Monday, 7 March 2022

 सौर कृषिपंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी

शेतकरी मेळावे घेऊन मार्गदर्शन करणार

        - ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे.

            मुंबई, दि. 7 :- सौरकृषिपंपांच्या देखभाल-दुरुस्ती मार्गदर्शनासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन त्यांना सौरकृषि पंप वापराबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.

            विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी वाशिम जिल्ह्यातील औरंगपूर येथे मुख्यमंत्री कृषिपंप योजनेंतर्गत बसविण्यात आलेले सौरपंप नादुरुस्त असल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी उत्तर दिले. औरंगपूर येथील श्रीमती सिंधुबाई भगत यांनी त्यांच्या शेतात मे. स्पॅन पंप्स, पुणे या कंपनीद्वारे बसविलेल्या सौरकृषिपंपाबद्दल तक्रार केली होती. या तक्रारीचे निराकरण देखील कंपनीद्वारे करण्यात आले होते, त्यानंतर श्रीमती भगत यांनी त्यांच्या सौरकृषिपंपाबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यावेळी या पंपाची तपासणी केली असता स्प्रिंक्लरवर लावलेले पाईप हे व्यवस्थित न बसवल्याने पाणी येत नसल्याचे निदर्शनास आले, ते व्यवस्थित करुन देण्यात आलेले असून श्रीमती भगत यांनी त्यांच्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे, असे सांगून ऊर्जा राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सौरकृषिपंप वापराची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी मेळावे घेतले जातील, तसेच आगामी येऊ घातलेल्या ‘कुसुम’ योजनेतूनही माहिती दिली जाईल, असे सांगितले.

 

विधानसभा प्रश्नोत्तरे.

कोळगाव उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरचा गरजेप्रमाणे वापर

- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

            मुंबई, दि. 7 :- सोलापूर जिल्ह्यातील कोळगाव-जेऊर उपविभागातील धरणालगत असलेल्या कोळगाव उपकेंद्रात तात्पुरत्या स्वरुपात बसविण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला होता, तो बंद पडलेला नाही तर त्याचा गरजेप्रमाणे वापर सुरु असून त्यामुळे कोणताही तोटा किंवा नुकसान झालेले नाही, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

            विधानसभा सदस्य संजयमामा शिंदे आणि बबनराव शिंदे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले की, कोळगाव उपकेंद्रातील 5 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरुन तीन वाहिन्यांद्वारे त्या भागातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरील भार कमी करण्यासाठी ३.१५ एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर तात्पुरत्या स्वरुपात बसविण्यात आला होता. त्यानंतर धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे आणि इतर कारणांमुळे तो ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आला. ३१ जानेवारी २०२२ रोजी ३ एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर या उपकेंद्रात कार्यन्वित करण्यात आला असून गरजेप्रमाणे त्याचा वापर सुरु आहे. हा ट्रान्सफॉर्मर बंद केल्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही हे राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी स्पष्ट केले.

००००


 

 देवसरीतील 99 घरांच्या पुनर्वसन प्रस्तावाला

मान्यता देणार- मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 7 :- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील देवसरी या पूरग्रस्त गावच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव महिन्याभरात पाठविण्याच्या सूचना जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना देण्यात येतील आणि या प्रस्तावाला मान्यता देऊन या गावातील 99 घरांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

            विधानसभा सदस्य संतोष बांगर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, २००६ मध्ये झालेली अतिवृष्टी आणि पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे देवसरी गावातील पूरबाधित १८७ कुटुंबांपैकी ९९ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास सादर केला होता. हा प्रस्ताव शासनाने १ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन पत्रान्वये अमान्य करण्यात आला. या बाधित कुटुंबांचे पुनर्वसन होणे अभिप्रेत असताना हा प्रस्ताव परत केला आहे. त्यामुळे पुनर्वसन अधिकाऱ्यांनी महिन्याभरात हा प्रस्ताव शासनाकडे पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात येतील आणि या प्रस्तावाला मान्यता देऊन ९९ घरांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सभागृहाला सांगितले.


०००० 

 *BUY ONE GET ONE FREE*

🙏😃🙃😄👍🙏


😊एक विकत घ्या त्यावर

🤗एक फुकट घ्या.

विचार केला तर ही एक व्यापारी व्यवस्था वाटते पण वास्तवात ती आपल्या जीवनाशी निगडित व्यवस्था आहे.

जर आपण 😡 *'राग'* विकत घेतला तर आपल्याला 

 😱 *'एसिडिटी'* फुकट मिळते.

जर आपण 😏 *'ईर्ष्या'* विकत घेतली तर आपल्याला 

 🤕 *'डोकेदुखी'* फुकट मिळते.

जर आपण 😤 *'द्वेष'* विकत घेतला तर आपल्याला 

 😬 *'अल्सर (पोटदुखी)'* फुकट मिळते.

जर आपण 🥺 *'ताणतणाव'* विकत घेतला तर आपल्याला 

 😟 *'रक्तदाब (BP)'* फुकट मिळतो.

अशाप्रकारे आपण वार्तालाप (बोलचाल) करून 

🥰 *'विश्वास'* विकत घेतला तर आपल्याला 🤩 *'मैत्री दोस्ती'* फुकट मिळते.

जर आपण 💪 *'व्यायाम कसरत'* विकत घेतला तर आपल्याला 

 ☺️ *'निरोगी आयुष्य'* फुकट मिळते.

जर आपण😇 *'शांती'* विकत घेतली तर आपल्याला 

 😍 *'समृद्धी'* फुकट मिळते.

जर आपण ✋ *'ईमानदारी प्रामाणिकपणा'* विकत घेतला तर 

आपल्याला 😴 *'झोप'* फुकट मिळते.

हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की, आपण काय विकत घेतलं पाहिजे...!                        

👍🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹









 

 🌹🌹🌹


*The secret of success in any relationship lies in turning one alphabet upside-down-*

*'ME' to be turned into 'WE'!*


*🌹Good Morning🌹*

Featured post

Lakshvedhi