Thursday, 24 February 2022

 एमटीडीसीच्या निवास व न्याहारी योजनेद्वारे पर्यटक सुविधांबरोबरच उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होईल

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. 24 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) निवासन्याहारी तसेच महाभ्रमण योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण भागातील उद्योजक यांना उद्योगसंधी आणि सर्वसामान्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईलअसा विश्वास पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

            कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. आता परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याने एमटीडीसीमार्फत निवास व न्याहारी आणि महाभ्रमण योजनेबाबत माहिती देणारी दोन दिवसांची कार्यशाळा नुकतीच दिवेआगर येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यमंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत एमटीडीसीचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी योजनेच्या सादरीकरणाद्वारे पर्यटन संकल्पनांच्या व्यावसायिक संधीशासकीय योजनांचे स्वरूप यांची माहिती देऊन त्याबाबतचे प्रशिक्षण दिले.

           पर्यटन राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्यारायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. एमटीडीसीच्या विविध योजनांचा उद्योजकांनी येथे नक्कीच लाभ घ्यावा. महामंडळाने या योजनेत अधिकृतरित्या नोंदणीसाठी काही अटी शर्ती आखल्या असून नोंदणी केल्यानंतर पर्यटकांना काय सुविधा द्याव्यापर्यटकांच्या निवासासाठी काय कार्यपद्धती असावी याचे मार्गदर्शन करण्यात येते. ग्रामीण भागातील पर्यटनाच्या व्यावसायिक संधीबाबत तरुणवर्ग जागरूक होत आहे ही एक सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी निवास व न्याहारी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या व्यावसायिकांना राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

            एमटीडीसीच्या निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनांना आजवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पर्यटन क्षेत्रात या उपक्रमांचे महत्व सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना तसेच सामान्य जनतेला उत्पन्नाचा स्रोत म्हणून निवास व न्याहारी योजनेअंतर्गत नोंदणी करून आपली जागाकक्ष किंवा निवास व्यवस्था पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक अनुभवांसह परवडणाऱ्या दरात प्रदान करता येते. अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवली जावी या उद्देशाने या कार्यशाळेत सहभागी झालेल्या इच्छुकांना या योजनांचे स्वरूप व त्याबाबतची माहिती दिली गेली.

०००००


 राज्यात लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम

•       कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

         मुंबई, दि. 22 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ०८ ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबर २०२१ तसेच ८ जानेवारी, दि.०९ जानेवारी दि.३१ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केलेले आदेश राज्यात अद्याप लागू आहेत. त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम आहेत. नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
         कोविड विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी १५ जुलै, .१० ऑगस्ट आणि .११ ऑगस्ट २०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्बंधाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र  तरीही  ०८ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर २०२१, दि.८ जानेवारी, दि.०९ जानेवारी दि. ३१ जानेवारी २०२२ या तारखांना निर्गमित केलेले आदेश अद्याप लागू आहेत. तरी नागरिकांनी व विविध सेवा देणाऱ्या संस्थांनी लसीकरण झाले असले तरी व झाले नसले तरी सार्वजनिक प्रवास करताना मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार धुणे अशा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसुल करण्याचा

महामंडळाचा कोणताही निर्णय नाही एसटी महामंडळाची स्पष्टोक्ती

        मुंबई, दि. 22 : एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसुल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांनी स्पष्टपणे सांगितले.
        एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसावे लागते आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचारधीन आहे, असे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. वास्तविक, अशा प्रकरणी संपामुळे होणारी महसुली नुकसान भरपाई कामावर रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनातून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही किंवा तसा प्रस्तावही विचारधीन नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच अशा तथ्यहीन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
        दरम्यान, संपामुळे सर्वसामान्य प्रवासी, ज्येष्ठ नागरिकांचे तसेच शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कामगारांनी आपल्या कर्तव्यावर हजर व्हावे, असे आवाहनही श्री. चन्ने यांनी केले आहे.
00000


 

 महानगरपालिका व नगरपालिकामधील सफाई कामगारां

वारसा हक्काचा प्रश्न मार्गी लागणार

- सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे

लाड-पागे समितीच्या शासननिर्णयात सुधारणा करणार

            मुंबई, दि. २३ : सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत सफाई कामगारांच्या विविध संघटनांच्या मागण्या व महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने शिफारशी केलेल्या आहेत. लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत आतापर्यंत शासनाच्या विविध विभागांनी सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत काढलेले सर्व शासननिर्णय एकत्र करून सुधारीत शासननिर्णयाचा प्रस्ताव मंत्रीमंडळात प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत सांगितले.

            मंत्रालयातील दालनात लाड-पागे समितीच्या शासननिर्णयात सुधारणा करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, दूरदृश्यप्रणालीव्दारे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सफाई कामगार नेते गोविंदभाई परमार, सुभाष मालपानी, शकील मुजावर यावेळी उपस्थित होते.

            सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या 2016 रोजीच्या शासननिर्णयानुसार फक्त वाल्मिकी मेहेतर व इतर अनुसूचितजाती मधील सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क लागू होता. इतर सर्व जातीच्या सफाई कर्मचारी यांनाही न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यामध्ये बदल करून सर्वच जातीच्या सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क लागू करणे, यासह सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत सफाई कामगारांच्या विविध संघटनांच्या मागण्या व महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोग यांनी केलेल्या शिफारशींचाही विचार करण्यात येईल.

            सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करून लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत आतापर्यंत विविध विभागांनी सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत काढलेले सर्व शासननिर्णय एकत्र करून सुधारीत शासननिर्णयाचा प्रस्ताव मंत्रीमंडळात सादर करण्यात येईल यामुळे राज्यातील सर्व महानगर पालिका व नगरपालिकामधील वारसा हक्काचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे श्री. मुंडे यांनी सांगितले.

धारावी येथे भीम थीम पार्कसह सभागृह बांधकामाच्या प्रस्तावांवर लवकरच कार्यवाही

            धारावी येथे संत रोहिदास सभागृह, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह तसेच धारावी येथे भीम थीम पार्क उभारणे हे तीन प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे सादर करण्यात यावेत, लवकरात लवकर या प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झालेल्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सांगितले.                                                                

दिव्यांगांचे राज्य स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

            मागील काही वर्षांपासून राज्य स्तरावर दिव्यांग अधिकारी-कर्मचारी, उद्योजक, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार या वर्षी दिले जावेत यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. मागील पाच वर्षातील प्रलंबित पुरस्कार प्रदान करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

*****



 

 ❤️ *भारतीय स्त्रियांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण : फ्रीजमधील वस्तू लवकर वापरून संपवा*❤️


◆ फ्रीजमधील वस्तूंचा आणि कॅन्सरचा काय संबंध? 

पण आहे. 

◆ दुधापासुन दही  

◆ बटर पर्यंत 

◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,

◆ पोहे, 

◆ रवा, 

◆ लोणचे, 

◆ पापड, 

◆ मसाले, 

◆ सुकामेवा, 

◆ भाजीपाला 

जे असेल ते कोंबा फ्रीजमध्ये, 

ही महिलांची वृत्ती.

इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळ, 

◆ कालची शिल्लक राहिलेली 

■ डाळ, 

■ भाजी, 

■ चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली  

■ मसालावाटण, 

■ सर्वप्रकारची कडधान्ये, 

■ वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, 

■ उरलेली शितपेये,  

■ मिठाया, 

एक ना धड भाराभर वस्तू!

या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे.  

पण कॅन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत. 

अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. 

पण १००० व्यक्तींचा अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील ५३८ जणांना कॅन्सरची लागण झाली असून, यात स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे

आणि आश्चर्य म्हणजे या ५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार चालू होता.

■ फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, लागते तेवढेच आणा. 

■ इडली, डोसा, 

■ वडा सांबरच पीठ आणा ताज ताज करण्यापुरतं.. 

आठ आठ दिवसाच नाही. 

■ चणा डाळीचं पीठ, 

■ जोंधळा पीठ, 

■ कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.

फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा. 

दूध ४८ तासांत वापरून शिल्लक

राहिलेलं फेकून द्या ! ठेवू नका.

साभार : डॉ. मकरंद करमरकर

*टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई*

*एक विनंती हा मेसेज प्रत्येक घरात व घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोंचवा.*

*आपले ज्यावेळी कैंसरने अवेळी आपणाला सोडून जातात त्याचे दु:ख उमजा*🙏🙏🙏🙏

Featured post

Lakshvedhi