सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 20 February 2022
Saturday, 19 February 2022
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दीष्टांमध्ये सुधारणा
- अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना मिळणार लाभ
मुंबई,दि.19 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत जिल्हानिहाय उद्दीष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात 25 लाख 05 हजार 300 अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना तर 5 कोटी 92 लाख 16 हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक हक्क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यासाठी 76.32 टक्के ग्रामीण(469.71लक्ष) व 45.34 टक्के शहरी ( 230.45लक्ष) असे एकूण 7 कोटी लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे.
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील माहितीच्या आधारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत जिल्हानिहाय उद्दीष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर सध्या राज्यात अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांची संख्या नाशिक, जळगाव,नंदूरबार, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सात जिल्ह्यात सर्वाधिक आहे. नाशिक जिल्हयातील अंत्योंदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 78 हजार 563, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 29 लाख 80 हजार 804,जळगांव जिल्हयात अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 35 हजार 192 तर प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी संख्या 22 लाख 19 हजार 690 ,नंदूरबार जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 06 हजार 857 प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यी संख्या 7 लाख 41 हजार 360,अमरावती जिल्ह्यातील अत्योंदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 25 हजार 632, तर प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी संख्या 14 लाख 8 हजार 878 ,यवतमाळ जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 32 हजार 603 तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 14 लाख 69 हजार 136 ,चंद्रपूर जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 40 हजार 621 तर प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी संख्या 10 लाख 74 हजार 240,गडचिरोली जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 02 हजार 338 तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 4 लाख 57 हजार 869 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. राज्यात एकूण 25 लाख 05 हजार 300 अंत्योदय शिधापत्रिकाधारक तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 5 कोटी 92 लाख 16 हजार यांना सवलतीच्या दरात योग्य व गरजू व्यक्तींना अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे.
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्यांचा सुधारित इष्टांक देण्याच्या दृष्टीने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वर (Digitisation) संगणकीकरण करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सुधारित इष्टांक देताना जिल्हा , शहर अथवा गाव हे घटक विचारात न घेता राज्य हा घटक विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार पात्र असलेल्या शिधापत्रिकेवरील ज्येष्ठ महिलेच्या नावावर कुटुंबप्रमुख असा शिक्का मारण्याची खबरदारी यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांक वाढीबाबतचा शासन निर्णय दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जय जय जय शिवाजी ’ च्या गजराने महाराष्ट्र सदन दुमदुमले
नवी दिल्ली दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळयातील ढोल-ताशांचे दिमाखदार सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फुर्त घोषणांमुळे आज राजधानीतील ल्युटियन दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचा परिसर दुमदुमला.
शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज्ञी राजे संयोगिता राजे छत्रपती ,युवराज राजे शहाजी राजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेतला. यानंतर पालखी पुजन करण्यात आले.
महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळयाला छत्रपती परिवारातील सदस्य, खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हसंराज अहिर, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांसह वरिष्ठ अधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर कुमार बिस्वास, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त डॉ. निधी पांडे, महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण
ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले होते आणि सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निणादून गेले होते. नाशिक येथील 30 वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांना ठेका धरायला लावला.
संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले.यावेळी युवराज राजे शहाजी राजे छत्रपती, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...