सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 14 February 2022
Sunday, 13 February 2022
एलोरा लेण्याजवळील किर्तिस्तंभ हटवला जाणार नाही : केंद्रीय संस्कृती मंत्री जी.किशन रेड्डी*
एलोरा लेण्याजवळील कीर्ती स्तंभ हटवण्याचे पत्र पुरातत्त्व विभागातर्फे जैन समाजाला पाठवण्यात आल्याचे समजल्यानंतर देशभरातील जैन समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. यासंबंधी 'अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे' राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री ना. जी. किशन रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर जी.किशन रेड्डी यांनी जैन समाजाच्या भावना दुखावतील असा कोणताही निर्णय पुरातत्व विभागातर्फे केला जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही देऊन यासंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
जैन समाजाचे राष्ट्र निर्माण कार्यातील असलेले योगदान, भगवान महावीर यांचा विश्व शांतीचा संदेश देशातील सर्वांसाठीच सन्माननीय आहेत, त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे कार्य होणार नाही. अशी ग्वाही दिली. या संबंधी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी एक विडिओ संदेश ही यावेळी प्रसारीत केला.
जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी कीर्ती स्तंभाची उभारणी व त्याच्या देखभाली संबंधातील माहिती देऊन याविषयीच्या समाजाच्या भावना व्यक्त केल्या.
याचबरोबर जैन समाजाच्या देशभरातील विविध ठिकाणी असलेल्या प्राचीन तीर्थक्षेत्र संबंधी पुरातत्त्व विभागाकडून येत असलेल्या अडचणी, अनेक प्राचीन मंदिरांचा प्रलंबित असलेला जीर्णोद्धार, विविध ठिकाणी उत्खननात आढळणार्या जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा व मंदिरांचे अवशेष याचे हस्तांतरण यासंबंधी येणाऱ्या अडचणी, या बाबीवर संस्कृती मंत्र्यांशी ललित गांधी यांनी सविस्तर चर्चा केली. प्राचीन मंदिरांचे जीर्णोद्धार, प्राचीन तीर्थक्षेत्र यांच्या जीर्णोद्धार संबंधित विषय, सम्मेद शिखरजी, गिरणार, शत्रुंजय आदी तीर्थांचे पावित्र्य जपण्याच्या विविध मागण्या, यासंबंधी पुरातत्त्व विभाग, संस्कृती खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळासमवेत केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल असे स्पष्ट आश्वासनही श्री रेड्डी यांनी दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, महासंघाच्या आंध्र प्रदेश विभागाचे अध्यक्ष मुकेश चौहान, तेलंगणा विभागाचे अध्यक्ष विमल नहार, दिगंबर समाजाचे पदाधिकारी अशोक पहाडे, मिथुन पोरवाल आदी मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला.
या वेळी केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचा विशेष सत्कार केला.
*मी असेपर्यत येत रहा*
अगदी काळजात धस्स करणार वाक्य, मरणासन्न बाबा. ऊभ्या आयुष्यात कधीही न झुकलेला, न थकलेला, हारजीत, उन पाऊस सगळ धिरानं पचवलेला माझा बाप. आज बेडवरुन ऊठु शकत नाही. सुन मुलगा करतात सगळं पण त्याला नाईलाजाची किनार आहे की कर्तव्य की प्रेम माहीत नाही. आणि सासरी गेलेल्या लेकी, त्यांच्या जगात व्यस्त आहेत. नाही म्हणायला पाच सहा दिवसांतुन व्हिडीओकॉल करतात. आणि बाबा म्हणतात, *"मी असेपर्यत येत रहा".* डोळ्यातुन गंगा यमुना वहातात.
अगदी जन्म झाल्यापासुन, दवाखान्यातुन घरी आणणारा, रात्री बेरात्री जागुन खांद्यावर जोजवणारा बाप. शाळेच्या पहिल्या दिवशी अलगद हात सोडणारा बाप. सायकल शिकवताना "हो जमतय. जमतय , बँलेन्स कर हँन्डल, समोर बघ" म्हणुन अचानक हात सोडुन आत्मविश्वास दुणावणारा बाबा. कॉलेजात पहिल्या दिवशी काळजीत दिसणारा, परिक्षेच्या रात्री डोक्यावरुन हात फिरवणारा बाप. स्वतःसाठी फाटके बुट, बटनाचा फोन वापरुन कॉलेजची भरमसाठ फी भरणारा बाबा. बाहेरची घोंघावणारी वादळे थोपवुन धरतोय दरवाजातच बाजीप्रभु सारखा. आपल्याला नेहमी हसताना दिसतो. जखमा, वार, अपमान, कढ, हुंदके , कुठल्यातरी फाटक्या शेल्यात गुंडाळतो. नोकरी , छोकरी आपल्याला मिळते पण आभाळाएवढं कौतुक त्याला असत. आपल्या पहिल्या पगारातुन आपण घेतलेला शर्ट, घड्याळ सा-या जगाला भाबडेपणाने दाखवत बोलतच राहतो. आई रागावली की बाबा बुलेटप्रुफ जँकेट सारखा बचाव करायला उभा असतो. "करु दे ग तिला तिच्या मनासारखं" अस म्हणतो खर पण आतुन साफ घाबरलेला, काळजीत असतो. पण त्यात लेकीची काळजीच असते .
मुलीच / मुलाचं लग्न ठरल की, तो मनाची बांधाबांध करायला सुरुवात करतो. जणु तिस-या अंकाची नांदी . " काही चुकल तर पोरीला संभाळुन घ्या " अस हात जोडुन सांगणारा बाप सगळ्यांनाच माहीती आहे. पण त्याच वेळी मुलाच्या लग्नात सुनेच्या आई वडिलांना , "काळजी करु नका, आता ती माझी मुलगी आहे".अस भरभरुन आश्वासन देणारा आणि तंतोतंत पाळणारा बाप असतो. तो सुनेत आपल्या चिमण्यापरीला शोधत असतो. म्हणुनच, "बाबांच काही नाही गं, उलट खुप आधार वाटतो त्यांचा" अस गॉसिपींग करणा-या सुना घरोघरी दिसतात. पण सुन आणि सास-यात ठिणगी स्पर्धा, अस्तित्व आणि स्थान ह्यासाठीचा संघर्ष कधीच नसतो. असो.
आणि समजा पत्नी अगोदर गेली तर आतुन तुटलेला पण बाहेरुन अजुन अँडजेस्टेबल झालेला बाप बघायला मिळतो. मग नातवांना पाढे, कविता, श्लोक , गीता शिकवण्यात रमतो. आणि त्यांच्याकडुन स्मार्ट फोनची फीचर्स शिकत असतो. कधी तर सुनेला प्रेमाने स्वतःला राखी बांधायला सांगतो. मागे सुटलेले, विस्कटलेले नाते सोडुन नव्याने नाती बांधतो. कधी कधी सकाळी आठ साडेआठलाच पिक अवर ला फोन करतो, "काही नाही बर आहे ना सगळं , सहजच फोन केला गं" म्हणुन खुप काही सांगायच राहु देतो. मुलगी असो की मुलगा, सुन असो की जावई , मनात आणि मानात कुठेही वर खाली, पार्शलिटी न करणारा बाबा.
आजार बळावला, अंथरुण धरले तरी बाबांच विठुरायाचे भजन, रामरक्षा, अथर्वशीर्ष जप सुरुच असत. घर कस सुरक्षित आधाराखाली आहे वाटत रहात. त्यांच केवळ असण खुप बळ देणारं असत. आणि माहेरचा हक्काचा शेवटचा दुवा असतो बाप. बाप गेला की माहेर संपल्याची काळीज चिरणारी यातना होते. भाऊ, वहिनी, भाच्या, भाचे, सगळ मनापासुन करतात नणंदेच माहेरपण. ती ही दुःख विसरुन सगळ्यांवर बाबाचं पांघरुण घालते. पण ती सल, ती उणीव, ते खालीपण कुठेतरी आत जाणवत रहाते.
मित्र मैत्रिणिंनो, तुम्हालाही तुमचा बाबा म्हणाला की *" मी असेपर्यत येत रहा "* तर अगदी सर्व काम, लायबिलीटीज, कमिटमेंट, मिटींग्ज, सेमिनार, सेशन्स, टुर आणि अजुन काय जे असेल ते बाजुला टाकुन बाबाला भेटा.
सुरकुतलेल्या हातांवरुन, परतीच्या चाहुलीने सैरभैर झालेल्या, एकटेपणाने कोलमडलेल्या बाबाला धीर द्या, सांगा, *"हो बाबा, मी तुम्ही असेपर्यत आणि नसल्यावरही सगळं संभाळेल",* तुम्हाला त्यांच्या डोळ्यात भरुन पावल्याचं समाधान दिसेल.
*मी असेपर्यत येत रहा,*
*काळजात धस्स करणार वाक्य.*
*.*
😊😊💐💐
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...