सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 13 February 2022
Saturday, 12 February 2022
*60+ ज्येष्ठ नागरिक सहसा पुढील गोष्टींचा अनुभव घेतात:*
1. घशात अन्न अडकणे
2. मान दुखणे
3. पायात गोळे येणे
4. पायला मुंग्या येणे.
विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी खाली दिलेले सोपे उपाय डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी मदतीचे ठरू शकतात.
समस्या व उपाय
*१. घशात अन्न अडकणे*
आपल्याला फक्त "हात वर करणे" आवश्यक आहे.
हात डोक्यापेक्षा वर सरळ ताणल्यास , आपल्या घश्यात अडकलेले अन्न आपसुक खाली जाण्यास मदत होईल.
*२. मान दुखी*
कधीकधी आपण मानेच्या दुखण्यासह सकाळी उठतो. याला चुकीची उशी वापरणे हे एक कारण असू शकते. अशा परिस्थितीत आपण फक्त आपले पाय उचलून जर बोट ओढून आपले पाय एका घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरूद्ध दिशेने हलवले तर आराम मिळू शकेल
*३. पायात गोळे येणे*
जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळे अथवा पेटके आले असतील तर आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात पेटके आले असतील तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरे वाटेल.
*४. पायाला मुंग्या येणे*
जेव्हा डावा पायास मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला उजवा हात गोलाकार फिरवा, जेव्हा उजवा पाय मुंग्या येत असेल, तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला डावा हात गोलाकार फिरवा. याने लगेच फायदा होईल.
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
😂😂🤔😂😂😂😂
सांगा पोरांनो
पार्वतीने शंकराला आपला पती म्हणून का निवडले?
बंड्याने लगेच हात वर ☝ केला :-
मास्तरनी बंड्याला उत्तर देण्यास सांगितले...
बंड्याने पाच कारणे सांगितली...
१) शंकर वाघाचे कपडे बनवुन वापरत असल्यामुळे पार्वतीला कपडे धुण्याचा त्रास नव्हता...
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
२) शंकर कंदमुळे खात असल्यामुळे पार्वतीला स्वयंपाक करण्याची चिंता नव्हती...
🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈
३) शंकराच्या डोक्यावरूनच गंगा यमुना वाहात असल्याने पार्वतीला लांबून पाणी आणायची गरज नव्हती...
🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊
४) शंकराच्या डोक्यावरच चंद्र असल्यामुळे लोड शेडींग मधे मेणबत्त्या शोधायची कटकट नव्हती....
🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛
५) शंकराला माता पिता नसल्यामुळे सासू सासऱ्यांचा त्रास नव्हता...
🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬
अन मास्तर यामुळेच आताच्या पोरी असाच शंकरा सारखा नवरा मिळावा म्हणून सोळा सोमवारचे व्रत उपाशी राहुन करतात...!
😄😂😄😂😄😄😄😭😄😭😄बोला हर हर महादेव
ना चिंता ना भय हो, भोलेेनाथ की जय हो!!
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने कुसुमाग्रजांच्या साहित्य वाचनाचा उपक्रम
· ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त विशेष आयोजन
नवी दिल्ली, 11 :‘मराठी भाषा गौरव दिन’ या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्य वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात दिल्लीतील मराठी अधिकारी आणि पत्रकार सहभागी होणार आहेत.
वि.वा.शिरवाडकर यांनी मराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राने १४ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान त्यांच्या साहित्य वाचन उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात केंद्र व राज्य शासनातील दिल्लीत कार्यरत मराठी अधिकारी आाणि मराठी पत्रकार सहभागी होणार आहेत. वि.वा.शिरवाडकरांच्या कथा, कादंबरी,कविता आदि साहित्याचे मान्यवरांनी केलेले वाचन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिन्ही ट्वीटर हँडल, तिन्ही फेसबुक पेज, युटयूब चॅनेल, इन्स्टाग्राम आणि कु या समाजमाध्यमांवरुन प्रसारित करण्यात येतील.
‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘कुसुमाग्रज’
विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिध्द साहित्यिक वि.स.खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते दुसरे मराठी साहित्यिक. कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
वि.वा शिरवाडकरांचे एकूण २४ कविता संग्रह , ३ कादंबऱ्या, १६ कथा संग्रह, १९ नाटके, ५ नाटिका व एकांकीका आणि ४ लेखसंग्रह आदि साहित्य संपदा प्रसिध्द आहे. १९६४ मध्ये गोव्यात आयोजित ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये त्यांच्या ‘नटसम्राट’ ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले तर याच कलाकृतीला १९८७ मध्ये ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारही मिळाला.
कुसुमाग्रजांच्या कविता संग्रहाविषयी
कुसुमाग्रजांचे एकूण २४ कविता संग्रह प्रकाशित आहेत. यामध्ये जीवनलहरी, विशाखा , समिधा , किनारा, मेघदूत अनुवाद, मराठी माती, स्वगत ,जाईचा कुंज बालांसाठी कविता, हिमरेषा , वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, श्रावण, प्रवासी पक्षी, पाथेय, बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज, माधवी, महावृक्ष, करार एका ताऱ्याशी, चाफा, मारवा, अक्षरबाग, थांब सहेली या काव्यसंग्रहांचा समावेश आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ‘मराठी भाषा गौरव दिन उपक्रम-२०२१’ विषयी
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने २०२१ मध्ये ‘मराठी भाषा गौरवदिना’निमित्ताने कार्यालयाच्या सर्व समाज माध्यमांद्वारे कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला होता .यात महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्य व परदेशातील साहित्य प्रेमींनी सहभाग घेतला होता.
राज्य शासनाच्या ‘द्वि वर्षपूर्ती’ निमित्त सध्या महाराष्ट्र परिचय केंद्राची विशेष मोहीम
महाराष्ट्र शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सर्व समाजमाध्यमांद्वारे सध्या विशेष मोहीम राबविली जात आहे. यात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित ‘दोनवर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या पुस्तिकेतील माहितीवर आधारीत ध्वनिचित्रफीत दररोज प्रसारित करण्यात येते. या मोहिमेद्वारे राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेली जनकल्याणाची कामे व राबविलेल्या जनहितकारी योजनांची माहिती देण्यात येत आहे.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
होमगार्ड मुख्यालयात ‘होमगार्ड समाधान कक्ष’ स्थापन;
व्हॉट्सअॅपवरही होणार शंकांचे निरसन
मुंबई, दि. 11 : होमगार्ड संघटनेच्या अधिपत्याखालील जिल्हा होमगार्ड कार्यालयातील मानसेवी होमगार्ड, वेतनी कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रशासकीय व अन्य शासकीय बाबीशी संबंधी अनेक प्रकारच्या तक्रारींवर विहित वेळेत कार्यवाही करुन तक्रारदारांच्या शंकाचे निरसन करणे. त्यांना योग्य व समर्पक उत्तरे देणे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याकरिता होमगार्ड मुख्यालयात ‘होमगार्ड समाधान कक्ष’ स्थापन करण्यात आले आहे, असे महासमादेशक होमगार्ड, मुंबई कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सर्व मानसेवी होमगार्ड यांना काही सूचना / निवेदने करावयाचे असल्यास होमगार्ड मुख्यालयाच्या समाधान कक्षाचा व्हॉट्स अॅप क्रमांक ८३५५८६४९३२ यावर निवेदने / सूचना सादर करता येणार आहेत. सर्व मानसेवी होमगार्ड यांचेकडुन सुचना/निवेदने समाधान कक्षास प्राप्त झाल्यावर महासमादेशक डॉ. बी. के. उपाध्याय, उपमहासमादेशक श्री. ब्रिजेश सिंह हे व्यक्तीश: लक्ष देवून संबंधितांच्या शंकांचे निरसन करणार आहेत.
सर्व मानसेवी होमगार्ड/अधिकारी यांनी होमगार्ड संघटना सक्षम व त्याचे नाव उज्वल करण्याकरिता प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
००००
जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातीl
त्रूटी दूर करण्यासाठी सात शिफारशी सादर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध राज्यांच्या मंत्रीगटाची बैठक
मुंबई, दि. 10 :- जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी, यंत्रणेद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारांची प्रत्यक्ष तपासणी, बोगस व्यावसायिक नोंदणी रोखण्यासाठी प्रत्यक्ष तपासणी, जीएसटीएन नोंदणीवेळी वीजग्राहक क्रमांक अनिवार्य करणे, करदात्यांच्या बँकखात्यांचे ‘एनपीसीआय’ कडून प्रमाणिकरण, संशयित व्यावसायिकांचे गैरव्यवहार शोधण्यासाठी ‘फिडबॅक’ यंत्रणेची स्थापना, अशा सात शिफारशी जीएसटी परिषदेत करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विविध राज्यांच्या स्थायी मंत्रीगटाच्या दुसऱ्या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जीएसटी संकलन प्रक्रियेतील करगळती, करचोरी रोखण्यासाठी यंत्रणेचे संपूर्ण संगणकीकरण हा प्रभावी उपाय आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करुन जीएसटी वसुलीतील गैरप्रकारांना आळा घालणे, करचोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जीएसटी लागू झाल्यापासून या यंत्रणेत, व्यवस्थेत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करचोरी रोखण्यासाठी करतानांच ग्राहकांना सहज, सुरळीत सेवा देण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिकांच्या माहितीची पडताळणी, विश्लेषण करणारी यंत्रणा उपलब्ध असली पाहिजे. प्राप्तिकर प्रणालीशी जोडलेली ‘चेक्स अॅन्ड बॅलन्स’ यंत्रणा जीएसटीसाठी वापरल्यास करगळती रोखण्यास आणि महसुलवाढीस उपयोग होऊ शकतो. जीएसटी प्रणालीत सुधारणा करताना ती कर अधिकाऱ्यांप्रमाणेच करदात्यांना वापरण्यासही सहज, सुलभ, उपयुक्त असली पाहिजे. करदात्यांची गैरसोय होणार नाही, करदात्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना केली.
व्यावसायिकांची जीएसटी नोंदणी करताना सखोल पडताळणी करावी, नियमांचे पालन न करणाऱ्या बोगस व्यावसायिकांची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात यावी, रिटर्न फाईल करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करावी, आयटीसी साखळी नियमित ठेवणे तसेच खोट्या बिलांची तपासणी करण्यासारख्या उपाययोजना राबवण्यात याव्यात, करचोरी करणाऱ्या व्यावसायिकांची तसेच मोठ्या रकमेच्या आणि संशयित व्यवहारांची चौकशी करणे, जीएसटी प्रणालीतील माहितीचे अचूक विश्लेषण करणारी प्रभावी यंत्रणा विकसित करणे, आदी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्या.
व्यावसायिकांकडून रिटर्न फाईल करताना झालेल्या चुका सुधारण्यासाठी त्यांना ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करुन द्यावी, सिक्वेन्शियल फायलिंग यंत्रणेची अंमलबजावणी, नोंदणी रद्द झालेल्या बोगस व्यावसायिकांची माहिती ठळकपणे प्रसिद्ध करणे, पीओएसद्वारे होणाऱ्या व्यवहारांची माहिती बँकांद्वारे उपलब्ध करुन घेणे आदी मुद्यांवर राज्यांकडून मते मागवून त्यावर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले.
हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पालनिवेल थियागा राजन, आसामाच्या अर्थमंत्री श्रीमती अजंता नियोग यांनीही बैठकीत विचार मांडले.
००००००
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...