Monday, 7 February 2022

 ***धडधाकट व ऐतखावू, सुशिक्षित बेरोजगार समजणाऱ्या तरुण मुलांना लाजवीणारी पोस्ट **

&&&&पंक्चरचं दुकान &&&&&

*************************

पंक्‍चर काढण्याचे आगळे वेगळे दुकान

फुलेवाडी पहिल्या बसस्टॉपजवळच्या पंक्‍चर काढण्याच्या एका आगळ्या वेगळ्या दुकानाची ही कथा आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणे कामे टाळून फिरणाऱ्या तरुणांनी या दुकानातील मतिमंद मुले कशी मन लावून कामे करतात, हे पाहण्याची गरज आहे.

कोल्हापूर - ‘हे पंक्‍चर काढायचे दुकान आहे का, खुळ्याची चावडी’, असे काही लोक मुद्दाम चेष्टेने म्हणायचे... पंक्‍चर काढणाऱ्यांच्या हालचाली चेहऱ्यावरचे भाव पाहून कुत्सितपणे हसायचे. पण हे आठ जण मात्र समोरच्याकडे लक्ष न देता, शांतपणे काम करत राहायचे. एकजण पंक्‍चर झालेले चाक काढायचा. दुसरा पंक्‍चर शोधायचा. तिसरा पंक्‍चर काढायचा. चौथा हवा भरायचा. सुरुवातीला ते थोडे गोंधळायचे. हळूहळू त्यांचा जम बसला आणि आज पंक्‍चर काढायचे हे दुकान एकदम फास्ट आहे. विशेष हे की, येथे काम करणारे हे आठही जण मतिमंद, गतिमंद, मूकबधिर आहेत. पण शहाण्या धडधाकट माणसाला लाजवतील असा त्यांचा या कामात हात बसला आहे.

फुलेवाडी पहिल्या बसस्टॉपजवळच्या पंक्‍चर काढण्याच्या एका आगळ्या वेगळ्या दुकानाची ही कथा आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणे कामे टाळून फिरणाऱ्या तरुणांनी या दुकानातील मतिमंद मुले कशी मन लावून कामे करतात, हे पाहण्याची गरज आहे.

‘राबणाऱ्याला क्षितिज खूप मोठं’ हा संदेश

कामात रमल्याने या मुलांचे औषधही बंद झाले. सकाळी नऊला ही मुले कामाला येतात. आल्या आल्या कामाला सुरुवात करतात. दुपारी पंगत करून जेवायला बसतात. आपल्या आपल्यात हसतात, गंमत करतात. अधूनमधून खोड्या करतात. पण काम मनापासून करतात. राबणाऱ्याच्या हाताला क्षितिज खूप मोठं अतिं, हाच जणू संदेश ते आपल्या कृतीतून देतात.

श्रावण टायर अँड सर्व्हिसिंग सेंटर या दुकानाचे मालक महेश शामराव सुतार हे स्वतः एम.ए.बी.पी.एड आहेत. नोकरीच्या शोधात फिरत राहिले. पण नोकरी मिळण्यासाठी पदवीबरोबर ‘इतरही’ काही लागते हे लक्षात आल्यानंतर नोकरीचा नाद सोडला आणि वडिलांच्या पंक्‍चर काढण्याच्या दुकानात हवा भरण्याचे काम करू लागले. ते हळूहळू सर्व काम शिकले व त्यांनी आपल्याला नोकरी नाही मिळाली तरी इतरांना आपल्या व्यवसायात नोकरी द्यायचे व त्यासाठी त्यांनी मूकबधिर, अपंग व मतिमंदांना प्राधान्य द्यायचे ठरवले. कारण धडधाकट माणसाला कोणीही नोकरी देईल; पण अपंग, मतिमंदांना शक्‍यतो कोणी नोकरीवर ठेवत नाही. त्यांनी संभाजी रामचंद्र दिवसे, अभय गणेश केसरकर, अनिल मोहन खटावकर, अमिर गुलाब खान, संकेत सपकाळे, सुजित सुतार, किसन मुरलीधर कदम व ओंकार राजू मोरे या मतिमंद, मूकबधिर, अपंगांना कामावर घेतले.

खाणाखुणांनी गिऱ्हाईकाशी संवाद

ही मुले काम कशी करणार? त्यांना काम कसे समजणार, ते गिऱ्हाईकाशी कसा संवाद करणार हा प्रश्‍न होता. पण महेश सुतार यांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी या मुलांना काम शिकवणे सुरू केले. सुरुवातीला थोडा त्रास झाला. पण त्यांनी सर्व मुलांना काम शिकवले. त्यांच्या दुकानात ही मतिमंद, मूकबधिर अपंग मुले पाहून काही लोक कुचेष्टा करायचे. हे दुकान आहे की खुळ्याची चावडी आहे असे म्हणायचे. पण हळूहळू ही मुले मनापासून काम करू लागली. अगदी हौसेने पंक्‍चर काढणे, हवा भरणे, गाडी धुणे, स्वच्छ करणे यात गुंग होऊन गेली. खाणाखुणांनी गिऱ्हाईकाशी संवाद करू लागली.

आज दुकानातली सर्व कामे ही मुले आनंदाने करतात. कधीही कामाला दांडी मारत नाहीत, कामात चूक करत नाहीत; काम करताना तोंडात तंबाखू, मावा, पानपराग असली भानगड करत नाहीत. ही मुले इतके चांगले काम करतात हे त्यांच्या घरातल्यांनाही पटत नाही. कारण काम करण्यापूर्वी ही मुले त्यांच्या घरात अधूनमधून विक्षिप्त वागून घरच्यांना त्रास देत होती. आता ही मुले कामात रमली आहेत. ही मुले घरात पगार किती आणतात यापेक्षा ही मुले कामात रमली याचे त्यांच्या घरातल्यांना खूप समाधान आहे.

 *दूसरों की "छाँव" में खड़े होकर हम अपनी "परछाई" खो देते हैं..* *अपनी "परछाई" बनाने के लिए हमें खुद को धूप में खड़ा होना पड़ेगा..* 

    💐💐शुभ सकाळ 💐💐

 दिल्ली से अयोध्या जाने वाली ट्रेन का नाम रामायण एक्सप्रेस है जिसका आज पहला दिन है पूरी गाड़ी पूरी तरह से बुक हो चुकी है l रुद्राक्ष की माला पहने हुए इन व्यक्तियों को देखकर चौंकिए मत यह इस ट्रेन में खाने पीने का सामान देने वाले कर्मचारी हैं l


Sunday, 6 February 2022

 लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

            मुंबई दि. 6: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

 पुण्यातील इमारत स्लॅबची जाळी कोसळून मृत्यू पावलेल्या

पाच कामगारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

· मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत

· दुर्घटनेच्या चौकशीचे प्रशासनाला निर्देश

            मुंबई, दि. 4 :- पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

००००



 

 महाड येथे उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

            मुंबई, दि. 4: महाड येथे पूर निवारण व त्यासंदर्भातील उपाययोजनांबाबत सर्वंकष आढावा मंत्रालयात राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी खासदार श्री. सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, महाड शहराच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, अपर जिल्हाधिकारी श्री. अमोल यादव, हे बैठकीस उपस्थित होते.

            राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, पूर निवारणासाठी करावयाच्या महत्त्वाच्या उपाययोजनांच्या कार्यवाहीसाठी सध्या सावित्री नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्याचा काळ आहे. याबाबत प्रशासनामार्फत सर्वप्रकारे सकारात्मक कार्यवाही वेळोवेळी करण्यात येते. सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रगती कार्याचा नियमित आढावा विभागनिहाय बैठकीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. कोकण रेल्वे संदर्भातील अहवाल आयआयटी मुंबईकडून दि. 12 फेब्रुवारी रोजी तर राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील अहवाल दि. 14 फेब्रुवारी रोजी प्राप्त होणार असून त्यानंतर पुढील दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याविषयीची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात येईल, असेही राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.


            यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, कोकण किनारपट्टीवरील रायगड जिल्ह्याला वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. अतिपर्जन्याच्या या प्रदेशात कायमस्वरुपी ठोस उपाययोजना होण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने कालबद्ध अंमलबजावणी करावी, अशा सूचना श्री. तटकरे यांनी दिल्या.

            जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महाड पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी सर्व आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता प्राधान्याने करीत आहे. या उपाययोजनांशी संबंधित जलसंपदा विभाग, कोकण रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक त्या तांत्रिक बाबतीत तातडीचे सहकार्य जिल्हा प्रशासन करीत आहे. नदीपात्रातील गाळ काढून ठेवण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्थाही रायगड जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आल्याचे तसेच तातडीने दहा डंपर व दोन पोकलेन च्या सहाय्याने गाळ काढण्याच्या कामास सुरुवात केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी सांगितले.

            याशिवाय, या परिसरात सीआरझेडमध्ये चार बेटे आहेत त्यापैकी एका बेटावर मगरींचे वास्तव्य आहे. याबाबत पर्यावरणीय परिणाम सर्वेक्षण पहाणीनंतर पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

            यावेळी पाटबंधारे विभागाने महाड परिसरातील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असल्याने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी कुठेही खंड पडणार नाही तसेच नाम संस्थेस सर्व प्रकारचे सहकार्य विभागाकडून केले जाईल, असे स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्गावरील जुना सावित्री पूल काढून टाकण्याविषयीची कार्यवाही देखील मार्चपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

            जुलै महिन्यात आलेल्या महापुरात शहरातील महत्त्वाचा भाग पाण्याखाली होता. महाड तालुका कोकणातील सरासरी पर्जन्याहून अधिक पर्जन्यमान असलेला तालुका आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्ग, कोकण रेल्वे आदींमुळे शहराची लोकसंख्या अलिकडच्या काळात मोठ्या संख्येने वाढत आहे. पावसाळ्यात सावित्री नदीच्या पाण्याची पातळी वाढून जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी तसेच भविष्यात अतिवृष्टी व पुरामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करणे अनिवार्य आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या तातडीच्या उपाययोजनांमध्ये नजिकच्या कालावधीत कोकण रेल्वेच्या पूल परिसरातील भराव काढणे, सावित्री नदीचा गाळ व नदीपात्रातील बेटे काढणे, लहान धरणे बांधणे व सावित्री नदीपात्रातील अडथळे दूर करणे आदी महत्त्वांच्या कामांचा आढावा संबंधित शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीत घेण्यात आला.

            यावेळी कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता नागनाथ राव, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (यांत्रिकी) एम. एस. जीवने, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे डॉ. बाबाजी मस्कारे, आयआयटी मुंबईचे प्रो. सुबीमल घोष व पूर नियंत्रण समितीचे सदस्य उपस्थित होते.

0000



 

 व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वाहतुकीचा खर्च कमी करा ; निर्यात वाढवा - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी* 

*महाराष्ट्र चेंबरचे ४० वे अध्यक्ष ललित गांधी पदग्रहण समारंभ संपन्न* 

जगात भारत व देशात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सर्वात अधिक गतीने वाढत आहे.  निर्यात वाढवून आयात कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी व व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी वाहतुकीसाठी होणारा खर्च कमी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र चेंबरने राज्याच्या विकासासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांचा असेल. इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. महाराष्ट्र चेंबरने राज्याचा जिल्हावार अभ्यास करून महाराष्ट्रच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार करून द्यावी व महाराष्ट्र चेंबरचे नुतन अध्यक्ष ललित गांधी निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार करून त्यावर काम करतील याची खात्री असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांनी केले.
चेंबरच्या प्रथेप्रमाणे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अध्यक्षीय ट्रॉफी देऊन नूतन अध्यक्ष ललित गांधी यांचे पदग्रहण करण्यात आले.  
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व अर्थसंकल्पानंतर महाराष्ट्रातील विकासाची नवी दिशा याविषयावर परिषद व मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक  ५ फेब्रुवारी २०२२  रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथे संपन्न झाला. सदर  परिषदेचे फेसबुक, युट्युब, ट्विटरच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे ४० वे अध्यक्ष कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योजक ललित गांधी यांनी चेंबरच्या महोत्सवी वर्षापर्यंतच्या ६ वर्षांची ब्लु प्रिंट सादर केली. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या ६ विभागासाठी ६ महिला उद्योजिका क्लस्टर, कृषिपूरक उद्योगांचे क्लस्टर व उत्पादन आधारित उत्पादनांचे ६ क्लस्टर चेंबरच्या पुढाकाराने उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच चेंबरतर्फे सभासद व सहयोगी सभासद संस्थांच्या सभासदांना व्यापार विकासासाठी वेबसाईट व डिजिटल प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध करून आहे. तसेच चेंबरतर्फे उत्पादक ते विक्रेता अशा व्यापार वृद्धीसाठी व सभासदांच्या व्यापार वृद्धीसाठी लवकरच अँप उपलब्ध करून देणार असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. 
केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. भागवत कराड यांनी देशाच्या अर्थसंकल्पात विकासाच्या अनेक योजना केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत. आजादी का अमृत महोत्सव साजरे करत असतांना पुढचे २५ वर्षांचा काळ हा अमृत काळ असेल. त्यादृष्टीने सरकारने काम सुरु केले आहे. क्रिप्टो करन्सीला सरकारने मान्यता दिलेली नाही त्यावर ३० टक्के कर आकारण्यात आल्याचे सांगितले. देशात ७५ डिजिटल बँक सुरु करण्यात येत आहे. डिजिटल करन्सी आल्यावर पारदर्शकता येईल. भ्रष्टाचार संपुष्टात येईल. राज्याच्या व देशाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजना समजून घ्या व त्याचा प्रचार प्रसार करून सर्वांना त्याचा फायदा मिळण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करा. राज्याच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करू असे प्रतिपादन डॉ. भागवत कराड यांनी केले. 

माजी वस्त्रोउद्योग मंत्री प्रकाश आवाडे व माजी मंत्री राज के. पुरोहित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगीव्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे ४० वे अध्यक्ष ललित गांधी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रियवित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. उमेश दाशरथी, विश्वस्तमंडळाचे चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष श्री. करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे, माजी वस्त्रोउद्योग मंत्री श्री. प्रकाश आवाडे , माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा उपस्थित होते.  
याप्रसंगी नूतन पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व तज्ञ समिती चेअरमन, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांचा सत्कार अध्यक्ष ललित गांधी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रियवित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, माजी वस्त्रोउद्योग मंत्री श्री. प्रकाश आवाडे, विश्वस्त मंडळाचे चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष सौ. मीनल मोहाडीकर, श्री. संतोष मंडलेचा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.  उपस्थितांचे स्वागत व पाहुण्यांचा परिचय वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. उमेश दाशरथी यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री. करुणाकर शेट्टी यांनी मानले. 

कार्यक्रमास  विश्वस्त खुशालचंद्र पोद्दार, माजी अध्यक्ष श्री. शंतनु भडकमकर, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे, सचिव विनी दत्ता, कार्यकारिणी सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi