Friday, 7 January 2022

 *मी....*.

*मी तर एकच आहे तरीही,*

*प्रत्येकास वेगळा वाटत गेलो.*

*ज्याचा जसा भाव माझ्याशी*

*त्याला तसाच भेटत गेलो..!*

*प्रेमळ माणसांना घरचा वाटलो.*

*कावेबाजांना परका वाटलो,*

*सोबत चालणाऱ्यांस सखा वाटलो.*

*पाय ओढणाऱ्यांस पुढचा वाटलो.!*

*मैफलीत कधी कवी वाटलो,*

*कुणाला सुरेल गायक वाटलो.*

*व्यासपीठावर वक्ता वाटलो,*

*आंदोलनामध्ये नायक वाटलो.*

*कुणाला संगीतकार वाटलो,*

*कुणाला कलाकार वाटलो.*

*मैदानावर मी खेळाडू वाटलो,*

*मैत्रीच्या दुनियेत खिलाडू वाटलो.*.

*सज्जनांना मी भावूक वाटलो,*

*बाजारबुणग्यांना घाऊक वाटलो.!*

*जळणाऱ्यांना मुजोर वाटलो,*  

*मुजोरांना मी शिरजोर वाटलो.!*

*लबाडांनी राजकारणी मानलं,*

*चोरट्यांनी मलाच चोर मानलं.!*

*टवाळांनी तर 'हा पोर' मानलं,*

*पण शहाण्यांनी 'थोर ' मानलं.*

*हिरा म्हणून कुणी जवळ केलं.*

*दगड समजून फेकून ही दिलं.*

*सुगंध लुटण्यास जवळ केलं,*

*मन भरल्यावर निर्माल्य केलं.*

*मैत्री नावाचे बुरखे चढवून,*

*दोस्तीत कुणी कुस्ती केली.*

*विश्वास,वचनांच्या गाठी बांधून*,

*नात्यांत काहींनी मस्ती केली.*

*प्रेम करणाऱ्यांनी जवळ केलं.*

*सोंग करणाऱ्यांनी दूर केलं*.

*संधीसाधूंनी साधून घेतलं.*

*जाणकारांनी पण जाणून घेतलं..*

*चरित्र नसलेल्यांनीच माझ्या*

*चारित्र्यावर कचरा फेकला.*

*वासनेच्या दलदलीतून सहज*

*माझ्या प्रेमाचा निचरा केला..!*


*ज्याने ज्या चष्म्यातून पाहिलं,* 

*त्याला तसाच मी वाटत गेलो.*

*पण त्या प्रत्येकालाच मी मात्र* 

*आनंदाचे क्षण वाटत गेलो*....


🙏🙏🙏🙏🙏





 

 *वेळ खराब असेल तर निघून जाईल*

*पण मोबाईल खराब असेल तर वेळ जात नाही*


*एक नवीन संशोधन* 😉😀


 

Featured post

Lakshvedhi