केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेत अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या
घटकांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याबाबत आवाहन
मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. मासाका/२०१८/प्रक्र. २५९ (२)/अजाक, दिनांक 08 मार्च, २०१९ अन्वये केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनुसुचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नव उद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षम नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थ्यांना एकुण प्रकल्प किमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्श्यामधील २५ % मधील जास्तीत जास्त १५ % मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
योजने बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य, शासन निर्णय क्र. मासाका /२०१८/प्रक्र. २५९(२)/अजाक, दिनांक ०८ मार्च, २०१९ मध्ये प्रस्ताव सादर करण्याबाबत सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तरी इच्छुक नव उद्योजकांना सुंदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयामध्ये नमुद माहितीनुसार सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबुर, ४०००७१ यांचे कार्यालयामध्ये योजनेच्या लाभाकरीता अर्ज सादर करावा.
अर्ज करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबुर (पूर्व), मुंबई ४०० ०७१ दुरध्वनी ०२२ २५२२२०२३, ईमेल आयडी acswomumbaisub@gmail.com या पत्यावर अर्ज करावा. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.
००००
नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस
“आचार्य पार्वतीकुमार" राज्य सांस्कृतिक पुरस्कार
मुंबई, दि. 30 : राज्यात एकूण 12 विविध सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते.यापैकी "नृत्य" या कलाक्षेत्रातील पुरस्कार यावर्षापासून “आचार्य पार्वतीकुमार" यांचे नावाने देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे .
००००
मुंबई शहर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना (GOIPMS-SC) साठी सन २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता महाडिबीटी पोर्टल http://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर दि १४ डिसेंबर २०२१ पासून प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याकरिता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या नूतनीकरण (Renewal) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ०४ जानेवारी २०२२ आहे तर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या नवीन अर्ज (Fresh) ऑनलाईन सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०९ जानेवारी, २०२२ आहे. तरी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरावे असे, आवाहन मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.
00000