Alibag chya लोकांचं एक बरं असतं...
31st चा प्लॅन कॅन्सल झाला तरी Alibag la असतात..
🤣🤣🤣
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
सदर लिंक प्रत्येकाने आपल्या मोबाईल कंप्युटर व लॅपटॉप मधे जपुन ठेवा / सेव्ह करुन ठेवा. आपल्याला कोणत्याही स्तोत्र मंत्र किंवा धार्मिक ग्रंथांचे पुस्तके घेण्याची गरज नाही.
vignanam.org/mobile/
धन्यवाद टेक्नॉलॉजी
खरेच अतिशय कौतुकास्पद link बनवली Great Job🙏
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन.
मुंबई, दि. 30 : कायम विनाअनुदान तत्वावर नवीन खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करणे आणि विद्यमान खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन व्यवसाय/ जादा तुकडी/ व्यवसाय बदल करण्याकरिता ऑनलाईन अर्ज करणे. यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील विद्यमान खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना तसेच नवीन खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास इच्छुक असलेल्या संस्थांनी http://vti.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 31 डिसेंबर 2021 पर्यंत पुन्हा पोर्टल सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.
इच्छुक विद्यमान खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच नवीन खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास इच्छुक असलेल्या संस्थांनी ऑनलाईन अर्ज करावेत. मात्र त्याकरीता डी.जी.ई.टी. नवी दिल्ली यांचे दि.4 ऑगस्ट 2021 चे पत्रात नमूद केलेल्या अटी व शर्ती ह्या कायम राहतील, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.
०००००
मुंबई उपनगर जिल्ह्यांर्तगत शासकीय वसतिगृहाच्या
प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 30 : मुंबई उपनगर जिल्ह्यांर्तगत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांच्या अधिनस्त चार शासकीय वसतिगृह असून या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या राहण्याची, भोजनाची मोफत सुविधा आहे. या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना मासिक निर्वाहभत्ता, स्टेशनरी रक्कम देण्यात येते. या वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
वसतिगृहातील रिक्त जागा पुढीलप्रमाणे : मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलुंड (गुणवंत विद्यार्थ्याचे वसतिगृह) या वसतिगृहात केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरिता व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याकरिता असलेले वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता 100 असून रिक्त जागा 45 आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, कांदिवली (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) हे केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता 100 असून रिक्त जागा 70 आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे शासकीय वसतिगृह, जोगेश्वरी येथे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता 150 असून रिक्त जागा 92 आहेत.
संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर येथे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरिता असलेले वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता 150 असून रिक्त जागा 110 आहेत.
या चार वसतिगृह प्रवेशासाठी एकूण विद्यार्थी मंजुर क्षमता 500 असून रिक्त जागा 317 आहेत.
या वसतिगृह प्रवेशासाठीची पात्रता :-
विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा, विद्यार्थ्याचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसावे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता उत्पन्न मर्यादा रुपये 2 लाख पर्यंत तर इतर जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्याकरिता उत्पन्नांची मर्यादा रु. 1 लाखापर्यंत दिली आहे.
विद्यार्थ्याचा प्रवेश महाविद्यालयात निश्चित झालेला असावा, मागासवर्गीय विद्यार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याकरिता असलेल्या (गुणवंत विद्यार्थ्याचे वसतिगृह) वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता 55 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास असलेल्या विद्यार्थ्यांनाच वसतिगृहात प्रवेश देण्यात येतो. केवळ पदविका अभ्यासक्रमानंतर पदविकेच्या द्वितीय वर्षास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना वसतिगृहात द्वितीय वर्षास प्रवेश देण्यात येतो.
जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.
०००००
राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान
‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान
मुंबई, दि. २९- राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. या अभियानादरम्यान कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
असंख्य अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ०३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच या अभियानाच्या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या अनुषंगाने शालेय स्तरावर दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. ३ आणि १२ जानेवारी रोजी अनुक्रमे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन, ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले आणि १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब वेशभूषा, ४ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्र, ५ जानेवारी रोजी विविध विषयांवर निबंधलेखन, ६ जानेवारी रोजी यशस्वी महिलांच्या यशोगाथा/ मुलाखती, ७ जानेवारी रोजी आनंदनगरी प्रदर्शन, ८ जानेवारी रोजी चित्रकला आणि किल्ले शिल्प, १० जानेवारी रोजी पोवाडागायन तसेच समूहगायन उपक्रम, ११ जानेवारी रोजी व्याख्याने व परिसंवादाचे आयोजन, तर १२ जानेवारी रोजी एकांकिका/ एकपात्री नाटिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/ कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाज-संपर्क माध्यमांवर (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम) #balikadivas2022, #mahilashikshandin2022, #misavitri2022, #mijijau2022 या हॅशटॅग (#) चा वापर करून अपलोड करण्यात यावा, असे यासंदर्भातील शासन निर्णयात म्हटले आहे. कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालकांच्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित केल्या जातील. असेही कळविण्यात आले आहे.