Wednesday, 29 December 2021

 महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची बैठक

            मुंबई, दि. 28 : अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.

              राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पोषण ट्रॅकर ॲपमधील तांत्रिक दोष दूर करण्याबाबत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन, पेन्शन, पदोन्नती यासह अन्य मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

               या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव विलास ठाकूर, एकात्मिक बाल विकास उपायुक्त गोकुळ देवरे, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

----


 

 'युनिकॉर्न' ! 

व्यावसायिक जगता मध्ये एक 'युनिकॉर्न' म्हणजे १ ते १० बिलियन अमेरिकन डॉलर्स मूल्य असलेला एक स्टार्टअप व्यवसाय. (एक बिलियन डॉलर्स म्हणजे आताच्या बाजार भावानुसार जवळपास साडे सात हजार कोटी रुपये.) एक युनिकॉर्न निर्माण होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. प्रचंड मेहनत, नवं कल्पना, व्यावसायिकता अशा अनेक गोष्टींचा संगम साधत तुटपुंज्या पाठबळावर सुरू झालेला एक छोटासा स्टार्टअप युनिकॉर्न मध्ये परावर्तित होतो. 

तर आज या युनिकॉर्न बद्दल सांगायचे कारण म्हणजे २०११ ते २०१४ या काळात जागतिक पातळीवरचे अर्थतज्ज्ञ आपले पंतप्रधान असले तरी दरवर्षी फक्त एक युनिकॉर्न भारतात निर्माण व्हायचा. परंतु २०१४ ला अर्थतज्ज्ञ गेले आणि एक तथाकथित कमी शिकलेला व्यक्ती भारताचा पंतप्रधान झाला. त्या कमी शिक्षित व्यक्तीने मेक इन इंडिया नामक संकल्पना प्रमोट केल्यावर जवळपास ५० हजार नवीन स्टार्टअप भारतात सुरू झाले. आणि २०१४ ते डिसेंबर २०२१ पर्यंत भारताने सर्व युरोपियन देशांना मागे टाकत आतापर्यंत एकूण ५४ युनिकॉर्न निर्माण केले आहेत. 

फक्त २०२१ या एका वर्षामध्येच भारताने कमीतकमी साडे सात हजार कोटी रुपये मूल्य असलेले ४० स्टार्टअप युनिकॉर्न निर्माण केले. यामध्ये BYJU अग्रक्रमावर असून फक्त BYJU चे बाजारमूल्य २१ बिलियन डॉलर्स म्हणजे दीड लाख कोटी रुपयांच्या वर आहे. या भारतीय स्टार्टअप व्यावसायिकांनी अंदाजे १५ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या कंपन्या व २० लाखाच्या वर नवीन रोजगार निर्माण केले आहेत. 

हे फक्त त्यांचे यश नाही तर हे तुमचे आमचे देखील यश आहे. चायनीज मालावर बहिष्कार टाका असे सुचवणारे व्हाट्सएप फॉरवर्ड करणाऱ्या सामान्य लोकांची खिल्ली उडवणारे अतिशहाणे आपण आपल्या आजूबाजूला पाहिले आहेत. पण २०२१ च्या दिवाळीत याच सामान्य लोकांनी चीनला ५० हजार कोटी रुपयांचा तडाखा दिला आहे. सद्य भारत सरकार भीम ऍप-भारत पे आदी ऍप वरून ऑनलाइन व्यवहार प्रमोट करते म्हणून मास्टर कार्ड सारख्या अमेरिकन कंपन्या त्यांच्या सरकारकडे रडत आहेत. पण फक्त परदेशीच नव्हे तर स्वतः अ दर्जाच्या सर्व सुविधा उपभोगत 'उद्योजक म्हणजे आपले शत्रू व गरिबी म्हणजे दागिना' असे बिंबवणाऱ्या समाजवादी,गांधीवादी, कम्युनिस्ट असलेल्या स्थानिक भोंदूबाबांपासून देखील आपल्याला सावध रहायचे आहे. 

भारताच्या पुढे चीन (३०१ युनिकॉर्न ) व अमेरिका (४८७ युनिकॉर्न) असून अंदाजे २०३० पर्यंत भारत या क्षेत्रात चीनला मागे टाकेल. परंतु २०३० पर्यंत कमीतकमी दहा हजार कोटी रुपये मूल्य असलेले ४०० नवीन उद्योजक व त्यापाठोपाठ लाखो रोजगार निर्माण व्हावेत म्हणून आपण देशी ऍप्स, देशी उत्पादनं, देशी सेवा उद्योग यांची खरेदी-विक्री व मौखिक जाहिरात करणे सुरूच ठेवायचे आहे. आपला पैसा आपल्या देशातील समविचारी लोकांच्या खिशातच जाईल याची काळजी आपणच घ्यायची आहे. 

तुषार दामगुडे

 ऐतिहासिक शक्ती विधेयकासह

 अधिवेशनात 24 विधेयके मंजूर

- उपमुख्यमंत्री अजित पवार

         मुंबई, दि. 28 : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 24 विधेयके संमत करण्यात आली. यामध्ये ऐतिहासिक अशा शक्ती विधेयकाचा समावेश आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.

         महाराष्ट्र विधिमंडळाचे २०२१ चे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

         श्री.पवार यांनी सांगितले, या अधिवेशनात एकूण 24 विधेयके दोन्ही सभागृहात मंजूर झाली. एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला. तीन विधेयके मागे घेण्यात आली. या अधिवेशनात मंजूर करण्यात आलेली सगळीच विधेयके महत्वाची होती. या विधेयकांपैकी शक्ती विधेयक हे ऐतिहासिक म्हणावं लागेल. या कायद्यामुळे राज्यातील माता-भगिनींची तसेच लहान मुलांची सुरक्षितता आपण निश्चित केली आहे. राज्यातल्या महिलाशक्तीला बळ देत असताना, पुरुष वर्गावरही विनाकारण अन्याय होणार नाही, याचा समतोल साधण्याचा प्रयत्न आपण शक्ती विधेयकात केला आहे, असे श्री.पवार यांनी सांगितले.

            अधिवेशनात तीन कृषी विधेयके एकमताने मागे घेण्यात आली. अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्याचे विधेयक देखील महत्वपूर्ण आहे. अधिवेशनात ३१ हजार २९८ कोटी २६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नये, असा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. तशी शिफारस निवडणूक आयोगाला करण्यात येत आहे. ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षण निश्चितीसाठी, महत्वाचा असलेला इम्पिरीकल डेटा संकलित करण्यासाठी, पुरवणी मागण्यांद्वारे ४३५ कोटी रुपये मंजूर केले, असे श्री.पवार यांनी सांगितले.

            छत्रपती संभाजी महाराजांचे, तुळापूर येथील स्मृतीस्थळ, वढू बुद्रुक येथील स्मारक आणि परिसराचा विकास करण्यात येणार आहे. स्मारक परिसराच्या विकासासाठी १५० कोटी रुपये टप्प्याटप्प्यानं खर्च करणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई महाराज यांच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसराचाही विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

        विदर्भ आणि मराठवाड्याच्या निधी वाटपात अन्याय केलेला नाही. वैधानिक मंडळाच्या निकषानुसारच निधीचे वितरण झाले आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पिक विम्याला पर्याय शोधण्यात येत आहे, अशी माहिती श्री.पवार यांनी दिली.

            गेल्या सहा दिवसांत, राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या तिपटीनं वाढली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची भीती, आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्याकडेही सर्वांनी गांभीर्यानं बघितलं पाहिजे. राज्यात आणि देशात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वांनी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

************



Tuesday, 28 December 2021

 भंडारा जिल्ह्यातील धान पीक नुकसान भरपाई एक महिन्यात देणार

- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 28 : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धान पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. ही मदत एक महिन्याच्या आत देण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासांत दिली.

            या विषयाच्या अनुषंगाने सदस्य डॉ. परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

0000

गडचिरोली प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देणार

- उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे

            मुंबई, दि. 28 : गडचिरोली जिल्हातील एटापल्ली तालुक्यातील सुरजगड प्रकल्पात स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देणार असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

            राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, येथील खाणपट्ट्याचे काम सप्टेंबर 2021 पासून सुरु झालेले असून सुमारे 1500 स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे. येथील काम नक्षलवादी कारावायांच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षणात सुरु झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

            या विषयांवर सदस्य नागोराव गाणार, गिरीश व्यास, जयंत पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

0000


 

 वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार

- वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

            मुंबई, दि. 28 : वृक्षतोडीच्या घटना जर कुठे घडत असतील तर अशा वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार असल्याची माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली.

            विधानपरिषद सदस्य अरूण लाड यांनी कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड तसेच या परिसरात करण्यात येणारी लागवड याबाबत शासन करत असलेली कार्यवाहीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.

            राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कडेगाव-पलूस वन परिक्षेत्राची निर्मिती सन २०१४ मध्ये झाली असून कडेगाव-पलुस वनपरिक्षेत्राचे एकूण क्षेत्र २६७५.१० हे. इतके आहे. कडेगाव वनपरिक्षेत्रात एकूण ३ वन परिमंडळ व ५ नियत क्षेत्राचा समावेश आहे. बेकायदा वृक्षतोडीस चाप बसावा, म्हणून कडेगाव-पलूस वन परिक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.मागील ३ वर्षात अवैध वृक्षतोडीचा १ वनगुन्हा निदर्शनास आला आहे. यामध्ये फॉरेस्ट सर्वे क्रमांक ११६ मधील ग्लिरिसिडिया या प्रजातीच्या वृक्षाच्या ५ वृक्षांना क्षती पोहोचविणेबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच माहे नोव्हेंबर २०२१ मध्ये मालकी क्षेत्रात वृक्षतोडीच्या एका घटनेची नोंद करण्यात आली आहे. ही घटना हिंगणगाव खुर्द येथील असून, यामध्ये १० आंबा या प्रजातीचे वृक्षतोड करणाऱ्या आरोपीस दंड करण्यात आला आहे. तथापि, दि. 8 नोव्हेंबर 2021 दरम्यान वन हद्दीत कोणताही अवैध वृक्षतोडीची बाब कडेगाव पलूस वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांचे निदर्शनास आली नाही. वनक्षेत्र तसेच वनक्षेत्राबाहेर अवैध वृक्षतोड रोखण्याच्या दृष्टीने गस्तीचे नियोजन असून त्यानुसार वनपरिक्षेत्र स्तरावर कार्यवाही करण्यात येते. तसेच वृक्षलागवडीसाठीदेखील वृक्षलागवड करण्यात येत आहे, अशी माहिती वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार

- वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

            मुंबई, दि. 28 : वृक्षतोडीच्या घटना जर कुठे घडत असतील तर अशा वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार असल्याची माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली.

            विधानपरिषद सदस्य अरूण लाड यांनी कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड तसेच या परिसरात करण्यात येणारी लागवड याबाबत शासन करत असलेली कार्यवाहीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.

            राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कडेगाव-पलूस वन परिक्षेत्राची निर्मिती सन २०१४ मध्ये झाली असून कडेगाव-पलुस वनपरिक्षेत्राचे एकूण क्षेत्र २६७५.१० हे. इतके आहे. कडेगाव वनपरिक्षेत्रात एकूण ३ वन परिमंडळ व ५ नियत क्षेत्राचा समावेश आहे. बेकायदा वृक्षतोडीस चाप बसावा, म्हणून कडेगाव-पलूस वन परिक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.मागील ३ वर्षात अवैध वृक्षतोडीचा १ वनगुन्हा निदर्शनास आला आहे. यामध्ये फॉरेस्ट सर्वे क्रमांक ११६ मधील ग्लिरिसिडिया या प्रजातीच्या वृक्षाच्या ५ वृक्षांना क्षती पोहोचविणेबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच माहे नोव्हेंबर २०२१ मध्ये मालकी क्षेत्रात वृक्षतोडीच्या एका घटनेची नोंद करण्यात आली आहे.  ही घटना हिंगणगाव खुर्द येथील असून, यामध्ये १० आंबा या प्रजातीचे वृक्षतोड करणाऱ्या आरोपीस दंड करण्यात आला आहे. तथापि, दि. 8 नोव्हेंबर 2021 दरम्यान वन हद्दीत कोणताही अवैध वृक्षतोडीची बाब कडेगाव पलूस वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांचे निदर्शनास आली नाही. वनक्षेत्र तसेच वनक्षेत्राबाहेर अवैध वृक्षतोड रोखण्याच्या दृष्टीने गस्तीचे नियोजन असून त्यानुसार वनपरिक्षेत्र स्तरावर कार्यवाही करण्यात येते. तसेच वृक्षलागवडीसाठीदेखील वृक्षलागवड करण्यात येत आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

                             *****

दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी

शासन सर्वतोपरी प्रयत्नशील

- जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू

            मुंबई, दि. 28 : पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षण भाग व तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील  आहे अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

             विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा –भीमा स्थिरीकरण योजनेला गती मिळाली नाही तरी या योजनेसंदर्भात शासन करीत असलेली कार्यवाही याबाबत लक्षवेधी मांडली. 

            जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले,पावसाळ्यात कृष्णा खोऱ्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून ते भीमा खोऱ्यात आणून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दुष्काळी भागाला पुरविण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी 2004 मध्ये कृष्णा –भीमा स्थिरीकरण योजनेला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली.मात्र सन 2013 च्या कृष्णा पाणी तंटा लवाद 2 च्या निर्णयामध्ये कृष्णा खोऱ्यातील पाणी एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यात वळविण्यास मनाई केलेली असून कृष्णा –भीमा स्थिरीकरणाचा प्रस्ताव नामंजूर केला आहे.कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा शासन स्तरावर फेरविचार व्हावा, असा अहवाल महामंडळ आणि शासनाकडे सादर करण्यात आला आहे.उजनी जलाशयातून गाळमिश्रीत रेती तसेच वाळू यांचे प्रमाण निश्चित करुन आणि निविदेचे निकष अद्यावत करुन गाळ काढण्याची प्रक्रिया करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

****राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीdile              

दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी

शासन सर्वतोपरी प्रयत्नशील

- जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू

            मुंबई, दि. 28 : पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षण भाग व तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

             विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा –भीमा स्थिरीकरण योजनेला गती मिळाली नाही तरी या योजनेसंदर्भात शासन करीत असलेली कार्यवाही याबाबत लक्षवेधी मांडली. 

            जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले,पावसाळ्यात कृष्णा खोऱ्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून ते भीमा खोऱ्यात आणून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दुष्काळी भागाला पुरविण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी 2004 मध्ये कृष्णा –भीमा स्थिरीकरण योजनेला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली.मात्र सन 2013 च्या कृष्णा पाणी तंटा लवाद 2 च्या निर्णयामध्ये कृष्णा खोऱ्यातील पाणी एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यात वळविण्यास मनाई केलेली असून कृष्णा –भीमा स्थिरीकरणाचा प्रस्ताव नामंजूर केला आहे.कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा शासन स्तरावर फेरविचार व्हावा, असा अहवाल महामंडळ आणि शासनाकडे सादर करण्यात आला आहे.उजनी जलाशयातून गाळमिश्रीत रेती तसेच वाळू यांचे प्रमाण निश्चित करुन आणि निविदेचे निकष अद्यावत करुन गाळ काढण्याची प्रक्रिया करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

****

 विधानसभा तारांकित प्रश्नोत्तरे 

सामाजिक समांतर आरक्षण संबधित निर्णयाचे

 एकत्रिकरण करण्यासंदर्भात अभ्यास गट                        - सामान्य प्रशासन विभाग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

          मुंबई दि. 28 : राज्याच्या शासकीय भरतीमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी तसेच आरक्षण ठरविण्यासाठी भरतीसंदर्भातील अभ्यास गटाची स्थापना करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत सांगितले.

          शासकीय नोकरभरतीमध्ये आरक्षणबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य दीपक चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

          राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले की, सामाजिक आणि समांतर आरक्षण संबंधित निर्णयाचे एकत्रिकरण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली 11 ऑगस्ट 2021 रोजी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटामध्ये सुमंत भांगे, मनिषा कदम, गीत कुलकर्णी, सु.मो.महाजन आणि टि.वा. करपते यांचा समावेश आहे. सामाजिक आणि समांतर आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासन निर्णयात सुधारणा करणे आवश्यक आहे किंवा कसे हे अभ्यासगट तपासणार आहे. या अभ्यासगटामार्फत सर्व माहिती एकत्रित करुन याबाबत पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. अभ्यासगटाची पहिली बैठक 12 नोव्हेंबर 2021 रोजी झाली असून अभ्यासगटामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००


 


 



Featured post

Lakshvedhi