Tuesday, 14 December 2021

Mulagi-Heera hai anmol

 ज्याला मुली आहे त्याच्या साठी हा मेसेज माझ्या कडून सर्वांनी नक्की वाचावा🌹🌹🍫🍫🍫🍫

*💕💕मुलीची तक्रार*💕💕

एकदा एका मुलीनं👩💕

तक्रार केली बापाकडे👴💕

मलाच का बंधने ??💕

जाऊ नको कुणीकडे....💕

का सारखे कपडयांवरून बोलणे👗💕

आणि माझ्या मित्रां बाबत नेहमी चौकशी करणे??....

का मीच उंबर्‍याच्या आत राहायचं,💕

आणि उठता बसता स्वतःला सावरायाचं.....💕

बाप बोलला,💕

बेटी म्हणणे तुझं पटतयं,💕

चल जरा बाहेर,💕

आत खूप उकडंतयं..💕

बाजारपेठेतून जाताना दिसलं दुकान लोखंडाचं,💕

बाहेरच पडल होत अवजड सामान लोहाचं.....💕

बाप बोलला,💕

बेटी, हे ऊनपावसात इथंच असतं💕

तरी पण याला काही होत नसतं, कोणी नेत नसत.💕

किमतीत पण याच्या अधिक उणं होत नसतं...💕

जरा पुढे जाताच,💕

ज्वेलरी💍 शाँप दिसलं💕

आत जाऊन मग बापाने *हिर्‍याच* मोल पुसलं,💕

तिजोरीतून बंद पेटी हळूवार पुढे मांडली,💕

त्याच्या झगमगाटात, नजरच दिपली...💕

सराफ बोलला किमती आहे,💕

फार जपावं लागतं,💕

जरा सुद्धा चरा पडता,💕

मोल याचं कचर्‍याच होत.💕

काळजी घेऊन खूप,💕

मलमली कपड्यात जपून ठेवावं लागतं,💕

तिजोरीच्या आत लपवावं लागतं...💕

फिरून घरी येताच बाप बोलला बेटी!💕

*तूच तर माझी हिर्‍याची पेटी,*💕

*सांग तुला जपण्यात काय माझं चुकतं*💕

तुझ्यामुळेच माझं, घर सारं झगमगतं"...💕

"तुझा दादा म्हणजे लोखंड, जपावं लागत नाही,💕

तू म्हणजे अनमोल हिरा,💕

सांग चुकतं का काही.....💕

तुझ्यामुळेच घर प्रकाशित, आमचा तु अभिमान,💕

तुझ्यासाठी काळीज तुटतं,💕

तु आमचा जीव की प्राण"...💕

💕

सर्व बघुन मुलीचे डोळे पाणवले,💕

बापापुढे झुकली मान शरमेने...💕

कळलं तिला सगळं,💕

मन तीचं हेलावल...💕


"बस्स! करा बाबा "💕

ऎकवत आता नाही,💕

तुमच्याकडे माझी तक्रार मुळीच नाही....💕

मीच मला आता,💕

जीवापाड जपेन,💕

हिर्‍याच्या तेजानं,💕

चौफेर चमकेन."...💎💕

    

मुलगा मुलगी समसमान,💕

हे जरी असलं खरं,💕

पण आपल्या बहीण-लेकीला अधिक जपलेलेच बरं...💕

पटवून द्या तिला --💕

बेटी! तू हिरा आहेस,💕

आमच्या आनंदाचा तू झरा आहेस...💕

म्हणुन जपाव लागत 😌😌😌💕

😌 ही कविता प्रत्येक मुली पर्यंतष पोचावी व तिने💕 वाचवी ही अपेक्षा.💕💕 वाचुन झाल्यावर पुढे पाठवा

 *अकलेचे भिकारी.....कोएसोचे भ्रष्टाचारी*

*अलिबागच्या बिनडोक कोकण एज्युकेशन सोसायटीला चॅरिटी कमिशनरचा दणका, लपविलेली माहिती अर्जदारास देण्याचे आदेश*

शिक्षण संस्था आणि शाळा चालविणाऱ्या रायगडमधील कोकण एज्युकेशन सोसायटीने माझ्या माहिती अधिकार कायद्यातील अर्जाला उत्तर देताना अकलेची दिवाळखोरी अखेर पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

*भ्रष्टाचाराने बरबटलेली कोकण एज्युकेशन सोसायटी ही शेकापचा गुंडगिरी करणारा (विधानसभेत पडलेला) आमदार बाळाराम पाटील याच्यामुळे अधोगतीला लागली आहे. शिक्षणाच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि राजकारण करून स्वतःच्या तुंबड्या भरणारे संस्थेचे दोन भ्रष्ट संचालक संजय दत्ता पाटील आणि अजित पुरूषोत्तम शहा या दोघांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे संस्थेचा सीईओ विनायक खोपकर आणि त्याच्यासोबतची पिलावळ एवढी सैरभेर झाली आहे की त्यांच्यावर शासनाचे आणि कायद्याचे नियंत्रण आहे हेच ते विसरून गेले आहेत.*

लाखो करोडोंची कंत्राटे काढून, संस्थेतील शाळांमधे शिकणाऱ्या *गोरगरीब मुलांकडून फीच्या मार्गाने ओरबाडलेला पैसा* वापरून आता त्याची माहिती देताना *संस्था माहिती देण्यास बांधील नाही* असे बिनडोक उत्तर दिल्यामुळे कोकण एज्युकेशन सोसायटीची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर झाली आहेच पण यातून *त्यांच्या कंत्राटांमधील भ्रष्टाचारावरही शिक्कामोर्तब झाले आहे.*

*ॲड. दत्ता पाटील या एका असामान्य आणि प्रथितयश वकीलाच्या पोटी जन्माला येऊनही कायद्याला फाट्यावर मारणारा संजय पाटील आणि गरीब मुलांच्या माथी महागडी पुस्तके मारून स्वतःच्या तुंबड्या भरणारा व्यापारी अजित शहा या मूर्खांना कायदा कधी माहीत नव्हता हे त्यांच्या कामातून आजवर दिसलेच... पण अजूनही तो माहीत करून घेण्याची बुद्धी त्यांना होत नाही हा त्यांना आयत्या बिळात नागोबा पद्धतीने मिळालेल्या पदांचा आणि अधिकारांचा माज आहे.*

*शासनाचे अनुदान आणि मुलांची फी खाणारी ही भ्रष्ट संस्था करोडोंच्या कंत्राटांची माहिती लपविण्यासाठी प्रयत्नशील आहे.* पण आम्ही त्यांच्या घशात हात घालून ही माहिती घेतल्याशिवाय आणि संस्थेतील भ्रष्ट चांडाळचौकडीला धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाही. 

*आम्हाला माहिती देण्यास नकार देणाऱ्या कोकण एज्युकेशन सोसायटीला अपिल सुनावणीत अलिबाग येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दणका दिला असून, सर्व माहिती आम्हाला देण्याचे आदेश दिले आहेत.* लवकरच यांच्या भ्रष्टाचाराची सखोल माहिती रायगड आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन यांचे खायचे दात दिसतील यात मला शंका नाही. धन्यवाद.

आपला,

*श्री. रमेश नामदेव देवरूखकर*

*पत्रकार*

8104508844

 *👏 नमस्कार 👏*

*सुखाचे क्षण तुमच्या अवतीभवतीच असतात. त्यांच्याकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे.*

*एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे.समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे.*

*मान-अपमान मैत्रीत काहीच नसतं.आपल्याला फक्त,समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे.*

   *🍂🍁🍂🍁 शुभ सकाळ 🍁🍂🍁🍂*

 *डायबेटिस वर रामबाण उपाय...*

👉🏾 शुगर असलेल्यांनी हा लेख आवर्जून वाचावा व न विसरता आपल्या सर्व व्हॉटसअप फेसबुक व इतर सोशल मीडिया वर प्रसारीत करावा ही नम्र विनंती

 डॉक्टर सांगतात की, एकदा शुगर झाली की, तो रोग नष्ट होत नाही. फक्त कंट्रोल करण्यासाठी त्या डॉक्टरच्या गोळ्या घ्यायच्या का ? फक्त किती वाढली ते पाहण्यासाठी लॅब मध्ये जायचे का ? मजेशीर आहे ना सगळं. 

मी काहीं दिवसापूर्वी *पनीर फुलाचा* प्रयोग करावा म्हणून केला. भावजयीला पण शुगर आहे आणि खूप जास्त आहे. जवळपास उपाशी पोटी 250 ते 300 मध्ये आणि जेवण करुन 450 ते 500 (डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या खाऊन). मग मी त्यांनाही हा उपाय सांगितला. त्यांनी 15 दिवस हा उपाय केला आणि नंतर कामात त्या विसरुन पण गेल्या. पण परवा त्यांनी दर महिन्याला येऊन डॉक्टरकडे रिपोर्ट करायचा तो केला. डॉक्टर परेशान शुगर नॉर्मल. 


मला सांगायचा मुद्दा हा आहे की, शुगर असेल तर घाबरु नका. आपल्याकडे निसर्गाने अशा काहीं गोष्टी दिल्यात की त्या फुकट कोणी सांगत नाहीत. पण हा आजार संपूर्ण नष्ट होतो. तोही फक्त 60 रुपयामध्ये. मसाल्याच्या दुकानात पनीर फुल 60 रु. पाव किलो मिळते. जे तुमचा आजार पूर्णपणे बरा करते. 

कसे घ्यायचे ?

एका काचेच्या ग्लास मध्ये एक-दोन कप पाणी घ्या.

त्यामध्ये चार ते पाच फुले रात्री भिजत ठेवा

सकाळी ते पाणी गाळून उपाशी पोटी प्या.

तीच फुले तीन दिवस परत परत वापरावी

पंधरा दिवसानंतर एकदा शुगर चेक करुन पहा.

ज्यांना खूप वर्षापासून शुगर आहे त्यांना सहा महिने हा उपाय केल्यास नंतर आयुष्यभर कधीही शुगरची गोळी लागणार नाही. हा उपाय करताना फक्त मैदा खाण्याचे टाळा. (गोड बिनधास्त खा) 👌👌👌

आपल्या आजूबाजूला कोणीही शुगर पेशंट असेल तर त्याला हा उपाय सांगा.

👍👍👍पोलीओ प्रमाणे एक दिवस आपण डायबेटीस सुद्धा संपवू आणि तेही मोफत.

- राज ढवळे.

कृपया हा लेख न विसरता आपल्या सर्व व्हॉटसअप फेसबुक व इतर सोशल मीडिया वर प्रसारीत करावा ही नम्र विनंती. 👏🏼

 ध्वजदिन ही सैनिकांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी’

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

· राज्यपालांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ

            मुंबई, दि. 13 : देशाचे जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर देशाचे रक्षण करीत असल्यामुळे देश सुरक्षित आहे. अनेक जवान प्राणांची आहुती देतात तर कित्येक जवान जायबंदी होतात. सैन्य दलातील हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी, सेवानिवृत्त जवानांसाठी तसेच अपंगत्व आलेल्या जवानांप्रती सरकार आपले कर्तव्य करीत असते. परंतु सशस्त्र सेना ध्वजदिन ही समाजाला सैनिकांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असते. त्यामुळे समाजातील सर्व लोकांनी ध्वज निधीला आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि १३) राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

            कार्यक्रमाला भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे कार्यवाहू ध्वजाधिकारी व्हाईस एडमिरल कृष्णा स्वामिनाथन, महाराष्ट्र, गुजरात व गोवा प्रभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग ले. जन. एच.एस. कहलों, एअर ऑफिसर कमांडिंग मेरीटाईम एअर ऑपरेशन्स शिव रतन सिंह, प्रधान सचिव सीमा व्यास, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी व सैनिक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद यादव उपस्थित होते.

            देशासाठी कार्य करताना जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व लष्कराच्या अधिकारी व जवानांना वीरमरण आले. सर्व देश या हुतात्मा अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे, असे राज्यपालांनी सांगितले. यंदा कोरोना परिस्थितीमुळे सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट पुरे झाले नसले तरीही कोरोना काळात लष्कर, प्रशासन, पोलीस, अधिकारी व समाजसेवकांनी चांगले काम केले असे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी सन २०२०-२१ या वर्षात निधी संकलनात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संस्थांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.

**

Governor Koshyari inaugurates Armed Forces Flag Day Fund Raising Drive

       Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Armed Forces Flag Day Fund Collection Drive by making his donation to the Flag Fund at Raj Bhavan, Mumbai on Monday (13 Dec).

      Stating that the Flag Day is an opportunity to express gratitude to the family members of the martyrs and jawans of the armed forces, the Governor appealed to the citizens to donate to the Flag Fund that is utilized for the welfare of families of martyrs, the disabled jawans and ex-servicemen.

      The Flag Fund Collection Drive was organized by the Mumbai City and Mumbai Suburban Districts Sainik Welfare offices.

      The Governor felicitated representatives of various donor organizations on this occasion. Many organizations handed over their donation cheques to the Governor.

      Vice Admiral Krishna Swaminathan, Officiating Flag Officer Commanding in Chief Western Naval Command, Lt Gen H S Kahlon, General Officer Commanding, Headquarters, Maharashtra Gujarat and Goa Area, Air Vice Marshal Shiv Ratan Singh, Air Officer Commanding, Maritime Air Operations, Seema Vyas, Principal Secretary and Special Enquiry Officer, Government of Maharashtra, Nidhi Chaudhari, Collector Mumbai Suburban District, Rajiv Nivatkar, Mumbai City Collector and Pramod Yadav, Director, Department of Sainik Welfare were present on the occasion.

**



 



 महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावरील

भ्याड शाई हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र निषेध

 

            मुंबईदि. 13 :- महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वकसुनियोजित केलेला हल्ला आहे. या संतापजनक घटनेमुळे मराठी भाषक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाहीउलट मराठीभाषक चळवळ आणखी जोमाने उसळी घेऊन पुढे जाईल. या घटनेमुळे मराठीभाषक एकदिलाने एकत्र येत लढा आणखी मजबूत करतील. एकीकरण समितीचे नेते दीपक दळवींसह मराठीभाषक चळवळीच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहेअसे ठणकावून सांगत मराठीचा आवाज कदापी दबणार नाहीअसा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

            महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा निषेध केलाते आपल्या प्रतिक्रियेत म्हणतातसीमाभागातील मराठीभाषकांचा हक्क जपणेत्यांच्या अस्मितेचे संरक्षण करणेसीमाभागातील मराठी बांधव सनदशीर मार्गानेलोकशाही मार्गाने लढत आहेतत्यांच्या पाठीशी राहणेहे आमचे कर्तव्य आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही. मराठीभाषक चळवळीला धक्का देण्यासाठी हे भ्याड कृत्य सुनियोजित पद्धतीने करण्यात आले असावे. मात्रअशा घटनांमुळे मराठीभाषक आंदोलनावरचळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. लढणे हे मराठी भाषकांच्या रक्तात आहेत्यामुळे मराठी भाषकांना जेवढे दाबण्याचा प्रयत्न होईलतेवढी मराठी भाषकांची चळवळ आणखी उसळी घेईल. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या मराठी सैनिकाच्यामागे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूसमहाराष्ट्र खंबीरपणे उभा आहेअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*****


 बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात

पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

            मुंबई, दि. 13 : बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके तसेच लेसर प्रकाश (बीम) यांना प्रतिबंध करण्याचे आदेश दि. 7 डिसेंबर 2021 ते 5 जानेवारी, 2022 पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

          बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हे आदेश जारी केले आहेत. असा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद असून मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई, डॉ.शिवाजी राठोड यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.

Featured post

Lakshvedhi