Saturday, 11 December 2021

 *मणिपूर चक्र आणि रामरक्षा---*                     

              *एक अभ्यास*                                                                         

हे चक्र नाभिस्थानाजवळ असते.                

ह्याला दहा पाकळ्या असून *सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु* याची अधिष्ठात्री देवता आहे.

२) शरीराचा मध्य बिंदू अर्थात *गुरुत्वमध्य* ह्याच चक्रात असतो. 

३) ह्या चक्रावर *धारणा* केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते.

४) *धारणा म्हणजे काय?* चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा...

*धारणा, ध्यान आणि समाधी या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत.*

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर *धारणा म्हणजे concentration*... किंवा *एकाग्रता*

५) *चित्त शरीरांतील एखाद्या भागावर स्थिर ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय*

६) *महत्त्वाचं*--- एकदा आपल्याला आपल्या चक्रांचं शरीरातील स्थान माहीत झाले की त्या स्थानावर धारणा केली (त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केलं) की त्या *चक्रावर ती धारणा* केली असं म्हणतात.

७) ज्या नाडीचक्रावर आपण चित्त स्थिर केलं (धारणा केली) की *त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात.*

उदाहरणार्थ , आपल्या शरीरातील खालील अवयव/ग्रंथी *मणिपूर चक्राच्या नियंत्रणाखाली असतात*(आणि याचे आपल्याला अजिबात ज्ञान नसते) ..

-Liver 

-Pancreas

-Small Intestine

-Kidney

- *Adrenal Gland*

-Gall bladder

*आता मणिपूर चक्र बिघडलं की त्यासंबंधीत होणारे रोग पाहू या*-----

-Indigestion

-Diabetes

-Acidity

-Ulcer

-Cholitis

-Appendicitis

-Kidney Stone

-Nephropathy.

मी वर उल्लेख केला आहे Adrenal Glands चा आणि त्याला bold केलं आहे... 

या glands खूप महत्त्वाचे हॉर्मोन्स निर्माण करतात त्यांचं नाव आहे--- adrenaline आणि  cortisol...  Adrenaline च़ level बिघडलं की खालील परिणाम होतात---- 

High Blood Pressure

High Blood Sugar

Depression

एखादी वाईट बातमी आली की आपले हृदयाचे ठोके वाढतात, बीपी वाढतं, भीति वाटते, excitement वाढते, anxiety वाढते.... *ते कश्यामुळे ?????* तर त्यावेळी आपल्या Adrenal Glands खूप उत्तेजित होतात म्हणून. *यालाच आपण म्हणतो पोटात खड्डा पडला किंवा छातीत धस्सं झालं.*

*हा आघात आपल्या मणिपूर चक्रावर होतो*, हृदयावर नाही... *पण त्याचे परिणाम हृदयावर होतात*

*मग ते pressure release करायला लगेचच आपल्या systems activate होतात... काही लोकांना लगेच urine pass होतं , काही लोकांना तर लगेच शौचास जावे लागते... *असं झालं की समजावं की तुमच्या systems व्यवस्थित काम करत आहेत.*

अश्या परिस्थितीत आपण लगेच *रामरक्षा स्तोत्र* म्हणायला सुरुवात करतो.... *खरं ना ?????*

*तर रामरक्षा च कां?*

मणिपूर चक्राचं बीज अक्षर आहे *रं*

*रं* चा वारंवार उच्चार केल्याने आपलं मणिपूर चक्र आहत होतं आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व इंद्रिये / ग्रंथी उत्तेजीत होतात... सोप्या भाषेत सांगायचे तर charge होतात व त्यातून निघणारा स्त्राव regulated/ नियंत्रित होतो... परंतु नुसतं एकसारखे *रं* म्हणत राहिलो की कंटाळायला होईल.... आपल्या ऋषीमुनींना याचं पक्क ज्ञान होतं.... *म्हणून त्यांनी रामरक्षा स्तोत्राची रचना केली*..

*रामरक्षेत किती वेळा *र* अक्षर येतं ते मोजून पहा... त्याची आवर्तनं केलीत तर किती वेळा *र* चा उच्चार होईल याची कल्पना करा !!!! मग किती वेळा आपलं मणिपूर चक्र आहत होईल याचा विचार करा. 

*परंतु आपण यांत्रिक पणे रामरक्षा म्हणत राहतो त्यामुळे जितका फायदा व्हायला हवा तितका होत नाही* ...... कारण आपण आधीच बघितलं आहे की कुठल्याही चक्राला *activate करायचं असेल तर त्याच्यावर *धारणा* करायची असते... 

*आपण रामरक्षा म्हणताना डोळे मिटून मणिपूर चक्रावर आपलं चित्त एकाग्र केलं तर निश्र्चितच आपलं चक्र activate होईल आणि सतत *र* अक्षराच्या उच्चाराने *निर्माण होणारी energy , त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे शुद्धीकरण व बळकटीकरण करेल... परिणामी त्याला संलग्न असलेले आजार पण मिटतील.*

यापुढे  रामरक्षा म्हणण्यापूर्वी -

*१)एका जागी स्वस्थ बसा*

(घरात इकडे तिकडे डुलत डुलत, घरातली कामं करताना, स्वयंपाक करताना रामरक्षा म्हटली तर त्याचा मणिपूर चक्रावर काहीच सकारात्मक परिणाम होणार नाही)

*२) डोळ्यासमोर श्रीरामाची मूर्ती आणा ,*

*३) मणिपूर चक्रावर चित्त एकाग्र करा...*

*४)  नंतर रामरक्षा पठण सुरु करा*

*५) ९० दिवसांत आपल्या मणिपूर चक्राशी संबंधित organs वर काय positive फरक वाटतोय ते observe करा....*

*टीप: ---* 

*योग, मेडीकल सायन्स आणि अध्यात्म असा हा समन्वय आपणास कुठल्याही पुस्तकात रेडीमेड मिळणार नाही..*. परत परत हा लेख वाचून समजून घ्या आणि अंमल करा....🙏🏻🙏🏻🙏🏻 

*दत्त प्रभु आपणास सर्वांना उत्तम स्वास्थ्य देवो हीच माझी प्रार्थना*

*श्री गुरुदेव दत्त*.                                                                                     🖕माझ्या वाचनात आलेली सुंदर माहिती...‌‌.

Friday, 10 December 2021

 'दिलखुलास' कार्यक्रमात

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची मुलाखत

            मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित - 'दिलखुलास' या कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या अॅपवर सोमवार दि. १३, मंगळवार दि. १४ आणि बुधवार दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षातील सामाजिक न्याय विभागाची वाटचाल, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, बार्टी या संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम, सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, ग्रामीण व शहरी भागातील गाववाड्यांना समताधिष्ठित नावे देण्याचा निर्णय तसेच ज्येष्ठ नागरिक व तृत्तीयपंथीयांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय आदी विषयांची सविस्तर माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.


०००००

 पर्यटन अनुभव संस्मरणीय करण्यासाठी एमटीडीसी सज्ज

            मुंबई, दि. 10 : वातावरणातील गारवा आणि पर्यटकांची ओढ लक्षात घेऊन नववर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, आयुर्वेदीक आणि नैसर्गिक अप्रतिम खाद्यपदार्थांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ सज्ज झाले आहे. कोविडसंदर्भातील शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून पर्यटकांच्या आरोग्याचीही खबरदारी घेण्यात येत असल्याने पर्यटकांनी महामंडळाच्या साथीने मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रसंग संस्मरणीय करावा, असे आवाहन महामंडळाच्या पुणे प्रादेशिक विभागामार्फत करण्यात आले आहे.

            पर्यटनासाठी पूरक वातावरण पाहता पर्यटक निसर्गाकडे धाव घेत आहेत. त्यांच्या सोयीसाठी महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे / रिसॉर्ट खुली असून पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत. योगा आणि वेलनेसची शिबिरे घेण्याचे प्रस्तावित असून स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपरिक खेळ इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

            पर्यटक निवासांमध्ये छोटेखानी मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पर्यटकांच्या सेवेत सादर करण्याचाही महामंडळाचा मानस आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर महामंडळाने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून जवळपास दोन वर्षानंतर पर्यटकांना निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांचीही माहिती वेबसाईट, फेसबूक आणि व्हॉट्सॅप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

            पर्यटक निवासांमध्ये निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना अव्याहतपणे सुरू असून निवास, उपहारगृहे आणि अनुषंगिक बाबींची काटेकोरपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपट्टी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महामंडळाच्या पर्यटक निवासांना पर्यटक प्राधान्य देत असून डिसेंबरमध्ये महामंडळाच्या पर्यटक निवासांचे 90 टक्के आरक्षण झाले आहे.

            पर्यटकांनी निसर्गाचे आणि कोविडविषयक भान ठेवून पर्यटनाचा, नववर्ष स्वागताचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.


०००००







Loksanskuti


 


 

 स्किलबुक ॲप ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा संगम : डॉ. ज्ञानेश्वर मुळे


स्किलबुक ॲप प्रकल्पाचा देशार्पण सोहळा

            नवी दिल्ली, दि. 9 : स्किलबुक ॲप हे ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा संगम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

            नवीन महाराष्ट्र सदन येथे स्किलबुक ॲपचा देशार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी जिल्हा उस्मानाबाद येथे शिल्पनिदेशक (कोपा) या पदावर कार्यरत असलेले डॉ.किरण प्रकाश झरकर यांनी तयार केलेल्या स्किलबुक ॲपच्या देशार्पण समारंभ कार्यक्रमात जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांच्यासह महाराष्ट्र व अन्य राज्यातील विविध पंथांचे गुरू उपस्थित होते.

            श्री.ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, स्किलबुक ॲप हा विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाला उपयोगी पडणारे महत्वाचे एप आहे. हा उपक्रम मोठा आहे. याचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा आणि इतरांनाही करून द्यावा, असे आवाहनही श्री मुळे यांनी यावेळी केले.

            श्री. झरकर यांनी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्किल बुक या संगणकीय प्रणालीची निर्मिती केली आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारी बदल करणारे स्किलबुक हे उपकरण विद्यार्थ्यांना व शेतक-यांना उपलब्ध करून देण्यासाठी मुळे आण्णा सोशल फाउंडेशन, औरंगाबाद या संस्थेच्या मदतीने स्किलबुक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲप तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेला बळ देण्यासाठी डॉ. झरकर यांनी गेल्या चार वर्षापासून स्किल बुक या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीवर संशोधन केले आहे.

            स्किल बुक हे एक कोटी विद्यार्थी व शेतकरी यांना एक लाख कौशल्यांशी जोडण्याचे डिजिटल माध्यम आहे. मोबाईल एप्लिकेशन, संगणक वेबपोर्टल व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस या तिन्ही माध्यमातून ते उपलब्ध होणार आहे. स्किल बुक या ॲप प्रणालीतून मुख्यत्वे विद्यार्थी व शेतकरी यांचेसाठी एक लाख कौशल्याचे जाळे तयार करण्यात येणार आहेत. यात कौशल्य प्रकाशन, प्रशिक्षण, अभ्यासक्रम, प्रमाणपत्र, नोकरी, शिकाऊ उमेदवारी, सेवा व स्टार्टअप या सुविधा सर्वांना उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

            स्किल बुक या प्रकल्पास स्मित किरण पब्लिशिंग प्रा. लि. या कंपनीने स्टार्टअप इंडिया या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत तयार केलेले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्यावतीने कंपनीस डिप प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

            कार्यक्रमास स्किल बुकच्या संचालिका, प्राचार्य डॉ. भारती पाटील, तसेच विशेष निमंत्रीत करण्यात आलेले माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक तथा न्यूज स्टोरी टूडे या आंतरराष्ट्रीय वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ आणि जेष्ठ दूध तज्ज्ञ अशोक कुंदप हे उपस्थित होते.



 ठाणे खाडी परिसराला रामसर क्षेत्र म्हणून मान्यतेसाठी


केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

            मुंबई, दि. 9 : ठाणे खाडी परिसरात जैवविविधता असल्याने या परिसरास आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

            पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेटलँड प्राधिकरणाची चौथी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वनविभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.

            ठाणे खाडीच्या 65 चौरस किलोमीटरच्या परिसरात 17 चौरस किलोमीटर अभयारण्य असून उर्वरित जागेत परिसंस्था (इकोसिस्टीम) असल्याने या क्षेत्रात इतर नवीन बंधने येणार नाहीत. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे. देशात एकूण ४६ रामसर क्षेत्र आहेत. राज्यात यापूर्वी लोणार सरोवर आणि नांदूर मध्यमेश्वर या दोन क्षेत्रांना रामसर म्हणून मान्यता मिळाली असून ठाणे खाडी क्षेत्राला मान्यता मिळाल्यास राज्यातील हे तिसरे रामसर क्षेत्र असेल.

00

Featured post

Lakshvedhi