Wednesday, 8 December 2021

 प्राध्यापक हिरा राखुंडे यांना मुंबई भूषण पुरस्कार 

  मुंबई : ‘मुंबई भूषण’ पुरस्कार महाराजा यशवंतराव होळकर यांचे 16 वे वंशज युवराज यशवंतराव होळकर आणि बाळूमामा मालिकेतील अभिनेते सुमित पुसावळे यांच्या शुभहस्ते प्रा़ हिरा राखुंडे यांना देण्यात आला़ हा सोहळा अत्यंत दिमाखदारपणे पार पडला. यावेळी आर्थिक व शारीरिक दुर्बल घटकासाठी केलेल्या सामाजिक कार्य करणाºया व्यक्तिंचाही सन्मान करण्यात आला. पुण्यश्लोक फौंडेशन आणि धनगर माझा यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा पुरस्कार अनाथांचा नाथ, चला इंग्रजी बोलायला शिकू आणि घरोघरी निर्माण करू डॉक्टर व अभियंते या संकल्पना संस्थेने सुरू केल्या आणि त्या इतर गावातही सुरू झाल्या. कोरोना काळात सॅनिटायझरचे वाटप, आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, थंडी तापाच्या गोळ्यांचे वाटप, सहकाºयांबरोबर अन्न धान्य वाटप असे अनेक उपक्रम राबवले. तसेच शालेय साहित्याचं वाटप, वृक्ष लागवड , डिजिटल साहित्य वाटप, अपंगांना मदत या संपूर्ण कार्याच्या निकषावर मुंबई भूषण पुरस्कार ठरविण्यात येऊन जाहीर करण्यात आला. हा पूरस्कार प्रा़ हिरा राखुंडे यांना देण्यात आला़ यावेळी धनगर माझाचे संपादक धनंजय ताणले, आयकर आयुक्त डॉ नितीनजी वाघमोडे, यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे, वीरकरवाडी गावचे स्थानिक प्रतिनिधी मार्केट कमिटी संचालक अमोल राऊत, माजी नगरसेवक आप्पा वीरकर, संजय वीरकर, राखुंडे वस्तीतील नागरिक, मुंबईमध्ये स्थायिक असलेले वीरकरवाडी आणि पंचकृषितील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--

 राज्यात बैलगाडी शर्यत सुरु होणारच

                       - पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त केला विश्वास   

        मुंबई, दि. 7 : राज्यातील बैलगाडी शर्यतीस प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतक-यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यात या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून राज्यात बैलगाड्या शर्यत सुरु होणार आसल्याचा विश्वास पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.

            महाराष्ट्र राज्यातील बैलगाडी शर्यत सुरू व्हावी याकरिता शासन प्रयत्नशील असून याबाबत सुरुवातीपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. सन 2014 पासून बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. तत्कालिन सरकारने त्यासंदर्भात 2017 मध्ये कायदा लागू केला. परंतु पाठपुराव्या अभावी 2017-2018 पासुन आजवर कोणतीही ठोस सकारात्मक घटना यादरम्यान झाली नाही आणि शर्यती बंदच राहिल्या.        

            ऑगस्ट 2020 मध्ये बैलगाडा चालक,शेतकरी,पशुपालक आणि लोकप्रतीनिधी यांची बैठक घेण्यात आली आणि या विषयास पुन्हा चालना मिळाली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याबरोबर यावर्षी पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले. यासाठी दि.24 ऑगस्ट 2021 रोजी सर्व बैलगाडा मालक,पशुपालक यांची मंत्रालयाच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली.

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या पाठपुराव्याला यश

             बैलगाड्या शर्यतीसंदर्भात वरिष्ठ अधिवक्ता आणि राज्य शासनाचे वकील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी श्री केदार यांनी दिल्लीत वारंवार बैठका घेवून यासंदर्भात पाठपुरावा केला. राज्यात बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी स्वत: पुढाकार घेवून प्रयत्न केले.           

            श्री.केदार यांनी राज्याचे महाधिवक्ता श्री. आशुतोष कुंभकोणी यांचेशी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दोन वेळा भेट घेवून चर्चा केली. आणि सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्याबाबत नियोजन केले. सप्टेंबर-ऑक्टोंबर या महिन्यात 22 पेक्षा जास्त वेळा सर्वोच्च न्यायालयात Mentioning केले. वरिष्ठ अधिवक्ता शेखर नाफडे यांनी मुख्य न्यायाधीशांचे समक्ष दाद मागितली व इतर राज्यात शर्यती सुरू आहेत व महाराष्ट्रात बंद आहेत अशा अन्यायकारक निर्णयास स्थगिती देण्याबाबत विनंती केली.

      श्री.केदार यांनी वरिष्ठ अधिवक्ता शेखर नाफडे यांच्या दि. 13 नोव्हेंबर 2021 व दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेतली. दि 14 नोव्हेंबर 2021 रोजी वरिष्ठ अधिवक्ता मुकूल रोहतगी यांचेशी चर्चा केली. यावेळी राज्याचे अधिवक्ता सचिन पाटील यांचेशी देखील चर्चा करून त्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.         

       या सर्व प्रयत्नांची फलश्रृती म्हणून सर्वोच्च न्यायालयाने 4 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी सुनावणी घेतली. न्यायालयीन प्रक्रियेनुसार न्यायालयाने सर्व संबंधीत प्रभावीत राज्याचे म्हणणे ऐकून घेण्याचे निर्देश दिले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबीत असलेल्या जनहित याचिकेस सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली. जेणेकरून यावर अंतरीम निर्णय घेता येवु शकेल.         


            या प्रकरणाची दुसरी सुनावणी 6 डिसेंबर रोजी झाली. यावेळी मागील सुनावणी दरम्यान तामिळनाडू व कर्नाटकचे वकील हजर होते. न्यायालयाने यावेळी सर्व प्रभावीत राज्याचे म्हणणे ऐकून घेतले व स्पष्ट केले की त्या राज्यांच्या अंतर्गत आदेशामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. परंतु याचवेळी PETA या संस्थेने काही मुद्दे उपस्थित केले असल्याने त्यांचेही म्हणणे ऐकून घेण्याबाबत आणखी एक सुनावणी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.         

            श्री.केदार म्हणाले, यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया 4 वर्ष प्रलंबीत व बंद पडलेली होती. ती या शासनाने सुरू केली. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय येईल, असा विश्वास वाटतो. बैलगाडी मालक व पशुपालक सुजाण असून त्यांनी पोकळ भुलथापांना बळी पडू नये,असे अवाहनही श्री.केदार यांनी केले.

००००



 



 *मी डॉ. दिपाली,*

 * *माझे म्हणणे आहे की या कडाक्याच्या थंडीत ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी रात्री १० वाजता झोपल्यानंतर जेव्हाही तुम्ही अंथरुणावरून उठता तेव्हा लगेच उठू नये. कारण थंडीमुळे शरीरातील रक्त घट्ट होते, नंतर हळूहळू काम केल्यामुळे ते हृदयापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकत नाही आणि शरीर निघून जाते. या कारणास्तव, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हृदयविकारामुळे होणारे अपघात हिवाळ्याच्या महिन्यांत खूप जास्त असल्याचे आढळून आले आहे, म्हणून आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मी पण तीच सूचना देतो.*

 *साडेतीन मिनिटे: माझा सल्ला!*

        विजयसिंह राजपूत डॉ

           सामान्य चिकित्सक

    *ज्यांना सकाळी किंवा रात्री झोपताना लघवीला जावे लागते त्यांच्यासाठी खास माहिती!!*

         या साडेतीन मिनिटांत प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी.

 *ते इतके महत्त्वाचे का आहे?*

         या साडेतीन मिनिटांनी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.

         जेव्हा-जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा रात्रीच सुदृढ व्यक्तीही मृतावस्थेत आढळते.

         अशा लोकांबद्दल आम्ही म्हणतो की, आम्ही त्यांच्याशी कालच बोललो. अचानक काय झालं? तो कसा मेला?

        याचे मुख्य कारण असे आहे की जेव्हा आपण रात्री लघवी विसर्जनासाठी जातो तेव्हा अचानक किंवा अचानक आपल्याला जाग येते, परिणामी मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही.

        ही साडेतीन मिनिटे खूप महत्त्वाची आहेत.

       जेव्हा आपण मध्यरात्री लघवी करण्यासाठी उठतो तेव्हा आपला ईसीजी पॅटर्न बदलू शकतो. याचे कारण असे की, जेव्हा आपण अचानक उभे होतो तेव्हा मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही आणि आपले हृदय काम करणे थांबवते.

    साडेतीन मिनिटांचा प्रयत्न हा एक उत्तम उपाय आहे.

 1. झोपेतून उठताना अर्धा मिनिट गादीवर झोपावे.

 2. *पुढील अर्धा मिनिट गादीवर बसा.*

 3. *पुढील अडीच मिनिटे गादीखाली पाय डोलत राहू द्या.*

    साडेतीन मिनिटांनी तुमचा मेंदू रक्ताशिवाय राहणार नाही आणि हृदय काम करणे थांबवणार नाही! यामुळे आकस्मिक मृत्यूही कमी होतील.

      तुमच्या प्रियजनांना फायदा झाला आहे, त्यामुळे त्यांना जाणीव करून देण्यासाठी नक्कीच प्रसारित करा.

             *धन्यवाद!!*

 45+ साठी खूप महत्वाचे

 विनंत्या आणि विनंत्या

    तुम्हाला हा मेसेज तुमच्यापैकी फक्त 10 लोकांना फॉरवर्ड करावा लागेल आणि त्या 10 लोकांनी हा मेसेज इतर 10 लोकांना फॉरवर्ड करावा.

 तुम्हाला फक्त एक लिंक जोडायची आहे आणि लवकरच संपूर्ण देश फक्त आठ पायऱ्यांमध्ये जोडला जाईल. ,

 आवडल्यास सर्व मित्रांसोबत शेअर करा-

 *झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?*

                    -जेफ्री ह्आंल (नोबेल विजेते-2017)

*झोप* (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? असे ऐकीवात आहे की *"लवकर नीजे  लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे "*हे किती खरे आहे ? ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का ? चला पाहूया....

खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.

    *रात्री 11 ते पहाटे 3 या* कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात(Liver) रोखलेलीअसते.तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून  विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची(Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात  साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या *रात्री 11 ते पहाटे 3*च्या वेळेत होत असते. 

तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे *यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही.*

.  जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण *4* तासांचा वेळ मिळतो.

जर 12 वाजता झोपलात तर *3*तास 

. जर 1 वाजता झोपलात तर *2* तास 

.   आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त *1* तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी.....

आणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ?

*दुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही.*जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात  कालानुक्रमे वाढत जातील.. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल ?

काय होते जेव्हा तुम्ही ऊशिरा झोपता आणि ऊशिरा ऊठता ?

ऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का ? तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल ?

ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता.

*पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते*. ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे ? खरेतर, तुम्ही शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते.

*सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते.* आता तुम्ही काय करायला हवे ? तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा.

*सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते.* आता तुम्ही काय करायला हवे ? तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते.

असा आहे तुमचा दिवस ऊत्तम प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग....

अश्याप्रकारे ह्या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी  ताजेतवाने होऊन  ऊठा.  

त्यानंतर तुम्ही मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या. 

आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या.

ह्यात काहीच आश्चर्य नाही की *ग्रामिण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात.*ते लवकर झोपून लवकर ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात.

शहरात रहात असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युत  प्रकाश , टी व्ही , आणि ईंटरनेट असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही.

आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना....

एकदा मला माझ्या शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाल्यावर मी ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन. जर मी लवकर ऊठलो तर जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कंप्युटर वर चालू झाला आणि मला *घड्याळात 7  वाजलेले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे*. तर मी माझा नाश्ताआहार शरीराद्वारे ऊत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी 9 च्या वेळेआधी करण्याचा प्रयत्न करीन.

जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर ? मी तुम्हाला जरी जास्त पगार दिला तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन. दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील.

ह्याप्रकारे जास्तत जास्त ह्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक असे तयार करा. मला खात्री आहे तुम्ही संपुर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजेतवाने रहाल 

संकलित व प्रसारीत

🌸🌸🌸धन्यवाद 🌸🌸🌸

 Coimbatore to Trichur Tunnel opened. 2 hour journey is now 10 minutes. Thanks to Govt of india infrastructure development No media house will talk about such news.


 [25/11, 16:23] Kharpatil 1: मित्र मित्राला म्हणाला की,

*बायकोकडून* होणाऱ्या त्रासाबद्दल

*सासुरवाडीला* सांगत का नाहीस ??

मित्र म्हणाला,

*डेंग्यु* बद्दल *डासांना*

सांगून काय फायदा..


👩🤦‍♂️😜😝

[25/11, 20:50] Kharpatil 1: *शहाणपण...*

   कितीही पैसे द्या कामवाली घरच्या सारखं झाडत नाही आणि पोळीवाली आपल्या सारख्या पोळ्या करत नाही....😊

    आई वडिलांसारखी छाया नाही आणि भावंडांसारखी माया नाही...👭🏻👬🏼

    हॉटेलच्या बिर्याणी ला घरच्या खिचडी ची चव नाही आणि कितीही यूट्यूब बघा थिएटरची सर नाही...

     साडीतलं सौदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणा सारखं सौदर्य नाही...👍🏼

     कितीही कलमं करा गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही अत्तरं आणा जुई आणि मोगऱ्याची सर नाही...

     शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही...

     भाजीभाकरीची चव पिझ्झा बर्गर ला नाही आणि ग्राउंड ची सर जिमला नाही...

     पहिल्या प्रेमासारखं निरागस प्रेम नाही 🌹🌹आणि जोडीदारासारखा आधार नाही...😊

     कितीही tally वापरा त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी-निमकीची मजा कॅलक्युलेटरमधे नाही...

     कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही आणि कितीही हुशार असा ईश्वरापुढं कुणाचंच चालत नाही...🙏🏼

     कितीही पाणी द्या पावसाशिवाय झाड काही खुलत नाही कितीही पैसे असुद्या पण माणसांशिवाय काही भागत नाही...

     अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजतच नाही...

     मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद जगात नाही...

     शालीनतेसारखा दागिना नाही आणि झोपडीचं प्रेम बंगल्यात नाही...

    स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही...

     सुखाच्या क्षणी माणसांशिवाय शोभा नाही पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतंच नाही...😊😊

     भक्ती सारखी शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कुणीच नाही...

      घरची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटूंबाशिवाय कुणीच नाही....🙏🏼🙏🏼

 *"ॐ" च्या उच्चारणाचे महत्व-* 

१] "ॐ" चे उच्चारण केल्याने गळ्यात कंपन होण्यामुळे थायरॉइडचा त्रास दूर होतो.

२] "ॐ" च्या जपाने जीव घाबरणे दूर होते.

३] "ॐ" चा जप केल्याने शरीरात रक्त प्रवाह योग्यरितीने होऊ लागतो

४] "ॐ" चा जप केल्याने रक्तदाब सामान्य होतो आणि ह्रुदय विकाराच्या झटक्या पासून बचाव होतो.

५] "ॐ" चा जप केल्याने पोटात कंपन होते आणि पचन शक्ति मजबूत होते.

६] "ॐ" चा जप केल्याने फुफ्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे उत्साहात वाढ होते.

७] "ॐ" चा जप केल्याने थकवा दूर होतो आणि ताजेपणाचा अनुभव होतो.

८] "ॐ" चे उच्चारण झोपण्यापूर्वी केल्याने झोप लगेच आणि शांत लागते.

९] "ॐ" चा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणावापासून कायमची मुक्ती मिळते.

१०] "ॐ" चा जप केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते आणि त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन कमरेचा त्रास दूर होतो.

११] "ॐ" चा उच्चार केल्याने मेंदूत कंपन होते आणि त्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते.

१२] "ॐ" चे उच्चारण अथवा जप केल्याने आपण खूप सगळे विकार दूर करू शकतो.


प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.

Featured post

Lakshvedhi