Tuesday, 7 December 2021

 घरकुलाचे स्वप्नपूर्ण करणारे


‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान   

      मुंबई, दि. 7 : राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना पक्के व स्वत:च्या मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन राज्यात 20 नोव्हेंबर 2020 पासून महाआवास अभियानाची सुरूवात केली. या पहिल्या टप्प्यात 1260 पेक्षा जास्त बहुमजली इमारती, 630 पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. सोबतच 50 हजार 112 भूमीहिन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका अर्थाने महाआवास अभियानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला.

            महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश पाहता दुसरा टप्पा दिनांक 20 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाला. यात 5 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. अन्य राज्याच्या तुलनेत हे महाआवास अभियान अधिक सक्षम आणि गतिमानतेने पुढे नेण्याचा निर्धार करत या पूर्ण अभियानात 7 डिसेंबर 2021 पर्यंत संपूर्ण राज्यात प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजनेच्या 9 लाख 88 हजार 691 घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून 7 लाख 43 हजार 326 घरे पुर्ण झाली आहेत. दिनांक 20 नोव्हेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील 1071 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे तर 4 हजार 684 घरे पूर्ण झाली आहेत.

            राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा विविध योजनेमार्फत 4 लाख 19 हजार 833 घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून दिनांक 7 डिसेंबर 2021 पर्यंत 2 लाख 95 हजार 941 घरे पुर्ण झाली आहेत. 20 नोव्हेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 या महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य पुरस्कृत आवास योजनेतील 1 हजार 902 घरे बांधण्यात आली आहे. उर्वरित घरे विहित मुदतीत पूर्णत्वाकडे जातील, असा विश्वास ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांनी व्यक्त केला आहे.

 जादुटोणा विरोधी कायद्याची' प्रभावी अंमलबजावणी करावी

- उपमुख्यमंत्री अजित पवार

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक

            मुंबई, दि.7 :जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीने कामकाजाला गती देवून राज्यात 'जादुटोणा विरोधी कायद्याची' प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात 'जादुटोणा विरोधी कायदा' प्रभावीपणे राबविण्याबाबत बैठक पार पडली.या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, वित्तीय सुधारणाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाच्या अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव नियोजन श्री.भांडारकर, विधी व न्यायच्या उपसचिव सुप्रिया धावरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(प्रशासन) गणेश रामदासी, जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव, शशिकांत गमरे, मधुकर कांबळे यावेळी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांनी प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत 2013 मध्ये हा अधिनियम संमत करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.राज्यात'जादुटोणा विरोधी कायद्याची'प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.या कायद्याची अंमलबजावणी करणा-या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे. आजही अंधश्रध्देमुळे अनेक गरीब, असहाय्य लोकांची फसवणूक होत असते अशा लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे,जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे गठन करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने कार्यवाही करावी.गृह विभागाने आलेल्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करावी.प्रा.श्याम मानव यांनी केलेल्या सूचनांबाबत शासन सकारात्मक असून राज्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व निर्णय घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जादुटोणा विरोधी कायद्याच्या समित्यांचे पुनर्गठन लवकरच करणार

:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

          सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले,जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे पुनर्गठन करण्यात येईल.या कायद्याची माहिती तसेच जनजागृती करणे तसेच जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांच्याशी चर्चा करून त्यांनी विभागासंदर्भात मांडलेल्या मुद्यांबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी मंत्री श्री. मुंडे यांनी दिली. या कायद्याच्या प्रचारामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा,मानवता जोपसणारा,समता -बंधुता-स्वातंत्र्य या मुल्यांना स्वीकारणारा समाज निर्माण होण्यास मदत होईल असेही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

               जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव यांनी जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे पुर्नगठन,या समितीने पहिल्या टप्प्यात केलेली कामे,समितीच्या कामकाजासाठी शासनाकडून वित्त,गृह,महसूल,सामाजिक न्याय विभाग,विधी व न्याय विभाग,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या जबाबदा-या या संदर्भात सविस्तर सूचना बैठकीत केल्या.


0000



 👆🏻👆🏻

*लिंबू मिरची बांधण्याची प्रथा कशी सुरु झाली ? काय आहे नेमके कारण*


 ⚜️⚜ *संकलन ⚜️ : 

*ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिब्बा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत की तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणाऱ्या वाटसरूना तो लगेच मिळेल.*

*पण हे का?*

*▪मैलोन मैल चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्यामुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते.*

*▪त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे. जर साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तिखट नाही लागली कि साप हा विषारी होता. असा अंदाज बांधला जात असे.*

*▪बिब्बा हा उत्कृष्ट एंटीबायोटीक समजला जातो म्हणून जखम झाल्यास , कापल्यास बिब्बा लावला जात असे आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात असे जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येई.*

*▪अश्या प्रकारे हा प्रथोमपचार बैल गाडीवर , घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारा साठी होई. पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक अंधश्रद्धा बनून अजून ही चालू आहे. ह्या प्रथमोपचारपद्धतीची कशी अंधश्रद्धा झाली ह्याची माहिती पोहोचावी हा एकच उद्देश.*


👍🏻🤝🏻🤝🏻👍🏻

Ma tuzha salam

 आठवणी २६ नव्हेंबर च्या ... कहाणी एका अज्ञात नायिकेची 

स्टाफ नर्स अंजली कुल्थे- माझी खरीखुरी सेलिब्रिटी

 ही शौर्यकथा आहे, स्टाफनर्स अंजली कुल्थे यांची! अंजलीला आवर्जून आठवायला ती कुणी चकचकीत दुनियेतली हिरॉईन नाही. तिच्या शौर्याची आठवण करून द्यावी लागणं, हेच मन विषण्ण करणारं आहे. अंजली ही सीएसटी स्टेशन जवळच्या कामा व अल्ब्लेस रुग्णालयात रात्री ८ ते सकाळी ८ अशी रात्रपाळी करणारी नर्स. हे स्त्री व बालरुग्णालय असल्यानं प्रसूतिवेदना सुरू झालेल्या बाळंतपणासाठी आलेल्या २० महिला त्यावेळी अंजलीच्या देखरेखीखाली लेबर रूममध्ये आपल्या बाळाच्या जन्माच्या प्रतीक्षेत होत्या. अंजली नेहमीपमिाणे तिची जबाबदारी पार पाडत होती. ती काळरात्र होती, २६ नोव्हेंबर २००८ची! एवढ्यात, मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाब कामा रुग्णालयाच्या परिसरात आल्यानं एकच गोंधळ उडाला. हातात बंदूक घेऊन माथेफिरूसारख्या गोळ्या चालवणाऱ्या, कसाबनं रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनाच गोळ्या घातल्यानं ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यानं एका नर्सलाही जखमी केलं. ‘आता आपल्यालाही हा गोळ्या घालणार,’ या भीतीनं रुग्णालयातील रुग्ण जीव मुठीत धरून होत्या.

 

सुरक्षारक्षकांना मारल्यावर तो पहिल्या मजल्यावर येण्याच्या बेतात असतानाच प्रसंगावधान राखून अंजलीनं अक्षरशः एका क्षणात पळतच जाऊन विभागाचे जड दरवाजे कसेबसे बंद केले. तिच्या देखरेखीखाली असलेल्या वीस गर्भवती महिला व त्यांच्या नातेवाइकांना तत्काळ वॉर्डच्या टोकाला असलेल्या पँट्रीमध्ये हलवलं आणि जखमी परिचारिकेला आपत्कालिन विभागात हलवलं. कसलाही आवाज होऊ न देण्याची खबरदारी घेतली. रुग्णालयातील प्रत्येक जीव वाचवण्याची सूत्रंच जणू तिनं हातात घेतली. त्यानंतर वेळ न दवडता तिनं प्रसंगावधान राखून डॉक्टर आणि पोलिसांना फोन करून सावध केलं. या इमारतीच्या खालीच बाँबस्फोटांचे हादरे आणि दहशतवादी व पोलिस यांच्यात गोळीबार सुरू होता. दहशतीच्या वातावरणात रुग्णालयातील प्रत्येकाला धीर देण्याचं, मदत करण्याचं काम ही नर्स मोठ्या धैर्याने करत होती. त्याचदरम्यान प्रसूती करण्यासाठी दोन महिलांना तिनं ताबडतोब दुसऱ्या मजल्यावरील प्रसूति विभागात नेलं. डॉक्टरांनाही प्रसूतीसाठी मदत केली. बाळं सुखरूप जन्माला आली. हे सर्व एकाच ट्यूबच्या उजेडात चालू होतं. कारण खाली तुफान गोळीबार सुरू होता. काही काळानंतर हा आवाज थंडावला; पण ती रात्र वैऱ्याची होती.

या घटनेनंतर महिनाभरात अंजलीनं ओळखपरेडमध्ये कसाबला न घाबरता ओळखलं. ती नर्सच्या गणवेशात गेली आणि त्या गणवेशाची ताकद दाखवली. ती घाबरली नाही, डगमगली नाही, आपल्या जिवाला असलेल्या धोक्याचा तिनं त्यावेळी विचारही केला नाही. तिनं प्रसंगावधान राखलं. स्वतःच्या जबाबदाऱ्या जिवावर उदार होऊन व्यवस्थित पार पाडल्या. तिचे रुग्ण ही तिची जबाबदारी होती. त्यांचा जीव वाचवला. काळजी घेतली. तिचा गणवेश हेच तिचं सामर्थ्य होतं.

 

त्या दिवशी घाबरून तिनं दरवाजेच बंद केले नसते तर... रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवलं नसतं तर... किंवा दहशतवाद्याला ओळखायला नकार दिला असता तर... पण तिनं केलेलं काम देशासाठी किती मोठं होतं, याची जाणीव आज आपण हरवून बसलोय की काय, असं वाटतंय.

अंजली कुल्थे ही माझ्या मते, आपली खरी सेलिब्रिटी आहे. आमची ही हिरॉईन, काही दीपिका पादुकोन नाही कि झेड सिक्युरिटीच्या गराड्यातली कंगना रणावत नाही . अंजली हीच धैर्यातलं आणि सेवेतलं खरं सौंदर्य असलेली आमची हिरॉईन आहे. माझ्या साठी ती या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. पडद्यावरील नायिकां एवढेच २६ नोव्हेंबरच्या रात्री अंजली किंवा तिच्यासारख्याच अनेकांनी दाखवलेलं धैर्यही तेवढंच मोलाचं आहे. कसाबच्या विरोधात ओळख परेड सुरू होती तेव्हा जसा उज्ज्वल निकम यांच्या जिवाला धोका होता तसा शंभर टक्के अंजलीच्या जिवालाही असणार! पण तिनं सिक्युरिटी मागितलेली नाही किंवा तिची तशी अपेक्षाही नाही. अंजली कुल्थे ही कधी पेज थ्री सेलिब्रिटी होणार नाही किंवा माध्यमांमधून तिला पहिल्या पानावर स्थान मिळणार नाही, ना तिला पद्मश्री मिळेल, ना विधानपरिषद मिळेल, ना तिला पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळेल, ना महाराष्ट्रभूषण मिळेल. आपला सन्मान व्हावा, अशी तिची अपेक्षाही असणार नाही. पण ती काळाच्या ओघात विस्मरणात गेली. आपण भारतीय तिच्यासारख्या खऱ्या नायिकेला ओळखू शकत नाही की लक्षात ठेवू शकत नाही.

पण तरीही समाजमन जागं ठेवून आपण अंजली कुल्थेला दीपिका पादुकोन, रिंकू राजगुरूच्या जागी ठेवू तेव्हा या धैर्याने, हजरजबाबीने काम करणाऱ्या वैद्यक क्षेत्रातल्या लेकींना , अहोरात्र रुग्ण सेवा करत नाईटेन्गेलने पेटवलेला सेवेचा धैर्याचा दिवा तेवत ठेवणाऱ्या नर्सेस आणी ब्रदर्स ला समाजमान्यता मिळेल . त्या जेव्हा खऱ्याखुऱ्या हिरॉईन्स म्हणून गणल्या जातील, तेव्हा तुमची पाच वर्षांची मुलगी किंवा मुलगा म्हणेल, ‘आई, मला नर्स व्हायचंय.’, ‘ आई मला ब्रदर व्हायचय”

 

यानिमित्ताने मी दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून म्हणजे रात्र रात्र जागून डॉक्टरांपेक्षाही जास्त कष्ट उपसून रुग्णांची शुश्रूषा करणारे देशातील तमाम ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना मी मानाचा मुजरा करतो.

- डॉ. अमोल अन्नदाते

 reachme@amolannadate.com

www.amolannadate.com

 

#anjalikulthe #staffnurse # #amolannadate #dramolannadate

Jai shivaji

 प्रतापगडा वरील महाराजांच्या पुतळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एका गाईड ने दिलेली जबरदस्त माहिती! नक्की ऐका गाईडच्या तोंडून! 🙏🙏🙏


 तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना

नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार

नगरविकास विभागाचा निर्णय

· ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपरिषद/नगर पंचायतीत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे समायोजन

· 1477 सफाई कर्मचाऱ्यांना होणार लाभ; शासन निर्णय जारी

            मुंबई, दि. 6 : ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातील 1477 सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.


            नवनिर्मिती नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आकृतीबंधात सफाई कर्मचाऱ्यांची नियमित पदे मंजूर नसल्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन झालेले नाही.


            विविध नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये ग्रामपंचायतकालीन सुमारे 1477 सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतच्या शासनाच्या प्रचलित धोरणानुसार समावेशनाची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील मंजूर व रिक्त असलेल्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या पदांवर तत्कालीन ग्रामपंचायतींमधील सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार मंजूर व रिक्त जागांवर विहीत शैक्षणिक व तांत्रिक अर्हता प्राप्त असलेल्या इच्छुक सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, विहीत तांत्रिक अर्हता पूर्ण न करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना यासाठी महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिक प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा) या संस्थेच्या माध्यमातून ६ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे समावेशन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


००००



 

Featured post

Lakshvedhi