Monday, 6 December 2021

 नमस्कार मंडळी 

श्री मल्लारी खंडोबाचे नवरात्र माहिती 

दिनांक ५/१२/२०२१ रोजी रविवार मार्गशीर्ष शुक्लपक्ष प्रतिपदेपासून ते ०९/१२/२०२१ रोजी मार्गशीर्ष शुक्लपक्ष चंपाषष्टी पर्यंत श्री खंडोबाचे षड्रात्रोत्सवारंभ आहेत...

 नमोमल्लारि देवाय भक्तानां प्रेमदायिने I

म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमोनमः I

 मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरारिं जगद् गुरुं I 

मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् II 

 श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. या वर्षी ५डिसेंबर. ते ०९डिसे २०२१ हा खरा षड्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने वाहतात. खंडोबाच्या उपासनेंतभंडारा फार महत्वाचा आहे. 

भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो. 

तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन "सदानंदाचा येळकोट" किंवा "एळकोट एळकोट जय मल्हार" असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.


खंडोबाची पांच प्रतिके: 

१) लिंग: हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते. 

२) तांदळा: हि चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते

३) मुखवटे: हे कापडी किंवा पिटली असतात. 

४) मूर्ति: ह्या उभ्या, बैठ्या, घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. 

५) टांक: घरांत पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा.


खंडोबा हि देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे. 


काही सौम्य नवस: 

१) यथाशक्ती मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. 

२) दीपमाळा बांधणे. 

३) मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे. 

४) पायऱ्या बांधणे. ओवरी बांधणे. 

५) देवावर चौरी ढाळणे. खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे. 

६) पाण्याच्या कावडी घालणे. 

७) उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळी कडून देवाची गाणी म्हणविणे. यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. 

८) देवाची गदा म्हणजे वारी मागणे. (देवाच्या नावाने ठराविक काळांत भिक्षा मागणे.) 

९) तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे. 

१०) पुरण-वरण व रोडग्याचा आठवा रीतिनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांस भोजन घालणे. 

११) कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.


दिन विशेष: 

रविवार हा खंडोबाचा मानण्यांत आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्टी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्म दिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.


महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील बारा प्रसिद्ध स्थाने:


महाराष्ट्र:

१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी 

2) निमगाव 

३) पाली-पेंबर सातारा 

४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद) 

५) शेंगुड (अहमदनगर) 

६) सातारे (औरंगाबाद) 

७) माळेगाव 


कर्नाटक: 

१) मैलारपूर-पेंबर (बिदर) 

२) मंगसूल्ली (बेळगाव) 

३) मैलारलिंग (धारवाड) 

४) देवरगुडू (धारवाड) 

५) मण्मैलार (बल्ळारी).


बरीचशी माहिती श्रीखंडोबा विशेषांक १९७८ "प्रसाद" या मासिकामधून साभार घेतली आहे.

खंडोबाची आरती, ध्यान, हृदय, प्रातःस्मरण,आणि अष्टोत्तरशत नाम


खंडोबाचे नवरात्र:

खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात. 

खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार, तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत , मार्तंडभैरव, किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात. 

स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा

वध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले.

हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा 

असे म्हणू लागले. 

खंडोबाची वेशभुषा: साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर,

डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेष असतो.

 

प्रमुख भक्ती: 

बेल-भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ति होय. 

हळदपूड, सुक्या खोबर्‍याच्या वाट्या एकत्र करुन तो प्रसाद व 

" येळकोट येळकोट जय मल्हार " हा गजर करतात. 

याचा अर्थ असा लावतात, की ' हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न-धान्य पिकू दे. ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान-धर्म करता येईल.  

खंडोबाच्या हातांतील वस्तु: खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरु व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो.

मानप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो. 

देवस्थाने : महाराष्ट्रांत व कर्नाटकांत खंडोबाची बरीच देवस्थाने आहेत.

मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणारी एकंदर प्रमुख अशी अकरा स्थाने आहेत. 

१) जेजुरी (पुणे) २) शेबुड (अहमदनगर) ३) निमगाव दावडी (पुणे)

४) सातारे (औरंगाबाद) ५) पाली-पेंबर (सातारा) ६) मंगसुळी (बेळगांव) ७) मैलारलिंग (धारवाड) ८) मैलार देवगुड्ड (धारवाड) ९) मण्णमैलार (बल्लारी ) १०) मैलापुर-पेंबर (बिदर) ११) नळदुर्ग-धाराशी (उस्मानाबाद).

जेजुरी हे गांव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरांत असणार्‍या राममंदिरांत एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्‍या ६३ ओर्‍या आहेत. 

खंडोबाची उपासना:  

खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा-संमार्जन करावे. नंतर नवरात्र बसविणार्‍याने स्नान करुन शुचिर्भूत व्हावे. 


खंडोबाची पूजा: 


खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रुपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्नसमारंभांतच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते. देवाची स्वच्छता, घासपूस करुन पूजा करावी. 

कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करतांना सुगंधि फुले, गुलाल, व भंडार वहावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत. पूजा करतांना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत. 

पत्री : पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळसीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री-पाने देवास वहावी. 

देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावेत. देवासमोर वाटींत दूध ठेवावे. त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. 

देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात.

देवाजवळ अखंड तेला-तूपाचा नंदादीप सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात.  

सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.

महानैवेद्य: सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य , वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात. 

खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. 

कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो.

चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन, वाघ्या-मुरळींस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. तळी भरणे-उचळणे हाही नवस प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात. 

वारी मागणे.

काही घरांतून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात. जेवावयास ब्राह्मण, वाघ्या-मुरळीस बोलावतात. जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ' वारी खंडोबाची ' म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.

वारीचा अजुनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यांत वारी मागतात. ताम्हण घेऊन पाच घरी ' वारी खंडोबाची ' म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारींत दिले जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरांतील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्न-धान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे. 

दान-धर्म: 

या नवरात्रांत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान-धर्म करावा. अन्नदानास फार महत्व आहे. कुंकू-अक्षतांसह पान-विडा द्यावा.      

दिवटी-बुधले: 

दिवटी- बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधांत शांत (विझवावी.) करावी. 

व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. 

लग्नकार्यांत अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे. याही प्रचलीत प्रथा आहेत. 

खंडोबाचे नवरात्र भाग ३

खंडोबाचे षड्रात्र उत्सव म्हणजे काय? घटस्थापना कशी करावी ?

॥ चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥

॥ चंपाषष्ठी चा करिती जे करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥

चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले. 

आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा ,आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत.

साहित्य:

कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप-दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल, पंचामृत इत्यादी पूजेचे साहित्य अमावस्येच्या दिवशीच जमवुन ठेवावे. 

प्रतिपदेला प्रात:काली उठुन स्नानादि आटोपुन सर्व देव टाक पंचामृताने प्रक्षालित करुन देवघर स्वछ करुन घ्यावे. चंदन पाट किंवा चौरंगावर नवीन वस्त्र टाकुन कुळाचाराप्रमाने माती; अथवा भंडार पात्रामधे पाण्याचा कलश ठेऊन त्यावर नागवेलीची पाने नारळ ठेवुन विधीवत् घटस्थापना करावी.घटाच्या डाव्या बाजुस जोड पानावर म्हाळसा देवीच्या प्रित्यर्थ सुपारी ठेवावी. व उजव्या बाजुस जोडपानावर बानु देवीच्या प्रित्यर्थ सुपारी पुजन करावे.

नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावतो तशीच षड्रात्र उत्सवातही देवासमोर अखंड ज्योती प्रज्वलीत करावी परंतु तत्पूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...

१. षड्रात्र उत्सवात देव खंडेरायाच्या घटासमोर सहा दिवस अखंड ज्योत लावली जाते. देवासमोर एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी.

२. मंत्र महोदधि (मंत्राच्या शास्त्र पुस्तका) नुसार अग्नीसमोर करण्यात आलेल्या जपाचा साधकाला हजारपट जास्त फळ प्राप्त होते. असे म्हटले जाते की, दीपम घृत युतम दक्षे, तेल युत: च वामत:।

अर्थ - तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा

३. अखंड ज्योत संपूर्ण सहा दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे. यासाठी एका छोट्या दिव्याचा उपयोग करावा. अखंड दिव्यामध्ये तेल, तूप टाकायचे असल्यास किंवा वात ठीक करायची असल्यास छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून बाजूला ठेवावा.

४. अखंड दिवा ज्योत ठीक करताना विझला तर छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा. सहा दिवस घटावरती वेगवेगळ्या फुलांच्या माळा टांगाव्यात. मंत्र जप जागरण , भजन , गायन करावे.चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला पुरणावरणाचा नैवेद्य तसेच वांग्याचे भरीत भाकरीचे रोडगे असा नैवेद्य दाखवावा. तळीभंडार करुन घटोत्थापन करावे.

या सहा दिवसात मार्तंड भैरव स्तोत्राचे , मल्हारी विजय ग्रंथांचे वाचन करावे

 जय मल्हाR

नमो सदा श्रीगुरू नृसिंहसरस्वती दत्त महाराज संकलित cp

 बायको- "मी दारू पिणार नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार" अस लिहून द्या बाँड पेपर वर लिहून द्या 

नवरा- ओके डार्लिंग.. 

नव-याने लिहले-

 *"मी दारू पिणार, नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार"*

मराठी भाषेत स्वल्पविराम ची कमाल 🤣🤣😅😅

नवरा कुठला होता हे सांगायला नको 🤣😉😉

 मोहन नारायण गवंडे यांच्या वाॅलवरुन.....


उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि भगवान श्रीकृष्ण!!🧵


खालील थ्रेड हा सत्य घटनांवर आधारित आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांनी इल्लूस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाच्या संपादकाला पुढील घटनांबद्दल सांगितलेले आहे.

दररोज सकाळी बिस्मिल्लाह खान यांचे मामा अली बक्ष हे शेजारी असलेल्या जडौ श्री बालाजी म्हणजेच महा-विष्णु मंदिरात जात होते. त्यावेळी त्यांना दिवसभर शहनाई वाजवल्यानंतर महिन्याला चार रुपये मिळायचे. बिस्मिल्लाह सुद्धा कधी-कधी सकाळी त्यांच्या मागे जायचे, त्यांचे संगीत ऐकायचे, मोहित व्हायचे आणि गोंधळून जायचे.

मामा आणि भाचे हे दोघे सकाळच्या सत्रातील काम पूर्ण झाल्यानंतर जडौ मंदिरातील बालाजी मंदिरात जायचे. तेथे अली बक्ष यांच्यासाठी एक खोली नेमून दिली होती. दिवसभर जवळपास पाच तास ते तिथे सराव करित असे आणि ज्यावेळी अली बक्ष यांचा सराव संपायचा त्यावेळी त्यांना दिसायचं की, बिस्मिल्लाह हे त्यांच्यासमोर बसलेले आहेत आणि एका भुकेल्यासारखे ऐकताहेत.

बिस्मिल्लाहनी कधीही आपल्या मामांना त्रास दिला नाही. परंतु बिस्मिल्लाह नेहमी गोंधळून जायचे की, त्यांचे मामा हे बालाजी मंदिराच्या खोलीत सराव करण्यासाठी का जातात? कारण तोच सराव ते घरी सुद्धा करू शकतात आणि त्यांना कोणीही त्रास सुद्धा देणार नाही. याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना नेहमीच असायची आणि एकेदिवशी न राहवून त्यांनी मामांना याबद्दल विचारले.

मामांनी आपल्या कुलपावर शेवटचा हात मारला आणि उत्तर दिले, 'एकदिवस तुम्हाला ते नक्की कळेल'. बिस्मिल्लाहने पटकन विचारले, 'पण मामू मी शहनाई कधी वाजवणार?' आणि मामू म्हणाले, 'कधी वाजवणार? ही काय विचारायची गोष्ट आहे का? तू आजपासूनच सुरुवात करीत आहेस'.

लगेच मामा अली यांनी त्या संध्याकाळी बिस्मिल्लाह यांना जडौ महाविष्णू मंदिरात घेऊन गेले आणि त्यानंतर बालाजी मंदिराच्या 'त्या' खोलीत घेऊन गेले ज्या खोलीत त्यांनी रात्रीच्या शहनाई वादनानंतर जवळजवळ 18 वर्षे सराव केला होता. शेवटी मामू अली यांनी बिस्मिल्लाह खान यांना तिथे सराव करण्याची परवानगी दिली. ती परवानगी देत असताना मामू अली यांनी त्यांना एक 'ताकीद' दिली की, या मंदिरात जर तुला काही वेगळा अनुभव आला किंवा काही वेगळे दिसले? तर कोणाला काहीही सांगायचे नाही.

बिस्मिल्लाह खूप आनंदित झाले आणि त्यांनी त्या खोलीत चार ते सहा तास सराव केला, चार भिंतीच्या बाहेर होणार्‍या बदलांकडे दुर्लक्ष करून त्यांनी संगीताच्या सुर-तालाची नवीन उंची आणि खोली शोधून काढली, आपले संगीत सुधारण्याच्या इच्छेने बिस्मिल्लाह यांना झपाटून टाकले होते.

एकेदिवशी बिस्मिल्लाह खान हे पहाटे चारच्या सुमारास बालाजी मंदिराच्या आवारात एकटेच होते आणि ते त्यांच्या शहनाईच्या सरावात मग्न होते. त्यावेळी अचानक त्यांना आपल्या शेजारी कोणीतरी बसले असल्याची जाणीव झाली आणि जेव्हा त्यांनी बघितले तर ते दुसरे कोणी नसून 'भगवान बालाजी' होते.

'भगवान बालाजी' आपल्या शेजारी बसलेले असलेले बघून बिस्मिल्लाह हे स्तब्ध झाले आणि अवाक राहिले. त्यांचा अवाकपणा बघून भगवान बालाजीनी हसत हसत म्हटले की, 'वाजवा'. परंतु बिस्मिल्लाह हे अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातून सावरू शकले नव्हते आणि त्यामुळे भगवान बालाजी हसले आणि तिथून निघून गेले.

बिस्मिल्लाह खान हे त्यादिवशी लगेच आपले गुरु आणि मामा अली बक्ष यांच्याकडे गेले आणि घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तो प्रसंग ऐकताच मामा अली यांनी बिस्मिल्ला यांच्या गालफडात लावली आणि त्यांना सांगितले की, तुला मी सांगितलं होतं की काहीही वेगळे दिसले किंवा अनुभव आला तर कोणाला काहीही बोलायचे नाही. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची व भगवान श्रीकृष्णाची प्रत्यक्ष भेट झालेली होती.

मुस्लीम श्रद्धा असूनही प्रसिद्ध उस्ताद बिस्मिल्ला खान हे भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रचंड आदर बाळगतात. ज्यामुळे दयाळू असलेला परमेश्वर श्रीकृष्ण हा त्यांच्यासमोर स्वतः प्रकट झाला असावा.

वरील कथा ही उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या मुलाखतीवर आधारित आहे. जी 'मल्याळम मनोरमा'मध्ये डॉक्टर मधु वासुदेवन यांनी प्रकाशित केली होती.

बर्‍याच वर्षापूर्वी उस्ताद बिस्मिल्लाह खान एकदा 'जमशेदपूर ते वाराणसी' असा रेल्वेने प्रवास करीत होते. उस्ताद हे कोळशावर चालणार्‍या पॅसेंजर ट्रेन मध्ये थर्ड क्लासच्या डब्यात प्रवास करीत होते.

एका मध्यम ग्रामीण रेल्वे स्थानकावरून ज्या बोगीत उस्ताद बसले होते त्याच बोगीत एक तरुण गोरक्षक आला. तो दिसायला सावळा आणि हडकुळा असलेला तरुण होता व तो बासुरी वाजवत होता.

उस्ताद असलेले बिस्मिल्ला त्या तरुणाच्या उत्तम दर्जाच्या संगीताने थक्क झाले. कारण तो तरुण कोणता 'राग' वाजवित आहे? याची सुद्धा त्यांना कल्पना येत नव्हती. उस्ताद बिस्मिल्लाह यांच्या म्हणण्यानुसार, 'हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात 'भगवान श्रीकृष्ण' होते जे स्वतः 'परमात्मा' आहेत'.

तरुणाच्या (कृष्णाच्या) बासरीतून वाहू लागलेल्या या नाद-ब्रम्हातील (संगीताच्या रूपातील ब्रह्म) अमृततुल्यामुळे उस्तादांचे हृदय आनंदाने भरले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 

त्या तरुणाच्या (कृष्णाच्या) या अतुलनीय बासरीवादनानंतर उस्तादांनी त्या तरुणाला (कृष्णाला) जवळ बोलावले आणि त्याला आपल्याजवळ असलेल्या रोख रकमेतून एक चतुर्थांश भाग दिला व त्याला पुन्हा तोच 'राग' वाजवण्यास सांगितले. तो तरुण म्हणजे 'भगवान कृष्ण' बासुरीवादन करण्यास खुशीने तयार झाला आणि उस्ताद बिस्मिल्लाह यांच्याकडील सर्व रोख रक्कम संपेपर्यंत असेच चक्र सुरू राहिले आणि जेव्हा हे चक्र थांबले. त्याच्या पुढच्याच रेल्वे स्टेशन तो तरुण (कृष्ण) उतरला आणि गायब झाला.

खरं म्हणजे उस्ताद बिस्मिल्लाह खान हे कुंभमेळ्याशी संबंधित एका संगीत मैफलीत भाग घेण्यासाठी जात होते. त्या मैफिलीत उस्ताद यांनी नवीन 'राग' जो त्यादिवशी त्यांनी कृष्णाकडून शिकला होता. तो शहनाईवर वाजवला. श्रोत्यांना त्यांचा हा नवीन सुरेल असा 'राग' इतका आवडला की उस्तादांना तो पुन्हा पुन्हा वादन करण्याची लोकांनी विनंती केली.

तिथे असलेल्या अनेक संगीत अभ्यासकांना त्या 'रागा'ला काय म्हणतात? हे समजू शकले नाही म्हणून त्यांनी बिस्मिल्लाह खान यांना याबद्दल विचारले. उस्ताद यांच्या म्हणण्यानुसार या रागाचे नाव 'कान्हारीरा' होते.

दुसर्‍या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या या नवीन मधुर 'रागा'बद्दलच्या बातम्या छापल्या गेल्या.

ते वाचून प्रसिद्ध संगीतकार (बासरीवादक) हरिप्रसाद चौरसिया यांनी बिस्मिल्ला खाँ यांच्याकडे 'कान्हारीरा' रागाच्या गुंतागुंतीबद्दल विचारपूस केली.

उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनी त्यांच्याकडे 'सत्या'ची कबुली दिली आणि 'कान्हारीरा' राग गाऊन दाखवला. तो ऐकल्यानंतर जगातील सर्वात महान बासरीवादक हरिप्रकाश चौरसिया यांच्या डोळ्यातून सुद्धा आनंदाश्रू निघाले. 

'कान्हारीरा' हा भारतीय संगीतातील एक पवित्र 'राग' आहे. कारण ते 'श्री' कडून आलेले आहे. देवांचे देव कृष्णाच्या 'कमलरुपी' ओठांतून ते आलेले आहे.

जेव्हा त्यांच्या शिष्याचा सन्मान करण्याचा विचार भगवान श्रीकृष्णाच्या मनात येतो तेव्हा त्यांच्या सन्मानाच्या पद्धती या खूप रहस्यमय असतात. भगवान श्रीकृष्ण हे जात, पंथ किंवा धर्मावर आधारित भेदभाव करत नाहीत. फक्त आणि फक्त 'भक्ती' इतकीच एक अट त्यांची असते.

सर्वं श्रीकृष्णार्पणम्‌ !

धन्यवाद!

पवन!

Avod cancer imp tips

 🍋🍐🍋

 *रिकाम्या पोटावर फळे खाणे*


 हे तुमचे डोळे उघडेल! शेवटपर्यंत वाचा; आणि मग, तुमच्या यादीतील इतरांना ते पाठवा जसे मी तुम्हाला केले!

 डॉ स्टीफन माक टर्मिनल आजारी कर्करोगाच्या रुग्णांवर "अन-ऑर्थोडॉक्स" पद्धतीने उपचार करतात आणि बरेच रुग्ण बरे झाले आहेत.

 त्याने आपल्या रुग्णांचे आजार दूर करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यापूर्वी, तो आजारांविरुद्ध शरीरातील नैसर्गिक उपचारांवर विश्वास ठेवतो. त्याचा लेख खाली पहा.

 कर्करोग बरे करण्याचे हे एक धोरण आहे. उशीरापर्यंत, कर्करोगाच्या उपचारात माझ्या यशाचा दर सुमारे 80%आहे.

 कर्करोगाचे रुग्ण मरू नयेत. कर्करोगाचा उपचार आधीच सापडला आहे. *आपण ज्या प्रकारे फळे खातो.*

 तुमचा विश्वास आहे की नाही हे आहे.

 पारंपारिक उपचारांखाली शेकडो कर्करोग रुग्णांचा मृत्यू झाल्याबद्दल मला खेद आहे.

 *फळ खाणे*

 आपल्या सर्वांना वाटते की फळे खाणे म्हणजे फक्त फळे विकत घेणे, ते कापणे आणि फक्त ते आपल्या तोंडात टाकणे.

 तुम्हाला वाटते तितके सोपे नाही. फळे कशी आणि कधी खावीत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

 फळे खाण्याची योग्य पद्धत कोणती?

 *याचा अर्थ आपल्या जेवणानंतर फळं खात नाही!*

 *रिक्त पोटात फळे खावीत*

 जर तुम्ही रिकाम्या पोटावर फळे खात असाल, तर ते तुमची प्रणाली डिटॉक्सिफाय करण्यात मोठी भूमिका बजावेल, तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आणि इतर जीवन कार्यांसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा पुरवेल.

 फ्रूट हे सर्वात महत्वाचे अन्न आहे.

 समजा तुम्ही ब्रेडचे दोन काप आणि नंतर फळांचे तुकडे खा.

 फळाचा तुकडा पोटातून सरळ आतड्यांमध्ये जाण्यासाठी तयार असतो, पण फळाच्या आधी घेतलेल्या भाकरीमुळे असे करण्यापासून रोखले जाते.

 या दरम्यान ब्रेड आणि फळांचे संपूर्ण सडणे आणि आंबणे आणि आम्ल बनते.

 ज्या क्षणी फळ पोटातील अन्नाशी आणि पाचन रसांच्या संपर्कात येते, त्याच क्षणी अन्नाचा संपूर्ण वस्तुमान खराब होऊ लागतो.

 म्हणून कृपया आपली फळे *रिकाम्या पोटी किंवा जेवणापूर्वी खा!*

 तुम्ही लोकांना तक्रार करताना ऐकले आहे:

 प्रत्येक वेळी मी टरबूज खातो तेव्हा मी गुरफटतो, जेव्हा मी ड्युरियन खातो तेव्हा माझे पोट फुगते, जेव्हा मी एक केळी खातो तेव्हा मला शौचालयात धावल्यासारखे वाटते.

 खरं तर जर तुम्ही रिकाम्या पोटी फळ खाल तर हे सर्व उद्भवणार नाही.

 फळ इतर अन्नांच्या पुटफायिंगमध्ये मिसळते आणि गॅस तयार करते आणि म्हणूनच तुम्ही फुगून जाल!

 राखाडी केस, टक्कल पडणे, चिंताग्रस्त उद्रेक आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे हे सर्व आपण *रिकाम्या पोटी फळे घेतल्यास होणार नाही.*

 संत्रा आणि लिंबूसारखी काही फळे अम्लीय असतात, अशी कोणतीही गोष्ट नाही, कारण सर्व फळे आपल्या शरीरात अल्कधर्मी बनतात, असे डॉ हर्बर्ट शेल्टन यांनी या विषयावर संशोधन केले आहे.

 जर तुम्ही फळे खाण्याच्या योग्य पद्धतीवर प्रभुत्व मिळवले असेल, तर तुमच्याकडे *सौंदर्य, दीर्घायुष्य, आरोग्य, ऊर्जा, आनंद आणि सामान्य वजन यांचे रहस्य आहे.*

 जेव्हा तुम्हाला फळांचा रस पिण्याची गरज असते *फक्त ताज्या फळांचा रस प्या,* कॅन, पॅक किंवा बाटल्यांमधून नाही.

 गरम झालेला रसही पिऊ नका.

 शिजवलेली फळे खाऊ नका कारण तुम्हाला पोषक तत्त्वे मिळत नाहीत.


 आपल्याला फक्त त्याची चव मिळते.

 पाककला सर्व जीवनसत्त्वे नष्ट करते.

 पण रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे चांगले.

 जर तुम्ही ताज्या फळांचा रस प्यायला असाल, तर ते हळू हळू तोंडावाटे प्या, कारण ते गिळण्यापूर्वी तुम्ही तुमच्या लाळेमध्ये मिसळू द्या.

 आपण आपले शरीर स्वच्छ किंवा डिटॉक्सिफाई करण्यासाठी 3 दिवसांच्या फळावर जाऊ शकता.

 फक्त 3 दिवस फळे खा आणि ताज्या फळांचा रस प्या.

 आणि जेव्हा तुम्ही तुमचे मित्र तुम्हाला किती तेजस्वी दिसता हे सांगता तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल!

 *किवी फळ:*

 लहान पण पराक्रमी.

 पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि फायबरचा हा चांगला स्रोत आहे. त्याची व्हिटॅमिन सी सामग्री संत्र्यापेक्षा दुप्पट आहे.

 *सफरचंद:*

 रोज एक अप्पाल खा आणि डॉक्टर पासून दूर रहा?

 सफरचंदात व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी असले तरी त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात जे व्हिटॅमिन सीची क्रिया वाढवतात ज्यामुळे कोलन कर्करोग, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते.

 *स्ट्रॉबेरी:*

 संरक्षक फळ.

 स्ट्रॉबेरीमध्ये प्रमुख फळांमध्ये सर्वाधिक अँटिऑक्सिडंट शक्ती असते आणि शरीराला कर्करोगास कारणीभूत, रक्तवाहिन्या-बंद आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते.

 *नारंगी:*

 सर्वात गोड औषध.

 दिवसातून 2-4 संत्री घेतल्यास _ सर्दी दूर ठेवण्यास, कोलेस्टेरॉल कमी करण्यास, मूत्रपिंडातील दगड रोखण्यास आणि विरघळण्यास तसेच कोलन कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

 *वॉटरमेलन:*

 सर्वात छान तहान शमवणारा. 92% पाण्याने बनलेले, ते ग्लूटाथिओनच्या विशाल डोससह देखील भरलेले आहे, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

 ते लाइकोपीन कर्करोगाशी लढा देणारे ऑक्सिडंटचे मुख्य स्त्रोत देखील आहेत.

 टरबूजमध्ये आढळणारे इतर पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम.

 *गुवा आणि पपाया:*

 व्हिटॅमिन सी साठी सर्वोच्च पुरस्कार ते त्यांच्या उच्च व्हिटॅमिन सी सामग्रीसाठी स्पष्ट विजेते आहेत.

 पेरूमध्ये भरपूर फायबर असते, जे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.

 पपई कॅरोटीनमध्ये समृद्ध आहे; हे तुमच्या डोळ्यांसाठी चांगले आहे.

 *थंड पाणी किंवा जेवणानंतर पेय = कॅन्सर*

 तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता का?

 ज्यांना थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स पिणे आवडते त्यांच्यासाठी हा लेख तुमच्यासाठी लागू आहे.

 जेवणानंतर एक कप थंड पाणी किंवा थंड पेय घेणे छान आहे.

 *तथापि, थंड पाणी किंवा पेय आपण नुकतेच खाल्लेले तेलकट पदार्थ घट्ट करतील.*

 *यामुळे पचन मंदावते.*

 *एकदा हा 'गाळ' आम्लाशी प्रतिक्रिया देतो, तो तो तुटून आतड्यातून घन अन्नापेक्षा वेगाने शोषला जाईल.*

 *ते आतड्यात रेषा करेल.*

 *लवकरच, हे FATS मध्ये बदलेल आणि कॅन्सरकडे नेईल!*

 _*जेवणानंतर गरम सूप किंवा कोमट पाणी पिणे चांगले.*_

 चला काळजी घ्या आणि जागरूक व्हा. आपण जितके अधिक जाणून घेऊ तितकेच आपल्याला जगण्याची अधिक चांगली संधी आहे.

 हृदयरोग तज्ञ म्हणतात:

 जर प्रत्येकाने ज्याला हा मेल मिळतो तो 10 लोकांना पाठवतो, आपण खात्री बाळगू शकता की आम्ही किमान एक जीव वाचवू.

🌹डॉ . विलास गावडे ❤️🌹

Mera Bharat mahan

 Mumbai

 जगातील सगळ्यात मोठा झेंडा 

FLAG 1400 किलो

225 फूट लांब 

आणि 150 फूट रुंद BROAD 

Gate Way Of Indian 

शेजारी.. NEAR 👇👇👇👇👇


👇👇

Om nm shivay

 कांचीपुरम एकम्बरनाथर मंदिर 100008 हीरे शिवलिंग पर जड़े हैं। एक दुर्लभ तस्वीर, हम भाग्यशाली हैं जो हमें इनके दर्शन प्राप्त हुए हैं। कृपया शेयर करें ।

ॐ नमः शिवाय ! 🌷


Katy satya

 *मनोगत*


           *पोलीस खात्यात 20 वर्षे नोकरी पूर्ण केल्यानंतर पोलिस हवालदार स्वेच्छा निवृत्ती(v.r.s) मंजुर करण्याकरिता डीसीपी यांच्या कॅबिन मध्ये गेल्यानंतर,  डिसीपीने पोलिस हवालादर यांचे बराच वेळ मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला , शेवटी स्वेच्छा निवृत्ती मंजूर केली.*   

           *पण न राहून शेवटी एक प्रश्न विचारला " सर्व काही मिळत होते या नोकरीमुळे, तरी सुध्दा नोकरी का सोडत आहे तुम्ही ? "*

           *त्यावर पोलीस हवालदार याने सुंदर हृदयस्पर्शी व मार्मिक उत्तर दिले.*

          *"सर बऱ्याच वेळा पासून तुमच्या समोरील खुर्च्या खाली असून देखील मी गेल्या दोन तासापासून मी सावधान मध्ये उभा आहे. पण तुम्ही साधे माणुसकी सुद्धा तुम्ही दाखवत नाही आणि बसायला पण सांगत नाही,आणि हे अमानुष पणाचे वागणे आता मला सहन होत नाही, कारण वीस वर्षा पूर्वी जी ताकत माझ्या मध्ये सहनशीलतेची होती, ती आता संपलेली आहे पण तुमच्या पदा मधील इंग्रज अधिकाऱ्याची वृत्ती अजून काही बदलली नाही "*


          *बस एवढेच कारण आहे नोकरी सोडण्याचे "*

 _(हे पोलीस दलातील एक प्रतिकात्मक उदाहरण आहे अमानुष पणाचे आणि शिस्तीच्या नावाखाली समोरच्याला माणूस न मानण्याचे)_ 

*हे एक पोलिस दलातील बोलके उदाहरण असले तरी प्रत्येक शासकीय कार्यालयात देखील थोड्याफार फरकाने दुर्दैवाने हिच परिस्थिती आहे. साक्षात देवाने पृथ्वीतलावर  सर्व कामगार, कर्मचारी तसेच आपल्या अधिनस्थ शासकीय सेवा बजावणारे यांचेवर अधिराज्य गाजवण्यासाठीच आपल्याला पाठवले असल्याची भावना अधिकारी वर्गात निर्माण झालेली आहे.कर्मचारी वर्गावर अन्याय, तुच्छतेची वागणूक देण्यासाठीच शासनाने आपली नेमणूक केली असल्याची कांही* *सन्माननीय अपवाद वगळता नोकरशाह व अधिकारी वर्गाची भावना झालेली आहे 👏👏🙏🙏

कोणी लिहिली माहीत नाही, पण वस्तुस्थिती खरी आहे।


Featured post

Lakshvedhi