Thursday, 2 December 2021

 *कोरोनामुळे मृत्यू: नातेवाईकांना सानुग्रह सहाय्याच्या ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ विकसित*


ठाणे, दि.२: कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता यावे याकरिता राज्य शासनाने वेब पोर्टल विकसीत केले असून अर्जदाराने mahacovid19relief.in वर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्देशानुसार कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याबाबत महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन निर्णय जाहिर केला. त्यानुसार ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले असून त्याद्वारे कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगईन करणे आवश्यक आहे. https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे. 

*अर्ज करण्याची प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रांची माहिती:* अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगईन करता येईल.

कोरोनामुळे मृत्यू झाला अशी केंद्र शासनाकडे ज्यांची नोंद झाली असेल अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोरोना मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ट्यर्थ कागदपत्रे अर्जासोबत द्यावी लागतील. 

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावरअर्जदारास जिल्हा, महानगरपालिका स्तरावर गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील.

अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज सात दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधारसंलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

००००

Bhartiya arithmetic

 *अद्भूत*


गणितात कोणतीही संख्या १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्याने भागता येत नाहीत, पण ही एक संख्या अशी विचित्र आहे की जगातले सर्व गणितज्ञ आश्चर्याने चकित झाले. ही संख्या भारतीय गणितज्ञांनी आपल्या अचाट बुद्धीने शोधली...!

ही संख्या - २५२० पहा. ही इतर अनेक संख्यांपैकी एक आहे असे दिसते पण वास्तव्यात मात्र तसे नाही, ही अशी संख्या आहे जगातील अनेक गणितज्ञांना थक्क करून सोडले !

ही विचित्र संख्या १ ते १० यापैकी प्रत्येक संख्येने भाग जाणारी आहे, ती संख्या सम वा विषम असली तरीही. ह्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी शून्यच रहाते. खरोखरच ही अद्भूत व अशक्य अशी संख्या वाटते ! आता पुढील टेबल पहा, वरील विधानाची सत्यता स्वतः अनुभवा.

2520 ÷ 1 = 2520

2520 ÷ 2 = 1260

2520 ÷ 3 = 840

2520 ÷ 4 = 630

2520 ÷ 5 = 504

2520 ÷ 6 = 420

2520 ÷ 7 = 360

2520 ÷ 8 = 315

2520 ÷ 9 = 280

2520 ÷ 10 = 252

२५२० या संखेचे रहस्य [ ७ × ३० × १२ ] या गुणाकारात दडले आहे.

भारतीय हिंदू संवत्सरच्या अनुषंगाने या २५२० संखेचे कोडे उलगडते,जे या संखेचे गुणाकार आहे. 

एक आठवड्यांचे दिवस (७), एका महिन्याचे दिवस (३०) व एका वर्षाचे महीने (१२)

[७×३०×१२=२५२०]

हेच आहे भारतीय कालगणनेचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व !

*भारतवर्षाने विश्वाला निरपेक्षतेने ज्ञान दिले नव्हे नव्हे ज्ञानभांडार दिले . विज्ञानाचा उत्तुंग अविष्कार म्हणजे भारतीय संस्कृती !! ज्ञानदानाने ज्ञान वाढते या दृढ विश्वासामुळे आपल्या ऋषीनी(शास्त्रज्ञानी *पेटंट्स* *घेतले नाहीत . म्हणुन त्यांचे महत्व कमी होते का? बील्कुल नाही . पुर्वसुरीनी हे आपल्यासाठी जे संचित ठेवलेय त्याचा नुसता पोकळ अभिमान न बाळगता या प्रगल्भ संस्कृतीचा प्रसार होणेसाठी या अशा बाबी शोधुन;अभ्यासुन ;वैज्ञानिक कसोट्यांवर पुन: एकदा घासुन/तपासुन प्रसारायला हव्यात .

भारतवर्ष जगाचा गुरु आहेच म्हणुन आपली जबाबदारीही वाढते हे लक्षात घेवुन दिवसातील किमान काही वेळ तरी संस्कृतीचा (काही लोक यास हिंदु/वैदिक धर्म असे संबोधुन त्यास मर्यादा घालतात) 

अभ्यास/ अध्ययन करावे ; बघा आनंद मिळेल .

साभार - 

अप्पा पाध्ये गोळवलकर ;

गोळवली;कोंकण .

@८७६७०७१७०५

 



 *ज्यांना* *ज्यांना* *आई* *आहे* *मग* *ती* *तरुण* *असो* *किंवा* *वृद्ध* *त्या* *सर्वांनी* *मुद्दाम* *खालील* *लेख* *वाचून* *तसे* *आचरण* *करण्याचा* *प्रयत्न* *करावा* *हीच* *अपेक्षा* *!*         

                                       

 पेशाने सर्जन असणा-या मुलाने लिहिलेला अतिशय सुंदर लेख -


              बीजांड ते ब्रह्मांड


वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमच

सर्व अवयव नव्वदीतले. 

झिजलेल्या कंबरेवरचा मुक्कामार तिला कायमचा परावलंबी करून गेला. 

पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं.

तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच. 

वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता. 

पण म्हातारपण म्हणजे सुकून जिर्ण झालेलं बालपण. 

तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. 

सल्ला मसलतींचा पाउस पडला. 

लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर... 

मनाला पटेना.

अनेक पर्यांयांचा उहापोह झाला. 

आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. 

सलग सुट्ट्यांचा दुष्काळ.

मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं. चिडक्या हट्टी म्हातारबाळाची आई व्हायचं.

   लाळेरं लावून सकाळी चमच्याने पाजलेला चहा. 

दमदाटी करत भरवलेलेचे चिऊ काऊ चे घास. 

कधी ठसका, कधी मळमळ तर कधी उलटी... 

बहाणेच बहाणे.

पेशाने सर्जन, मलमुत्र रोगांशी जुनी दोस्ती. त्यामुळे संकोच सोडणं सोपं गेलं. 

डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला पर्यायच नव्हता.

वेळोवेळी डायपर बदलून, अंग पुसून, पावडर लावून कपडे घालण्यापासून तेल लावून वेणी फणी करण्यापर्यंत सगळं.

दिवसातून दोन तीनदा घर ते हाॅस्पिटल.

हाॅस्पिटल ते घर अप-डाऊन.

धावपळ होत होती; पण थकवा आला तरी जाणवत नव्हता. 

तिच्या प्रत्येक हाकेमुळे मनातल्या मनात माझाही पान्हा फुटत असावा. 

मनाच्या कुठल्यातरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो. 

*कुठल्याही कळा न सोसता मला तिचं आईपण मिळालं हे माझं किती मोठं भाग्य होतं.* 

पण फार काळ नाही. 

काही महिन्यांची सेवा आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणी ने गड सोडला.

मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली. कुणीतरी म्हणालं पुण्य कमावलंस. 

त्यांचं खरं असेल तर हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतील माझं पान भरायला पुरेसं होईल.

देव आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू.

देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वी वर पाठवलं। असं कुठंतरी वाचलेलं. त्या वाक्याचा प्रत्यय यावा अशी आपली आई.

रामची असो की शामची.

कैकयी असो की गांधारी.

आई सगळ्यांची सारखीच.

शरीराने आणि मनाने आपल्या गूढ देवराई तील शक्ती देवता. 

फक्त आपल्या भल्यासाठीच तिच्या ओंजळीतली माया रिकामी करणारी लक्ष्मी.

प्रत्येकाच्या छोट्याशा आकाशातील अढळ स्थानावरील ध्रुवतारा. तिचं गुरुत्वाकर्षण तर पृथ्वीपे‌क्षाही भारी. खालून वर नेणारं.

*बिजांडातून ब्रम्हांडात पोहचवणारं.*

तिच्या बिजांडात अंकुरलेला सुक्ष्म कोंब म्हणजे आपण.

एक दशांश मि.मि.पेक्षाही लहान. गर्भाशयाच्या भिंतीवर ‌मुळं पसरून, तिचंच रक्त शोषून तगणारं बांडगुळ.

मधेच केव्हातरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बेंबीतून. 

त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपटं होण्याची सुरूवात होते.

चैत्राच्या पालवी सारखे हळूहळू फुटलेले कोवळे कोवळे अवयव. तिचीच उर्जा घेऊन सुरू झालेली इंजिनं... 

आदिपासून अंतापर्यंत अव्याहत पळणारी.

  नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास आणि नव्या ह्रदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा. 

नॅनोग्रॅम पासून ते किलोग्राम पर्यंतची वाढही तिच्याच कोठारातील.

कणाकणानं वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका. 

कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला सुरक्षित वाहणारा. 

लाथा मारणारं बाळ, आणि लाथा मारणारी परिस्थिती, दोघांना झेलत तारेवर झूलणारी डोंबारीण.

नऊ महिने नऊ दिवसांची कसरत. 

ढोलकं बडवायला नवरा आणि टाळ्या पिटायला ढिगभर जमाव. 

पण मदतीसाठी थाळी फिरवली की सगळ्यांचं घुमजाव.‌

बाळनिवासाच्या पायाभरणीत फिक्कट करणारे दिवस. 

धापा टाकत टाकत केलेलं रांधा वाढा, उष्टी काढा. 

सुजून जडावलेले पाय आणि वाढलेले श्वास म्हणजे घटीका भरल्याची नांदीच.

चंद्र, ग्रह, तारे बाळाच्या कुंडलीत स्थिरावले, कि सुरू झालेल्या प्रसव कळा.

खोल, गूढ,अगम्य कृष्ण विवरातील वादळ.

सुरुवातीला समुद्राच्या हळुवार लहरींचे हिंदोळे. 

नंतर याच लहरींवर स्वार झालेल्या भरतीच्या धडका. 

एकामागून एक. 

बाळाच्या ओढीने वाढलेल्या कळा जणू चंद्रासाठी उसळणाऱ्या पौर्णिमेच्या लाटा. काही सौम्य काही रौद्र. 

उरल्या सुरल्या शक्तीला मुठीत घट्ट आवळून घेतलेल्या, कळांवर कळा...

प्राण पुरवणारा वार जागा सोडण्यासाठी भिंतीपासून विलगू लागतो.

मुळापासून विस्थापित होण्याच्या भितीने बाळही अस्वस्थ होऊ लागते.

अशुभ संकेतांची टिटव्यांची टिवटिव.

गुदमरणाऱ्या बाळासाठी, खचलेला धीर मुठीत आवळून एक जोराची किंकाळी आणि निकराची एक शक्तीशाली कळ.

किनारा चिरणाऱ्या पाण्याच्या लोंढयात तरंगत आलेलं आणि दाईने झेललेलं गोंडस बाळ.

मातेने सोसलेल्या यातनांना बाळाने रडून दिलेली दाद, म्हणजे बाहेरच्या जगातला पहिला श्वास.

दुपट्यातल्या सुखाला उराशी कवटाळून अमृतकुंभाला शोधणाऱ्या अधाशी ओठांना कौतुकाने पाहणारे आईचे डोळे.

फुटलेल्या पान्ह्यातून गळणारे थेंब वेदनांचा निचरा करत बाळाच्या ओठांवर विसावले की, अमृताच्या अभिषेकात न्हाऊन तिच्या काळजाचा तुकडा झोपी जातो.

माता कुराणातील असो वा पुराणातील. तिचं वात्सल्य कुणालाही नतमस्तक करणारं.

अनुसया असो कि आदिती.

दिगंबराची असो किंवा पैगंबराची.

*आई शेवटी आईच असते.*

जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं त्याचं नातं अद्वैत. 

तिने शुन्य बॅलन्स वापरून उधळलेली अनमोल ममता.

त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढणारा प्रत्येक मोठा आकडा तिच्या ममतेशी गुणला की शुन्यच. 

जगभर फिरला, पण तिच्या उपकारांची परतफेड करणाऱ्या वस्तूंचा मॅाल नाही दिसला.

डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड, पास बुकं ही या नात्यात फक्त कागदं आहेत. 

आईचं कर्ज फेडण्या इतका त्यात बॅलन्स कुठे आहे ?

या ओझ्यातून किंचित मुक्त होण्याचा एक मार्ग... 

एक उतराई... 

शक्य असेल तर जरूर बना

                *आईची आई...*

-🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁


 

 *तवा माणूस माणसात होता*

 घरात टि.व्ही चं खोकं नव्हतं...💐

मोबाईल मध्ये डोकं नव्हतं...💐

काचा कवड्याचा खेळ होता..

गुटक्यानं भिती रंगत नव्हत्या...💐

ब्युटी पार्लरमध्ये झिंगत नव्हत्या...💐

ओठांवर ओरीजनल लाली होती...💐

चंद्राची खळी गाली होती...💐

पोरी मोबाईलवर गात नव्हत्या...💐

शाळेतुन पळून जात नव्हत्या...💐

वाकडा भांग पाडत नव्हत्या...💐

तोंड बांधून हिंडत नव्हत्या...💐

वाघासारखा लेक होता...💐

तवा बाप माणसात होता...💐 

राजकारणात निष्ठा होती...💐

खरं बोलणाऱ्याची चेष्टा नव्हती...💐

पैशावर पुढारी फुटत नव्हतं...💐

तत्वाशिवाय गटत नव्हतं...💐

प्रेम-माया अटत नव्हती...💐

चांगली माणसं तुटत नव्हती...💐

चहा-चिवड्याला रडत नव्हती...💐

*चोरुन पिल्याबिगर चढत नव्हती*...💐

आडाणी नेता भानात होता...💐

तळातला कार्यकर्ता मनात होता...💐

सोसायटीचा चेअरमन रानात होता..

तवा माणुस माणसात होता...💐

गावा शेजारी बार नव्हता...💐

रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता...💐 

पाठीवर दफ्तराचा भार नव्हता...💐

अनवाणी पायाला रस्ता गार होता.💐 

हातावर छडीचा मार होता...💐

शाळेचा मास्तर दिलदार होता...💐

तवा पैशाला किंमत नव्हती...💐

आयुष्य म्हणजे गंमत नव्हती...💐

घासाघासात कस होता...💐

माणसाच्या वागण्यात रस होता...💐

*तवा माणुस माणसात होता...*

         👆 🙏🙏🙏🙏

Gele te din gele

 सारे सारे निघून गेलेत.....


*कहीं दूर, कहीं दूर*


लता,आशा आता गात नाहीत..

भीमसेन, कुमारचे सूर हरवलेत..

शिवकुमार, हरिप्रसाद ही आता केव्हातरी..

आर डी, लक्ष्मी-प्यारे शांत झालेत..

कपिल, गावस्कर, तेंडुलकर आता खेळत नाहीत..

प्राण, कादर खानची दादागिरी संपली आहे..

अमिताभही आता फाइटिंग करत नाही..

रेखा, हेमा, झीनत, सा-यांचं सौंदर्य संपून गेलंय..

अटलजींचं ओघवतं हिंदी..

बाळासाहेबांची शिवाजी पार्कवरची गर्जना..

इंदीवरच्या गाजलेल्या मैफिली..

जगजीत, मेहंदीचा दर्दभरा आवाज..

रफी, किशोरची हृदयातली साद..

मुकेशचं कारुण्य, मन्ना डेचा पहाड़ी सूर..

सारे सारे निघून गेलेत 

*"कहीं दूर, कहीं दूर"*

रेश्माची तानही विरून गेली आहे..

तलतची मखमल विरून गेली आहे..

पुलंचं मिश्किलपणे गोष्टी सांगणं..

बापट, विंदा, पाडगावकरांचं कविता ऐकवणं..

शंकर पाटीलांच्या गावरान गप्पा व दमांची मिरासदारी संपलीय..

हृदयनाथ, ग्रेसच्या अविस्मरणीय मैफिली..

पल्लेदार संवादांनी जिवंत झालेला काशीनाथ घाणेकरांचा संभाजी..

कडक, शिस्तप्रिय तरीही प्रेमळ, हवासा सतिष दुभाषींचा प्राध्यापक..

आणि भक्ति बर्वेंची 'ती फुलराणी'..

नंदू भेंडेंने जिवंत केलेला

पु.लंचा 'तीन पैशाचा तमाशा'..

डॉ. आगाशेंचा 'घाशीराम कोतवाल'..

विजयाबाईंचं 'हमिदाबाईची कोठी' व 'बॅरिस्टर'..

जब्बारची 'अशी पाखरे येती' आणि 'सिंहासन'..

सिंहासनमधली लागू भटांची जुगलबंदी..

सामनामधली लागू फुलेंची आतिशबाजी..

'पुरुष' मधला राकट नाना..

चिमणराव प्रभावळकर 

आणि गुंड्याभाऊ कर्वे..

'गज-या'तले आपटे..

'प्रतिभा आणि प्रतिमा'ची सुहासिनी मुळगावकर..

आकाशानंदांचा 'ज्ञानदीप', 

तबस्सुमचं 'गुलशन गुलशन'..

'आवाज़ की दुनिया का दोस्त' अमीन सयानीचा दर बुधवारचा *आज पहली पायदान पर हैं*

म्हणत हृदयाला हात घालणारा आवाज..

रविवारचा विविधभारती वरचा 'एस. कुमार का फिल्मी मुक़दमा'..

आणि रेडियो सीलोन वरचा सैगलचा समारोप स्वर..

दर एक तारखेला न चुकता लागणारं किशोरचं 'दिन हैं सुहाना आज पहली तारीख हैं' म्हणून आठवण करून देणं..

तल्यारखान, लाला अमरनाथचा कानात प्राण आणून ऐकलेला क्रिकेटचा *आँखों देखा हाल*..

आणि black and white मध्ये बघितलेली 1983 ची क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल..

कॉलेज बंक करुन पाहिलेले मिथुनचे हाऊसफुल्ल पिक्चर..

झीनतची कुर्बानी..

अमिताभ-शत्रुचा दोस्ताना..

धर्मेन्द्रचा ओरिजिनल ढाई किलो का हाथ..

जीतेन्द्र-श्रीदेवीचे आचरट विनोद..

अमजद-कादर-शक्तिकपूरची विचित्र विनोदी व्हिलनगिरी..

राजेश खन्नाचा रोमँटिक अंदाज..

थिएटरमधली वीस वीस आठवडे ओसंडणारी गर्दी,

ब्लॅकमधे टिकिट घेताना

केलेली मारामारी..

सर्व काही आता इतिहासजमा होऊन गेलं,

आठवणींच्या कप्प्यात मात्र सुरक्षित राहून गेलं..

ऊर फाटेस्तोवर धावून

*फर्स्ट डे फर्स्ट शो* पाहणं नाही..

आता सतराशे साठ चॅनल्सवरुन चोवीस तास सिनेमे आणि मनोरंजन कोसळत असतात..

पण त्यामधे आता ती पूर्वीची हूरहूर अन् अप्रूप नाही..

खूप वेळ प्रयत्न करुन एकदाचा *तिने* उचललेला फोन नाही..

तिच्या बापाने नाहीतर भावाने फोनवरुन दिलेल्या शिव्या नाहीत..

फेसबुक, व्हाट्सएप, एस एम् एस आणि मोबाइलच्या जमान्यात टेलीफोनची गम्मत नाही..

तासनतास बिल्डिंगखाली उभं राहून वाट पाहणं नाही..

मनातलं कळवण्यासाठी 

रात्र रात्र जागून पत्रं लिहिणं नाही..

सेकंदात फेसबुकवर अपडेट होण्याच्या जमान्यात पत्राची वाट पाहण्यातली आतुरता आणि मजा नाही..

हातातून निसटून गेलेल्या वाळूच्या कणांसारखं हे सारं केव्हा निसटून गेलं ओंजळीतून खरं तर कळलंही नाही..

पण आयुष्याच्या उत्तरार्धात हे सारं आठवताना खुदकन हसतो भूतकाळाच्या हिंदोळ्यावर कितीतरी काळ झुलत राहतो..

खरंच तो काळ किती सुंदर होता !

सारं काही साधं, सरळ नि सोपं होतं... यंत्र आणि माणसंसुद्धा !

आता माणसांचीच यंत्र झालीत आणि यंत्रं माणसांसारखी वागू लागलीत..

प्रेम, स्नेह, आदर, जिव्हाळा हे शब्द आता फक्त शब्दकोशातच सापडतात..

तरीही जुनी मित्र मंडळी भेटली की तेवढ्यापुरते जिवंत होतात..

सारे सारे निघून गेलेत 

*कहीं दूर, कहीं दूर*........

Featured post

Lakshvedhi