Friday, 26 November 2021

 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी


विधानपरिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांची निवड


अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन


 


            मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी विधानपरिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना अध्यक्षपदी निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी आज मंत्रालय येथे प्रदान केले.


            अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले. मंडळावर सद्यस्थितीत 10 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. आता अध्यक्षपदाचीही निवड झाल्याने वक्फ मंडळ आता संपूर्ण क्षमतेने कामकाज करु शकेल. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांना तसेच मंडळाच्या पुढील वाटाचालीसाठी शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया मंत्री श्री. मलिक यांनी व्यक्त केली.


            वक्फ अधिनियम 1995 या केंद्र शासनाच्या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळावर सद्यस्थितीत 10 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुदींप्रमाणे मंडळाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज 26 नोव्हेंबर, 2021 रोजी बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ (निवडणूक घेणे) नियम 2000 मधील तरतूदीनुसार अपर मुख्य सचिव तथा सक्षम अधिकारी जयश्री मुखर्जी यांच्यामार्फत त्यांच्या दालनात निवडणूक घेण्यात आली. नियोजित वेळेत डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा या एकाच सदस्याकडून नामनिर्देशन प्राप्त झाल्याने व हे नामनिर्देशनपत्र वैध ठरल्याने डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा हे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले असल्याची घोषणा करण्यात आली.

 89 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई- पीक नोंदणी


 

                                                                                         · मराठवाड्यात सर्वांधिक नोंदणी

            मुंबई, दि.26 : महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई- पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 89 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई- पीक ॲपवर नोंदणी केली असून मराठवाड्यात सर्वांधिक नोंदणी झाली आहे.

            आजअखेर ई- पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत, 89 लाख 39 हजार 848 शेतकऱ्यांनी ई - पीक ॲपवर नोंदणी केली आहे, तर 64 लाख 48 हजार 368 शेतकऱ्यांची ई- पीक ॲपवरील नोंदणी पूर्ण झाली आहे.

            आज अखेर औरंगाबाद विभागात 20 लाख 75 हजार 108 पैकी 17 लाख 27 हजार 916, आणि नाशिक विभागात 19 लाख 34 हजार 767 पैकी, 13 लाख 89 हजार 756 ई-पीक पाहणी नोंदणी झाली आहे. तर अमरावती विभागात 14 लाख 15 हजार 252 पैकी, 11 लाख 97 हजार 275 आणि पुणे विभागात 20 लाख 33 हजार 441 पैकी, 9 लाख 94 हजार 747 नोंदणी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात 11 लाख 50 हजार 203 पैकी, 9 लाख 93 हजार 709 आणि कोकण विभागात 3 लाख 31 हजार 077 पैकी, 1 लाख 44 हजार 965 शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी पूर्ण केली आहे.

            ई-पीक पाहणी हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे. जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे देखील सुलभ होणार आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होणार आहे.


0000


 


वर्षा आंधळे/ विसंअ/26 नोव्हेंबर 2021

 शैक्षणिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना


संविधानिक मूल्यांबाबत सविस्तर माहिती व्हावी


                                                        -प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड


            मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत आणि सर्वसमावेशक संविधान म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच या संविधानातील मूल्य माहिती होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिले.


            शालेय अभ्यासक्रमात संविधानिक मूल्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ हत्तीअंबिरे हे प्रत्यक्ष तर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


            मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, सध्या विद्यार्थ्यांना पहिली पासून मूल्यवर्धन अभ्यासक्रमांतर्गत विविध उपक्रमांद्वारे संविधानिक मूल्य शिकविली जातात. तथापि विद्यार्थ्यांना संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये, स्वातंत्र्य, एकता, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांसह भारतीय संविधानाची सविस्तर माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी इयत्ता आणि विद्यार्थ्यांचे वय विचारात घेऊन नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुनर्रचित अभ्यासक्रम आराखडा निर्मितीच्या अनुषंगाने अभ्यासक्रमामध्ये याबाबींचा सविस्तर समावेश होणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षण आयुक्त आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सारासार चर्चा करून तातडीने अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.


००००



 पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी

शासन सर्वतोपरी सहकार्य करेल

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना गेटवे ऑफ इंडिया येथे गृहमंत्र्यांचे अभिवादन

 

            मुंबई, दि. 26 : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे संकट परतवून लावण्यासाठी कर्तबगार पोलिसांनी आणि इतर कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे. पोलीसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगतहल्ल्यातील शहीदांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे श्रद्धांजली अर्पण करत अभिवादन केले.

            पोलीस बॉईज चेरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री वळसे -पाटील हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना बोलत होते.

            मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणालेपोलीस कर्मचारी-अधिकारी कायम जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. आपल्या जीवाची आणि कुटूंबाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असतात. अशा पोलीसांना सहकार्य करण्याची भूमिका जनतेने ठेवावी आणि कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री वळसे पाटील यांनी जनतेला यावेळी केले.

            यावेळी संघटनेच्यावतीने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुष्प देऊन त्यांचे कौतुक आणि आभार मानण्यात आले.

            यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते दहशतवादी हल्ल्यातील कामगिरीबद्दल मुंबई पोलीस संजय पाटील तर कोरोना काळात रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल श्रीमती पद्मावती, पांडुरंग चौघुले, मुंबई मनपाच्या सफाई कामगार विद्या जाधव, बेस्ट बसचालक संतोष कदम यांच्या कार्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुसुम वाघमारे यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

            महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून शहीदांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीचा कार्यक्रम राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जातो. संकट प्रसंगी मदतीसाठी धावणाऱ्या पोलिसांचे मनोधर्य वाढवणेहा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

           

०००

 

 सैन्य दलातील कोरोना योद्धे साक्षात देवदूत


- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी


 


संविधान दिन व दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मृती दिनानिमित्त वीर सेनानी फाउंडेशनच्या वतीने सैन्यदलातील वैद्यकीय रत्न सन्मानित


 


            मुंबई, दि. 26 : सीमेवर रात्रंदिवस पहारा देऊन देश रक्षणाचे कार्य करणाऱ्या सैन्यदलातील अधिकारी व जवानांनी कोरोना काळात सैन्य दलाच्या विविध रुग्णालयांमधून अद्भुत आरोग्यसेवा प्रदान करत हजारो लोकांना जीवनदान दिले. विविध देशांमधून प्राप्त झालेले ऑक्सिजन सिलेंडर्स व औषधे पोहोचविणारे सैन्य दलातील कोरोना योद्धे साक्षात देवदूत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.


            वीर सेनानी फाउंडेशन या वीर नारी व वीर माता-पित्यांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे सैन्यदलातील कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. संविधान दिन व दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांच्या हस्ते कोरोना काळातील उल्लेखनीय सेवेबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


            कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, वीर सेनानी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कर्नल विक्रम पत्की, मानद सचिव स्वराधीश डॉ भरत बलवल्ली, आश्रयदाते मधुभाई शहा तसेच सैन्यदलाच्या विविध वैद्यकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, कोरोनाशी युद्ध करताना देशाने सन १९६५ व १९७१ सालच्या युद्धाच्या वेळी पाहिलेली एकता अनुभवली. अमेरिकेसारख्या विकसित देशांनी भारताकडून औषधाची मागणी केली तसेच भारताने अनेक लहान-मोठ्या देशांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली, असे सांगताना कोरोना विरुद्ध लढ्यात निरंतर जागरूकता व कोरोना विरुद्ध नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.


            यावेळी आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस पुणे येथील लेफ्टनंट कर्नल टेंटू अजय कुमार, सुभेदार सतीश खिलारी, नाईक जितेंद्र महादेव आघव व नाईक एसके यादव, अश्विनी हॉस्पिटल येथील लेफ्टनंट कर्नल अशोक मेश्राम, सर्जन कमांडर रमाकांत, नर्सिंग ऑफिसर कर्नल विजयालक्ष्मी, कमांड हॉस्पिटल पुणे येथील कॅप्टन अक्षता, नाईक एन एम सिंग, नाईक हाऊसकिपर एस. बंगारू राजू व वॉर्ड सहायिका सोनाली सोमनाथ राऊत, एनडीए मिलिटरी हॉस्पिटल खडकवासला येथील मेजर प्रीती मिश्रा, नायब सुभेदार पी के साहनी, नाईक मुन्ना कुमार व स्टेशन आरोग्य संघटना आर्मी येथील माजी नायब सुभेदार सुनील कुमार यांचा राज्यपालांच्या हस्ते शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 


            पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, नवनीत आरोग्य केंद्राचे प्रवीण कर्मण गाला व प्रभाबेन गाला तसेच मास्टर क्लीन सोल्युशन्स सर्व्हिसेस संस्थेच्या प्राची वैभव अरुडे व वैभव शिवाजी अरुडे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


            यावेळी गायक संगीतकार भरत बलवल्ली यांनी राज्यपालांना ‘रागोपनिषद’ ग्रंथ भेट दिला. राज्यपालांनी ग्रंथाची तसेच बळवल्ली यांच्या कार्याची प्रशंसा केली.


0000


 


 


Governor felicitates Corona Warriors from Armed Forces on


the occasion of 26 / 11 martyrs anniversary and Constitution Day


Pune Mayor Murlidhar Mohol also feted


 


            Mumbai, 26 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated COVID warriors from the Medical Wing of Armed Forces for their exemplary services during the COVID 19 pandemic at Raj Bhavan Mumbai on Friday (26th Nov).


            The felicitation was organised by the Veer Senani Foundation an organisation working for the assistance of Veer Naris and Veer Parents on the occasion of the 13th anniversary of the 26/11 martyrs remembrance day and the Samvidhan Din. 


            MLA Ashish Shelar, Founder President of Veer Senani Foundation Col Vikram Patki (retd), Secretary Dr Bharat Balvalli, trustee Madhubhai Shah and officers of the Armed Forces were present. The Governor felicitated the Mayor of Pune Murlidhar Mohol for his work during the COVID 19 pandemic on the occasion.


            Vocalist Dr Bharat Balvalli presented the book ‘Ragopanishad’ to the Governor on the occasion.


            Lt Col. Tentu Ajai Kumar, Subhedar Satish Khilari, Naik Jitendra Mahadev Aaghav and Naik S K Yadav of Army Institute of Cardio Thoracic Sciences Pune, Lt Col Ashok Meshram, Surgeon Commander Ramakant and Col Vijayalekshmi, Nursing Officer of INHS Ashvini, Captain Akshita, Naik N M Singh, Naik House Keeper S Bangaru Raju and Ward Sahayika Sonali Somnath Raut of the Command HOspital (Southern Command

 मैत्रेय कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा


मिळण्यासाठीच्या प्रक्रियेला गती द्यावी


- राज्यमंत्री शंभुराज देसाe

            मुंबई, दि. 25 : मैत्रेय कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा देण्यासाठी कंपनीच्या मालमत्ता न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने लिलावात काढण्यात याव्यात, असे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी दिले. यासंदर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरूद्ध एकूण ३२ जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. राज्यमंत्री श्री.देसाई यांनी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने यावेळी निर्देश दिले.

            गृह राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, मैत्रेय कंपनीने राज्यातील लाखो गुंतवणुकदारांना फसविले असून संबंधित गुन्हेगारांपैकी एक फरार व एक तुरूंगात आहे. हे प्रकरण निकालात काढून मालमत्तेचा लिलाव करण्यासाठीची परवानगी मिळावी यासाठी संबंधित विभागाने न्यायालयास विनंती करावी. न्यायालयाच्या निकालानंतर तातडीने मालमत्ता लिलावात काढण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सक्षम प्राधिकारी यांनी प्रस्ताव पाठवावा. आर्थिक गुन्हे शाखेने पुढील प्रक्रिया करुन मालमत्ता लिलावात काढावी आणि संबंधित गुंतवणुकदारांना दिलासा द्यावा, असे निर्देशही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

            या बैठकीस आमदार प्रकाश आबीटकर, आमदार किशोर पाटील, आमदार महेश शिंदे, गृह विभागाचे उपसचिव रमेश मनाळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.


००

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार

परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी

- राज्यमंत्री शंभुराज देसाई

            मुंबई, दि. 25 : पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळावा यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. संबंधित सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावासंदर्भातील प्रकिया तातडीने राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासदंर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री श्री.देसाई यांनी आर्थिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या.


            राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, सिंधुदुर्ग, अमरावती, सातारा, नाशिक, नवी मुंबई, नागपुर येथे या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५१ लाख गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे. या गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया करण्यात यावी. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा असे निर्देशही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

            या बैठकीस आमदार प्रकाश आबीटकर, आमदार किशोर पाटील, गृह विभागाचे उपसचिव रमेश मनाळे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


०००



 राज्यात अधिक ठिबक क्षेत्र वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील

कृषिमंत्री दादाजी भुसे

फळबागेव्यतिरिक्त इतर पिकेही ठिबक सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्न करणार

 

               मुंबईदि. 25 : राज्यातील ठिबक सिंचन क्षेत्र अधिक वाढावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज आहेअसे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

               ठिबक सिंचन असोसिएशन सोबत विविध विषयांवर आज मंत्रालयात कृषिमंत्री श्री. भुसे यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कृषी सचिव एकनाथ डवलेसहसचिव सुशील खोडवेकरफलोत्पादन संचालक कैलास मोतेउपसचिव श्रीकांत आंडगे आदींसह ठिबक सिंचन साहित्य निर्मिती करणारे उत्पादक यावेळी उपस्थित होते.

               राज्य शासनाने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 55 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान कमाल 5  हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास मान्यता दिली आहे. त्याचा लाभ राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या फळबागेसाठी ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. इतर पिकांनाही ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ठिबक सिंचन साहित्य निर्मिती करणारे उत्पादकविक्रेते यांनीही त्याची निकड शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी कृषी मंत्री श्री. भुसे यांनी केले. राज्यामध्ये आतापर्यंत 25.72 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून या नवीन योजनेमुळे त्यामध्ये निश्चितपणे वाढ होईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

               विशेषता विदर्भ आणि मराठवाडा भागात कापूस पीक लागवडीपूर्वी कृषि विभाग तसेच या उत्पादकांनीही तसेच ज्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म तसेच ठिबक सिंचनाचा वापर केला आहे त्यांनी इतर शेतकऱ्यांना ही आवश्यकता पटवून देण्याची गरज आहे. केवळ विक्रीपुरते मर्यादित न राहता ठिबक सिंचन असोसिएशनने  विक्रीपश्चात व्यवस्थापन कसे करावेयासंदर्भातही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. ठिबक सिंचन प्रणालीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी कृषि विभाग लक्ष ठेवून आहे. शेतकऱ्यांच्याच लाभासाठी ही योजना आहे. मात्रयात साखळी निर्माण होणार नाहीयाची दक्षता कृषि विभाग घेईलअसे त्यांनी स्पष्ट केले.

               ठिबक सिंचन अनुदानासाठी अधिक निधी कसा उपलब्ध होईलहे पाहिले जाईल. ज्यांचे अनुदान प्रलंबित आहेत्यांनाही लवकरच ते अनुदान देण्यासंदर्भातील कार्यवाही होत असल्याची माहिती, सचिव श्री. डवले यांनी दिली.

               यावेळी ठिबक सिंचनासाठी पूरक अनुदानाचा निर्णय घेतल्याबद्दल ठिबक सिंचन असोसिएशनच्या वतीने मंत्री श्री. भुसे आणि सचिव श्री. डवले यांचा सत्कार करण्यात आला.

                                                            

Featured post

Lakshvedhi