सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 18 November 2021
लहान असतांना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांना विचारलेले कि, तात्या श्रीमंती कशात आहे ?? तेव्हा प्रबोधनकार त्यांना हाथ धरून दारा पाशी घेऊन आले आणि घरा बाहेर च्या चपलांचा ढीग दाखवला आणि म्हणाले, हे बघ श्रीमंती याच्यात आहे. अजून कधी माणसाची श्रीमंती पाहायची असेल तर त्यांची अंतयात्रा बघ. त्याला जमा झालेली गर्दी आणि लोकांच्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू यावरून माणूस किती श्रीमंत आहे ते समझते.
जे स्वतःपुरते जगतात ते पैशाने कदाचित श्रीमंत असतील, पण जे इतरांच्या हाकेला धावून जातात. माणसं कमावतात, ती लोक खरी श्रीमंत असतात. अन्यथा जगात रोज हजारो लोक जन्माला येतात आणि हज्जारो मरतात. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक स्मरणात राहतात, अमर होतात.
प्रबोधनकारांना तेव्हा काय माहित कि, त्यांचा पुत्र त्यांचे बोलणे इतके मनावर घेईल आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेल.🙏
: *पारखून* घेतलं तर कोणीच
*आपलं* नसतं...!!
आणि
*समजून* घेतलं तर कोणीच
*परकं* नसतं...!!
*काही मिळाले किंवा नाही मिळाले... तो नशिबाचा खेळ आहे... पण, प्रयत्न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल...*
ओंजळीमध्ये धरलेल्या फुलांचा सुगंध दोन्ही हातांना सारखाच लागतो. मोठे मन असलेले लोक डावे-उजवे असा भेदभाव न करता सर्वांवर सारखेच प्रेम देतात. 😊
🌞 *शुभदिनम्* 🚩 🙏
Wednesday, 17 November 2021
पुणे म्हाडाच्या 4222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. 16 :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्विकृतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या 4 हजार 222 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात झाली. जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघणार आहे. पुणे म्हाडाची ‘जानेवारी 2022-ऑनलाईन सोडत’ योजना राज्यातल्या अनेक गरजूंचं, पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.
0000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...