Sunday, 14 November 2021


 


 

 बालगोपाळांच्या कट्टी – बट्टीने राज्यपाल प्रभावित

राज्यपालांच्या हस्ते अतुल परचुरे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान

उषा नाडकर्णी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

संगीतकार ओंकार घैसासदिग्दर्शक जयंत पवारअनुश्री फडणीसप्रकाश पारखी

राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

            मुंबई, दि. १४:    लहान मुलांना संस्कार देण्याचे स्थायी कार्य कुटुंबसमाज व सांस्कृतिक संस्थांकडून होत असते. या संस्कारांच्या माध्यमातून समाज घडतो व समाजाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य होतेअसे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणाऱ्या 'गंधारकला संस्थेतर्फे  लहान मुलांच्या 'कट्टी बट्टीया कार्यक्रमाचे  तसेच 'गंधार गौरवपुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.   

            बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आलातर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना 'जीवन गौरवपुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            आमदार आशिष शेलारआमदार संजय केळकर,  ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की  व गंधारचे अध्यक्ष मंदार टिल्लू व्यासपीठावर उपस्थित होते.

            संगीतकलानाट्य या गोष्टींचा ज्याला गंध नाही अश्या व्यक्तीला विना शेपटीचा पशु संबोधले जातेया अर्थाच्या सुभाषिताचा उल्लेख करून संगीत व नाट्यात दुःख विसरायला लावण्याची ताकत आहेअसे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.  

            'कट्टी बट्टीया कार्यक्रमात लहान मुलांनी सादर केलेल्या बालभारती पुस्तकातील बडबडगीतांना राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली व बालनाट्य चमूला वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

            बालप्रेक्षक हा महत्वाचा प्रेक्षक आहे व त्याचे पुढे सादर करणे आव्हानात्मक काम असते. करोनाचे निर्बंध संपल्यावर आपण पुन्हा बालनाट्य घेऊन रसिकांपुढे येऊअसे अतुल परचुरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

            राज्यपालांच्या हस्ते दिग्दर्शक जयंत पवारनिवेदिका अनुश्री फडणीससंगीतकार ओंकार घैसास व प्रकाश पारखी यांना गंधार युवा गौरव पुरस्कार देण्यात आले.

            गंधार ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून कार्य करीत असून संस्थेने १०० च्या वर बालनाट्य सादर करून त्याचे हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.   

 

Applauds Children’s theatre on Bal Din

Maha Governor presents Gandhar Gaurav Puraskar to Atul Parchure; senior actor Usha Nadkarni is honoured with Jeevan Gaurav Puraskar

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari applauded children’s musical performance and acknowledged the role of children’s theatre in shaping the personality of children at a function held at Raj Bhavan, Mumbai on Sunday (14th Nov).

The Governor also presented the Gandhar Gaurav Puraskar for 2021 to theatre and film personality Atul Parchure and gave the Lifetime Award to actress Usha Nadkarni for her contribution to theatre.

The Children’s programme and the awards presentation function was organized by Gandhar Arts, an organization promoting children’s theatre at Raj Bhavan Mumbai.

MLA Ashish Shelar, MLA Sanjay Kelkar, music composer Ashok Patki and Chairman of Gandhar Art Mandar Tillu were present. 

The Governor also presented the Gandhar Yuva Gaurav Puraskars to director Jayant Pawar, Anushree Fadnis, musician Omkar Ghaisas and theater personality Prakash Parkhi.

0000

 राज्यात ऑक्टोबरमध्ये १९ हजार ६४८ बेरोजगारांना रोजगार

          कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

 

            मुंबईदि. १४: कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकासरोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्याकॉर्पोरेट संस्थाउद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये १९ हजार ६४८ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टलऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्याकॉर्पोरेट संस्थाउद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

            अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आलेतर चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर अखेर १ लाख ४७ हजार ८८१ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहेअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

            मंत्री श्री. मलिक म्हणाले कीबेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकासरोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षणकौशल्येअनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्याउद्योजककॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

            विभागाकडेमहास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ९०८ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहेअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

मुंबईत ऑक्टोबरमध्ये ७ हजार ६८६ बेरोजगारांना रोजगार

            मंत्री श्री. मलिक म्हणाले कीमाहे ऑक्टोबर २०२१ मध्ये विभागाकडे ५१ हजार ८६२ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ११ हजार ६९५नाशिक विभागात ९ हजार ३९३पुणे विभागात १३ हजार ९८४औरंगाबाद विभागात ८ हजार ६७२अमरावती विभागात ५ हजार ०७१ तर नागपूर विभागात ३ हजार ०४७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

            माहे ऑक्टोबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १९ हजार ६४८ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ७ हजार ६८६नाशिक विभागात ४ हजार ००४पुणे विभागात ४ हजार ७४२औरंगाबाद विभागात २ हजार ३७४अमरावती विभागात ४८४ तर नागपूर विभागात ३५८ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.


 

 एकल श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

 

आदिवासींशी एकरूप होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न व्हावे

                                                            -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

            मुंबई,दि.14आदिवासी समाज आजही कठीण परिस्थितीत राहत आहे. त्यामुळे आदिवासींच्या केवळ सामाजिक व सांस्कृतिक उत्थानासाठी प्रयत्न न करता त्यांच्यासह एकरूप होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.    

      आदिवासींच्या सामाजिक सांस्कृतिक उन्नतीसाठी कार्य करीत असलेल्या एकल श्रीहरी समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त शनिवारी (दि. 13) गरवारे क्लब, मुंबई येथे आयोजित 'दीपावली संमेलन' कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.

      आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केवळ धन देणे पुरेसे नाही, असे नमूद करून त्यासाठी त्यांचेशी तादात्म्य होऊन काम करणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले. अनेक निःस्वार्थ कार्यकर्त्यांनी आपले जीवन उत्तर पूर्व भारतात आदिवासी विकासासाठी व्यतीत केल्यामुळे तसेच तेथील संस्कृतीशी एकरूप झाल्यामुळे आज तो भाग बव्हंशी शांत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.  

      मुंबईपासून शंभर किलोमीटर दूर असलेल्या पालघर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी मोबाईल संपर्क होत नाही असे नमूद करून शहरी सधन समाजाने आदिवासी बांधवांकडून बांबू राखी, फर्निचर, आकाश दिवे आदी वस्तू खरेदी करून त्यांना विकासात सहभागी करून घेतले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. 

      आदिवासींना कौशल्य शिक्षण देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे सांगताना राज्यपालांनी एकल श्रीहरी समितीच्या कार्याचे कौतुक केले. 

 

            एकल श्रीहरी समितीतर्फे देशभर 70,000 संस्कार केंद्र चालविले जात असून अनेक श्रीहरी रथ तसेच गौग्राम योजना आदी राबविल्या जात असल्याचे एकल श्रीहरी मुंबईचे अध्यक्ष विजय केडिया यांनी सांगितले. 

       कार्यक्रमाला एकल श्रीहरीचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यनारायण काबरा, आमदार मंगल प्रभात लोढा, रौप्य महोत्सव समितीच्या अध्यक्षा मीना अग्रवाल व एकल श्रीहरीचे महासचिव माधवेंद्र सिंह प्रामुख्याने उपस्थित होते.  

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते 15 गणमान्य व्यक्तींना एकल श्रीहरी सन्मान प्रदान करण्यात आले.  वरूण व ज्योती काबरा, गोपाळ कंडोई, रमाकांत टिबरेवाल, श्रीनारायण व मीना अगरवाल, विजय केडिया, सुरेश खंडेलिया, महावीर प्रसाद गुप्ता, रामविलास अग्रवाल, रामावतार मोदी, रामप्रकाश बुबना, चंद्रप्रकाश सिंघानिया, रमा पहेलजानी, महेश मित्तल, मंगलप्रभात व मंजू लोढा व प्रदीप गोयल यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

0000

 

 

Participates in Silver Jubilee of Ekal Shrihari Samiti

 

Maha Governor calls for working for the economic upliftment of tribals

 

     Mentioning that it is not enough to work for the social and cultural development of tribals, Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari called for the overall development of tribals through economic empowerment.  

     The Governor was speaking at the Silver Jubilee celebrations of Ekal Shrihari Samiti, an organization working for the social and cultural empowerment of tribals, at Garware Club, Mumbai on Saturday (13th Nov)

     The Governor presented the Ekal Shrihari Samman to Mangal Prabhat Lodha, MLA, Smt Manju Lodha and 15 other eminent social workers.

     National President of Ekal Shrihari Satyanarayan kabra, Mumbai President Vijay Kedia, organizer of Silver Jubilee celebrations committee Meena Agarwala and General Secretary of Ekal Shrihari Madhvendra Singh were present.

 

0000


 बाल दिनानिमित्त जवाहर बालभवन तर्फे

चित्रकला स्पर्धा संपन्न

   मुंबई,दि.१४: आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. यावर्षी जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनचर्नी रोडमुंबई तर्फे इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा बालभवनचर्नी रोडमुंबई येथे आयोजित करण्यात आली. स्पर्धेतील मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी बालभवन नियामक मंडळाच्या अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. प्रा.गायकवाड यांनी या मुलांच्या कलाकृतींची पाहणी केली व सर्व मुलांचे कौतुक केले.

     या स्पर्धेकरिता ३५ शाळांमधील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे आयोजन कोरोना नियमांचे पालन करुन करण्यात आले होते. यामध्ये सर्व मुलांना मास्कसॅनिटायझरची सुविधा पुरविण्यात आली.

     या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व मुलांना बालभवन तर्फे कलर बॉक्स देण्यात आले. त्याचबरोबर सर्व मुलांना स्पर्धेत सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेतील चित्रांचे परीक्षण करण्यासाठी विशेष परीक्षक नेमण्यात येणार असून त्यांच्यामार्फत घोषित केलेल्या उत्कृष्ट चित्रांना जवाहर बालभवनच्या फेब्रुवारी २०२२ च्या वर्धापन दिनी पारितोषिक देण्यात येणार आहेत.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक संतोष गायकवाड तर सूत्रसंचालन श्रीमती सृजनी यमनुरवार यांनी केले. आभार आसेफ शेख यांनी मानले.

Featured post

Lakshvedhi