सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 14 November 2021
पंजाबात दोन मराठी माणसांची नावे विशेष आदराने घेतली जतात.
एक म्हणजे संत नामदेव आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राला अक्षरश: ठावूकही नसलेले पण भारताच्या स्वातंत्र संग्रामात अत्यंत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या इतिहास प्रसिद्ध 'गदर' पार्टीची स्थापना करणारे हुतात्मा श्री. विष्णू गणेश पिंगळे.
भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.
महाराष्ट्राचे सुपुत्र असूनही आपल्याला त्यांच्याविषयी फारशी माहिती नाही.
ही उपेक्षा थोड्याफार प्रमाणात तरी कमी व्हावी, म्हणून हा लेखनप्रपंच!
विष्णु गणेश पिंगळे (जन्म : २ जानेवारी तळेगाव ढमढेरे , १८८९; मृत्यू : लाहोर, १६ नोव्हेंबर, १९१५) हे एक भारतीय क्रांतिकारक होते.
त्यांनी लाला हरदयाळ, डॉ. खानखोजे यांच्यासोबत ‘गदर पार्टी’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली.
विष्णु गणेश पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे या गावचे राहाणारे असून १९११ साली अमेरिकेतून ईंजिनिअर झाले होते..
देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला.
ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले.
त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले.
पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले.
रासबिहारी बोस, पिंगळे, कर्तारसिंग सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ या दिवशी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि ८ क्रांतिकारक फासावर चढले.
त्यांपैकी एक होते विष्णू गणेश पिंगळे!
स्वातंत्र्य हे प्रत्येक देशाला परमेश्वरानं दिलेलं बहुमूल्य असं वरदान आहे. स्वदेश हे आम्हाला दिलेलं गृह आहे. पण, तेच जर कुणी हिसकावून घेतलं, तर त्याचा प्रतिकार करणं, त्यासाठी मरे-मरेस्तोवर झुंजणं हे आपलं कर्तव्य ठरतं, या तत्त्वज्ञानावर ठाम विश्वास असलेले विष्णू गणेश पिंगळे होते. स्वातंत्र्य आणि स्वराज्य यावाचून आपलं दैन्य, दु:ख संपणार नाही, याचं वास्तववादी भान त्यांना होतं.
पिंगळे मूळचे शिरूर जिल्ह्यातील तळेगाव- ढमढेर्याचे. ते लहानपणी अगदी अशक्त होते. परंतु, मातोश्रींनी केलेली व्रतवैकल्ये आणि चौरस आहार यांनी त्यांची तब्येत सुधारली. इतकी सुधारली की, वडिलांना पाठीवर घेऊन एका दमात ते सज्जनगडावर गेले!
पुढील शिक्षणासाठी ते पुण्याजवळील तळेगाव-दाभाडे येथे आले. याच शाळेत त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. पिंगळे धप्प गोरे होते.
त्यांची उंची होती फक्त ५ फूट ४ इंच. पण, त्यांचं कर्तृत्व त्यापेक्षा सहस्रपटीनं मोठं होतं.
मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांव्यतिरिक्त त्यांनी उर्दू आणि पंजाबी भाषेवरही प्रभुत्व मिळवलं.
पण, इथे एक वेगळंच खूळ त्यांच्या डोक्यात शिरलं. साधू बनून ते सर्व भारतभर हिंडले. वेशांतराची ही कला पुढे त्यांना चांगलीच उपयोगी ठरली. पण, त्यांची खरी महत्त्वाकांक्षा होती मेकॅनिकल इंजिनीअर बनण्याची.
अक्षरश: पै न् पै जमा करून ते अमेरिकेला गेले.
तिथेही लाकडं फोडून पैसे जमविण्याचा उद्योग त्यांनी आरंभला.
यावेळी त्यांचे वडील वारले. दु:खाने ते अगदी वेडेपिसे झाले. ‘‘मी अशी एखादी विद्या शिकेन की, ज्यायोगे आपले कर्ज फिटेल’’ असे त्यांनी वडिलांना वचन दिले होते.
पण, आता ते कसे शक्य होते?
या वेळेपावेतो त्यांच्यातील संघटनवृत्ती, मनाचा प्रेमळपणा, स्वातंत्र्याविषयीची ओढ इत्यादी गोष्टींचा परिचय इतरांना झाला होता.
अमेरिकेत ते बुद्धिवादी विचारसरणी आचरू लागले होते. हा काळ भारतीय क्रांतिकारकांच्या दृष्टीनं उलथापालथीचा होता. याचा पिंगळे यांच्यावर चांगलाच परिणाम झाला.
यावेळी लाला हरदयाल या बुद्धिवान व्यक्तींनी ‘गदर’ म्हणजे उत्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या चळवळीला जोरात चालना द्यायचा प्रयत्न चालवला.
त्यात पिंगळ्यांचाही समावेश होता. क्रांतीचा प्रचार करणारी भाषणे, पत्रके त्यांनी अमेरिका, युरोपादी देशांमधून वाटली. देशाबाहेर असणार्या हजारो हिंदी युवकांना इंग्रज सरकार उलथवून टाकण्याच्या उठावणीसाठी उद्युक्त केले.
पहिल्या महायुद्धाची बातमी या लोकांना मिळालेली होतीच. ‘हीच संधी अन् हीच वेळ, उचल शस्त्र अन् हो तय्यार,’ हेच सूत्र त्यांनी आरंभलं.
इतकंच नाही, तर हिंदी सैन्य स्वातंत्र्यासाठी क्रांतिपक्षाकडे फितवून घेण्याच्या विभागाचे ते प्रमुख बनले. ‘‘आपण जागं व्हावं आणि इतरांना जागं करावं,’’ या सूत्राला अनुसरून अमेरिकेतल्या आपल्या भविष्याला तिलांजली देऊन ते भारतात आले.
‘कोमा गाटा मारू’ या जहाजातून हजारो क्रांतिकारक भारतात यायला निघाले. तर, ‘तोसा मारू’ या बोटीनं पौर्वात्य देशातून अनेक जण भारतात यायला निघाले. हिंदुस्थानात युरोपीय सैन्याच्या अभावी हिंदी सैन्यात इंग्रजांविरुद्ध द्वेषाग्नी भडकवून द्यायचा आणि संकल्पित उठावणी करून देशात उत्पात घडवायचा, इंग्रजांना ‘सळो की पळो’ करून सोडायचे, अशी योजना होती.
कलकत्त्यात त्यांची गाठ रासबिहारी बसूंशी पडली.
पिंगळे यांना अनेक भाषा येत असल्यामुळे, शिवाय ते वेषांतरात पटाईत असल्यामुळे गुप्तपणे प्रचारकार्य करत राहिले.
वेगवेगळ्या क्रांतिकारकांच्या भेटीगाठी घेत त्यांनी पंजाब प्रांत पिंजून काढला.
तरीही कलकत्ता, बनारस वगैरे ठिकाणी त्यांची भ्रमंती चालू होतीच.
१९१४ पासून पंजाब प्रांतात उठावाचं वातावरण तयार होऊ लागलं होतं. या उठावाचे मास्टर माईंड म्हणून रासबिहारी व पिंगळे यांना पकडून देण्यासाठी सरकारने पारितोषिके लावली.
१९१५ साली रासबिहारींनी सर्व क्रांतिकारकांना देशासाठी बलिदान करायचं आवाहन केलं.
या बैठकीनंतर पिंगळे मीरतला गेले. तेथील हिंदी सैन्याला फितवून पुढे आग्रा, कानपूर, अलाहाबाद येथील सैनिकांचा क्रांतीसाठीचा मनोदय जाणून ते अमृतसरला परतले.
१ मार्चला हिंदी सैन्य युरोपला पाठवलं जाणार होतं. त्याआधीच उठावणी होणं गरजेचं होतं.
सिंगापूरपर्यंत जागृत केलेला लोकांचा देशाभिमान, त्यांची तेजाने तळपू पहाणारी मृत्युंजय वृत्ती थंड होण्याच्या आत तिचा लाभ उठवणं महत्त्वाचं होतं. सबंध जनतेलाच या उठावणीसाठी सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
केवढ्या मोठ्या, प्रचंड भू-भागावरील लोकांमध्ये त्यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी करावयाच्या उत्थानासाठी क्रांतीचं जाळं विणलं होतं, ते कृतीत आणण्यासाठी जी रक्तांची शिंपणं केली होती, त्याला इतिहासात तोड नाही.
अशा कामासाठी काळजात आग, मस्तकात निश्चय आणि मनगटात ताकद असावी लागते.
पण, ही योजना फसली.
हिंदुस्तानी लोकांच्या दृष्टीने अत्यंत स्वस्त असलेल्या गोष्टींमुळे- फितुरीमुळे पिंगळे व रासबिहारी सरकारच्या हातून सुटले.
अजिबात निराश न होता, त्यांनी परत क्रांतीचा आराखडा तयार केला.
मीरत येथील घोडदळास भेट देऊन, त्या लोकांना उठावणीसाठी प्रवृत्त केलं.
यावेळी त्यांनी आपलं सर्व साहित्य एका अफगाण दफेदाराजवळ दिलं. रासबिहारींच्या चाणाक्ष नजरेला यातला धोका जाणवला.
त्याच व्यक्तीच्या फितुरीमुळे पिंगळे पकडले गेले. तुरुंगात त्यांचे अतोनात हाल करण्यात आले. शेवटी क्रांतीतला आपला सहभाग त्यांनी अधिकार्यांना सांगितला, पण अशा पद्धतीनं की, त्यामुळे फाशीची शिक्षा पक्की होईल.
त्यांचे हे उद्गार म्हणजे भारतीय क्रांतिकारकांची त्यागाची ही परिसीमाच होती.
या सर्वांवर कडी करणारा प्रसंग म्हणजे, विष्णू पिंगळ्यांच्या मातोश्री जेव्हा त्यांना तुरुंगात भेटावयास आल्या तेव्हाचा.
हा प्रसंग तर अगदी हृदयाचा कंदच हलवून सोडणारा होता.
असं वाचण्यात आलं की, त्यांच्या मातोश्री जेव्हा त्यांना भेटण्यासाठी तुरुंगात आल्या तेव्हा, दु:खाचा आवेग आवरला नाही, तर या कल्पनेने ते पाठ फिरवून बसले.
खूप समजाविल्यानंतर संभाषणासाठी त्यांनी मातोश्रींकडे तोंड फिरवले. पण, त्यांना पाहताच त्या मूर्च्छित पडल्या.
भावबंध क्षणात तोडले तर तुटतात, नाहीतर त्याच्या पाशातून मन मोकळे होणे, कठीण असते, हे ते जाणून होते. मातृभूमीच्या मानेभवती परवशतेचा पाश पडलेला असताना, तिच्या पुत्राने जगावे कसे अन् मरावे कसे, हे त्यांनी जगाला दाखवले.
फाशीच्या आदल्या रात्री एक इंग्रज अधिकारी त्यांच्याविषयीच्या सहानुभूतिपोटी म्हणाला, ‘‘आम्ही तुम्हाला शक्य तितक्या अधिक काळ जिवंत ठेवलं.’’ त्यावर पिंगळे ताडकन् उद्गारले, ‘‘चुकलात तुम्ही. अशानं स्वर्गात गेलेल्या माझ्या सहकार्यांना वाटेल की, मी त्यांचा विश्वासघात केला की काय?’’
असे हे विष्णू गणेश पिंगळे १६ नोव्हेंबर १९१५ रोजी अत्यंत धीरोदात्तपणे फासावर गेले.
हे क्रांतिवीरा, तुला आमचे शतश: प्रणाम!
वंदे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
वक्फ नोंदणीकृत संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार
-अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक
· जालना जिल्ह्यातील परतूर येथील वक्फ जमिनीच्याअनधिकृत खरेदी-विक्रीप्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
· महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पुढाकाराने कारवाई
मुंबई, दि. 13 : परतूर (जि. जालना) नगरपरिषद हद्दीतील आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या एका संस्थेकडील इनामी जमिनीची अनधिकृतपणे, बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री करुन तसेच काही जागेवर अतिक्रमण करुन बांधकाम केल्याप्रकरणी जालना जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन परतूर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक म्हणाले की, वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रस्ट आणि संस्थांकडून मुस्लिम समाजहिताचे कार्य केले जाते. पण काही अपप्रवृत्तींकडून याचा गैरफायदा घेतला जातो. अशा अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी तसेच वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाकडून कडक पावले उचलली जातील. अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
परतूर (जि. जालना) येथील कब्रस्तान की मस्जिद आणि मजार हजरत शाह आलम शाह (सुलेमान शाह की मस्जिद) या वक्फ अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहेत. या मस्जिदच्या नावे परतूर नगरपरिषद हद्दीत 6 हे. 49 आर तसेच 1 हे. 87 आर इतक्या क्षेत्रफळाच्या जमिनी आहेत. या जमिनीचा वापर मस्जिदच्या सेवेसाठी तसेच दैनंदिन खर्चासाठी कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन म्हणून करण्यात येतो. ही मस्जिद वक्फ अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असल्याने त्याच्याकडील कोणत्याही मालमत्तेची विना परवानगी खरेदी-विक्री, गहाण, दान, बक्षीस इत्यादी होऊ शकत नाही. तथापि, जिल्हा वक्फ अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवाब शाह उस्मान शाह, काजी नुरोद्दीन काजी अब्दुल रहीमोद्दीन, शेख आमेर उर्फ शानदार हनिफ कुरेशी (सर्व रा. परतूर) यांनी संगनमत करुन या ईनामी जनिमीची बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री करुन गैरव्यवहार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार याप्रकरणी नवाब शाह उस्मान शाह, काजी नुरोद्दीन काजी अब्दुल रहीमोद्दीन, शेख आमेर उर्फ शानदार हनिफ कुरेशी, दत्ता शंकर पवार, शेख अब्दुल सत्तार शेख रज्जाक, लुकमान कुरेशी नादान कुरेशी, हुसेन यासीन शेख, अजहर शेख युनुस शेख, मोहम्मद शरीफ अब्दुल हमीद कुरेशी या 9 जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेख खालेद शेख अहमद कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, परतूर) यांनी परतूर पोलीस ठाणे येथे फेब्रुवारी व मार्च 2021 रोजी अर्ज देवून कळविले की, आमेर उर्फ शानदार हनीफ कुरेशी व इतर 15 ते 20 लोकांनी या इनामी जमिनीत अनधिकृतपणे, बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री केलेली आहे. काही जागेवर स्वत: अतिक्रमण करुन बांधकाम केले आहे. या अर्जाच्या संदर्भात वक्फ कार्यालयातर्फे 09 ऑक्टोबर 2021 रोजी स्थळपाहणी व पंचनामा केला असता असे निदर्शनास आले की, शेख आमेर उर्फ शानदार कुरेशी यांनी ही ईनामी जमीन शेख अजहर शेख युनुस यांना व इतर लोकांना विनापरवाना स्वत:चे अधिकार वापरून प्लॉटींग करून भाडे करारनामा व इतर रितीने अनधिकृतपणे दिली आहे. सध्या या ईनामी जमीनीमध्ये काही जण अनधिकृतपणे व्यवसाय करीत आहे. काही लोक पत्र्याचे शेड वगैरेचे काम करत आहेत. तसेच नवाब शाह उस्मान शाह यांनी अनधिकृतपणे लोकांना दिलेल्या या जागेबाबत 100 रुपयांचे बाँड पेपरवर विनापरवानगी वक्फ मंडळ भाडे करारनामे केले आहेत. या ईनामी जमीनीमध्ये नवाब शाह उस्मान शाह यांनी अनधिकृतपणे विनापरवानगी जागा भाड्याने दिली आहे. ईनामदारांनी स्वत:चे अधिकारात विनापरवानगी या जागेचे मुख्त्यारआम पत्र काजी नुरोद्दीन काजी मोहम्मद अब्दुल रहिम व शेख अमीर उर्फ शानदार मोहम्मद कुरेशी यांच्या नावाने स्टँप पेपर करून दिला आहे. सर्वे नंबर 138 व 87 ही जमीन वक्फ संपत्ती असल्यामुळे ती विकता येत नाही. विना परवागी भाडेपट्ट्यावर देता येत नाही. नवाब शाह उस्मान शाह यांनी गुन्हेगारी कट रचून व संगनमत करून खोटा व बेकायदेशीर दस्त तयार करून वक्फ संपत्तीचा बेकायदा भाडेव्यवहार करुन इतर लोकांना प्लॉट पाडून बेकायदेशीररित्या भाडेपट्ट्यावर दिल्याचे, विकल्याने दिसून येते, असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले की, अशा गैरव्यवहारांचा शोध घेऊन त्याबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना विभागाच्या तसेच वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मागील 2 वर्षात वक्फ इनाम जमिनी बेकायदेशीररित्या खालसा करणे, विक्री करणे, अवैधरित्या मावेजा घेणे, अवैध भाडेपट्टीवर देणे या कारणास्तव राज्यातील विविध ठिकाणी 7 प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पुढाकाराने एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आष्टी (जि. बीड) येथील एका प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. वक्फ मंडळामार्फत राज्यातील संस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी मागील 2 वर्षात कार्यवाही करण्यात आली आहे. राज्यात वक्फ मंडळांतर्गत सुमारे 30 हजार संस्था नोंदणीकृत असून त्यांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी वक्फ मंडळामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.
सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा
· जामखेड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन
अहमदनगर, दि.13 ( जिमाका )- सर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकासकामे करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.
जामखेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामांचे एकत्रित भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सर्वश्री आमदार रोहीत पवार, लहू कानडे, निलेश लंके, संग्राम जगताप उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यात केंद्र व राज्याच्या माध्यमातून रस्ते विकासाची अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत. आमदार निधी 4 कोटी करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीस शंभर टक्के निधी देण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक संकटात आपत्तीग्रस्तांना मदत,कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भरघोस निधींच्या माध्यमातून राज्याने काम केले. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेनेही शासनाला पाठबळ देण्याची गरज आहे. थकीत वीज बीले भरली पाहिजेत, पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.
कोरोना संकटातून राज्य सावरत आहे. 10 कोटींच्या पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र पुन्हा तिसरी लाट येऊ नये. यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळत कोरोना नियमावलीचे नियमितपणे पालन केले पाहिजे. असे आवाहनही श्री.पवार यांनी यावेळी केले.
त्रिपुरामधील घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. राज्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जातीपातीच्या विचार न करता समाजाचा, माणूसकीचा विचार करा.
श्री.पवार म्हणाले, ऊसाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शासन साखर कारखानादारांशी चर्चा करत आहे. शेती उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाठी मार्केट कमिट्या मजबूत झाल्या पाहिजेत.
एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र प्रवाशी हिताचा पण विचार झाला पाहिजे. असेही श्री.पवार यांनी सांगितले.
खर्डा परिसरातील संत सिताराम गड, संत गीतेबाबा, शिवपट्टण किल्ला, निंबाळकर वाडा, बारा ज्योतिर्लिंग या स्थळांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही श्री.पवार यांनी यावेळी दिली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.अशोक चव्हाण म्हणाले, कोरोना संकटात राज्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचं काम शासनातर्फे करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांत कर्जत-जामखेड मध्ये 98 कामांच्या माध्यमातून 637 कोटींची कामे मंजूर करण्यात आली. रस्ते कामासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमापूर्वी चौंडी येथिल राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार व उपस्थितांनी अभिवादन केले.
जामखेड शासकीय विश्रामगृह विस्तारीकरण, पंचायत समिती दुस-या मजल्याचे बांधकाम, अधिकारी-कर्मचा-यांच्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम, शहरांतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता , नगरपरिषद प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नाना-नानी उद्यान, सामाजिक सभागृह, व्यापारी संकुल, मुस्लिम दफनभूमी बांधकाम व सुशोभीकरण अर्थसंकल्प व विशेष दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत मंजूर 120 कि.मी लांबीचा रस्ता, 140 कोटींच्या पाणी पुरवठा योजना व जामखेड शहरातील विविध कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी जामखेड येथे कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणारे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.रवी व शोभा आरोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
0000000
*काही मंडळी १५ लाखांची वाट पहाताहेत पण हे बदल पैशात मोजताच येणार नाहीत.. 😊*
*आज भुसावळ ते गोवा जातांना रेल्वे मध्ये आलेला सुखद अनुभव..*
अचानक मित्राच्या 2 वर्षाच्या मुलाला ताप आला.. जवळ कसल्याही औषधी नाहीत.. डेस्टिनेशन मडगाव पोहचायला 7 तास अवधी.. विचार आला पुढच्या स्टेशनला उतरू आणि एकदा डॉक्टरला दाखवू मग पुढचा प्रवास बाय रोड करू.. सहज म्हणून ट्रेन मध्ये सामान विकणाऱ्याला म्हटलं आम्हाला काही औषधी हव्या आहेत.. पुढच्या स्टेशनला व्यवस्था करून दे, तुला खर्च पाण्याला 500 रुपये देतो.. तो विक्रेता म्हणाला काही गरज नाही TC ला भेटा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.. TC ला लगेच भेटलो.. *सरकारी नोकरांची तत्परता उभ्या आयुष्यात मी इतकी कधीच अनुभवली नव्हती..* हातातलं काम सोडून त्याने समोर फोन लावला.. आमचा सीट नंबर आणि मेडिकल कंडिशन नोट केल्यात आणि आम्हाला सीट वर जायला सांगितलं...
समाधानाची अपेक्षा नव्हती.. पुढच्या स्टेशन वर उतरून माझ्या मित्राच्या मुलाला दवाखान्यात दाखवून बाय रोड च आम्ही प्लॅन केलाच होता.. आम्हाला वाटलं एखादा मुलगा येईल पेपरमध्ये गुंडाळून गोळ्या देईल..
पण पुढच्या स्टेशनला अक्षरशहा डॉक्टर त्यांच्या असिस्टंट सोबत आमच्या सीट वर हजर.. सोबत TC सुद्धा होते.. तपासल्या नंतर लगेच त्यांनी Assistant ला आम्हाला काही सिरपच्या बॉटल द्यायला लावल्या.. कसं घ्यायचं हे सांगून लगेच TC ला सांगितलं कि ह्यांना पॅन्ट्री मधून मीठ पाठवा.. TC ने लगेच फोन लावला.. मिठाच्या पाण्याच्या पट्टी कपाळावर फिरवायला सांगितलं आणि निघून गेले..
आम्ही आवाज देऊन किती पैसे झाले म्हणून विचारलं तर *हे सगळं विनामूल्य होतं..आश्चर्य च्या धक्क्यातच सीट वर पोहचलो तोपर्यंत पॅन्ट्रीवाला मीठ घेऊन हजर.. मेरा देश सहीमे बदल रहा है..*
काय करायचं राव त्या पेट्रोल ला काय पिऊन घ्यायचं का..
🙏🏻🙏🏻🙏🏻
अशी होत असलेले सुधारणा हे मिडीया / पेपरवाले दाखवत नाही. बदल होत आहेत. आपण सुद्धा आपल्या नातेवाईकांना व मित्राना कळवावे. वेळ लागेल पण आपण झालेला व होत असलेला बदल अनुभवत आहोत.🙏👌😊
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...