Saturday, 13 November 2021

 *तुलसी विवाह करण्याची प्रथा कशी सुरु झाली*🙏🌷

भगवान श्री कृष्णाची " तुला " करतांना एका पारड्यात भगवान श्री कृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजना इतके दागिने,मुद्रा,त्यांच्या सर्व पत्नीनी घातले तरी तुला पूर्ण होत नव्हती. त्यावेळेस सत्यभामाने एक तुळशीचे पान त्यावर ठेवले  त्याबरोबर अलंकाराचे ते पारडे झटकन खाली आले . *तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली . तेव्हा आशिर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी लोकशिक्षणाच्या दृष्टीने आधी माझा विवाह तुझ्याशी ( तुळशी ) होईल व त्यानंतर इच्छित इतर वधू वरांचे विवाह होतील* असा आशिर्वाद दिला .


*त्याप्रमाणे आजपर्यंत ही प्रथा सुरू आहे*


       *. . .... मराठी संस्कृती मराठी अस्मिता दिंडोरी प्रणित ग्रंथ*🌷🙏

🙏 श्री स्वामी समर्थ🙏

 एसटी चा संप कायदेशीर आहे!


    भारतीय नागरिक असो कि नौकर त्याला त्याचा हक्क मिळवण्यासाठी आंदोलन करण्याचा आधिकार कायम केला आहे. त्यात संप ही सामाविष्ट आहे.पगारवाढ ,किंवा धोरणात्मक निर्णय घेणे किंवा विरोध करणे यात त्या त्या लाभार्थी आणि पिडितांचा हस्तक्षेप मुलभूत हक्कात मान्य आहे.

    एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणे,खाजगीकरण रद्द करणे, परिवहन खात्यात महामंडळ विलीन करणे यात एसटी कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप मान्य आहे.Participaion of railway employees in management केंद्र सरकारने मान्य केलेले आहे.तेच तत्व एसटी महामंडळ किंवा सहकारी संस्था यात मान्य केलेले आहे.नोकरांना इतर व्यवस्थापनात हस्तक्षेप करता येणार नाही परंतु स्वताच्या नोकरीच्या व्यवस्थापात हस्तक्षेप करण्याचा आधिकार कायम  आहे.त्यासाठी पैसा व श्रम यांची इनव्हेस्टमेंट मानली जाते.

      एसटी मधे नवीन कर्मचारी भरती केले तरी आधीचे कर्मचारी नोकरीतून कमी करता येत नाहीत. संप पुकारल्यानंतरची कारवाई जसे निलंबन किंवा बडतर्फी करता येत नाही. निलंबन आणि बडतर्फी ही प्रशासकीय कामकाजातील अनियमितता बदल दिली जाणारी शिक्षा आहे. ती शिक्षा संप,आंदोलन काळात देता येत नाही. परिवहन मंत्री अनिल परब हे एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करून घटनात्मक आधिकाराचे उल्लंघन करीत आहेत.मंत्री पदाचा गैरवापर करीत आहेत.तो दहशत पसरवण्याचा दुष्ट हेतू आहे.संप मोडित काढण्याऐवजी संपकरी कर्मचाऱ्यांना घेऊन वैधानिक स्तरावर चर्चा केली पाहिजे. निलंबन किंवा बडतर्फी चे  भय दाखवणे घटनात्मक आधिकाराची पायमल्ली करणे असते.

    आजरोजी एसटी कर्मचारी संपावर आहेत.आधीच आर्थिक अडचणीत आहेत.आणि दुसरीकडे परिवहनमंत्री भरगच्च मानधन घेऊन हुकुमत गाजवत आहे. हे चित्र लोकशाहीला मारक आहे.लोक ब्रेडसाठी रडत होते आणि निरो व्हायोलिन वाजवत होता.असाच प्रयत्न इंदिरा गांधींनी केला होता.तो अपयशी ठरला होता.त्यांनी चूक कबूल केली होती.जे  इंदिरा गांधींनी चुकीचे केले होते तेच अनिल परब  करीत आहेत.उद्वव ठाकरे करीत आहेत.

     संप काळात एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याबद्दल कोर्टात अनिल परब यांना विचारले जाईल तेंव्हा ते नाकबूल करतील. कि, मी असा आदेश कोणाही आधिकारी ला दिला नव्हता.का निलंबित केले,मला सांगता येणार नाही. तेंव्हा निलंबन करणारे आधिकारी दोषी ठरतील.म्हणून अनिल परब यांनी जो जो तोंडी आदेश महामंडळ आधिकाऱ्यांना दिला,त्याची लिखीत प्रत त्या त्या आधिकाऱ्यांनी २४ तासात प्राप्त करणे आवश्यक आहे. आधीचा आदेश लिखीत स्वरूपात प्राप्त होत नसेल तर पुढील आदेश पालन करणे बंधनकारक ठरत नाही.असा नियम आहे.(Law of responsibility and accountability )मंत्री ला खुष ठेवण्याच्या नादात अशी घोडचूक आधिकारी करीत आहेत. कोर्टाच्या आदेशाने ती घोडचूक करणाऱ्या आधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

       संप करणे ही घटनात्मक व  कायदेशीर तरतूद असताना मनमानी करणे,हुकुमशाही गाजवणे चुकीचे ठरणार आहे.याकारणे राज्य सरकार वर गडांतर येऊ शकते.उद्धव ठाकरे यांनी मनमानी न करता सावध पवित्रा घेतला पाहिजे. कामगार विरूद्ध सरकार या लढाईत नेहमीच सरकार पराजित झाले आहे.कारण ठरले सत्तेचा माज.


....शिवराम पाटील.

9270963122

महाराष्ट्र जागृत जनमंच

Chubhn

 🙏🌹*चुभन*🌹🙏


पुरानी साड़ियों के बदले बर्तनों के लिए मोल भाव करती एक सम्पन्न घर की महिला ने अंततः दो साड़ियों के बदले एक टब पसंद किया . "नहीं दीदी ! बदले में तीन साड़ियों से कम तो नही लूँगा ." बर्तन वाले ने टब को वापस अपने हाथ में लेते हुए कहा .

अरे भैया ! एक एक बार की पहनी हुई तो हैं.. ! बिल्कुल नये जैसी . एक टब के बदले में तो ये दो भी ज्यादा हैं , मैं तो फिर भी दे रही हूँ . नहीं नहीं , तीन से कम में तो नहीं हो पायेगा ." वह फिर बोला .

एक दूसरे को अपनी पसंद के सौदे पर मनाने की इस प्रक्रिया के दौरान गृह स्वामिनी को घर के खुले दरवाजे पर देखकर सहसा गली से गुजरती अर्द्ध विक्षिप्त महिला ने वहाँ आकर खाना माँगा...

आदतन हिकारत से उठी महिला की नजरें उस महिला के कपडों पर गयी.... अलग अलग कतरनों को गाँठ बाँध कर बनायी गयी उसकी साड़ी उसके युवा शरीर को ढँकने का असफल प्रयास कर रही थी....

एकबारगी उस महिला ने मुँह बिचकाया . पर सुबह सुबह का याचक है सोचकर अंदर से रात की बची रोटियाँ मँगवायी . उसे रोटी देकर पलटते हुए उसने बर्तन वाले से कहा -

तो भैय्या ! क्या सोचा ? दो साड़ियों में दे रहे हो या मैं वापस रख लूँ ! "बर्तन वाले ने उसे इस बार चुपचाप टब पकड़ाया और दोनों पुरानी साड़ियाँ अपने गठ्ठर में बाँध कर बाहर निकला...

अपनी जीत पर मुस्कुराती हुई महिला दरवाजा बंद करने को उठी तो सामने नजर गयी... गली के मुहाने पर बर्तन वाला अपना गठ्ठर खोलकर उसकी दी हुई दोनों  साड़ियों में से एक साड़ी उस अर्ध विक्षिप्त महिला को तन ढँकने के लिए दे रहा था ! !!

हाथ में पकड़ा हुआ टब अब उसे चुभता हुआ सा महसूस हो रहा था....! बर्तन वाले के आगे अब वो खुद को हीन महसूस कर रही थी . कुछ हैसियत न होने के बावजूद बर्तन वाले ने उसे परास्त कर दिया था ! !! वह अब अच्छी तरह समझ चुकी थी कि बिना झिकझिक किये उसने मात्र दो ही साड़ियों में टब क्यों दे दिया था .

कुछ देने के लिए आदमी की हैसियत नहीं , दिल बड़ा होना चाहिए....!! आपके पास क्या है ? और कितना है ? यह कोई मायने नहीं रखता ! आपकी सोच व नियत सर्वोपरि होना आवश्यक है .

और ये वही समझता है जो इन परिस्थितियों से गुजरा हो.....! !!


 *उम्मीदें तैरती रहती है,*

*कस्तियाँ डुब जाती है,*

*कुछ घर सलामत रहते है*

*आँधिया जब भी आती है।।*

*बचा ले जो हर तूफान से,*

*उसे आस कहते है,*

*बड़ा मजबूत है ये धागा,*

*जिसे विस्वास कहते है।*

🙏🙏

 महाड शहरात भविष्यातील पूरसदृष्य परिस्थिती टाळण्यासाठी  सावित्री नदीच्या पात्रातील दगडमाती आणि वाळू उत्खननासंदर्भात परिसर सर्वेक्षणाचा अहवाल तातडीने सादर करावा

- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

 

            मुंबई, दि. 10 : महाड परिसरात भविष्यात पुरामुळे दुर्घटना तसेच वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी जलदगतीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. सावित्री नदीच्या पात्रातील दगडमाती आणि वाळू उत्खनन करण्यासंदर्भात तेथील परिसराचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून तातडीने त्याचा अहवाल पर्यावरण विभागाच्या मान्यतेसह सादर करावागाळ काढण्याचे काम कालमर्यादेत पूर्ण करावे असे निर्देश महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

 

            महसूल मंत्री श्री. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सावित्री नदीच्या पात्रातील वाळू-दगड उत्खननाबाबतच्या कामाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भविष्यातील मनुष्यहानी व वित्तहानी टाळण्यासाठीच्या दृष्टीने जलदगतीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिका-यांना दिले. यावेळी बंदरे विकास विभागाचे मंत्री अस्लम शेखमाजी आमदार हुस्नबानो खलीफेमहसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीरपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे संचालक श्री. टोकेमेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनीकोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील हे उपस्थित होते.  याचबरोबर पालघररत्नागिरीसिंधुदुर्गरायगडचे जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

            महसूलमंत्री श्री. थोरात म्हणालेया वर्षी सावित्री नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दगडमातीवाळूचा गाळ असल्याने तेथे पाणी साचून ते महाड शहरामध्ये जाते यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी होते. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या भागाचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करावा. याचबरोबर गाळ उपसण्याच्या कामास गती द्यावी. आपत्ती टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कामासाठी सर्व विभागांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून व सहकार्याने काम करणे गरजेचे असल्याचेही मंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले. नदी पात्रातील गाळ काढण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील स्थानिकांना सांगितले होते. या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, असेही मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

            मुंबई, दि. 10 : एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहातबाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठीराज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे कीकृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

००००


 भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आत्मनिर्भर भारत;

14 नोव्हेंबर रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन

 

          नवी दिल्ली, 12 : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. आत्मनिर्भर भारत या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात देशातील सर्व राज्ये आपापल्या राज्याच्या प्रगतीचे दर्शन घडवीत आहेत. महाराष्ट्राने यंदा राज्यातील औद्योगिक वाटचालीचा आलेख आत्मनिर्भर संकल्पनेखाली साकारला आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रविवारी दि. 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वा. होणार आहे.

            दि. 14 ते 27 नोव्हेंबर 2021 या कालावधीत प्रगती मैदान येथे 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना आत्मनिर्भर भारत  ही आहे. या मेळ्यात महाराष्ट्राने आपल्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन औद्योगिक वाटचालीतील महाराष्ट्राचा विकास या  संकल्पनेतून साकारले आहे.

            आत्मनिर्भर ही संकल्पना मांडताना यंदा उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी तसेच डिजीटलई-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासनिर्यातलघुउद्योगस्टॉर्टअपला चालना देणारे धोरणआदी सर्वच विषयांना स्पर्श करणारे आकर्षक प्रदर्शन यंदा महाराष्ट्राने आयोजित केले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे 13 स्टॉल्स असणार आहेत. बचत गटांचे 8 स्टॉल्सकारागीरांचे 7 स्टॉल्ससूक्ष्मलघुमध्यम उद्योगातंर्गत  येणारे उद्योग समुह (क्लस्टर) चे 8 स्टॉल्स आणि  स्टॉर्टअप चे 6 स्टॉल्स यंदा असणार आहेत.

            प्रगती मैदान येथील गेट क्रमांक 5 बीमधील नवीन बांधकाम इमारतीमधील 2 क्रमांक इमारतीतील दुस-या मजल्यावर महाराष्ट्र दालन आहे. या महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन रविवारी दि.14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते होणार आहे. या उद्घाटनप्रसंगी उद्योग राज्यमंत्री कु. अदिती तटकरेमहाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडेअपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त श्यामलाल गोयल उपस्थित राहतील. यावर्षी भागीदारी राज्य बिहार असून फोकस राज्य झारखंड आहे.

००००


 आरोग्य विभागाच्या तत्सम योजना

जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय निर्गमित

 

            मुंबईदि. 12 : राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या तत्सम योजनांना जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण) म्हणून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. याबाबतचे शासन निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार निर्गमित झाले आहेत.

            या शासन निर्णयानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीउपकेंद्रांसाठी औषधी साहित्य व साधन सामुग्री खरेदी करणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांचेउपकेंद्रांचे बांधकामविस्तारीकरणदेखभालदुरूस्ती व परिक्षण करणे. अग्न‍िसुरक्षा यंत्रणा खरेदी तसेच देखभाल दुरूस्ती करणे, रूग्णालयाच्या इमारतींचेविद्युत जोडणीचे लेखापरिक्षण करणे. पीट बरियल बांधकाम करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रमाणकानुसार (मंजूर संख्येनुसार) रूग्णवाहिकांची खरेदी करणे तसेच देखभाल दुरूस्ती करणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांचेउपकेंद्रांचेआयुर्वेदिकयुनानी दवाखान्यांचे बळकटीकरणसोयी-सुविधांमध्ये वाढ करणे. जिल्हा परिषद दवाखानेप्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम करणे आदी योजनांना राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण)म्हणून राबविण्यात येणार आहे.

            राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत रूग्णालयासाठी औषधीसाहित्यसाधनसामुग्री खरेदी करणे. रूग्णालयांचे बांधकाम विस्तारीकरणदुरूस्ती व देखभालअग्न‍िसुरक्षा यंत्रणा खरेदी तसेच देखभाल दुरूस्तीरूग्णालयांच्या इमारतींचेविद्युत जोडणीचे लेखापरिक्षण करणे आदी योजना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)म्हणून राबविण्यात येणार आहे.

            या शासन निर्णयामुळे राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सर्व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यवाही सुरू करतील. नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे या निर्णयामुळे शक्य होणार आहे.

*******


 

 

 

Featured post

Lakshvedhi