Friday, 12 November 2021

 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कोणत्याही कार्यालयावर ईडीचे छापे पडलेले नाहीत

- अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक

·       मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका संस्थेवर छापा पडल्याची माहिती

·       वक्फ मंडळाची किंवा व्यक्तिश: माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करु नये

 

मुंबईदि. 11 : वक्फअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका संस्थेवर अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) छापा पडल्याची माहिती मिळाली आहे. तथापीमहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कोणत्याही कार्यालयावर छापे पडलेले नाहीतयासंदर्भात चुकीची माहिती प्रसारीत होत असल्याने स्पष्टीकरण करत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तथापीवक्फ मंडळाचे कामकाज अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मागील २ वर्षात अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. मागील २ वर्षात राज्यातील वक्फ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या आणि गैरव्यवहार करणाऱ्या ७ संस्थांवर कारवाई करुन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ईडीमार्फत छापा टाकण्यात आलेल्या संस्थेवरही वक्फ मंडळाच्या पुढाकाराने आधीच कारवाई करण्यात आली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांवर ईडी कारवाई करत असेल तर त्याचे आम्ही निश्चितच स्वागत करु. पण याच्या आधारे वक्फ मंडळाची किंवा व्यक्तिश: माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करु नयेअसे त्यांनी सांगितले.

   मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री श्री.मलिक बोलत होते.

ईडीमार्फत करण्यात आलेल्या कारवाईच्या अनुषंगाने माध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसारीत होत आहे. त्यामुळे ईडीने नेमकी काय कार्यवाही केली याबाबत संदीग्धता निर्माण न करता अधिकृत माहिती प्रसारीत करुन जनतेला योग्य माहिती द्यावीअसे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले कीताबुत इंडोमेंट ट्रस्ट (ता. मुळशीजि. पुणे) या संस्थेच्या अनुषंगाने ईडीमार्फत छापा टाकून कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या संस्थेवर राज्य शासनाच्या वक्फ मंडळामार्फत आधीच कारवाई सुरु करण्यात आली आहे. जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यासाठी या संस्थेला मिळणाऱ्या ७ कोटी ७६ लाख रुपये इतक्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी इम्तियाज शेख व चाँद मुलाणी यांच्याविरुद्ध १३ ऑगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय वक्फ इनाम जमिनी बेकायदेशीररित्या खालसा करणेविक्री करणेअवैधरित्या मावेजा घेणेअवैध भाडेपट्टीवर देणे या कारणास्तव राज्यातील विविध ठिकाणच्या ७ संस्थांवर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पुढाकाराने एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आष्टी (जि. बीड) येथील एका प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळामार्फत राज्यातील संस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी मागील २ वर्षात कार्यवाही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

वक्फ इनाम जमिनी बेकायदेशीररित्या खालसा करणेविक्री करणेअवैधरित्या मावेजा घेणे व अवैध भाडेपट्टीवर देणे या कारणास्तव मागील २ वर्षात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ताबूत इंडोमेंट ट्रस्ट, (जि. पुणे),  जुम्मा मस्जिद (बदलापूरजि. ठाणे)दर्गा मजीद गैबी पीर (चिंचपूरआष्टीजि. बीड)मज्जीद देवी (निमगावता. आष्टीजि. बीड)दर्गा बुरहान शाह व इदगाह (जिंतूर रोडपरभणी)मज्जित छोटा पंजतन (परतुरजि. जालना)दर्गा नुरुल हुदा मज्जिद कब्रस्तान (दिल्ली गेटऔरंगाबाद) या संस्थांवर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पुढाकाराने आतापर्यत कारवाई करण्यात आली आहे. 

राज्यात वक्फ मंडळांतर्गत सुमारे ३० हजार संस्था नोंदणीकृत असून त्यांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी वक्फ मंडळामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येत आहेअशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बहुतांश सदस्यांची नियुक्तीही झाली असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे पूर्णवेळ पद भरण्यात आले आहे. अध्यपदाच्या निवडीची प्रक्रियाही सुरु आहे. मंडळाच्या अध्यक्षाची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.  वक्फ मंडळाच्या इतिहासात प्रथमच पूर्ण क्षमतेने वक्फ मंडळ कामकाज करु शकेल यादृष्टीने कार्यवाही करण्यात आली आहे. वक्फ मंडळाचे संपूर्ण कामकाजही ऑनलाईन करण्यात येत असून जुन्या दस्तावेजांचे डिजीटलायजेशन करण्यात येत आहेअशी माहितीही मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

०००००


 महाराष्ट्र विधान परिषदेसाठी मुंबई मतदारसंघाकरिता

द्विवार्षिक निवडणूक -2021 कार्यक्रम जाहीर

 

            मुंबईदि. 12 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने मुंबई मतदारसंघाकरिता दोन सदस्यांची मुदत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी समाप्त होत असल्याने बृहन्मुंबईत  दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

            महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 6 सदस्यांपैकी सर्वश्री रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप या सदस्यांची मुदत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

            निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार)उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार)मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 (शुक्रवार)मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतमतमोजणीचा दिनांक - 14 डिसेंबर 2021 (मंगळवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 16 डिसेंबर 2021 (गुरूवार).

            आयोगाने नमूद केल्याप्रमाणे कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच दिनांक 28 सप्टेंबर 2021 च्या मार्गदर्शक सूचनांमधील परिच्छेद क्र.6 मध्ये नमूद केलेल्या सूचनांचे निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या व्यक्तींनी पालन करणे आवश्यक असल्याचेही श्री.निवतकर यांनी सांगितले.

000


 

नवमतदारांनी मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी व्हावे

                                                            - जिल्हाधिकारी राजीव निवतकर

 

            मुंबईदि. 12 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision Programme) जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत या कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करणे/ मतदारांचे नावपत्ताफोटो यामध्ये दुरुस्ती करणे आणि मयतदुबार व स्थलांतरित मतदारांची वगळणी इ. बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदारमहिला आणि समाजातील वंचित घटकांतील मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी दि. 13 व  14 नोव्हेंबर2021 आणि दि. 27 व  28 नोव्हेंबर, 2021 रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

            तरी मुंबई शहर जिल्हयातील नवमतदारांनी व नागरिकांनी जवळच्या पदनिर्देशित ठिकाणी अथवा www.nvsp.in या वेबसाईट वर अथवा Voter Helpline App द्वारे मतदार यादीत आपले नाव नोंदणी करावीअसे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर यांनी केले आहे.

000


 अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन

संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार

·       ममताबाई भांगरे यांना प्लान्ट जिनोम सेव्हीयर शेतकरी सन्मान’ पुरस्कार

 

नवी दिल्ली 11 : पिकांचे स्थानिक वाणसंवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय जीनोम सेव्हीयर कम्युनिटी पुरस्कार’ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेला  प्रदान करण्यात आला. यासह या संस्थेच्या सदस्या ममताबाई भांगरे यांना प्लान्ट जिनोम सेव्हीयर शेतकरी सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत येणाऱ्या प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटिज अँड फार्मर्स राइट्स अथॉरिटी  (PPV & FRA)यांच्यावतीने भारतीय कृषी अनुसंधान येथे राष्ट्रीय जीनोम सेव्हीयर कम्युनिटी’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.  कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण खंडू डगळे संस्थेचे सदस्य बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरेअन्नमाता ममताबाई देवराम भांगरेबायफ संस्थेचे विषय तज्ज्ञ डॉक्टर विठ्ठल कौठाळेजैव विविधता तज्ज्ञ संजय पाटीलविभाग प्रमुख जितीन साठेप्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्थानिक वाण संवर्धन करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून गेली आठ वर्ष तालुक्यात कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक यांच्या आर्थिक सहकार्याने हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सध्या तालुक्यात राबविला जात आहे.  अकोले तालुक्यात बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धि व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे.

वातावरण बदल आणि पोषण सुरक्षा यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे 114 वाणांचे संवर्धन संस्थेने केले आहे. या भागातील खास वैशिष्ट्य असलेला काळ भात रायभोगकोळपी या भात वाणांचा त्यात समावेश होतो. या भागातील खास वैशिष्ट्य असलेल्या कडू व गोड वालहिरवा लाल घेवडावाटाणा घेवडा तसेच वरई  पिकाच्या  घोशी आणि दुध मोगरा या वाणांचे संवर्धन केलेले आहे. मुबलक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असलेल्या हुलग्याच्या वाणांचाही यामधे समावेश होतो. भातवाल हरभरावाटाणा या पिकांच्या सुमारे नऊ स्थानिक वाणांचे 25 मेट्रिक टन बियाणे गेल्या हंगामात या संस्थेने निर्माण करून त्याचे वितरण केले आहे.

पारंपरिक बियाणे वापरून तयार होणाऱ्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देताना गेल्या हंगामात सुमारे दहा टन तांदूळ विक्री संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे. सात्विक आणि परिपूर्ण आहार प्रत्येकाच्या घरी मिळावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून परस बागांसाठी बियाणे निर्मिती केली जाते. या बियांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गेल्या हंगामात सुमारे 18 हजार आठशे परसबाग बियाणे संच विक्री करण्यात आलेले आहेत.

संस्थेच्या माध्यमाने आदिवासीबहुल गावांमध्ये जाणीव जागृती करून स्थानिक जैवविविधता जपण्यावर भर दिला जातो. संस्थेच्या माध्यमाने कोंभाळणेंएकदरेदेवगाव या गावांमध्ये गावरान बियाण्यांच्या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. या बीज बँकांमधून विविध प्रकारच्या स्थानिक प्रजातींचे बियाणे संवर्धित करून स्थानिक शेतकऱ्यांमार्फत पारंपरिक बियाण्यांचा वापर करून शेती पिकवण्यावर भर दिला जातो. संस्थेमार्फत तालुक्यातील  सुमारे 30 ते 35 गावांमध्ये स्थानिक जैव विविधता ठेवण्यासाठी काम करण्यात येत आहे. या भागातील प्रमुख पिके भातनागलीवरईयासह भाजीपाला पिकेतेलबियातृण आणि गळीत धान्य यासह रानभाज्याकंदमुळे यांचेही संवर्धनावर भर दिला जात आहे. संस्थेमार्फत परसबागेत लागवड करण्यासाठी लागणाऱ्या विविध भाजीपाला पिकांच्या बियांची निर्मिती व वितरण केले जाते. त्यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून बीज उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण व सहकार्यही केले जाते.

ममताबाई भांगरे यांना प्लान्ट जिनोम सेव्हीयर शेतकरी सन्मान’ पुरस्कार

कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेच्या सदस्या ममताबाई भांगरे यांना प्लान्ट जिनोम सेव्हीयर शेतकरी सन्मान’ पुरस्काराने केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याहस्ते गौरविण्यात आले. जंगली अन्न वनस्पतीसेंद्रीय शेती आणि विविध पिकांच्या 68 स्थानिक वाण संवर्धन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

००००


 

Sukhachi sadara

 


Maher


 

Mera bharat mahan.

 हे फार भन्नाट आहे.... आधी व्हिडीओ बघा आणि मग वाचा...


पद्म पुरस्कार म्हटलं की तिथेच अर्ध्या गोष्टी संपतात... एखाद्या गोष्टीसाठी आयुष्य खर्ची करणाऱ्या व्यक्तीच्या नावाआधीच पद्म असणारा पुरस्काराचं प्रीफिक्स लागतं... इथे मुद्दा तो नाहीय... तर मुद्दा आहे पुरस्कार स्वीकारण्याआधी त्यांनी जे केलं त्याचा... आपण बदलतोय याचा... आपण त्यांना स्वीकारतोय याचा...


राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारणे हा कोणत्याही भारतीयासाठी अभिनानाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षणच असतो, मग ते भारतीय अगदी त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असले तरी ते भारावून जातात. सामान्यपणे राष्ट्रपतींशी हस्तांदोलन करुन पुरस्कार स्वीकारला जातो. मात्र तृतीयपंशी म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जोगाम्मा या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार घेण्यास गेल्या तेव्हा त्यांनी केलेली कृती पाहून त्या सभागृहामध्ये असणाऱ्या पंतप्रधानांपासून ते सभागृहातील इतर मान्यवरांनीही टाळ्या वाजवून त्यांच्या कृतीचं कौतुक केलं.


जोगाम्मा या तृतीयपंथी आहेत. आता तृतीयपंथी म्हटल्यावर ते आपल्याकडे जेवढ्या वाकड्या नजरेने पाहत नाही तेवढे पूर्वग्रह दुषीत ठेऊन त्यांच्याकडे पाहणाऱ्यांमध्ये आपण सर्वसामान्य आहोत. म्हणजे तुम्हीच नाही मी सुद्धा तुमच्यातलाच आहे त्यांच्याकडे ते आपल्यातले नाही या नजरेने पाहणारा. पण इथे जोगाम्मा यांनी तुमच्या माझ्यासारख्या थिल्लर लोकांची पर्वा न करता स्वतःचं आपलेपण या सर्वोच्च मंचावरही जपलं... त्या राष्ट्रतींसमोर पुरस्कार घ्यायला गेल्या. राष्ट्रपती पुरस्कार देणार इतक्यात त्यांनी साडीचा पदर एका हातात धरुन तो गोलगोल फिरवला नंतर राष्ट्रपतींपासून काही अंतरावरुन हात वर खाली फिरवून त्यांच्या पायाशी असणाऱ्या पायरीवर बोटं मोडून त्यांनी नजर काढली... 


आता हे नजर काढणं वगैरे इललॉजिकल वाटू शकतं पण तृतीयपंथी ज्यासाठी ओळखले जातात ते त्यांनी केलं. याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून न पाहता प्रेम या भावाने पहावं. देशातील सर्वात मोठ्या पदावर असणारी म्हणजे पंतप्रधानांच्याही वर असणारी व्यक्ती समोर असताना न घाबरता, संकोच मनात न ठेवता आपल्या आपल्या स्टाइलने आणि सगळ्यात युनिक पद्धतीने त्यांनी प्रेम व्यक्त केलं... हे रिपिट मोडवर पाहिलं ना यात फार फार सारे रिड बिटवीन द लाइन्स आहेत आणि तेच पाहताना आणि याचा आशय लक्षात घेतल्यास उगा डोळे पाणावल्यासारखे होतातय...


खरं तर आपण फार खुजे आहोत या जोगाम्मांसमोर... आपल्याला आपलं असणं स्वीकारता येत नाही तर एवढ्या मोठ्या स्टेजवर व्यक्तं होणं लांबचं राहिलं.... असं निस्वार्थी आणि भरभरून दिलेलं प्रेम पाहून राष्ट्रपतीही भावूक झाले असतील यात शंका नाही....


पद्म पुरस्कार सोहळ्यांच्या इतिसाहात कायम लक्षात राहिल असा हा क्षण वाटतोय मला तरी....


शेवटी मॉरल ऑफ द स्टोरी काय तर


तुम्ही कोणीही असला आणि तुमच्या क्षेत्रात आणि त्याहून मुख्य म्हणजे स्वत:शी प्रमाणिक राहिलात तर हे असं स्वछंदी जगता येतं आणि त्या स्वच्छंदीपणाचा आनंद वाटता येतो... जसा या जोगाम्मा यांनी वाटलाय....


Thursday, 11 November 2021

 यवतमाळ येथील घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश

 

            मुंबई, दि. 11 : काल (बुधवारी) रात्री यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

          यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्यावर रात्री आठ ते नऊच्या सुमारास अज्ञात इसमांनी केलेल्या हल्ल्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता.  रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

          ही घटना अतिशय गंभीर असून याबाबत यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचा अहवाल तातडीने मागविण्यात आला असून या दुर्दैवी घटनेत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन खोलवर चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख यांनी दिली.

००००

Featured post

Lakshvedhi