सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 9 November 2021
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗
मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा.
मग काय !
गाडी सुसाट !!
🚗🚗🚗🚗
:
आणि अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं.
😲 😳 🥵🥶
गीतानी कर्ररररकचू्..न ब्रेक दाबला.
: 😫😤😤😖😖
वाटलं आता जाऊन धडकतेकी काय .. !!
गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले.. 😣😫
आणि.....
:
:
:
:
:
हुश्श.....!!!
:
:
:
:
:
:
:
:
:
:....
गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. व अशाप्रकारे,
*गाढवा पुढे वाचली गीता.*
😆😂😎
नंतर घाबरलेली गीता घरी आली आणि घडलेली कथा आपला नवरा हरीला सांगितली. तिने हट्टच धरला की ज्या गाढवामुळे माझे प्राण वाचले त्याला घरी घेऊनच या.
मग बिचारा हरी गाढवाकडे गेला. पण गाढवही हट्टी. ते काही तयार होईना.
शेवटी...
..
...
...
...
....
....
....
....
....
....
.......
*अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी..*
शेवटी कसाबसा हरी गाढवाला घरी घेवुन आला.
उन्हातून आल्यामुळे गीता ने गाढवास बसायला खुर्ची दिली आणि पाणी व गुळाचा तुकडा खावयास दिला ..
गाढव पाणी गटा गटा प्यायला आणि मग गूळ खावयास लागला.
अचानक काय झाले कळ लेच नाही. गाढव पाण्याच्या गुळण्या करू लागले.
हरीला आणि गीताला हे कोडे आज पर्यंत सुटले नाही
..
..
..
..
..
..
..
..
..
*गाढवाला गुळाची चव काय*
😂😝😝😀
लेखक काहीही करु शकतात🤣
महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी
12 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई, दि. 9 (रानिआ): विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या पोटनिवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 22 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.
विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी: धुळे- 5ब, अहमदनगर- 9क, नांदेड-वाघाळा- 13अ, मीरा-भाईंदर- 10ड आणि 22अ, सांगली-मिरज-कुपवाड- 16अ आणि पनवेल- 15ड.
लोकसहभागातून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा
- मुख्य सचिव सीताराम कुंटे
मुंबई, दि. 9 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाने आखून दिलेल्या संकल्पनेनुसार आणि लोकसहभागातून राज्यात सर्वत्र कार्यक्रमांचे उत्साहाने आयोजन करून त्यांची माहिती यासाठी निर्मित स्वतंत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिल्या.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 15 ऑगस्ट 2022 पर्यंत 75 आठवडे राज्यभर विविध कार्यक्रम राबवून अमृतमहोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीर, माहिती - तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात व संबंधित अधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, दर्शनिका विभागाचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीज जास्त स्थानिक, युवा, विद्यार्थी यांचा सहभाग घ्यावा. खासगी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने आणि सहभागाने उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे असल्याचेही, मुख्य सचिव श्री.कुंटे यांनी सांगितले.
गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी, पोलीस बँड पथकाद्वारेही देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. अज्ञात स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यकालीन महत्त्व असलेली स्थळे प्रकाशात आणण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.
महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी सूचना केली की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे फक्त उत्सवी स्वरूप न राहता कायमस्वरूपी स्मरण राहिल, असे भरीव स्मारक उभे करण्याबाबतही सर्व संबंधितांनी प्रस्तावित करावे.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी प्रास्ताविक केले तर सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सादरीकरण केले.
विविध जिल्ह्यांत आजवर झालेल्या कार्यक्रमांची माहिती संबंधित विभागीय आयुक्तांनी दिली. दर्शनिका विभागाचे संचालक डॉ.दिलीप बलसेकर यांनी प्रत्येक जिल्ह्याचे विशेष पुरवणी गॅझेट तयार करण्यासंदर्भात व गॅझेटच्या आकृतीबंधाबाबत माहिती दिली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड १ ( सन १८१८) ते खंड १३ भारत छोडो डिसेंबर १९४२ या ग्रंथाचे चार ई बुक संच यावेळी मुख्य सचिव यांना सांस्कृतिक कार्य सचिव यांच्या हस्ते भेट देण्यात आला.
०००
पेट्रोल पंप, ढाबे, हॉटेल्सला पोचमार्गासाठी परवानगीच्या प्रक्रियेमध्ये येणार सुसूत्रता
राज्य व जिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यासाठी
परवानगीची नवी कार्यपद्धती लागू
- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
मुंबई, दि. 9 : राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मार्गांवरून पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे यांसारख्या खासगी आस्थापनांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी नवीन कार्यपध्दती लागू केली आहे. या कार्यपद्धतीमुळे ऑईल कंपन्या व इतर खाजगी आस्थापनांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी मिळविण्यामधील अडचणी दूर झाल्या असून परवानगीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आली आहे, परिणामी शासनाच्या 'ईज ऑफ डुईंग बिझनेस' या संकल्पनेस चालना मिळाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या कडेला पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन्स, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे यांना राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग इत्यादी मार्गावरुन पोचमार्गाची निकड भासते, त्या पोचमार्गासाठी परवानगी प्रस्तावांची छाननी इंडियन रोड काँग्रेस व केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या 2003 च्या परिपत्रकातील तरतुदीनुसार केली जात होती.
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या दि. 26 जून 2020 च्या परिपत्रकान्वये पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्ट, हॉटेल, ढाबे यांना राष्ट्रीय महामार्गांवरुन पोचमार्ग बांधण्याकरीता नव्याने सूचना जारी केल्या आहेत. या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दि.4 सप्टेंबर 2020 रोजीच्या परिपत्रकान्वये राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यांना लागू केल्या होत्या, मात्र, या सूचना या केवळ राष्ट्रीय महामार्गांकरीता असल्यामुळे त्या राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग यांना लागू करताना अडचणी येत होत्या व त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर पोचमार्ग परवानगीच्या प्रस्तावांची पडताळणी करणे जिकिरीचे ठरत होते.
याबाबत ऑईल कंपन्या, लोकप्रतिनिधी आदींकडून शासनाकडे तक्रारी आल्या होत्या. या समस्येचे निराकरण करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन या निकषांमध्ये राज्यातील रस्त्यांच्या दृष्टीने रस्त्यांच्या दर्जानुरूप सुधारणा करण्यासाठी सा. बां. प्रादेशिक विभाग पुण्याच्या मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली.
या समितीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, इंडियन रोड काँग्रेसची मानके, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार व हरियाणा या राज्यांनी तयार केलेले निकष, विविध न्याय निर्णय, ऑईल कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या सूचना यांचा रस्ते सुरक्षा व सुरळीत वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने तुलनात्मक व सखोल अभ्यास करुन पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन व रिसॉर्ट, हॉटेल, ढाबे यांसारख्या खासगी आस्थापनांना राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग इत्यादी मार्गावरुन पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्याकरिताची सुधारित मार्गदर्शक तत्वे दि. 9 जून 2021 रोजी शासनास अहवालाव्दारे सादर केली.
समितीच्या अहवालानंतर राज्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग इत्यादी मागांवरुन पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी अवलंबिण्यात येणारी प्रचलित कार्यपध्दती बदलून राज्य शासनाने 13 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयानुसार पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी नवी कार्यपद्धती लागू केली आहे. या कार्यपद्धतीमुळे ऑईल कंपन्या व इतर खाजगी आस्थापनांना राज्य, जिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यास परवानगी मिळविण्यात सुसूत्रता येणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.
०००००
🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹
🌻 *आनंदी पहाट* 🌻
*इंद्रायणी काठावरची*
*पु. ल. देशपांडे*
*जन्म दिन विशेष*
🌹🔆🌸🌿🚩🌿🌸🔆🌹
*पु. ल. यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले तरीही महाराष्ट्राने दिलेली पदवी म्हणजे 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व' आणि 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार हे आजन्म जवळचे वाटणारे.*
*पु. ल. बहुआयामी. त्यांनी अनेक कलांत नैपुण्य प्राप्त केले. अनेक क्षेत्र गाजवली. याचे कारण त्यांची बुद्धिमत्ता आणि क्रियाशीलता. लहानपणी त्यांना एका जागेवर शांत बसविणे ही घरच्यांची कसरत होती. अगदी वयाच्या पाचव्या वर्षी आजोबांनी लिहून दिलेले भाषण साभिनय सादर केले, तर बाराव्या वर्षी स्वतःच भाषण लिहून सादर करायचेच पण इतरांनाही लिहून द्यायचे. घरच्या गाण्याच्या मैफिली ऐकून अनेक वाद्य पण शिकले. त्यांचे पेटीवादन ऐकून बालगंधर्वही सुखावले होते.*
*१९४७ मध्ये त्यांचा चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून प्रवेश झाला. चित्रपट क्षेत्रातील सर्वच अंग आत्मसात केली. अभिनयासह कथा.. पटकथा.. संवाद लेखन.. दिग्दर्शन.. संगीत यामध्येही पु. ल. आपली छाप पाडायचे. त्यांनी आकाशवाणी.. दुरदर्शन यामध्ये ही काही काळ नोकरी केली. देशात दुरदर्शनचा प्रारंभ होताच पं. नेहरुंची पहिली मुलाखत पु. लं. नी घेतली होती.*
*'गुळाचा गणपती' हा साध्या भोळ्या व्यक्तीला लोकांच्या डावपेचाचा होणाऱ्या त्रासावरचा चित्रपट. या चित्रपटात तर पु. लं. प्रमुख अभिनेते होतेच पण कथा.. पटकथा.. संवाद.. दिग्दर्शन आणि संगीतही त्यांचेच असल्याने सबकुछ पु. ल. म्हणून प्रसिद्ध आहे.*
*इंद्रायणी काठावरची आळंदी. जिथे सत्ता आहे ती जगाला सत्य ज्ञान मुक्तपणे वाटणाऱ्या ज्ञानियाच्या राजाची. या संजीवन समाधीच्या मागे पुढे सारे जग ज्ञानप्राप्तीसाठी धावतेय. इथे मनातील अंधःकार दूर करणारा उजेड आहे. इथेच मनात.. बुद्धीत दडलेला अहंकार दूर करणारे कैवल्याचे.. मोक्षाचे झाड आहे. याच ज्ञानोबा नामक वटवृक्षाखाली ज्ञान प्राप्त होत निवृत्ती.. सोपान.. मुक्ताबाईंंचे जीवन उजळले. ज्ञानप्रकाशाने मोक्षाचा मार्ग सापडला.*
*इंद्रायणी नदी. जिच्या तिरावर ज्ञानोबांनी प्रदान केलेल्या सत्यमार्म ज्ञानाने मनुष्याच्या अनाठायी इंद्रिये इच्छा वाहून जातात.. इंद्रिय विजय प्राप्त होतो.. समता बुद्धी प्राप्त होत मनःशांती लाभत जीव शिव होतो.,अर्थात मोक्ष लाभतो अशी ही सरीता.*
*पु. ल. यांच्या संगीताची जादू अशी की, आजही या चित्रपटाची गाणी लोकप्रिय आहेत. भीमसेन जोशींना त्यांची मैफिल ज्या गाण्याशिवाय लोक पूर्ण होवू देत नव्हते अश्या या गाण्याचे संगीतकारही पु. ल. आणि चित्रपटात हे गाणे साभिनय सादर केलंय पु. ल. यांनीच.*
🌹⚜️🌹🔆🚩🔆🌹⚜️🌹
*_इंद्रायणी काठी, देवाची आळंदी_*
*_लागली समाधी, ज्ञानेशाची_*
*_ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव_*
*_नाचती वैष्णव, मागेपुढे_*
*_मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड_*
*_अंगणात झाड कैवल्याचे_*
*_उजेडी राहिले उजेड होऊन_*
*_निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई_*
🌸☘🌺🥀🌻🥀🌺☘🌸
*गीत : ग. दि. माडगूळकर* ✍
*संगीत : पु. ल. देशपांडे*
*स्वर : पं. भीमसेन जोशी*
*चित्रपट : गुळाचा गणपति (१९५३)*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*०९.११.२०२१*
🌻🌸🥀⭐🌺⭐🥀🌸🌻
॥ श्री स्वामी समर्थ ॥
सर्व भक्तांना शुभ दिपावली
माझ्या पाठीशी माय बापा प्रमाणे आधार बनून उभ्या राह1णाऱ्या माझा सर्व दानशूर व भक्तांना नतमस्तक होऊन एक विनंती करतो🙏
एवढ वर्ष वाचवा हो ही गोशाळा !
कारण कोकणात आता भात कापणी सुरू आहे त्यामुळे वर्षभराचा चारा हा आत्ताच विकत घ्यावा लागतो सुमारे चारशे ट्रक चारा गोशाळेत एक वर्षासाठी लागतो.माझे कीर्तन सेवा आजपर्यंत बंद असल्यामुळे मी हतबल आहे माझ्या पुढे विनंती केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय माझ्यापुढे शिल्लक नाही.
मला सर्वात जास्त महत्वाचे वाटते ते आता या साडेआठशे 850 गाईंचे संगोपन करणे.
माझ्याकडे कोणता इन्कम सोर्स नाही. मी उद्योजक नाही व माझ्या पाठीशी कोणती हिंदुत्ववादी संघटना नाही. मला बाहेरून मदत करणारे आपण माय बापा प्रमाणे पाठीशी उभे असणारे दान दाते हेच या गोशाळेचे खरे संचालक आहेत. म्हणून तेरा 13 वर्ष हे कार्य अविरत सुरू राहिले आहे. आपली कोकणातली एकमेव गोशाळा आहे की आजही कोणत्याही बाहेरून येणाऱ्या गाईला गो शाळेत प्रवेश मिळतो ती आजारी असो, जखमी असो, भाकड असो, हे काही न पाहता एवढ्या अडचणींवर मात करून आजही गाईंना विनामूल्य प्रवेश दिला जातो.हे आपण कधीही पडताळू शकता🙏
आज पर्यंत आपण केलेल्या मदतीचा रुपाया नी रुपयाचा हिशोब मी आपणासमोर कधीही द्यायला तयार आहे मी यापुढे आपला येणारा एक एक रुपया गोमातेच्या अविरत सेवेत खर्च केला जाईल असा विश्वास देतो🙏 आपण कधीही ही आमच्या जमाखर्चाचा अहवाल पाहू शकता. आपल्या गोशाळेत सुरुवातीला चार 4 गाई होत्या आत्ता 850 गाई आहेत. आपण व्हिडिओ कॉल करून कधीही प्रत्यक्ष पाहू शकता. व यापूर्वी अनेक चॅनेलवर आलेल्या बातम्याही आपण पाहिल्या असतील, व आमच्याकडे 992148 7148 कॉल करून प्रत्यक्ष पाहणी करू शकता.
1) एक दिवसाचा खर्च रुपये 40000
2) एक ट्रक कडबाकुट्टी रुपये 72 हजार
3) एक ट्रक भाताचा पेंढा रुपये 15000
4 ) ट्रक ओला चारा रुपया 30000
5 ) एक गाय मासिक दत्तक खर्च 1500 रुपये
6) एक अबोल गोमाता वार्षिक दत्तक खर्च 18000 हजार रुपये
7) पोर्णिमा निमीत्त गुळ खादय 6000 रूपये
ते कोणताही पाळीव जीवाला रोज जगण्या करता कमीत कमी पन्नास 50 रुपये खर्च येतो हे आपणा सर्वांना माहीत आहे.
मदतीसाठी संपर्क
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान
AC / 60010708605
IFSC - cod - MAHB0000296
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिपळूण (सेविंग खाते )
Google pay व Phon pay साठी 992148 7148
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा कदाचित आपण मदत करतच आहात आणी आपण नुसता हा संदेश पुढे पाठवला तरीसुद्धा दुसऱ्याकडून मिळाल्या दानाच्या पुण्यात आपणही वाटेकरी व्हाल🙏
आपल्या घरातील आपल्या मुलांचा वाढदिवस आपला वाढदिवस कोणतेही सुख किंवा दु:ख कार्य असता गाईला चारा द्यायला विसरू नका कारण तिचा आशीर्वाद खूप मोठा आहे🙏
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...