Tuesday, 9 November 2021

Tips arogya


 

 




 

 स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता

‘मार्जिन मनी’ उपलब्ध होण्यासाठी पात्र लाभार्थींना अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 8 : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेंतर्गत राज्यातील पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी इच्छुक नव उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर यांनी केले आहे.

            नवउद्योजक लाभार्थींना ‘मार्जिन मनी’ भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थींना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत४ था मजलाआर. सी. मार्गचेंबूर (पूर्व)मुंबई ४०० ०७१, दूरध्वनी ०२२ - २५२२२०२३ ईमेल आयडी acswomumbaisub@gmail.com या पत्यावर अर्ज करावा, असे सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

००००

 


दि. 8 नोव्हेंबर 2021

 

पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण कराव्यात

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात

राज्य शासन कमतरता राहू देणार नाही

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

           सोलापूर/पंढरपूरदि. 8 :- संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी अनुक्रमे 231 व  130 किलोमीटर इतकी असून यासाठी एकूण 12 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या दोन्ही पालखी महामार्गाच्या बाजूला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करावा व या महामार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक विविध सोयी-सुविधा निर्माण कराव्यातअसे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

            पंढरपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 विविध महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटचे कळ दाबून आभासी प्रणालीद्वारे करण्यात आलेत्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरीकेंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंहकेंद्रीय वाहतूक मंत्रालयाचे सचिव गंगाधर अरमानेविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीससोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

               प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले कीया पालखी महामार्गामुळे या भागातील विकासाला गती मिळण्याबरोबरच दक्षिण भारताशीही चांगला संपर्क निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग बनवले जाणार असून या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या जाव्यात. पंढरपूरच्या वारीला अनेक वर्षांची परंपरा असून या ठिकाणी भरणारी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा आहे. शेकडो वर्षाची गुलामीनैसर्गिक आपत्तीमध्येही वारी सुरूच होती. आजही अविरत सुरु आहे. या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नसून ही जगाला समानतेचा संदेश देणारी ही वारी असून या ठिकाणी प्रत्येक वारकरी हा समान असतो असे त्यांनी सांगितले.

               केंद्र शासनाकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर महामार्गाची निर्मिती केली जात असून प्रत्येक गाव व खेडे रस्त्यांनी जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने दक्षिणेची काशी असलेल्या पंढरीलाही पालखी महामार्गाने जोडले जाऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. या रस्त्यामुळे सांस्कृतिक प्रगतीबरोबरच या भागाच्या विकासाला अधिक चालना मिळून येथे धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढेल. रोजगार निर्मितीही होणार असल्याने हे मार्ग म्हणजे विकासाचा नवा प्रवाह असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करून पंढरीची वारी ही स्त्री पुरुष समानतेचे प्रतिक असल्याचेही त्यांनी म्हटले.

                यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी या भागातील नागरिकांकडून पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला सावली देणारे वृक्ष लावणेपालखी मार्गावर शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे व भविष्यात पंढरपूर हे भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच येथील जनसमुदायाशी काही वेळ मराठी भाषेतूनही त्यांनी संवाद साधला.

पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात

राज्य शासन कमतरता राहू देणार नाही

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

                    पालखी महामार्गाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासनाचा सहभाग असून या पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी ज्या काही आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच वाखरी येथे वारकऱ्याकडून  रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर हेही महामार्गाने जोडण्याचा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

                    पालखी महामार्ग तसेच महाराष्ट्रातून जाणारे रस्ते निर्मितीत महाराष्ट्र शासनाचे प्रत्येक पाऊल केंद्रासोबत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी करून पंढरपूरकडे म्हणजेच भक्तिमार्गाकडे जाणारे रस्ते चांगलेच असले पाहिजेत असे सांगून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी विठूमाऊलीचा आशीर्वाद असेल असेही त्यांनी सांगितले. वारकरी संप्रदायाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वारीची परंपरा जपलेली आहे. त्या वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा निर्माण करण्यात राज्य शासनाचाही पुढाकार असेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


 

 महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

·       उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण

 

            नवी दिल्ली 08 : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडुप्रधानमंत्री नरेंद्र मोदीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

        दरवर्षी  प्रजासत्त्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.  राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आज सकाळी वर्ष 2020 च्या काही पद्म पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. सकाळी पार पडलेल्या समारोहात 4 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. वर्ष 2020 च्या उर्वरित पद्म पुरस्काराचे वितरण सोमवारी  सायंकाळी करण्यात आले. यामध्ये एकूण 6 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक श्री. आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्म भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्री महिंद्रा हे महिंद्रा समुहाचे चेयरमन आहेत. जगभरातील 100 देशांमध्ये त्यांचे उद्योगसमूह आहेत.  

            महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-यांना 5 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये कला क्षेत्रातील योगदानासाठी 3 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने आज दुस-या टप्प्यात सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुरेश वाडकर यांना त्यांच्या अविट आवाजाने मराठीहिंदीसह अन्य भाषेतील गायनासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी एकता कपूर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दूरचित्रवाणी तसेच चित्रपट सृष्टीतील वैविध्यपूर्ण मालिका तसेच चित्रपट निर्माता म्हणून  श्रीमती कपूर यांची स्वतंत्र ओळख आहे. दूरचित्रवाणीवरील त्यांच्या मालिकांनी घराघरात लोकप्रियतेचा कळस गाठलेला आहे.

            करण जोहर यांनाही कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदी सिने जगतात त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित तसेच निर्देशित केलेल आहेत. मागील 2 दशकांमध्ये  त्यांनी एका पेक्षा एक असे मनोरंजनपूर्ण हिंदी चित्रपट बनविले आहेत.

            पोपटराव पवार यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी पद्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणा-या अहमदनगर जिल्ह्याच्या राहीबाई पोपेरे यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी गौरिवण्यात आले.

            वर्ष 2020 मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म विभूषण, 16 मान्यवरांना पद्म  भूषण आणि 118 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 13 मान्यवरांचा समावेश आहे. आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये महाराष्ट्रातील एकूण 10 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

००००


 

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पब्लिक रिलेशन कौन्सिलचे पुरस्कार प्रदान

·       कोरोना काळातील देवदुतांचा राजभवन येथे सन्मान

·       वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेखप्रिया दत्त,

मध्य व पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सन्मानित

 

            मुंबई, दि. 8 : कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर्सपासून वार्डबॉयपर्यंतपोलीस शिपायापासून महासंचालकांपर्यंतउद्योजकापासून ते सामान्य माणसापर्यंत सर्वांनीच निःस्वार्थपणे व सेवाभावाने काम केल्यामुळे तसेच कमी अवधीत देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यामुळे भारताने कोरोनावर यशस्वीरित्या मात केलीअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            कोरोना काळात विशेषत्वाने कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ८) राजभवन येथे एन्जेल कम्युनिकेटर’ पुरस्कार प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

            पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियातर्फे आयोजित कार्यक्रमात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेखमाजी खासदार प्रिया दत्तमध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतारपश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर व टाटा हॉस्पिटलचे कर्करोग तज्ञ डॉ.सुदीप गुप्ता व डॉ.शैलेश श्रीखंडे यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

            अभिनेते रोहिताश्व गौरसंपादक सुंदरचंद ठाकूरडॉ.निर्मल सुर्यडॉ.हरीश शेट्टीरुबिना अख्तर हसन रिझवीभारत मर्चंट चेंबरचे राजीव सिंघलअजंता फार्माचे आयुष अगरवालकमल गुप्ता यांना देखील कोरोना काळातील कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi