सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 1 November 2021
मतदार नोंदणीसाठी महिलांनी पुढे यावे
मुंबई, दि. 1 : संपूर्ण राज्यात आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या मोहिमेत महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असून जास्तीत जास्त महिला नवमतदारांची नोंदणी व्हावी, यासाठी निवडणूक विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी समन्वयाने काम करावे व शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचून त्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अधिकाऱ्यांना केले.
दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राज्यात होणाऱ्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीस महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.
श्री.देशपांडे म्हणाले की, जास्तीत जास्त महिलांची मतदार नोंदणी करण्याकरिता त्यांच्यापर्यंत संदेश घेऊन जाणे आवश्यक आहे. नवविवाहितेचे नाव तिच्या सासरकडील मतदार यादीत होण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात यावा. मतदार यादीत महिलांना नाव नोंदणी करावयाची आहे, ही माहिती जर एका महिलेपर्यंत गेली तरी ती सर्व कुटुंबापर्यंत जाते. नाव नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. दिनांक 13 व 14 नोव्हेंबर आणि 26 व 27 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येत असून दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असल्याची माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.
राज्यातील नवमतदार, तृतीयपंथी तसेच दिव्यांगांचे नाव मतदार यादीत समाविष्ठ होण्यासाठी आवश्यक ती लागणारी सर्व मदत उमेदमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.वसेकर यांनी यावेळी दिली.
००००
आदिवासी भगिनींनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी यंदाही राजभवन उजळणार
दीपावलीनिमित्त राज्यपालांचे कर्मचाऱ्यांना आकाश कंदील व मिठाई वाटप
मुंबई, दि. 1 : दीपावलीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवनातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आदिवासी भगिनींनी तयार केलेले आकाश कंदील तसेच मिठाईचे वाटप केले.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भगिनींनी बांबूपासून हे पर्यावरण-स्नेही आकाश कंदील तयार केले असून ‘सेवा विवेक’ (विवेक ग्रामविकास केंद्र) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राजभवन येथे पाठविण्यात आले. गेल्या वर्षी देखील राजभवनाकडून येथील आकाश कंदील घेण्यात आले होते.
दिवाळीनिमित्त राजभवन परिसरात आज एका रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांनी स्पर्धकांच्या कलाकृती पाहिल्या व विजेत्या स्पर्धकांना कौतुकाची थाप दिली.
यावेळी राजभवनात कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय, श्रमिक तसेच पोलीस दलातील जवान उपस्थित होते.
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
*संपू दे अंधार सारा*
उजळू दे आकाश तारे
*गंधाळल्या पहाटेस येथे*
वाहू दे आनंद वारे....
*जाग यावी सृष्टीला की*
होऊ दे माणूस जागा
*भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*
घट्ट व्हावा प्रेम धागा...
*स्वच्छ सारे मार्ग व्हावे*
अन् मने ही साफ व्हावी
*मोकळ्या श्वासात येथे*
जीवसृष्टी जन्म घ्यावी...
*स्पंदनांचा अर्थ येथे*
एकमेकांना कळावा
*ही सकाळ रोज यावी*
आणि माणसाचा देव व्हावा.........
*आजपासून दिवाळी सुरू होतेय*...
*सगळ्यांना दीपोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!*
*🌹सुप्रभात🌹*
☀️ *सुप्रभात* ☀️
*बहुत फर्क होता है..*
*किसी को 'जानने' और 'समझने' में....*
*जानता वो है जो 'साथ' होता हैं....*
*समझता वो है जो 'पास' होता हैं...
🙏🏻🙏🙏*🌹एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात.
*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*
🌹🌻 *|| शुभ सकाळ ||*🌻🌹
Sunday, 31 October 2021
महानगरपालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना दीपावली -२०२१ साठी
सानुग्रह अनुदान जाहीर
बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी / कर्मचारी यांना दीपावली - २०२१ सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबईच्या महापौर श्रीमती किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक २९ ऑक्टोबर २०२१) मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे झालेल्या बैठकीत रुपये २० हजार इतके सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
दीपावली -२०२१ करीता महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या बैठकीत घोषित करण्यात आला.
क्रम | तपशिल | सानुग्रह अनुदान रक्कम |
१ | महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचारी, प्राथमिक शिक्षक | रु. २०,०००/- |
२ | माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळा यातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारी | रु. १०,०००/- |
३ | प्राथमिक शिक्षण सेवक | रु. ५,६००/- |
४ | आरोग्य सेविका | रु. ५,३००/- |
५ | विनाअनुदानित माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवक | रु. २,८००/- |
बैठकीला उप महापौर ऍड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, बेस्ट समितीचे अध्यक्ष श्री. आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक श्री. लोकेश चंद्रा, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी / कर्मचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
0000
(संदर्भ क्रमांक: जसंवि/ ४१५/ बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभाग)
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...