Saturday, 30 October 2021

Exam

 दहावीबारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना

22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार

§  विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेण्याचे शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

 मुंबईदि. 30 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावाअसे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. 

या सुविधेनुसार विद्यार्थी 22 नोव्हेंबरपासून नावनोंदणी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरू शकतील. तर 23 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्जऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करता येतील. इ. दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in तर इ. बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच हे अर्ज भरावयाचे आहेत. त्याचबरोबर दि. 11 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याचे नावनोंदणीसाठी (प्रथम मुदत व द्वितीय मुदतवाढ यामधील) प्राप्त अर्जातील दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित विद्यार्थ्यी आपल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधू शकतील.

विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता 1) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत)नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र 2) आधारकार्ड 3) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो आवश्यक असून ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य असणार आहे. संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाईल. विद्यार्थ्यांनी अर्जऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावीत.

खासगी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावीसाठी एक हजार रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल तर इयत्ता बारावीसाठी 500 रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल. एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाहीतसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यमशाखासंपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल.

दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या किंवा प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी.

विद्यार्थ्याना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र अथवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील सूचना वाचून अर्ज भरावेत तसेच अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२०- २५७०५२०७/ २५७०५२०८ अथवा २५७०५२७१ यावर संपर्क साधावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

00000

 


 

 

 

 

 

 

 

 


 



Mera bharat mahan

 


 👆 Be careful about inflammable methane gas in drainage lines ....


 पदभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणासंदर्भात

नियमाप्रमाणे कार्यवाही करावी

- सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 

 

            मुंबई, दि. 27 : प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरतीमध्ये पाच टक्के समांतर आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या आरक्षणासंदर्भातील नियमांचे सक्तीने पालन करण्यात यावे. यापूर्वी झालेल्या पदभरतीमध्ये या नियमांचे पालन झाल्यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अनुकंपाधारकप्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीतील आरक्षण आणि वन व्यवस्थापन समितीच्या कामकाजासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री श्री.भरणे यांनी आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा तसेच कामांना गती देण्यासंदर्भात निर्देश दिले.

            राज्यमंत्री श्री.भरणे म्हणालेप्रकल्पग्रस्तांना समांतर पाच टक्के आरक्षण असूनशासनाच्या आदेशानंतर झालेल्या भरतीसंदर्भातील अहवाल सादर करावा. तसेच तब्बल 11 हजार उमेदवार प्रतिक्षा यादीमध्ये असूनत्यांच्या भरतीसंदर्भात सर्व विभागांनी भविष्यात नियमांचे सक्तीने पालन करून कार्यवाही करावी.

वन व्यवस्थापन समितीच्या कामकाजाची आदर्श नियमावली बनवावी

            वन व्यवस्थापन समितींच्या कामकाजात सुधारणा होणे आवश्यक असल्याचे निर्देश राज्यमंत्री श्री.भरणे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील वनव्यवस्थापन समितींच्या कामांची एक आदर्श नियमावली बनवावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी केली.

            यावेळी आमदार प्रकाश आबिटकरवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीसामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णीसहसचिव श्री सुर्यवंशी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

0000

 विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाला आरंभ;

मतदार नोंदणी सुरू

 

       मुंबईदि. 29 : पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू झाले असून१ नोव्हेंबरपासून १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वय असलेल्या नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदवता येणार आहे.

            1 नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नावपत्तालिंगजन्मदिनांकवयओळखपत्र क्रमांकमतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाहीअशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे.

            १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ हा कालावधी मतदार नोंदणीचा आहेतसा तो एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेलतर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणेही महत्त्वाचे असते.

            यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची मोहीम राबवणार आहे. तसेचतृतीय पंथी नागरिकदेह व्यवसाय करणाऱ्या महिलादिव्यांग व्यक्ती यांच्या नाव नोंदणीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबवली जाणार आहे. मतदार नोंदणीसाठी नोव्हेंबरमधील १३-१४ आणि २७-२८ तारखांना राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेचग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिकलग्न होऊन गावात आलेल्या स्त्रियागावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावेमृत व्यक्तीगावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्तीलग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

            येत्या काळात अनेक महानगरपालिकानगरपालिकाजिल्हापरिषदापंचायत समित्या यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि नगरपालिका येथे प्रभागानुसार मतदार अर्ज स्वीकृती केंद्रे उभारली जाणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नव्याने मतदार म्हणून पात्र प्रत्येक युवकांने मतदार यादीत आपले नाव नोंदवावेतसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपला तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावीअसे आवाहन केले आहे.

            मतदारांमध्ये निवडणूकलोकशाही यांविषयीची जाणीव-जागृती निर्माण व्हावी म्हणून भारत निवडणूक आयोगाने मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणुकीतील सहभाग’ (Systematic Voters’ Education and Electoral Participation- SVEEP) हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्याक्रमांतर्गत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करण्यासाठी परिपत्रके काढलेली आहेत. आज शाळा-महाविद्यालयांमधून शिकणारे विद्यार्थी सुजाण नागरिक झाले तरच देशात लोकशाही साक्षरता निर्माण होईलहा विचार हे व्यासपीठ स्थापन करण्यामागे आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही मूल्यांची रुजवण आणि शिक्षकांची भूमिका’ हा कार्यक्रम आणि लोकशाही गप्पा (भाग-एक)’ हे कार्यक्रम घेण्यात आले होते. या लोकशाही गप्पांमध्ये डॉ. सुहास पळशीकरप्रवीण महाजनश्रीरंग गोडबोलेनागराज मंजुळेरवींद्र धनकश्रुती गणेश हे मान्यवर सहभागी झाले होते.

            स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये निवडणूकलोकशाही यांविषयीची जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी यंदा घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा (उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा)लोकशाही भोंडला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या लोकशाही दीपावली ही स्पर्धा सुरू आहे.

000

Featured post

Lakshvedhi