Friday, 8 October 2021

 बहुत जरूरी खबर


पुणे में उपलब्ध है


कृपया इस महत्वपूर्ण खबर को पढ़ने के बाद फॉरवर्ड करने का मन बना लें,


मेरे प्यारे दोस्तों


ब्लड कैंसर की दवा मिल गई है !!


इसे दोबारा फॉरवर्ड किए बिना डिलीट न करें

इसे भारत के हर घर में पहुंचने दें।


'इमोटिफ मर्किलेट' एक ऐसी दवा है जो रक्त कैंसर को शुद्ध करती है।


पुणे में योशोदा हेमेटोलॉजी कैंसर संस्थान में मुफ्त उपलब्ध है।


जागरूकता लाएं।


यह किसी की भी मदद कर सकता है।


जहाँ तक हो सके आगे बढ़ें।

नैतिकता की कोई कीमत नहीं है।


पता:

यशोदा हेमेटोलॉजी क्लिनिक। 109, मंगलमूर्ति कॉम्प्लेक्स, हीराबाग चौक,

तिलक रोड,

पुणे-४११००२।


फ़ोन:

020-24484214 या 09590908080 या 09545027772 या यात्रा के लिए www.practo.com पर जाएं।


मेरा विनम्र अनुरोध: कृपया फॉरवर्ड करें

 🙏🏻 *!! पत्नीचे नऊ अवतार !!* 🙏🏻


१) सकाळी गृहिणी म्हणून घर कामात व्यस्त असणारी-

     *अष्ट भुजा*

  

२) मुलांना शिकविणारी - 

     *सरस्वती*


३) घर खर्चात पैसे वाचविणारी- 

     *महालक्ष्मी*


४) घरात गृहिणी म्हणून स्वयंपाक करणारी 

     *अन्नपूर्णा*


५) घरातील समस्यांचे निवारण करणारी-

     *पार्वती*


६) लादी पुसताना नवरा मध्येच लुडबुडला तेव्हा - 

      *दुर्गा*


७) बाजारातून नवऱ्याने खराब वस्तू आणल्यास- 

     *कालीमाता*


८) नवऱ्याने माहेरबद्दल काही वाईट बोलल्यास- 

     *महिषासुरमर्दिनी*


९) नवऱ्याने चुकून दुसऱ्या बाईची स्तुती केली तर-

     *रणचंडी*

       

नशीबवान आहेत लग्न झालेले पुरुष ज्यांना घरी बसल्या बसल्या देवीच्या नऊ अवतारांचे दर्शन होते. *आज पासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा* 🌹🙏🏻🌹

 मेंढरांना त्यांच्या एका नेत्याने सांगितलें की यंदा थंडी पासून रक्षण करण्यासाठी, प्रत्येक मेंढीला एक लोकरीची शाल भेट दिली जाईल 'मोफत'! ! 




मेंढरं लैच खुश झाली, 

आसमंतात बँबँबँबँ शिवाय दुसरा आवाज

ऐकायला मिळेना! ! ! 




इतक्यात एका कोकराने आईला हळूच विचारले की हा नेता लोकरीच्या शाली साठी लोकर कुठून मिळवेल  .... ??




आणि कळपात अचानक भयाण शांतता पसरली..... !!!🙂😐😐







राजकीय नेते सभेत कर्जमाफी,

 फ्री गहू, तांदूळ, साखर, मोबाइल फोन, साईकल, लेपटॉप,  वीज अशा घोषणा करतात तेंव्हा लोक खुश का होतात ? 🤔🤔



ते विकत घ्यायला, सरकार पैसे कुठून  आणणार हा प्रश्न माणसांना का पडत नाही ?????🤔🤔🤔🤔🤔🤔






गेली सांगून ज्ञानेश्वरी....माणसांपरीस मेंढरं बरी ..🤣🤣😥😥😥😐😐🤔🤔🙏 🙏 🙏

 मानधन तत्वावर अनुवादकांची नामिका करण्याबाबत

भाषा संचालनालयाकडून अनुवादकांना आवाहन

 

            मुंबईदि. 8 : प्रशासकीय, कायदेविषयक, शैक्षणिकअभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा मराठीत किंवा मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांची नामिका तयार करावयाची आहे. त्यासाठी इंग्रजीतून मराठी व मराठीतून इंग्रजी अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून भाषा संचालनालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

            इच्छुक अनुवादकांनी  आपले अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह भाषा संचालनालयनवीन प्रशासकीय इमारत ५ वा मजलावांद्रे (पूर्व)मुंबई ४०००५१ या पत्त्यावर दि. १० नाव्हेंबर २०२१ पर्यंत पाठवावेत. असे भाषा संचालकयांनी कळविले आहे.

कोण अर्ज करु शकेल?

·       अनुवादकास प्रशासकीय, कायदेविषयकवैद्यकीय, महसूलशैक्षणिकअभियांत्रिकी पर्यावरणसंगणक तंत्रज्ञान  यापैकी एक किंवा त्याहून अधिक विषयांचा अनुवाद करण्याचा अनुभव असावा.

·       अनुवादकास मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

·       ज्या व्यक्तींनी उपरोक्त एक किंवा अनेक विषयांमध्ये स्वतः अनुवाद करून पुस्तके प्रकाशित केली आहेत अशा व्यक्ती देखील अर्ज करू शकतात.

·       अनुवादकास पुरेसे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. अनुवाकाकडे इंटरनेटसह संगणकाची सुविधा असावी,

·       मराठी/इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी/पदवी/अनुवाद पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात.

कामाचे स्वरुप तसेच अटी व शर्ती

·       नामिकेतील तज्ज्ञ अनुवादकांना अनुवादांची कामे शासनाच्या विविध विभागमंडळे. महामंडळे यांच्याकडून परस्पर पाठविण्यात येतील तसेच संबंधित विभाग व कार्यालय आणि तज्ज्ञ अनुवादक यांच्यामध्ये ठरविण्यात येईल अशा कालावधीत ही कामे नामिकेतील अनुवादकांना विहित मुदतीत पूर्ण करून द्यावी लागतील.

·       नामिकेतील अनुवादकांना शासन वेळोवेळी निश्चित करील त्या मानधन दरानुसार मानधन अनुज्ञेय राहील.

·       अनुवादकाने अनुवादित केलेल्या अनुवादाच्या अचुकतेची जाबाबदारी सर्वस्वी संबंधित अनुवादकाची राहील.

·       अनुवादकांनी त्याच्या कामाचा सहामाही अहवाल विहित नमुन्यात या कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक राहील.

·       नामिकेतील तज्ज्ञांना त्यांची अचूकता कार्यक्षमता व कार्यतत्परता विचारात घेऊन वगळण्याचा तसेच नामिकेत नवीन तज्ज्ञांचा समावेश करण्याचा अधिकार या कार्यालयाचा राहील.

 -खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            पुणे, दि. 8 : देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी  कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

            महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे पीवायसी जिमखाना येथे आयोजित पुरस्कारार्थी खेळाडूंच्या गौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरेअभिमन्यू पवारमहाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीव राजे निंबाळकरसचिव गोविंद शर्माअर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रीरंग इनामदारसारिका काळेखो-खो खेळाचे मार्गदर्शक डॉ चंद्रजित जाधवविश्वस्त अरूण देशमुखवैशाली लोंढे आदी उपस्थित होते.

            श्री.पवार म्हणालेप्रत्येकाने एकतरी खेळ खेळलाच पाहिजे. खेळ तरुणांना जिंकण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह आणि ऊर्जा देतो. शरिराची व मनाची जडण-घडण खेळांच्या माध्यमातून होत असते. आयुष्यात खेळांमुळे नेतृत्वंगुणांना वाव मिळतो. टीव्हीलॅपटॉप आणि मोबाईल समोर बसणाऱ्या आजच्या युवा पिढीने मैदानी खेळाकडे वळण्याची आवश्यकता आहे.

            गेल्या काही दिवसात ‍क्रिकेट सोबतच इतरही सांघिक आणि वैयक्तिक खेळात राज्यातल्या अनेक खेळाडूंनी आपली चमक दाखविली आहे. यामध्ये खो-खोच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाने सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे प्रयत्न

            राज्यातल्या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आघाडी सरकारने राज्याचे स्वतंत्र क्रीडा धोरण तयार केल्याचे सांगून श्री. पवार म्हणालेराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटविणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत वर्ग एकच्या पदावर नोकरीच्या संधी दिल्या आहेत. राज्यातल्या खेळाडूंसाठी शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय आघाडी सरकारने घेतला. कबड्डीखो-खोनेमबाजीकुस्ती या खेळात देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या खेळाडुंना राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे खेळांना प्रोत्साहन मिळत आहे.

शहरी भागात खो-खो लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करा

            खो-खो च्या राज्य संघटनेने यापुढे शहरी भागात खो-खो खेळ पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील होतकरुगुणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नियमीतपणे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात यावे. शहरी भागातील क्रीडा मंडळेक्लब कमी होत असताना त्यांना पुन्हा या प्रवाहात आणण्यासाठी राज्य संघटनेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आशियाई पातळीवर खो-खो  खेळाची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम राज्य संघटनेवर आहे.  त्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवावेत. खो-खोसह कबड्डीकुस्ती सारख्या खेळांना प्रोत्साहन आणि सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे श्री.पवार त्यांनी सांगितले.

सारिका इतर खेळाडूंसाठी मार्गदर्शकप्रेरणादायी

            खो-खो खेळातल्या कामगिरीसाठी देशातील मानाचा अर्जून पुरस्कार मिळवणारी खेळाडू  सारिका काळे आणि तिला प्रशिक्षण देणारे चंद्रजित जाधव यांचा राज्याला अभिमान आहे. सारिका काळे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतअनेक संकटांवरआव्हानांवर मात करुन इथपर्यंतची वाटचाल केली आणि मोठे यश मिळवले. त्यांची वाटचाल ही इतर खेळाडूंसाठी मार्गदर्शक तसेच  प्रेरणादायी असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

            आमदार अभिमन्यू पवार यांनी खो-खो खेळाला दर्जा मिळवून देण्यासोबतच शाळा तिथे खो-खो मैदानही संकल्पना राबवावीअशी अपेक्षा व्यक्त केली.

            भारतीय खेळ वाढावाखेळाला राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता मिळावीयासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून सातत्याने काम करणार असल्याचे श्री. निंबाळकर  त्यांनी सांगितले.

            भुवनेश्वर येथे गेल्या महिन्यात झालेल्या 40व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत सलग सातव्यांदा विजयी झालेल्या दोन्ही संघातल्या खेळाडूंचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारीखेळाडूपालक उपस्थित होते.

००००

 सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी 13 ऑक्टोबर रोजी परीक्षा

 

            मुंबई, दि. 3 : सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा 13 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

            सिधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा 13  ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयकुडाळ हायस्कुल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज या परीक्षा केंद्रावर होणार आहे. लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत 18002100309पोलीस भरती मदत केंद्र कक्ष 02362-228008/  सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्ष - 02362228614 आणि bhartimahapolice@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असेही एस. बी. गावडे प्रभारी पोलीस उप अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

०००


Featured post

Lakshvedhi