Monday, 4 October 2021

Shivling Pashupatinath


 

Dusare Maher

 *मैत्रिणी कडील माहेरपण...*

ही कुठली नवीन कन्सेप्ट बुवा असं वाटेल नक्की तुम्हाला!

पण ही कन्सेप्ट नाही, हा स्नेह भाव आहे खर तर.

असे किती स्नेह भाव सांगू??


शुभा कडे जेवायला गेलं की पाण्याचं भांड सुद्धा उचलू देत नाही.

थेट पानावर बसायचं! कधी गरम पोळी, कधी ठरवून केलेला आवडीचा मेनू..माझ्या स्वभावाप्रमाणे मी काम करण्यासाठी चुळबुळ करू लागले की प्रेमळ ओरडा "काहीही करू नकोस कविता, मस्त आयतं जेव " नंतरचं सुद्धा आवरू देत नाही.

तीच कथा वैशु ची ..तिच्या हातचे गरम गरम डोसे असो की सँडविच असो 

ही स्वतः हॉस्पिटलमधून दमून येऊन सगळं करणार आणि मी बसून खायचं ...तिचा ही हाच लटका ओरडा "तुझ्याकडे आम्ही येतो तेंव्हा तू उभीच असतेस ना ?  मग आता इथे हे आयतं गरम जेवण ही एन्जॉय कर.."

तीच गोष्ट अनघा ची आणि वंदना ची .. अनघाच्या टेरेस मध्ये तिनं खपून केलेल्या  छान गरम पावभाजीचा आयता आस्वाद, लेक टाटा ला ट्रेनिंगला जाणार म्हणून साग्रसंगीत उत्तम पदार्थ करून आयतं जेवायला घालणारी वंदना, समोर पूर्वी रहाणारी स्मिता ही तशीच ! रात्री मेसेज करायची ..उद्या मी पास्ता करणार आहे ग..इकडेच या जेवयला!

तू काही करत बसू नकोस !!

विशाखा कडे गेल्यावरही ती कितीही दमून आली असली तरी तिच्या हातचा मसाला घातलेला सुंदर आयता चहा !!कित्ती उदाहरणं देऊ ! 

अजून एक खास उदाहरण म्हणजे खुप कमी वेळात छान मैत्री झालेली शुचिता !तिच्या कडे गेल्यावर तिने करून घातलेली गरम गरम घावन ,चविष्ट ताज लोणचं ,गरम गरम कॉफी !!

तास दोन तासांच का होईना  हे माहेरपण च की. काहीही न करता मिळालेला , प्रेमाने खाऊ घातलेला गरम गरम आयता घास .

मागचं पुढचं आवरणं नाही, वाढणं नाही की काही नाही ..आता हे सगळं हॉटेल मध्ये गेलं तरी होतच की पण तिथे चार्ज असतो ह्या सगळ्याचा. आणि इथे ह्या *अशा मैत्रिणींच्या माहेरपणात इन्व्हेस्टमेंट असते , दुपटीने रिटर्न्स देणारी. जिव्हाळा , माया, आपलेपणा , प्रेम हे सगळं सगळं इन्व्हेस्ट केलं की हे असं हक्काचं माहेरपण मिळतं आणि केलं ही जातं.* 50 शी ला तर ह्या मैत्रिणींच्या माहेरपणाची च गरज जास्त भासते .

*ठरवून माहेरी जाऊन राहणं तर सुखदायी असतच पण हे  2 तासाच माहेरपण , हा शॉर्ट ब्रेक ही खूप मोठी एनर्जी देऊन जातो.*

*पण ह्या शॉर्ट ब्रेक साठी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट लागते बरं,* शुभा काय किंवा वैशु काय किंवा माझ्या इतर मैत्रिणी काय मी आयतं जेवल्याचं समाधान माझ्यापेक्षा त्यांना जेव्हा जास्त समाधान देऊन जात तेंव्हा समजायचं ह्या गुंतवणुकीला मोल नाही.

Suvichar

 *"जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे"*

ज्याच्या कडे *"अन्ना"* सोबत *"भूक"* आहे,

*"अंथरूणा"* सोबत *"झोप"* आहे,

 *"संपत्ती"* सोबत *"धर्म"* आहे आणि *"ओंजळीतले"* दुसऱ्याला देण्याची *"दानत"* आहे...!

          *"तोच खरा माणूस"*

Sunday, 3 October 2021

 . दिनांक १ ऑक्टोबर २०२१ रोजी शासनाचा जिल्हा परिषदेकडून दिला जाणारा *आदर्श शिक्षक पुरस्कार*  कडापे शाळेचे विषय शिक्षक श्री सखाराम भागोजी कदम यांना पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदितीताई तटकरे ताई, जिल्हा परिषद अध्यक्षा पारधी मॅडम, उपाध्यक्ष सुधाकर घारे साहेब, तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेळके हॉल, कर्जत येथे कोविडचे सर्व नियम पाळून थाटामाटात संपन्न झाला... 💐💐💐💐💐💐💐

Adarsha shikshak puraskar


 

Gandhi bhajan satya


 

 राज्य ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्णतेच्या दिशेने

                                                   :जलसंपदा मंत्री जयंत पाटील

कळवण उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण

 

नाशिक दि. 3 : कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक अडचणी उद्भवल्या होत्यामात्रआता शासनाच्या प्रयत्नाने संपूर्ण राज्य ऑक्सिजनच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होत आहेजिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयांमध्ये स्वयंनिर्मित ऑक्सिजन तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णालयात पोहचविण्यासाठी असलेल्या मध्यवर्ती यंत्रणेमुळे आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाला मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

          कळवण उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन  निर्मिती प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते काल बोलत होतेयावेळी आमदार नितीन पवारजिल्हा परिषद सदस्य यतींद्र पगार,  माजी  जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवारजिल्हा शल्यचिकित्सक डॉअशोक थोरातवैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवारनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरे यांच्यासह कळवण उपजिल्हा रुग्णालयातील विशेषज्ञअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

          यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार यांनीही मार्गदर्शन केले.

Featured post

Lakshvedhi