Saturday, 2 October 2021

Seniors citizon policy

 ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच 'शरद शतम्योजना

 - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

·       'जागतिक ज्येष्ठ नागरिक'दिनानिमित्त 'समृद्ध वृद्धापकाळचर्चासत्र

 

          मुंबईदि.1 :  ज्येष्ठ  नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाय योजनांच्या  दृष्टीने 'शरद शतम्नावाची योजना प्रस्तावित केली असून राज्यात  ही योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू सुरु करण्यापूर्वी तीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर एक उच्च स्तरीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होतोच ही योजना मंत्रीमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 65 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करता येणार आहेत.लवकरच या योजनेची मान्यता आगामी मंत्रीमंडळ बैठकीत घेणार असल्याची  घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

         यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 'जागतिक ज्येष्ठ नागरिकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे  बोलत होते.आमदार बाळासाहेब अजबे,सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार,समाज कल्याण आयुक्त पुणे डॉ.प्रशांत नारनवरेहेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावंकरमुंबईच्या माजी महापौर सौ.निर्मला सामंत प्रभावळकरसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळेफेस्कॉमचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे  यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

            सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले,आजाराचे वेळीच निदान व्हावे व त्यासाठी सर्व  आरोग्य तपासण्या वर्षातून किमान एकदा तरी केल्या जाव्यात व त्या मोफत असाव्यात या उद्देशाने  'शरद शतम्ही योजना  खूप महत्वाची आहे. या योजनेची कार्यपद्धती,सर्वेक्षण या सर्व बाबींबरोबरच आजाराचे निदान झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन कमीत कमी खर्चात उपचार केले जावेत यासाठीचे समन्वयन या सर्व बाबी ठरवून अंतिम ऍक्शन प्लान तयार करण्यासाठी आरोग्यसह विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती नुकतीच गठीत केली आहे.या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या योजनेचा प्रस्ताव मंत्री मंडळासमोर मंजुरीसाठी ठेवणार आहोत. ही सगळी कार्यवाही येत्या काही दिवसातच पूर्ण होणार आहे असेही श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

           श्री.मुंडे म्हणालेआपण आपल्या आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांचा देखील आदर केला पाहिजे. त्यांना वेळ देवून आजवर त्यांनी ज्याप्रकारे आपल्याला मायेची ऊब आपल्या लहानपणी दिली तीच ऊब या वृद्धापकाळात आपण त्यांना देण्याची आवश्यकता आहे  आणि आजच्या दिवशी अशी शपथ सर्वांनी घेणे गरजेचे आहे. बालपणतारुण्यप्रौढत्व आणि म्हातारपण अशा चार अवस्था मनुष्य जीवनात येतात. प्रत्येक अवस्था आपापल्या जागी महत्वाची असते.प्रत्येकाला आपला वृद्धापकाळ आनंदात जावा ही एकमात्र अपेक्षा असते.

राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटी

          सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे म्हणाले,राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे एक कोटी आहे म्हणजेच लोकसंख्येच्या सव्वा आठ टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. वृद्धापकाळात विविध आजारकौटुंबिक अवहेलनाआर्थिक अडचणीमानसिक आजारएकटेपणा यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. बऱ्याच ठिकाणी वयोवृद्ध व्यक्तींना सांभाळायला,आधार द्यायला कोणी नसल्यांने अत्यंत कठीण  परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक पाहायला मिळतात व हे पाहून आपण व्यथित होतो. मात्र काही आदर्श कुटूंब देखील आहेत जी ज्येष्ठांची चांगली काळजी घेतात.

राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण

                सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे म्हणालेभारताच्या संविधानाने जेष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावायासाठी जेष्ठ नागरिक धोरण, 14 जून 2004 रोजी जाहीर केले. या धोरणास महाराष्ट्र शासनाने 30 सप्टेंबर 2013 रोजी सर्वसमावेशक जेष्ठ नागरिक धोरण म्हणून जाहीर केले.जेष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी व जेष्ठ नागरिकांचे अधिकार यांची समाजाला आणि त्यांच्या पाल्यांना जाणीव व्हावी म्हणून केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई-वडील,ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 पारित केलेला आहे. हा अधिनियम महाराष्ट्र राज्यात दि .१ मार्च२००९ पासून लागू करण्यात आला असून अधिसूचना दि.३१ मार्च २००९ रोजी जारी करण्यात आली आहे.

वृध्दाश्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार

        सामाजिक न्याय मंत्री  श्री. मुंडे म्हणालेअनाथनिराधारनिराश्रीत जेष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसहय व्हावे तसेच त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावाराज्यात वृध्दाश्रम ही योजना सुरु केलेली आहे.आजमितीस राज्यात ३२ वृध्दाश्रम अनुदान तत्वावर सुरु आहेत. हया वृध्दाश्रमात प्रवेशित निराधारनिराश्रीत व गरजू जेष्ठ नागरिकांना निवासअंथरुण - पांघरुणभोजन व वैद्यकीय सेवा - सुविधा मोफत आहेत. तसेच वृध्दाश्रमामध्ये बाग - बगिचावाचनालयदूरचित्रवाणी वरील कार्यक्रम आदी सुविधा देखील पुरविण्यात येतात.याव्यतिरिक्त मातोश्री वृद्धाश्रम योजनेंतर्गत सेवाभावी संस्थांमार्फत 5 एकर जागेमध्ये 100 व्यक्तींसाठी एक असे 23 वृद्धाश्रम राज्यात सुरू आहेत. याव्यतिरिक्त श्रावणबाळइंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना तसेच एस टी बस प्रवासदरात सवलत अशा आणखी काही योजना देखील राबविल्या जातात असेही श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

टाळेबंदी कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वपूर्ण निर्णय

          सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणालेमागील दोन वर्षात कोविडच्या लॉकडाऊन काळात श्रावण बाळइंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन या दोन्ही योजनेतील लाभार्थींना राज्य सरकारने तीन तीन महिन्यांचे मानधन एकत्रित ऍडव्हान्स दिले. असे करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. लॉकडाऊन काळात प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरिकदिव्यांग यांसाठी 24 तास कार्यरत मदत कक्ष स्थापन करून हजारो ज्येष्ठ नागरिकएकटे राहणारे निराधार आदींना विविध प्रकारची मदत व दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ मदत मिळावी म्हणूनही हेल्पलाईन आहे असेही श्री. मुंडे सांगितले.

           यावेळी हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावंकरफेस्कॉमचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी प्रास्ताविक केले.

        'समृद्ध वृद्धापकाळया विषयावर  आयोजित चर्चासत्रात हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावंकरमुंबईच्या माजी महापौर सौ.निर्मला सामंत प्रभावळकरसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळेफेस्कॉमचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदेज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना,ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम,ज्येष्ठ नागरिकांनी  संवाद कसा करावा,दोन पिढीतील संवाद या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कदम यांनी केले.

 रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून नोबेल’ मिळविणारे वैज्ञानिक घडावे

                                        - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

संस्थेचा 88 वा वर्धापन दिन कार्यक्रम

 

          मुंबई, दि. 1 : देशाच्या वैज्ञानिक विकासात रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे योगदान फार मोठे राहिले आहे. इनोव्हेशन व इनक्युबेशनवर भर देत असताना संस्थेच्या माध्यमातून नवनवे  संशोधन व्हावेदरवर्षी देशाला नवे पेटंट मिळावे व नोबेल पारितोषिक मिळवून देणारे वैज्ञानिक घडावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

          राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचा ८८ वा वर्धापन दिन साजरा झालात्यावेळी उपस्थितांना तसेच दूरस्थ माध्यमातून उपस्थित अध्यापक व विद्यार्थ्यांना संबोधन करताना ते बोलत होते.

          युवा संशोधक व वैज्ञानिकांनी केवळ चांगली नोकरी मिळावी इतकीच आकांक्षा न ठेवता नवसृजन व नवनिर्मितीचे ध्येय्य बाळगावे व त्या दृष्टीने कठोर परिश्रम करावे असे राज्यपालांनी सांगितले. जागतिक कोरोना संकटाच्या काळात प्रतिबंधक लस शोधून तसेच जगालाही लस उपलब्ध करून देऊन भारताचा गौरव वाढविल्याबद्दल राज्यपालांनी देशातील वैज्ञानिक समुदायाचे अभिनंदन केले.

          राज्यपालांच्या हस्ते यावेळी संस्थेच्या प्रोसेस इनोव्हेशन सेंटर व स्नातक विद्यार्थी प्रयोगशाळेचे तसेच फॅकल्टी डेव्हलपमेंट केंद्राचे उद्घाटन झाले.

          कार्यक्रमाला संस्थेचे कुलपती डॉ रघुनाथ माशेलकरमाजी कुलगुरु प्रा. जे. बी. जोशी आणि माजी कुलगुरु डॉ जे. डी. यादव ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होतेतर विद्यमान कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडितकुलसचिव प्रा. राजेंद्र देशमुखविविध विभागांचे अधिष्ठाताविभाग प्रमुख व प्राध्यापक राज्यपालांसमवेत संस्थेच्या सभागृहात उपस्थित होते.

          यावेळी थिरूवनंतपुराम येथे कार्य करीत असलेले डॉ. सुरज सोमण यांना अल्कील अमिन्स आयसीटी स्थापना दिवस युवा वैज्ञानिक पुरस्कार’ दूरस्थ माध्यमातून प्रदान करण्यात आला.

०००००

 

 

 

 

 

Governor attends 88th Foundation Day celebration of Institute of Chemical Technology

 

     Mumbai Dated 1 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the 88th Foundation Day of the Institute of Chemical Technology in Mumbai. The Governor inaugurated the newly created Process Innovation Center and Undergraduate Laboratory and the Faculty Development Centre of the Department of Pharmaceutical Sciences and Technology. 

     Chancellor of ICT Prof. R. A. Mashelkar, Former Vice Chancellors Prof. J. B. Joshi and Prof. G. D. Yadav attended the programme online.

      Vice Chancellor of Institute of Chemical Technology Prof. Aniruddha Pandit, Registrar Prof. R. R. Deshmukh, Deans and Heads of various departments, members of faculty and others were present.

      Dr. Suraj Soman was presented the ‘Alkyl Amines ICT Foundation Day Young Scientist award’ through online mode.

 युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन च्या वतीने

कोरोना योद्ध्यांचा सत्कार

 

·        राज्यपाल कोश्यारीकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत लोकसेवा गौरव पुरस्कार प्रदान

·        आ. गणपत गायकवाडउपमहापौर भगवान भालेरावजगदीश गायकवाडसीमाताई आठवलेझरीन खान सन्मानित

 

            मुंबई, दि. 30 : भारताने जगाला भगवान बुद्धांचा दयाशांती व करुणेचा संदेश दिला. बुद्ध धर्माचा पुढे चीनजपानश्रीलंका आदी अनेक देशात प्रचार-प्रसार झाला. भारत ही भगवान बुद्धांची भूमी असून भारताने सर्व धर्मियांचे येथे स्वागत केले. भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कठीण परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन आपले जीवन लोक कल्याणासाठी व्यतीत केले. भगवान बुद्ध व डॉ आंबेडकरांचे आदर्श पुढे ठेवून समाजाने एकदिलाने कार्य केले तर कोरोनासारखे कोणतेही संकट आले तरीही ते पराभूत होईलअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनेच्या वतीने राजभवन येथे लोकसेवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप उपस्थित होते.     

            कोरोना महामारी कधी संपूर्णपणे जाईल हे सांगणे कठीण आहे असे सांगून कोरोनाला हरवून लोकांना जगवायचे ध्येय्य ठेवून कार्य केले पाहिजे असे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले. यावेळी त्यांनी काव्याच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन केले.

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी आमदार गणपत गायकवाडउल्हासनगरचे उपमहापौर भगवान भालेरावपनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाडरामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई रामदास आठवलेइंग्लंड येथील हरबन्स विर्डीअभिनेत्री डॉ झरीन खानयांचेसह 35 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. प्रदीप जगताप संपादित दैनिक लोकधारा टाइम्सच्या करोना विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

0000

 

 

 

 

 

Governor Koshyari presents Lokseva Gaurav Puraskars to Corona Warriors

Union MoS Ramdas Athawale applauds Corona Warriors through poetry

 

            Mumbai, 30 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Lok Seva Gaurav Puraskar to 35 Corona Warriors from different walks of life at Raj Bhavan, Mumbai on Thursday (30th Sept). Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale and President of the United Buddhist and Ambedkarite Foundation Pradip Jagtap were present.

            The Governor presented the Lok Seva Gaurav Puraskar to MLA Ganpat Gaikwad, Deputy Mayor of Ulhasnagar Bhagwan Gaikwad, Panvel Deputy Mayor Jagdish Gaikwad, leader of Ambedkarite movement in England Harbans Virdee, actress Zarine Khan and wife of Ramdas Athawale Seema Athawale and other social workers. The Governor released the Special Issue of ‘Lokdhara Times’ edited by Pradip Jagtap on the occasion. Union Minister Ramdas Athawale applauded the Corona Warriors through a poetry.

            Vandana Rajesh Mehta, Varun Sadashiv Patil, Ramesh Sudam Jadhav, Sadashiv Hender Patil, Ankush Krishna Gaikwad, Sanjay Baburao More, Divvesh L. Ganatra, B. R. Jagtap, Vandana Sonawane, Dr. Shubhangi Ratnaparkhi, Shilatai Anil Gangurde, Dr. Ram Wadhwa, Jitendra Sonar, Tukaram Namdev Jadhav, Prashant Kumar Tularam Mankar, Abhijeet Karanjule, Vishwanath Sonar, Ajit Ramchandra Sawant, Shruti Manish Patil, Dr. Karbhari Kharat, Hemant Ranapise, Babulal Bachher, Rajendra Jadhav, Amit Ojha, Kavita Santosh Shiktode, former Mayor Ramesh Jadhav, Rajesh Puraswani, Bhushan Pradip Jagtap were felicitated by the Governor on this occasion.

0000


 

 

एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी

स्वीकारला वायुदल प्रमुखाचा पदभार

 

               नवी दिल्ली30 :  महाराष्ट्राचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक चौधरी  यांनी भारतीय वायुदलाचे प्रमुख  म्हणून पदभार स्वीकारला आहे.

               एअर चीफ मार्शल आर.के.एस.भदौरिया वायुदल प्रमुख पदावरुन सेवानिवृत्त झाले असून एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी  त्यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारली.

           एअर चीफ मार्शल विवेक चौधरी हे मूळचे नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत. त्यांनी  नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले व पुढे  पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केले. 29 डिसेंबर 1982 रोजी  ते वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये रूजू झाले.

               त्यांनी यापूर्वी वायुदलाचे उपप्रमुख तसेच वायुदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य केले आहे. वायुदलात त्यांनी कमांडस्टाफ आणि निर्देशात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मिग’ आणि सुखोई’ ही लढाऊ विमाने उडविण्याचा ३८०० तासांचा त्यांना अनुभव आहे. वायुदलाने राबविलेल्या सियाचीन येथील ऑपरेशन मेघदूत’ आणि कारगिल युध्दातील ऑपरेशन सफेद सागर’ या मोहिमांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. वायुदालातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 2004 मध्ये वायुदल पदकविशिष्ट पदक२०१५ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २०२१ मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

0000


 





 


 

Maruti with wife


 

 🚩🚩मारुती हे आपल्या पत्नी सोबत ।।।।अगदी दुर्मिळ फोटो आहे। त्यांचे मंदिर खम्माम या ठिकाणी आहे।।🚩🚩

🌞☀। जय श्रीहनुमान । ☀🌞

आपणास माहीत आहे का ?

मारुती विवाहीत होता !! 


आपल्याला मारुती नाव काढल्यावर एकटा दिसणार, दुसऱ्या देवांसारखा पत्नीबरोबर दिसणार नाही. आपणास तसे पाहायचे असेल, तर आंध्र प्रदेशातील खम्माम जिल्ह्यात जावे लागेल. तेथे मारुतीचे एक प्राचीन मंदिर आहे. हे एकमेव मंदिर आहे. जिथे मारुती आपल्या पत्नी समवेत आहे.


मारुतीने विवाह का केला ? 


अशी आख्यायिका आहे की, जेव्हा मारुती त्याचे गुरू सूर्य, ह्यांच्याकडून विद्या शिकत होते, तेव्हा त्याला ९ विद्यांपैकी ५ विद्या शिकवल्या, पण शिल्लक ४ विद्या शिकण्यासाठी विवाहीत असणे गरजेचे होते. (तशी अटच असते.) आजीवन ब्रह्मचारी राहाण्याचे व्रत घेतलेला मारुती खूपच बेचैन झाला. शिष्याला द्विधा मनस्थितीत पाहून सूर्यदेवांनी सांगितले की, तु माझ्या मुलीशी विवाह कर. सूर्यदेवांची मुलगी सुवर्चला तपस्विनी होती. मारुतीबरोबर विवाह करून सुर्वचला परत तपस्या करायला गेली. अशा प्रकारे मारुतीने विवाहाची अट पूर्ण केली होती आणि ब्रह्मचारी राहाण्याचे व्रतही पाळले होते. मारुतीच्या या विवाहाचा उल्लेख पराशर संहीतेमध्ये आहे.

खम्माम या ठिकाणी विवाहीत जोडप्याने येऊन त्या सपत्निक मारुतीचे दर्शन घेतले, तर त्या दांपत्यामध्ये प्रेम, सुख-शांती नांदते, अशी धारणा आहे...


🌹 जय श्री राम 🌹

Featured post

Lakshvedhi