Wednesday, 1 September 2021

 *घाली लोटांगण वंदीन चरण*

   

*|| वैशिष्ट्ये व अर्थ ||*


*बाप्पाची आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते.*


*अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हणले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.*


*आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ.* 


*ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हे एक मंत्र आहे.*


*वैशिष्ट्ये*


(१) *प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत.*


(२) *ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.*


(३) *पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.*


(४) *बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते.*


(५) *सर्व  कडवी कृष्णाला  उद्देशूनआहेत. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.*


(६) *वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.*


*आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया*


१) घाली लोटांगण वंदीन चरणl                               डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |

प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |

भावे ओवाळीन म्हणे नामा |


*वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे*


अर्थ..

*कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन  अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.*


२) त्वमेव माता च पिता त्वमेव |

     त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |

    त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |

    त्वमेव सर्व मम देव देव |


*हे कडवे आद्यगुरू शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.*


 अर्थ..

*तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.*


(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |

  बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात |                      करोमि यद्येत सकल परस्मै |

नारायणापि समर्पयामि ||


*हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.*


अर्थ...

*श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.*


(४) अच्युतम केशवम रामनारायणं | 

कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |

श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |

 जानकी नायक रामचंद्र भजे ||


*वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.*


अर्थ...

*मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.*


हरे राम हरे राम |

राम राम हरे हरे |

हरे कृष्ण हरे कृष्ण |

कृष्ण कृष्ण हरे हरे |


*हा सोळा अक्षरी मंत्र "कलीसंतरणं" या उपनिषदातील आहे.*

( ख्रिस्तपूर्व काळातील असावा) 


*कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे.*

          

*अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो.*


      🙏 *राम कृष्ण हरी* 🙏

Tuesday, 31 August 2021

 आता रुग्णालय प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

 

          मुंबईदि. 31 : कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे.

          काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांना प्राण गमवावे लागले. या आगी लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात असल्याने रुग्णालयातील वीज पुरवठ्याच्या संदर्भात अधिक काळजी व उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारने शासकीय व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना दिलेले आहेत.

          कोविड काळात रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणेजनित्र संच तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून अंतर्गत वीज पुरवठा उपलब्ध करणेऑपरेशन थिएटरआयसीयू येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणेविद्युत उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने करण्याच्या संदर्भात रुग्णालयांना शासनाने दिशानिर्देश दिलेले आहेत.

          रुग्णालयात अंतर्गत वीज संचमांडणीच्या सुरक्षेसोबतच वीज पुरवठ्याची अखंडता तेवढीच महत्त्वाची आहे. अखंडीत वीज पुरवठा राखण्याची रुग्णालय प्रशासन तसेच पुरवठादार कंपनीची सामुहिक जबाबदारी राहणार आहे.

          उच्चदाब व मध्यमदाब फिडर्सची नियतकालिक पेट्रोलिंग व पाहणी करणेरुग्णालयातील वीज भार मंजूर भारापेक्षा अधिक राहणार नाहीयाची तपासणी करणे, केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम2010 नुसार वीजसंच मांडणी राखणे अनिवार्य आहे. 15 मीटरपेक्षा उंच इमारतीतील रुग्णालयांनी विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत वीज संचमांडणीचे निरीक्षण विद्युत निरीक्षक मार्फत ''ना-हरकत प्रमाणपत्र" मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्याच्या एक वर्षाच्या आत प्राप्त करून घेणे बंधनकारक केले आहे. या इमारतींचे फायर ऑडीट नियमितपणे सक्षम संस्थेमार्फत करून अग्नी सुरक्षाप्रणाली प्रमाणित करावी लागणार आहे.

          आयओटी तत्वावर चालणारे मायक्रोकंट्रोलर संयंत्र अंतर्गत वीज संरचना मांडणीमध्ये निर्माण होणाऱ्या दोष किंवा असामान्य बाबींचे विश्लेषण करून दोष निदान करणे शक्य होते. वीज संच मांडणीच्या संरचनेमध्ये उपलब्ध होणारी माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण करू शकणारे एन.ए.बी.एल. टेस्टिंग लॅबद्वारे प्रमाणित असे आयओटी तत्वावर चालणारे मायक्रोकंट्रोलर सयंत्र सर्व शासकीय व खासगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमध्ये बसविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

          तसेच शासकीयखासगी रुग्णालये आणि सार्वजनिक इमारतींच्या परिसरात कार्यरत असलेल्या उद्वाहनामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठीच्या मार्गदर्शक उपाययोजनाही या परिपत्रकानुसार जारी करण्यात आल्या आहेत.

          चौकट

रुग्णांच्या जीवन सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - डॉ. नितीन राऊत

          कोरोना काळात शासकीय व खासगी रुग्णालयांवर बराच ताण होता. त्याचप्रमाणे वीज उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने न राखल्याने या अनुचित घटना घडल्या आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयातील वीज पुरवठा योग्य राहावारुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जीवन सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य राहावेया उद्देशाने राज्य सरकारने हे निर्देश जारी केले असल्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

000


 योगविद्येच्या प्रचारासाठी प्राण ते प्रज्ञा हे पुस्तक मार्गदर्शक

                                                                                          खा.शरद पवार

डॉ. प्रज्ञा पाटील लिखीत प्राण ते प्रज्ञा या पुस्तकाचे  प्रकाशन

         

          मुंबईदि. 31: योगविद्या हे भारताने जगाला दिलेले तत्वज्ञान आहे. जगमान्य अशी योगसाधना सातत्याने केल्यास मानवी आयुष्याच्या अखेरपर्यंत श्वसनक्रिया सुरळीत व उत्तमपणे राहण्यास मदत होईल. योगांचे विविध प्रकार व तंत्र आत्मसात करण्यासाठी प्राण ते प्रज्ञा हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शन ठरेलअसा विश्वास ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

          यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज डॉ. प्रज्ञा पाटील लिखीत प्राण ते प्रज्ञा या पुस्तकाचे प्रकाशन  खासदार शरद पवार यांच्यासह सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळक्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरेआमदार हिरामण खोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

           श्री. पवार पुढे  म्हणालेयोगविद्येच्या प्रसारासाठी उपयुक्त अशा या पुस्तकाचे इंग्रजी व हिंदीमध्ये भाषांतर केल्यास जास्तीत-जास्त वाचकांना याचा दैनंदिन आयुष्यात उपयोग करता येईलअसा सल्ला या पुस्तकास शुभेच्छा देतांना श्री. पवार यांनी दिला.     

          यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणाले कीसर्वसामान्याला परवडेल असा योग हा व्यायामप्रकार असून याच्या नियमित साधनेने अनेक शारिरीक व्याधी दूर होण्यास मदत होते. प्राणायाम व योगासनामुळे श्वसन संस्थेतील सर्व इंद्रियांचा वापर पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होते. त्यामुळे सर्वानी आपल्या दैनंदिन आयुष्यात योगासने करावी. सुदृढ राष्ट्र निर्मितीसाठी या पुस्तकाचा नक्कीच हातभार लागेलअशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.  

          गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सतत 103 तास योग करण्याचा विक्रम केलेल्या डॉ. प्रज्ञा पाटील लिखित प्राण ते प्रज्ञा या पुस्तकात प्राणायाम करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, प्राणायाम साधना कशी करावी, प्रकृती नुसार प्राणायाम, विद्यार्थ्यांचे शारिरीकमानसिक व बौद्धिक विकास साधण्यासाठीची माहिती या पुस्तकातून देण्यात  आली आहे. 

 अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा

                                                     -कृषीमंत्री दादाजी भुसे

          मुंबईदि. 31: अल्प भूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतीलअसे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावाअसे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

           श्री. भुसे यांनी आज आयआयटीमुंबई येथे भेट दिली. त्यांनी आयआयटीच्या रुरल टेक्नॉलॉजी अँक्शन ग्रुपसितारा ग्रुपच्या प्राध्यापकसंशोधक यांच्याशी संवाद साधला. या ग्रुपच्या सहाय्याने शेती तंत्रज्ञानावर केल्या जात असलेल्या संशोधनाची माहिती घेतलीप्रकल्पांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. आयआयटीमुंबई  येथील जलविहार सभागृह येथे ही बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवलेकृषी आयुक्त धीरज कुमारनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) संचालक इंद्रा मालो,  आयआयटीचे संचालक डॉ. सुभाषिश चौधरीप्रा. आनंद राव आदी उपस्थित होते.

          श्री. भुसे यांनी सांगितले कीराज्यातील  शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता यावी यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.  अल्प भूधारक शेतकऱ्यांसमोरील समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांना उपयुक्त ठरतील आणि निविष्ठा खर्चात कपात होईलअसे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीने भर द्यावा. राज्यातील विविध भागांत अनेक प्रयोगशील शेतकरी आपल्या अनुभवातून विविध तंत्रज्ञानयंत्रसामग्री विकसित करतात. त्यांच्या संशोधनाला तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीने विकसित करण्यासाठी आयआयटी आणि कृषी महाविद्यालयांनी एकत्रित यावेअसे आवाहनही श्री. भुसे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजित मानेमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक गणेश पाटीलकृषी संचालक (गुणवत्ता) दिलीप झेंडे,  संचालक ( विस्तार आणि शिक्षण) विकास पाटीलपोकराच्या मेघना केळकरविजय कोळेकरडॉ. मिलिंद राणेडॉ. सतिश अग्निहोत्रीडॉ. बकुळ राव आदी उपस्थित होते.                                                                  

 

 

कृषी विभाग-आयआयटी करणार समस्यांवर एकत्रित संशोधन

          आयआयटी मध्ये संशोधन करणारे विद्यार्थी राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी पूर्ण वेळ देणार आहेत. यासाठी राज्य शासनकृषी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, असे आयआयटीच्या आनंद राव यांनी सांगितले. या कल्पनेवर आयआयटी आणि कृषी विभाग यांनी एकत्र येऊन आराखडा तयार करावाअशी सूचना श्री. भुसे यांनी केली. कृषी विभाग-आयआयटी यांच्या सहकार्यातून शेतीच्या समस्यांवरील उपाय शोधण्यासाठी प्रथमच प्रयत्न होत आहेत. यातून समस्यांवर निश्चितच तोडगा निघेलअसा विश्वासही श्री. भुसे यांनी व्यक्त केला.

आयआयटीला भेट देणारे पहिलेच कृषी मंत्री

          मुंबई येथे राज्याच्या कृषी मंत्री यांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहेअसे प्रा. आनंद राव यांनी सांगितले. आयआयटी मधील संशोधनाचा शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी उपयोग होऊ शकतोअसा विचार कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आमच्या कडे व्यक्त केला. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. कृषी विभागासोबत काम करण्यासाठी निश्चितच आनंद होईलअसेही त्यांनी सांगितले.

0000

 राज्य सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही

तर कोरोनाच्या विरोधात

                                 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील ऑक्सीजन प्रकल्पाचे लोकार्पण

 

       ठाणेदि 31 (जिमाका): राज्य सरकार हे कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहेकोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाहीत्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले कीकेंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे. 

          कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

          कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेखासदार संजय राऊतआमदार सर्वश्री प्रताप सरनाईकरवींद्र फाटकमहापौर नरेश म्हस्के यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधीमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार श्री. सरनाईक यांच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी  मीरा भाईंदर येथे पहिल्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणालेदहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. मात्र कोरोना निर्बंधासाठीचे  नियम मोडून आंदोलने केली जात आहेत. आंदोलन करायचेच असेल तर कोरोना विरुद्ध कराअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

          कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे.  त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे  हे पत्र आपल्याला दाखवायचे आहेअसे सांगून मुख्यमंत्री म्हणालेसध्या आमदार सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत तसे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे येथून पुढेही निधी मिळेल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्राणवायूचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री. सरनाईक यांचे अभिनंदन केले.

 

तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना निर्बंधाचे पालन करा

                                                 - पालकमंत्री एकनाथ शिंदे

 

          नगरविकास मंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सर्वांधिक गरज भासली. उत्पादनापेक्षा मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र जिल्हा नियोजन विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसरातील महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट उभारले आहेत. त्यामाध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत होईल. सध्या  कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत असल्याचे सांगत संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोना लढाईतील ठाणेकरांच काम मार्गदर्शक

                                              - खासदार संजय राऊत

 

          खासदार श्री. राऊत यावेळी म्हणालेजे कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळत नाहीत ते त्याच्या संसर्गाला आमंत्रण देतात. रुग्ण वाढले की ऑक्सिजनची मागणी वाढते त्यावेळी अशा प्रकारच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची गरज भासते. कोरोना लढाईत ज्याप्रकारे काम ठाणेकरांनी काम केलं आहे ते मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार श्री. सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका परिषा सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

 

ऑक्सिजन प्रकल्पाविषयी

          आमदार सरनाईक यांनी आपल्या ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणेकर नागरिकांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे.

          प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टने - ठाणे शहरातरेमंड कंपनी समोरविहंग पाम क्लब येथे हा कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. ठाण्यातील हा ऑक्सिजन प्लांट सुरु होत असून दिवस-रात्र या प्लांटमधून शहराला ऑक्सिजन सेवा मिळणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटरकर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करून त्याचे फिल्टरेशन करून ते सिलेंडरमध्ये भरले जाणार आहे. या  प्लांटमधून  120 सिलेंडर ऑक्सिजन दिवसाला मिळणार आहे. हे ऑक्सिजन जनतेला विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

          हा ऑक्सिजन  प्लांट लोकांसाठी 24 तास सुरु राहील. रिकामे सिलेंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर येथून दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर नसेल त्यांना डिपॉजिट घेऊन मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्याची ही योजना आमदार सरनाईक यांनी तयार केली आहे. दररोज निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पालिकासरकारी हॉस्पिटल तसेच गरज पडल्यास खासगी हॉस्पिट्लनाही केला जाईल. कोरोना पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत व त्यानंतरही ही ऑक्सिजन सेवा सुरु राहणार 

 रस्ते अपघातजीवितहानी रोखण्यात वाहतूक नियमनाची

अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल

                                              - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

§  मोटार वाहन विभागाच्या वायुवेग पथकात 76 नवीन इंटरसेप्टर वाहने दाखल

§  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

          मुंबई,दि.31: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरचालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघातजीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. 

          राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा 76 वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमारडीए मैदानवांद्रे कुर्ला संकुल येथे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास परिवहन मंत्री ॲड. अनिल परबपरिवहन राज्यमंत्री सतेज  उर्फ बंटी डी. पाटीलपरिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या वाहनांची पाहणीही केली. 

          मुख्यमंत्री म्हणाले कीकोरोना महामारीमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले त्याप्रमाणे रस्त्यांवरील वेगवान धावणा-या वाहनांच्या अपघातात बळी जाणा-यांची संख्या हजारात आहे. भरधाव वेगाने वाहने चालवू नयेत असे आवाहन करूनही नियमांचे पालन न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. यावर आळा घालण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज वाहने दाखल झाली असून यामाध्यमातून अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल स्थानी असल्याचा अभिमान आहेअशी भावना श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

          परिवहन विभागाने अद्ययावत यंत्रणा कार्यरत केल्याचे समाधान व्यक्त करून या यंत्रणेच्या वापरातून अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि जीवितहानी रोखणे हा राज्य शासनाचा हेतू निश्चितच साध्य होईलअशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केली. 

          कारण नसतांना उगाचच वेगापायी वाहनचालक आणि सोबतींचेही प्राण जातात. अनेकदा वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. ही प्राणहानी न होता त्यांना वाचवणे हेच शासनाचे कर्तव्य आहे. कोरोना महामारी किंवा अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच सहकार्य करेल असेही श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

 

          परिवहन मंत्री श्री. अनिल परब म्हणालेदेशातील रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाचे मार्गदर्शक तत्वे ठरवून दिलेले आहेत. गेल्या वर्षभरात दुदैवाने महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण वाढले होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी वायुवेग पथकांना अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असलेली 76 वाहने उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या वाहनांच्या माध्यमातून अपघातांचे प्रमाण आणि बेशिस्त वाहतुक नियंत्रणात येईल. भविष्यात महाराष्ट्र अपघात रोखण्यात यश मिळेल. तसेच अपघाताच्या प्रमाणाबाबतीत राज्याचे स्थान खाली आणण्यासाठीही वाहनांचा उपयोग होईलअसेही श्री. परब यांनी यावेळी सांगितले. वायुवेग पथकाच्या माध्यमातून वेगवान आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करता येणार आहे. 

 

वायुवेग पथक व वाहनांविषयी : 

          राज्यामध्ये वाहन तपासणीसाठी परिवहन विभागाची एकूण 92 वायुवेग पथके आहेत. राज्य रस्ता सुरक्षा निधीतून महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनीची स्कॉर्पिओ S५ या मॉडेलची 76 वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्पीड गनब्रेथ अॅनालायझरव टींट मीटर उपकरणेइंटिग्रेटेड कॅमेरे बसविण्यात आली आहेत.

                                                            00000

 *तैमूर*


  (विनंती - लेख अवश्य वाचा)


*समरकंद म्हणजेच सध्याचा उझबेकिस्तान .. तिथला क्रूर शासक तैमूर ..!! हिंदुस्थान जिंकून इथे धर्मप्रसार करावा या उद्देशाने तो भलंमोठं सैन्य घेऊन निघाला ..!!* 


*अफगाणिस्तानातील गझनवी शासकांना त्याने हरवले. सर्वांना माहीतच आहे की, तो अत्यंत क्रूर, निर्दयी, दुष्ट होता ..!!*


*हाच तो तैमुर, ज्याचे नाव तो पराक्रमी (!) होता म्हणून, करिना कपूरने स्वतःच्या मुलाचे नाव तैमुर ठेवले .. त्याच तैमुरला, एका रणरागिणीने अक्षरश: जेरीस आणले होते ..!!*


*ती होती रामप्यारीबाई चौहान ..!!*


*तैमुर च्या अत्याचाराचे किस्से वाचून, कुणाचाही थरकाप उडेल ..!! अफगाणिस्तान चा प्रदेश जिंकून, हाच तैमुर, हरिद्वार, हरियाणा, दिल्लीच्या रोखानें, पंजाब उध्वस्त करून निघाला .. वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या राजांनी प्रतिकार केला देखील .. पण, तैमुरच्या विशाल सेनेपुढे कुणाचाही टिकाव लागू शकला नाही ..!!* 


*राजे महाराजे थकले तरी, भारतीय जनता मात्र हार मानणारी नव्हती ..!!* 


*उत्तर भारतात त्याकाळी असणाऱ्या विविध जातींच्या प्रमुखांनी, देश धर्माच्या रक्षणासाठी एक समिती तयार केली ..!!* 


*आमने सामने लढून आपला निभाव, तैमुर समोर लागणार नाही, ह्याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यानें, त्यांनी गनिमी काव्याने लढायचे ठरवले ..!!* 


*जोगराजसिंग परमार ह्यांना त्या सर्वानी आपल्या नवीन सैन्याचे प्रमुख बनवले ..!!गावोगावचे तरुण लढण्यासाठी आले ..!!* 


*पण आजपर्यंत कोणीही शस्त्र हाती धरलेले नसल्यानें, त्या सर्वांचे प्रशिक्षण जरुरीचे होते ..!!* 


*तरीही त्यांचा आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास होता. जोगराजसिंग ह्यांनी, त्या सर्व 'सेनेला' प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली ..!!*


*इसवी 1305 मध्ये, हरिद्वार जवळील कुंजासनहाटी गावात जन्मलेले जोगराजसिंग एक छोटे संस्थानिक होते ..!! इस्लामी आक्रमकांनी त्यांचे संस्थान लुटून, जाळून नष्ट करून टाकले होते ..!!* 


*त्यामुळे जोगराजसिंग गावोगावी फिरून, ह्या 'हिरव्या' संकटाशी लढायला युवकांना प्रेरित करत होते ..!!* 


*त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तब्बल ८०,००० युवकांची सेना, देशभरातून तयार झाली होती ..!!*


*सर्व जाती-जमातींची महापंचायत, पुन्हा एकदा विचार-विनीमयास बसली .. त्यांच्यासमोर वेगळाच प्रश्न उभा झाला होता .. गावो-गावच्या युवतीही लढायला तयार झाल्या होत्या .. सर्वानी एक मताने ठराव मंजूर केला की, स्त्री सेना तयार करून, त्यांनाही लढण्याचे प्रशिक्षण द्यायचे ..!! अशाप्रकारे, तब्बल ४५,००० युवतींची 'स्त्री सेना' तयार झाली ..!! त्यांची सेनापती होती रामप्यारीबाई चौहान ..!!*


*कोण होती ही रामप्यारी बाई चौहान ..??*


*उत्तरप्रदेश मधील सहारनपूर गावात, रामप्यारीबाई चौहानचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला ..!!*


*लहानपणापासून इस्लामी आक्रमकांच्या भयकथा ऐकून, रामप्यारी चे मन पेटून उठत होते ..!!* 


*अन्यायाचा प्रतिकार करायचा तर, शरीर मजबूत हवे ..!! शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे .. त्यासाठी रामप्यारी रोज सुर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर, आपल्या शेतात जाऊन, सर्व प्रकारचे व्यायाम करत असे .. व्यायाम करून आपले शरीर तिने दणकट बनवले होते ..!!* 


*गांवकरी त्याबद्दल तिच्यावर टीका करीत पण तिचे आई-वडील मात्र तिच्या मागे ठामपणे उभे राहिले होते .. एकदा पंचायती समोर तिने गावक-यांना ह्याचे महत्त्व पटवून सांगितले ..!!* 


*इस्लामी आक्रमकांचा मुकाबला करायचा असेल तर, आपणच आपले शरीर मजबूत केले पाहिजे .. तिने सांगितलेला हा उपाय सहजसाध्य होता, आणि सर्वाना पटला होता ..!!*


*मग काय .. गावोगावी अशी व्यायाम शिबीरे होऊ लागली ..!!*


*सुरुवातीला फक्त आठ मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच ४५,००० रणरागिणींपर्यत पोहोचली ..!!*


*हा काळ होता अंदाजे इसवीसन १३३० चा ..!! एका पायाने लंगडा तैमुर, दिल्ली उध्वस्त करून पुढे सरकत होता ..!!*


*पुढील ठिकाणी येताच त्याला नवल वाटले .. लुटालूट करायला तो ज्या, ज्या गावात जाई, ते गाव अगोदरच रिकामे केलेले असे .. सर्व धनधान्य बाड-बिस्तरा घेऊन गावकरी गायब झालेले असत ..!!* 


*लुटायचे, मारायचे, बाटवायचे .. पण कुणाला ..??*


*गावकरी विहिरीतील पाण्यात देखील कचरा आणि घाण टाकून जात .. ह्या गोष्टींमुळे, तैमुर च्या सैन्याची उपासमार होऊ लागली .. गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे जाई .. त्यावेळी गनिमी कावा करून, अचानक गावकरी सैन्यावर हल्ला करत आणि पळून जात ..!! दिवसा आमने सामने लढाई करायला काहीवेळ पुरुष सैनिक पुढे येत आणि हल्ला करून पळून जात ..!! रात्रीच्या वेळेत जाळपोळ आणि छुपे हल्ले ठरलेले ..!! ह्या गनिमी हल्ल्यांनी तैमुर हैराण झाला .. सैन्य देखील उपाशी राहू लागले तशी सगळ्यांची चिडचिड ही वाढू लागली ..!!* 


*रोजच्या रात्रीच्या गनिमी काव्याने सैन्य पुरते नामोहरम झाले. रामप्यारीच्या मर्दानी युवती रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करत आणि हे हल्ले करत असताना त्या काळजी घेत असत, की तैमुर च्या सैन्याला झोप मिळणार नाही ..!! हरदाई जाट, देवीकौर राजपूत, चंद्रो, ब्राम्हणी, रामदायी त्यागी ह्यांच्याकडे ह्या रात्रीच्या छुप्या हल्ल्याची जबाबदारी होती ..!!* 


*एखादी तुकडीच्या तुकडी वेगळी पाडून कापून काढणे .. तंबूला आगी लावणे, आगींमुळे हत्ती पिसाळणे, सततचे जागरण ह्यामुळे, तैमुर चे सव्वा लाख सैन्य, अक्षरश: जेरीस आणले गेले ..!!* 


*बरेच सैनिक तडफडून मरण पावले .. मेरठ वर हल्ला केल्याचा तैमुरला आता पस्तावा होऊ लागला .. नेमक्या ह्याचवेळी, लपून बसलेले जोगराजसिंग चे सैनिक, अचानकपणे चहुबाजूंनी चालून आले ..!!* 


*त्यांनी सैनिकांच्या तुकड्या केलेल्या होत्या .. त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे ..!!* 


*तीच कहाणी स्त्री सेनेची होती ..!! रामप्यारी ने दिवसा व रात्री लढण्यासाठी, आपल्या सेनेच्या तुकड्या केलेल्या होत्या. एक तुकडी झाडांवर बसून, तैमुरच्या सैन्यावर शर-वर्षाव करे तर दुसरी तुकडी, तैमूरच्या मेलेल्या सैनिकांची शस्त्रे व दारुगोळा घेऊन त्यांच्यावरच चालवत ..!!*


*पुरुष तुकडीचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया, लढाईच्या ऐन धुमाळीत, तैमुरच्या दिशेने निघाला ..!! तैमुरच्या अंगरक्षकाना उडवून, बाहेरील कडे फोडून तो आत जातोय हे रामप्यारी ने पाहिले मात्र, ती आपल्या तुकडीसहित, त्या धुमाळीत त्याच्या रक्षणार्थ उतरली, आणि सपासप सैनिक कापत, रामप्यारी बाईची स्त्री सेना, तैमुरच्या जवळ पोचली ..!!* 


*चपळाईने लढणाऱ्या स्त्री सैनिकांना पाहून, तैमुरचे सैनिक पुरते गोंधळले .. हरवीरसिंगच्या रक्षणार्थ आलेल्या ह्या स्त्री सेनेचा धोका, खिजराखानने ओळखला .. त्याने तैमुरचा घोडा खेचून, सटकण्याचा प्रयत्न केला .. त्यात तो काहीसा यशस्वीही होत होता तोच, २२,००० सैनिकांची दुसरी आणि अंतिम तुकडी घेऊन, ताज्या दमाने जोगराजसिंग मैदानात उतरले .. घमासान लढाई पेटली .. तैमुर चक्क पळून जात होता .. रामप्यारी ने त्याला पाहिले व पळणाऱ्या तैमूरचा  पाठलाग चालू केला ..!!* 


*रामप्यारी घोड्यावर आणि तैमुर देखील घोड्यावर ..!! तैमुर ने चिलखत घातले होते. चिलखतातून दिसणा-या तैमुरच्या काखेच्या उघड्या भागावर, रामप्यारी ने दौड घेतानाच, बाण चालवले. रामप्यारी ने त्याला गाठून त्याच्यावर तलवार देखील चालवली .. पण विष लावलेले बाण शरीरांत शिरल्याने तैमुर बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडला ..!!* 


*खिजराखान ला मागे येताना बघून रामप्यारी मात्र जंगलात नाहीशी झाली ..!!* 


*ह्या जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरून, तैमुर भारतावरील आक्रमण व त्याचे मनसुबे गुंडाळून, समरकंद ला पळून गेला ..!! गळा, छाती तसेच बगलेतील जखमांमुळे, तैमुर लवकरच मेला ..!!* 


*अशा ह्या 'पळपुट्याचे' तिकडे शूर योद्धा आणि महान धर्मप्रसारक म्हणून पुतळे ऊभे आहेत ..!!* 


*देश, धर्म, संस्कृतीच्या रक्षणासाठी, एकीकरण व स्त्री सक्षमीकरण करून प्रत्यक्ष युध्दात उतरणाऱ्यांना भारतीय लोक विसरले ..!!* 


*पण त्यांनी पळपुटेपणा केलेला तैमुर मात्र लक्षांत ठेवला ..!!*


*तैमुरसारख्या नराधमाला समोर गाठून, त्याला विदीर्ण करणारी रामप्यारीबाई चौहानला देखील भारतीय लोक पार विसरून गेले .. कारण हा खरा इतिहास आम्हाला कधीच शिकवलाच गेला नाही ..!!*


*तैमुर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला, हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही ..!!*


*रामप्यारीबाई ला मानाचा मुजरा ..!!* 🙏🇮🇳

Featured post

Lakshvedhi