Tuesday, 31 August 2021

 गाेव्याचे मुख्यमंत्री व देशाचे माजी दिवंगत संरक्षण मंत्री *मा.श्री मनोहर पर्रीकर* साहेब   यांचे अखेरचे शब्द ..


*" राजकीय क्षेत्रात मी उत्तुंग  यशाची शिखरं गाठली....*

*इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले....*


*तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी राजकीय प्रतिष्ठा माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थिती मात्र बनून राहीली.*


*आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.*


*आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्यु जवळ श्वासोच्छवासही मला जाणवतोय…*


*आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:*

*त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा समाजसेवा करणे.*


*सातत्यानं केवळ राजकारणा मागे धावण्यामुळे माणूस  'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो... अगदी माझ्यासारखा..."*


*आयुष्यभर मी, जी संपत्ती आणि राजकीय मानमरातब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...*


*जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे ?*

तो आहे, *'आजारपणाचा बिछाना' ..!* 


*आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे मंत्री ठेवता येतात... पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही ..कधीही नेमू शकत नाही...*


*हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की, जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते  "आपलं आयुष्य" " काळ " " समय ".*


*शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".*


*सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो....*


*स्वत:कडे दुर्लक्ष  करू नका... स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा...*


 *लोक माणसं वापरायला शिकतात, आणि पैसे जपायला शिकतात. वास्तविक पैसा वापरायला हवा, आणि माणसं जपायला हवीत... आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो, मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...!!! "*


*- मनोहर पर्रीकर*


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°


           ( संप्रेषित )

 थाइलैंड में एक पर्वत के नीचे पानी का एक छोटा झरना है  जिसके बाजु वाले पर्वत पे *ओम् ( ॐ)* का उच्चारण करने पर पानी का फ़व्वारा  बन कर पर्वत से भी उपर तक उछलता है.. 


  ये किसी  साधु सम्प्रदाय ने बनाया है । 


पानी का वज़न + गुरुत्वाकर्षण से भी इतना ऊपर पानी सिर्फ़ आवाज़ के तरंग से कैसे जा सकता है? ये कोई विज्ञानी ही बता सकता हे .. 


क्योंकि ऐसा सिर्फ़ *ओम् ( ॐ* )बोल ने पर ही होता हे !!         ये भी एक अजूबा हे ....!💐

 🍂अतिशय छान आहे एकदाच वाचा 


                 *देवाचा मित्र*

एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.

.

*स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? 


देवाचा मित्र व्हा🍃


🐬 देवाचा मित्र होण्यासाठी शुभेच्छा

Monday, 30 August 2021

 मेसेज निट वाचून समजून घ्या खरोखर प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी विचार करायला लावणारा हा मेसेज आहे...


     .


  

     प्यादी मरण्यासाठीच का ❓?????


 अनेक  दिवसांपासून डोक्यात असलेला_

       _*' प्रश्न '*_

       _आहे की _


*.* *बुद्धिबळात* दोन्ही बाजूकडून *प्यादीच*

       पुढे का असतात ?


     _*.* *उभा-आडवा* मारा करु शकणारे *बलदंड_

         _*¤हत्ती,*_


     _*.* कानाकोपऱ्यातून *तिरप्या* चालीने वेध घेऊ_

     _*.* शकणारे *काटक*_

         _*¤उंट,*_


     _*.* उलटसुलट *अडीच घरां* पल्याड जाऊन हल्ला_

     _*.* चढवू शकणारी_

         _*¤घोडी,*_


     _*.* सर्वशक्तिमान_

         _*¤वजीर*_

     _*.* आणि_

     _*.* महामहीम_

         _*¤बादशहा*_

     _*.* एवढी सारी  *मातब्बर*_ 

       _मंडळी *मागच्या रांगेत*_


     _*.आणि तोफेच्या तोंडी*

     _*.*कोण तर*

     _*.* स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली,_

     _*.* किरकोळ देहयष्टीची,_

     _*.* एक-एक घर पुढे सरकणारी_

      _□ *प्यादी !*_


     _*.* *हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला*_

        _*प्रकार झाला !*_


     _*.* बरं,_

     _*.* इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर_

        _*मागे* फिरु शकतात._

     _*.* प्याद्यांना ती *मुभा* नाही._


     _*.* एवढंच काय_

     _*.* जीवाच्या आकांताने_

     _*.* एखाद्या प्याद्याने शत्रुचा प्रदेश पादाक्रांत करून_

     _*.* अंतिम रेषा गाठलीच_

     _*.* तरी_


     _*.* *पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच* होणार._

     _*.* तसा रिवाजच आहे !_


     _*.* थोडक्यात काय तर_

     _*.* प्यादी जन्माला येतात_

     _*.* ती *बळी* जाण्यासाठीच._

     _*.* *प्याद्यांनी* फक्त *लढायचं,*_

     _*.* तेही समोरच्या *प्याद्यांविरुद्धच.*_ 

     _*.* *का ?*_

     _*.* ते विचारायचं नाही._


     _*.* सरपटत-फरफटत प्यादी लढणार,_

       _झगडणार, मरणार._


     _*.* स्मारकं मात्र *प्रतिष्ठितांचीच* उभारली जाणार._


     _*.* इतिहासाची पानही डामडौल्यांचीच नोंद घेणार._


     _*.* उदोउदोही मानकर्‍यांचाच होणार._

     _*.* कारण, तसाच *रिवाज* असतो!_


     _*.* *कार्यकर्त्यांनी समजून घ्या !*_

     _*.* *आणि जर इच्छा झालीच*_

     _*.* *राजकारणातून बाजूला होऊन व्यवसायाकडे*__*वळा..........*_

*स्वतः कडे, स्वतःच्या कुटूंबाकडे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या*

*भक्त व गुलाम बनून आयुष्याचं मातेर नका करून घेऊ.*

*कुठलाही राजकीय पक्ष , राजकीय नेता तुम्हाला प्यादी म्हणूनच वापरत असतो.*

*अशी प्यादी आजकाल सोशल मीडिया वर जास्तच कार्यरत असतात.*

*म्हणून स्वतः प्यादी बनायचं की नाही हे ठरविता आलं तरच शिक्षणाचा उपयोग आहे.*


*कृपया प्यादी बनू नका...बुद्धिवादी व्हा....*


     _*.* *हेच शिक्षित माणसाचे*_

           _*लक्षण*🙏

 प्र.के.अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटले...

ही टीका तालिबानी वृत्ती पेक्षाही वाईट होती. 

तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही.

त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले,

" माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात

असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी  हल्ला केला,

व त्यात तिचा गर्भपात  झाला ...

आणि गर्भाशय कायमचे  निकामी झाले ..."


यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागावले , 

ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला...!


मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले.

त्यांनी त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली,

पश्चाताप केला आणि यशवंतरावांनी हसतमुखाने अत्रेंना माफ केले...!


ही महाराष्ट्रातील नेत्यांची  त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती...!


ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावीत ..??🤔


आजची संस्कृती म्हणजे ....,

तुला चप्पलने मारतो ...,

कानशिलात मारतो ...,

कोथळा काढतो....,

राडा...,

ही आहे...!


आता हा राडा पुढे न्यायचा ...?

का यशवंतराव - अत्रे यांची नीती पुढे न्यायची...??

हे आपल्या युवकांच्या  हातात आहे...!!

 कोरोना काळातील एकल/विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तालुकास्तरीय  समाधान शिबीर’ घ्यावे

-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 

·       जिल्हा उपसमिती स्थापन करण्याचेही निर्देश

 

            मुंबईदि. 30 : कोरोना महामारीमुळे घरातील कर्ता पुरुष दगावलेल्या एकल / विधवा महिलांच्या आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनासाठी कागदपत्रांच्या औपचारिक पूर्ततेसाठी  जिल्ह्यात समाधान शिबीर’ आयोजित करुन अडीअडचणी सोडवाव्या तसेच टास्क फोर्स समिती अंतर्गत जिल्हा उपसमिती स्थापन करुन त्या समितीत स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

            महिलांना समाजात योग्य मान मिळावा यासाठी डॉ.गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली  कोरोनामध्ये  एकल / विधवा महिलांच्या पुनर्वसनाबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे सामाजिक संस्थांची बैठक झाली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे अवर सचिव महेश वरुडकरएकल महिला पुनर्वसन समितीचे हेरंब कुलकर्णीजयाजी पाईकरावविदर्भ विभागाच्या सामाजिक संस्था प्रतिनिधी सुजाता भोंगाडेअंबेजोगाई हून पंचशीला ओव्हाळपुण्यातून ॲड.असुंता पारधेकोल्हापुरातून  प्रकाश गाताडे,अशोक कुटेबाजीराव ढाकणे, बीडयांच्यासह अनेक  सामाजिक कार्यकर्ते ऑनलाइन उपस्थित होते.

             उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्याकोरोना महामारीमुळे एकल / विधवा झालेल्या महिला आणि अनाथ बालकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. एकल / विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेद्वारे मिळणारी मदत,अडीअडचणी सोडविणेमालमत्ता प्रकरणे निकाली काढणेमहामंडळांच्या योजनांतून मदत देणेआर्थिक समस्या सोडविणेव्यावसायिक प्रशिक्षण देवून महिलांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे अशा उपायायोजना करण्यासाठी जिल्ह्यात समाधान शिबीर आयोजित करणे गरजेचे आहे. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांचा समावेश करुन महिलांना शासकीय मदतीची प्रकरणे छाननी करून त्यांनी मदतीचा लाभ दिला जाणे आवश्यक आहे. कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे निधन होवून एकल / विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावायासाठी राबविण्यात येणारी मिशन वात्सल्य’ योजना अत्यंत  चांगली असून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

सर्वेक्षण टप्पेनिहाय करावे

             एकल / विधवा महिलांचे सर्वेक्षण शासनस्तरावरून 1 मे पासून सुरु झाले आहे. सर्वेक्षणादरम्यान प्रत्येक महिलेच्या गरजांबाबतही पडताळणी केली जात आहे. कोविड काळात सर्वेक्षण सुरुच राहणार असून महिलांची संपूर्ण आकडेवारी मिळविण्यासाठी सर्वेक्षणाचे टप्पे ठरवावे लागतील. त्यानुसार माहिती गोळा करुन आवश्यक उपाययोजना शासनाने राबवाव्यात.

लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहणार

            केंद्र सरकारच्या माध्यमातून एकल/ विधवा महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहणार असल्याची माहिती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिली. तसेच देशातील विविध राज्यांनी या स्वयंसिद्धा महिलांसाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची माहितीही घ्यावी लागणार आहे. तसेच  लोकसभेतील  लोकप्रतिनीधींमार्फत केंद्र सरकारकडे उपलब्ध असलेली माहिती राज्यसरकारला पुरविण्‍याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील महामंडळांसमवेत बैठक घेणार

            कोरोना महामारीमुळे अनेक महामंडळांचे कामकाज थांबले होते ते आता सुरु झाले आहे. राज्यशासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळमहात्मा जोतिबा फुले मागासवर्गीय महामंडळ,  अण्णाभाऊ साठे विकास महामंडळअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांचेमार्फत एकल/ विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्‍यासाठी या सर्व महामंडळासमवेत लवकरात लवकर बैठक घेणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

फसवणूक टाळा

            विविध योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचासंस्थांचा वापर करुन अनेक महिलांची फसवणूक झाल्याचे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. अशा गैरप्रकाराला बळी न पडता शासकीय यंत्रणेमार्फतच योजनांसाठी अर्ज करुन स्वत: ची फसवणूक टाळण्याचे आवाहनही डॉ.गोऱ्हे यांनी केले.

००००


 ८.८९ टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, २०२१ ची परतफेड

 

             मुंबई,दि.30 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.८९ टक्के कर्जरोखे २०२१ ची परतफेड दि.५ ऑक्टोंबर २०२१ रोजी पर्यंत आहे असे पत्रक वित्त विभागातर्फे प्रसिध्दीस देण्यात आले आहे.

            महाराष्ट्र शासनवित्त विभागअधिसूचना क्र. एलएनएफ-१०,११/प्र.क्र.२/अर्थोपाय दि. ३० सप्टेंबर २०११ अनुसार ८.८९% महाराष्ट्र शासन कर्जरोखे२०२१ अदत्त शिल्लक रकमेची दि.४ ऑक्टोंबर२०२१ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. ५ ऑक्टोंबर२०२१ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. "परक्राम्य संलेख अधिनियम१८८१ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी  जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. ०५ ऑक्टोंबर २०२१ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियम२००७ च्या उप-विनियम २४(२) व २४(३) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान है,इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

         तथापि,बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी८.८९% महाराष्ट्र शासन कर्जरोखे२०२१ च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत:

                                 " प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली."

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित) बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल,त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील असे वित्तीय सुधारणा प्रधान सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

0000

 

Featured post

Lakshvedhi