Tuesday, 3 August 2021

 आपत्ती काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात

आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे 

-उद्योगमंत्री सुभाष देसाई

 

            मुंबईदि. 3 :  नैसर्गिक आपत्तीमहामारी अशा संकटकाळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात समुपदेशन तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे,  असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

            मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर येथील जम्बो कोविड केअर केंद्रामध्ये हनिवेल कंपनीच्यावतीने सर्व सुविधायुक्त अतिदक्षता विभागाची स्थापना करण्यात आली.  त्याचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

            कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शासनाच्या आरोग्य विभागाला हनिवेल कंपनीने ही मोलाचे सहकार्य केले. हेच सामाजिक दायित्व जपत कंपनीने दहिसर येथील जम्बो कोविड केंद्रामध्ये अतिदक्षता केंद्र सुरू केले आहे. त्याचे अनावरण श्री. देसाई यांनी केले. या अतिदक्षता केंद्रात व्हेंटीलेटर्सफ्लॉवर बेड्सबी आय पॅप मशिन्समॉनिटर्सएक्स रे मशिन्सइसिजी मशिन्स  आदी सुविधा उपलब्ध आहेत.

            नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे आरोग्यक्षेत्रात हनिवेल कंपनी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. या पुढील काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात नैसर्गिक आपत्ती किंवा महामारीच्या काळात काम करण्याची गरज  असल्याचे श्री. देसाई म्हणाले.

            यावेळी कंपनीचे भारतातील प्रमुख आशिष गायकवाडमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.

 बारावी इयत्ता उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

·       आवडीचे क्षेत्र निवडून देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन

 

             मुंबईदि. 3:- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडून शिक्षणाचा आनंद घ्यावा. जीवनात यशस्वी व्हावे. देशाच्या विकासात योगदान द्यावेअसे आवाहन करून उपमुख्यमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात कीकोरोना संकटामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षाहून अधिक काळ तणावाखाली वावरावे लागले. तरीही शाळांतर्गत मुल्यांकनात विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. 99.81 टक्के निकालासह  कोकण विभाग बारावीच्या मूल्यांकनात राज्यात अव्वल ठरला असून अन्य विभागांचा निकाल 99 टक्क्यांहून अधिक लागला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळातून विज्ञानकलावाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांतून 99.63 टक्के विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. हे यश कौतुकास्पद असून त्याबद्दल विद्यार्थीशिक्षकपालकांचे मी अभिनंदन करतो. जीवनात येणाऱ्या आव्हानांवर मात करुन हे विद्यार्थी प्रत्येक टप्प्यावर असेच यश मिळवतीलअसा विश्वास व्यक्त करुन उपमुख्यमंत्र्यांनी बारावी इयत्ता उत्तीर्ण विद्यार्थीपालक व शिक्षकांचे अभिनंदन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

0000

 सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने

मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न

-- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

·        ११ हजार ५०० कोटीच्या तरतुदीस मंत्रिमंडळाची मान्यता

 

            मुंबईदि. ०३ : गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असताना देखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वाऱ्यावर न सोडता मदत केली आहे. आजही ११ हजार ५०० कोटीच्या तरतुदीस मान्यता देऊन राज्य सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे  असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नुकसान मोठे आहे. शेतकरीव्यापारीव्यावसायिकदुकानदारसर्वसामान्य नागरिककारागीर सर्वानाच झळ बसली आहे. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेहमीच्या निकषापेक्षा वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

पूरदरड समस्येवर कायमस्वरूपी उपाय करा

तज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल देण्याचे

मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश

            या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुराचे संकटदरडी कोसळण्याच्या घटना यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले की,  महाड व चिपळूण शहरातील पूर नियंत्रणासाठी तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार वशिष्टीगांधारीसावित्री नद्यातील बेट व गाळ काढून मॉडेल स्टडीच्या आधारे पूर संरक्षण भिंत ३ वर्षात पूर्ण करा.

            कोकणातील बांधकामाधीन प्रकल्प (काळूशाई,काळ ई.) येणा-या ३ वर्षात पूर्ण करा. कोयना टेलरेस पाणी मुंबई लिंक प्रकल्पासाठीच्या डीपीआरवर अभ्यास करुन ३ महिन्यात निर्णय घ्यावा. डोंगर कोसळण्याच्या घटनेवर प्रतिबंधासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल तयार करा. कोकणाच्या २६ नदी खो-यात पूर इशारा देणारी आरटीडीएस प्रणाली ३ महिन्यात स्थापित करा.

-----०-----

 *_अळूची पाने खाणाऱ्यांनी एकदा ही माहिती अवश्य वाचा..बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते !_*

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आ-रोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यापैकी एक म्हणजेच अळूची पाने ही एक अतिशय आ-रोग्यदायी भाजी मानली जाते. हृदयाच्या विकारांवर मात करण्यासाठी अळूच्या पानांमध्ये बरेच औ-षधी गुणधर्म असतात. भारतीय संस्कृतीत भाजी शिवाय इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाने वापरली जातात.

त्यामुळे आपले आ-रोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामध्ये प्रामुख्याने अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते. अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्ट या सर्व घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे शरीर अनेक स-मस्यांपासून दूर राहते.

याचबरोबर अळूची पाने नियमितपणे खाणे आपल्या आ-रोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तसेच यामुळे आपल्या शरीरातील अनेक व्याधी बऱ्या होण्यास मदत होते. तसेच या वनस्पतीची पाने नियमित खाल्याने आपल्या शरीरातील मुख्य अवयव म्हणजेच डोळे निरोगी राहतात.

कारण आपल्या शरीरातील डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. अळूच्या पानामुळे आपल्या डोळ्याना व्हिटॅमिन A मिळते. कारण या अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन A अधिक प्रमाणात उपलब्ध असते. ज्यामुळे आपल्या डोळ्यांना त्याचा खुप फायदा होतो.

याशिवाय आपल्या डोळ्यांच्या मांसपेशीही मजबूत होण्यास मदत होऊन,त्यामुळे आपली दृष्टी ही वृद्धावस्थेत सुद्धा चांगली राहते. तसेच अळूच्या पानांचा दुसरा फा-यदा म्हणजे यामुळे आपल्या सांधेदुखीचा त्रा स कायमस्वरूपी बंद होतो, तसेच आपले वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होत असतो.

कारण या धावत्या काळात व्यायामाच्या अभावामुळे तसेच फास्ट फूड अतिसेवन, अवेळी झोपणे, चुकीच्या सवयी आपल्याला वजन वाढीची खूप स-मस्या निर्माण झाली आहे. याशिवाय अळूच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स असल्याने आपली पचनशक्ती सुधारते. तसेच आपले वजन हे नियंत्रणामध्ये राहते. अळूची पाने पोटाच्या विकारासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात.

कारण यातील पोषक घटकामुळे आपल्या पोटदुखीच्या समस्या दूर होते. तसेच जर आपल्याला रक्तदाबाचा त्रास असल्यास ,ही आळूची पाने सेवन केल्यास यातील पोषक तत्वामुळे, आपली रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय या अळूच्या पानांमुळे आपला ट्रेस सुद्धा कमी होण्यास मदत होते.

यामुळे मनावरील ताण तनाव दूर करण्यासाठी ही पाने अत्यंत महत्वाची आहेतअसे आयुर्वेदात सांगितले जाते.अळूच्या पानांचे , आपलं आ-रोग्य नीट तर सर्वकागुणधर्म पाहता आपण अळूच्या पानांचे सेवन करणे आवश्यक आहे, त्यामुळे अळूवडी, भाजी आहारात घ्यायलाच हवीही ठीक.

 सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा

सन २०२१ चा निकाल ३ ऑगस्ट रोजी

            मुंबई, दि. २ : शासन निर्णय क्र.परीक्षा ०६२१/प्र.क्र.५६/एमडी-२ दि.०२/०७/२०२१ मध्ये निश्चित केलेली मूल्यमापन कार्यपद्धती तसेच मंडळाच्या दि.०५ जुलै २०२१ रोजीच्या परिपत्रकामधील सूचनांनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल मंडळामार्फत तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणेनागपूरऔरंगाबादमुंबई. कोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसास अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारदिनांक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

            उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

https://hscresult.1lthadmission.org.in

https://msbshse.co.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in.

https://lokmat.news18.com

            www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

            तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 निकालाबाबतचा अन्य तपशील

            सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१०वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयाचे सरासरी गुणइ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षासराव परीक्षासराव चाचण्यातत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त  गुण इत्यादींच्या आधारे इ.१२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

            दि.२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील. अशी माहिती डॉ.अशोक मसले सचिवराज्यमंडळपुणे यांनी प्रकटनाच्या माध्यमातून दिली आहे.

 कोरोना तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून जबाबदार वर्तन अपेक्षित

- राज्यपाल कोश्यारी

प्रत्यक्ष क्षेत्र स्तरावर कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार

            मुंबई, दि. 2 : सर्वांच्या सहकार्यामुळे गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवर नियंत्रण प्राप्त करणे शक्य झाले आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून अधिक जबाबदार वर्तन अपेक्षित असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            युवकांमध्ये कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या साई लीला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कोरोना काळात प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करणाऱ्या ३० कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.

            कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री व गोरेगाव येथील आमदार विद्या ठाकूरलोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढासाई लीला फाउंडेशनच्या अध्यक्षा रश्मी उपाध्यायविश्वस्त महेश शेट्टी आदि उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, देश संकटात असताना देशातील सामन्यातील सामान्य व्यक्तीने परोपकाराची भावना दाखविली. डॉक्टर्सनर्सेसपोलीसस्वच्छता कर्मचारीवार्ड बॉय यांसारख्या कोरोना योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन काम केले. हे कार्य देशाला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर अग्रेसर करेल. कोरोनाचे आव्हान थोपविण्यासाठी निर्भय होऊन काम केले पाहिजे मात्र निष्काळजीपणा नको असे सांगताना सुरक्षित अंतरमास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर याबाबत जनजागृती व्हावीअशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

            जयपॅन इंडस्ट्रिचे जय नारायण अग्रवालइंडियन फिल्म्स एंड टीव्ही डिरेक्टर्स असोसिएशनचे  सचिव कुकू कोहलीईंडीयन मोशन पिक्चर्स असोसिएशनच्या सुषमा शिरोमणीसेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.शेफाली केशरवानीकेईएम हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ धीरज कुमारडॉ.सिद्धनाथ दुबेडॉ प्रज्ञा कुलकर्णीराज श्रीवास्तवमिहीर भोईरप्राध्यापक प्रशांत नवाथेआशा सेविका उज्वला नेमन आणि  उषा खराडेआरोग्य सेविका प्रियंका वाधवासीमा ओटेकरनीता काळडोकेवर्षा गरवारेउर्वशी बिहारे व उन्नती तोडणकरमुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रवी सोलंकीवॉर्डबॉय शंकर मुंसेसनदी लेखापाल अवधेश पटेलइम्रान गफ्फार पिराणीताराबाई राजवंशीप्रसाद कदमसंतोष वासुदेव नारकरमहेश पवारकमलेश सदानंद मौर्यलक्ष्मण नाडरअरविंद दुबे यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

**

Felicitation organized by Sai Leela Foundation

Governor felicitates ground level Corona Warriors

 

       The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari felicitated 30 Corona Warriors including ASHA workers, health workers, ward boys, doctors, social workers and other ground level staff at a felicitation held at Raj Bhavan, Mumbai on Monday (2 Aug).

       The felicitation of Corona Warriors was organized by the Sai Leela Foundation, an organization working in the areas of skill development and women empowerment.

       Former Minister Vidya Thakur, Chairperson of Lodha Foundation Manju Lodha, President of the Sail Leela Foundation Rashmi Upadhyay, Trustee Mahesh Shetty and others were present.

       Jaipan Industries  CMD Jai Narayan Agrawal, Indian Films and TV Directors’ Association Kuku Kohli, Indian Motion PIctures Association head Sushama Shiromani,  Dr. Shefali Kesharwani, Dr. Dhiraj Kumar,   Dr. Sidhnath Dubey,  Dr. Pradnya Kulkarni, Raj Shrivastav, Mihir Kisan Bhoir,  Prof Prashant Navathe,  Asha workers  Ujwala Neman and Usha Kharade, Aarogya Sevika Priyanka Wadhwa, Seema Otekar, Neeta Kaldoke,  Varsha Garware,  Urvashi Bihare,   Unnati Todankar,  Ravi Solanki, Shankar Munse,  CA Avdesh Patel, Imran Gaffar Pirani,  Tarabai Rajvanshi, Prasad Kadam, Santosh Vasudev Narkar, Mahesh Pawar, Kamlesh Sadanand Mourya, Laxman Nadar, Arvind Dubey  were felicitated by the Governor.

**

 एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

           

            नाशिक दि. 2 : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यानुसार एकलव्य मॉडेल निवासी शाळेत शासकीयअनुदानित आणि खाजगी शिक्षण संस्थांमधून शिकत असणाऱ्या अनुसूचित/आदिम जमातीच्या इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेतअसे आवाहन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

            प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसारआदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील नाशिक विभागांतर्गत 17ठाणे विभागांतर्गत 08अमरावती  विभागात 04 आणि नागपूर विभागांतर्गत 10 अशा एकूण 39 एकलव्य मॉडेल निवासी शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निवासी शाळेत इयत्ता 6 वी मध्ये नियमित प्रवेश घेण्यासाठी आणि इयत्ता 7 वी ते 9 वी च्या वर्गातील अनुसूचित जमातीच्या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थीत्यांचे पालकशिक्षक अथवा मुख्याध्यापक यांनी https://admission.emrsmaharashtra.com या संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदनपत्र 31 ऑगस्ट 2021 पर्यंत विद्यार्थ्याच्या मागील शैक्षणिक वर्षाच्या  गुणपत्रक व विद्यार्थ्याच्या सरल आय डी सह अपलोड करावेअसेही आदिवासी विकास आयुक्त श्री. सोनवणे यांनी  सांगितले आहे.

            शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळाजिल्हा परिषदनगरपालिका व महानगरपालिकेच्या तसेच इतर शासनमान्य अथवा खाजगीअनुदानित शाळेत शिकत असणारा कोणताही अनुसूचित जमातीचा विद्यार्थी हे आवेदनपत्र भरू शकेल. तसेच इयत्ता 6 वी मध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आणि आदिमकरिता प्रत्येक शाळेत 5  जागा आरक्षित असणार आहेत. ऑनलाईन प्राप्त आवेदनपत्रातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पालकांच्या मूळ राहिवासचा पत्ता विचारात घेऊन नजिकच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेत उपलब्ध जागेनुसार प्रवेश देण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प कार्यालये यांच्याशी संपर्क साधण्यात यावाअसे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi