Wednesday, 5 June 2019

आईने मोजलेच नाही...

आयुष्याच्या तव्यावरती 
संसाराची पोळी
भाजता भाजता 
हाताला किती बसले चटके
आईने मोजलेच नाही...

नवर्‍यासह लेकराबाळांचे 
करता करता
मोठ्यांचा मान राखता राखता
कितीदा वाकले गेले ,          
आईने  मोजलेच नाही...

जरा चुकले की 
घरच्यांची, बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली,
काळजाला किती घरं पडली ,   आईने  मोजलेच नाही...

याच्यासाठी त्याच्यासाठी
आणखीही कुणासाठी
जगता जगता ,
स्वतःसाठी अशी 
किती जगले ,आईने
मोजलेच नाही...

पाखरे गेली फारच दूर 
डोळा आहे श्रावणपूर
पैशाचा हा नुसता धूर
निसटून गेले कोणते सूर,
आईने मोजलेच नाही..

*स्मिता मोहरीर यांना काव्यांगण प्रतिष्ठान वणी च्या वतीने बेटी फाऊंडेशन चा राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार*

*स्मिता मोहरीर यांना काव्यांगण प्रतिष्ठान वणी च्या वतीने बेटी फाऊंडेशन चा राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार* 

*महाराष्ट्रभरातुन नामांकीत व्यक्तीमत्वास आणि कलत्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करुन हे पुरस्कार देण्यात येत असतात* 
या पुरस्कारासाठी नांदेडच्या  सौ.स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर यांची  निवड झाली आहे. हा पुरस्कार 9 जून 2019 रोजी त्यांना वणी जि. यवतमाळ येते देउन सत्कार करण्यात येणार आहे. या आधी त्यांना राज्यस्तरीय क्रांतिज्याती सावित्रीबाई फुले पुरस्कार, संत जनाबाई काव्य रत्न पुरस्कार,यशस्विनी पुरस्कार,समाजसेविका दुर्गाताई देशमुख गौरव पुरकाराने आणि आर.बी.फिल्म प्रोड्युकॅशन चा जीवन गौरव लेखन पुरकाराने सन्मानित झाल्या  आहेत. स्मिता मोहरीर ह्या लेखिका,कवियत्री तसेच दोन लघुचित्रपटाच्या दिग्दर्शिका सुद्धा आहेत.

Tuesday, 4 June 2019

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2019

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 21 ते 26 वयातील युवकांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2019 सुरू केला आहे. या कार्यक्रमात 45000 इतके महिन्याचे वेतन देखील दिले जाते.  ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 14 जून 2019 आहे. अर्ज करण्यासाठी https://mahades.maharashtra.gov.in

स्त्री शिवाय माणूस अपूर्णच !


जळगाव जिल्ह्यात १ ते २१ जून २०१८ दरम्यान झालेली वादळी वारा व अवेळी पाऊस यामुळे केळी व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत




पंतप्रधानमंत्री पीक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईची रक्कम नूनंतम्म् रुपये १०००/- इतकी देणेबाबत



Featured post

Lakshvedhi