Sunday, 10 August 2025

राज्यातील 24 महिलांची ओमान देशातून सुटका करण्यात आयोग यशस्वी

 राज्यातील 24 महिलांची ओमान देशातून सुटका करण्यात आयोग यशस्वी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या कीशेकडो वर्षापूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. आता समाजाची मानसिकता बदण्याची गरज आहे. गेल्या तीन वर्षात मानवी तस्करी संदर्भात काम करताना आयोगाने राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलीस दलाच्या ॲन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग आणि ओमानच्या देशदूताच्या सहकार्याने राज्यातील 24 मुली व महिलांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सोपविण्यात आले. भविष्यातही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी काम करण्यासाठी आयोग सज्ज आहे.

       पहिल्या चर्चासत्रात मानवी तस्करीविरोधी लढ्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित माँडेल्ससाधनेनवीन कल्पना आणि उपाय यावर चर्चा करण्यात आली. यामधे श्री ज्ञानेश्वर मुळयेमाजी सदस्यराष्ट्रीय मानवाधिकार आय़ोगस्टँक टेक्नोलाँजीचे संस्थापक श्री अतुल रायप्रेरणा संस्थेच्या रश्मी टेलरसायबरपीस फाउँडेशनचे इरफान सिद्धावतम सहभागी झाले. मानवी तस्करी रोखण्यासाठी उपलब्ध कार्यपद्धतीतंत्रज्ञानावर आधारित मॉडेल्सबाबत तज्ञ व्यक्ती यांनी जगभरातील अनुभव सांगितले.

                  प्रवासादरम्यान आणि ऑनलाइन माध्यमाद्वारे मानवी तस्करी विरोधात कृती आराखडा या दुसऱ्या सत्रात रेल्वे स्थानकेमहामार्गबस स्थानके आणि फेसबुकइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅपएक्स यांसारख्या ऑनलाइन जागांवर तस्करी कशी ओळखायची आणि ती कशी थांबवायची यावर चर्चा झाली. यात परिवहनरेल्वेडिजिटल व्यासपीठस्वयंसेवी संस्थाकायदेशीर तज्ञ सद्यस्थितीसुधारणासमन्वय यावर  त्यांनी विचार मांडण्यात आले.

सूत्रसंचालन प्रयास संस्थेच्या शँराँन मेनेझेस यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi