Sunday, 18 May 2025

स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार मेजर अनिल अर्स यांना तर विज्ञान पुरस्कार शास्त्रज्ञ मिलिंद अत्रे यांना जाहीर

 स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य  पुरस्कार मेजर अनिल अर्स यांना तर विज्ञान पुरस्कार शास्त्रज्ञ मिलिंद अत्रे यांना जाहीर

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. वीर सावरकर यांच्या आदर्श विचारांना अनुसरून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्यआणि 'स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कारदेऊन गौरविण्यात येते. मराठा लाइट इन्फंट्रीचे मेजर अनिल अर्स यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार - २०२५', जाहीर करण्यात आला आहे. तर आयआयटीमुंबईचे शास्त्रज्ञ मिलिंद अत्रे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

मानपत्रस्मृतिचिन्हरू. ५१,००० असे स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्काराचे स्वरूप आहे. तर  मानपत्रस्मृतिचिन्ह आणि १ लाख १००१ रुपये असे स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्काराचे स्वरूप आहे.

मेजर अनिल अर्स यांचा परिचय

मेजर अनिल अर्स हे जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर कंपनी कमांडर म्हणून कार्यरत होते. त्यांना जेव्हा काही दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय जवानांवर हल्ला करणार असल्याची गुप्त माहिती मिळालीतेव्हा त्यांनी प्रसंगावधान दाखवत दहशतवादी टप्प्यात येण्याची प्रतीक्षा केली. दहशतवाद्यांचा गट टप्प्यात येताच मेजर अनिल अर्स यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने गोळीबार करून तीन दहशतवाद्यांना ठार केले. नियंत्रण रेषेच्या जवळ मेजर अनिल अर्स यांनी ही कारवाई केल्याने नियंत्रण रेषेपलीकडूनही जोरदार गोळीबार सुरु झाला. त्यावेळी जीवितहानी होण्याचा धोका पत्करून ते त्यांच्या पथकासोबत उर्वरित दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी तिथेच थांबले. १५ मिनिटांनंतर त्यांच्या पथकाने आणखी दोन दहशतवाद्यांना पाहिले आणि अचूक गोळीबार करून त्यांनाही कंठस्नान घातले. आपल्या पथकातील सहकाऱ्यांना सुरक्षित ठेवत दहशतवाद्यांचा खात्मा करणारे मेजर अनिल अर्स यांनी अदम्य साहस आणि लढाऊ नेतृत्व दाखविल्याबद्दल २०१९ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते 'शौर्य चक्रप्रदान करण्यात आले.

प्राध्यापक मिलिंद अत्रे यांचा परिचय

सध्या मिलिंद अत्रे हे आयआयटी मुंबईआयनॉक्स येथे उपसंचालक – एआरटी (अॅकेडेमीकरिसर्च आणि ट्रान्सलेशन) आहेत. त्यांनी ४ वर्षांहून अधिक काळ आयआयटी मुंबईचे डीन (संशोधन आणि विकास) म्हणून आणि ६ वर्षांहून अधिक काळ आयआयटी मुंबई येथे बिझनेस इनक्यूबेटर, SINE (सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप) चे प्रोफेसर-इन-चार्ज म्हणून काम केले आहे. प्राध्यापक अत्रे यांनी नागपूरच्या व्हीएनआयटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आणि नंतर १९९१ मध्ये आयआयटी मुंबई येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात क्रायोजेनिक्समध्ये पीएचडी केली. टाटा रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाइन सेंटर (टीआरडीडीसीपुणे) मध्ये २ वर्षे काम केल्यानंतरत्यांनी जर्मनीमध्ये त्यांच्या पोस्ट-डॉक्टरेट संशोधनावर काम केले. १९९६ मध्ये ते अणू ऊर्जा विभागात सहभागी होण्यासाठी भारतात परतले.


त्यांनी स्वदेशी क्रायोजेनिक प्रणाली विकसित करण्यासाठी इंदूर येथील राजा रमणा सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (RRCAT) येथे काम केले. २००० मध्येते MRI/NMR प्रणालींशी संबंधित संशोधन करण्यासाठी ऑक्सफर्ड इन्स्ट्रुमेंट्सइंग्लंड येथे प्रिन्सिपल इंजिनिअर म्हणून सहभागी झालेजिथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स कूलिंगसाठी कोल्ड प्रोब४ के पल्स ट्यूब क्रायोकूलर, MRI, सुपरकंडक्टिंग मॅग्नेट आणि हेलियमसाठी री-कंडेन्सिंग क्रायोस्टॅट विकसित करण्यावर काम केले. अत्रे यांना विविध पुरस्कार मिळाले आहेतजसे कीअध्यापनातील उत्कृष्टतेसाठी प्रोफेसर सुखात्मे पुरस्कारडॉ. पटवर्धन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अवार्डइंडस्ट्रियल इम्पॅक्ट अवार्ड. सध्या त्यांच्याकडे संरक्षणअवकाश आणि अणुऊर्जाअणू प्रयोगांशी संबंधित विविध प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi