Sunday, 2 November 2025

बेस्ट उपक्रमात नवीन इलेक्ट्रिक बसगाड्‌यांचे पर्व

 बेस्ट उपक्रमात नवीन इलेक्ट्रिक बसगाड्‌यांचे पर्व

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा मार्फत एकूण 150 नवीन 12 मीटन लांबीच्या संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसगाड्‌या प्रवर्तित होत आहेत. या बसगाड्या 'वेट लीजपद्धतीने चालविल्या जाणार असूनत्यामुळे मुंबईतील पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.

 150 इलेक्ट्रिक बसगाड्या मुंबईतील 21 मार्गावर चालविण्यात येणार आहेतज्यामध्ये 21 प्रभागांचा समावेश आहे. बसगाड्यांची गुणवत्ता नियंत्रण केंद्रा‌द्वारे नियमित देखरेख केली जाईल.

ही बससेवा अंधेरी (प.)जोगेश्वरी (प.)कुर्ला (पूर्व व पश्चिम)बांद्रा (प.)कांदिवली (प.) आणि बोरिवली (प.) या उपनगरी रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार आहे.

या बसगाड्या मेट्रो लाईन क्र. 1,2A, 7 आणि 3 (अॅक्वा लाईन) या प्रमुख मेट्रो मार्गाशी जोडणी साधून मेट्रो प्रवाशांना अखंड शेवटच्या टप्प्यापर्यतची जोडणी उपलब्ध करून देतील.

ओशिवरा, गोरेगाव येथील आगारातील पर्यावरणस्नेही बसेसचे देखील लोकार्पण

 ओशिवरागोरेगाव येथील आगारातील पर्यावरणस्नेही बसेसचे देखील लोकार्पण

 कुलाबा आगारासह ओशिवरागोरेगाव येथील आगारातील पर्यावरणस्नेही बसेसचे  देखील लोकार्पण करण्यात आले.  यामुळे सुमारे 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज दर्जेदार प्रवास अनुभवता येईल.

मुख्यमंत्री यांच्या समवेत मान्यवरांनी क्रमांक 4068 वीर कोतवाल उद्यान कुर्ला नामफलकाच्या बस मध्ये बसून पाहणी केलीमाहिती घेतली व काही अंतर प्रवास केला.

पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसमुळे प्रवासाचे नवीन पर्व

 पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसमुळे प्रवासाचे नवीन पर्व--उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कीमुंबईकरांसाठी  'बेस्ट'आणि लोकल रेल्वे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नागरिकांना चांगला प्रवास मिळावा यासाठी साडेतीन हजार कोटी रुपये निधी तरतूद केली आहे. एकेकाळी ट्राम व  बग्गी धावलेल्या मुंबई शहरातील रस्त्यांवर आता या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस धावणार आहेप्रवासाचे हे नवीन पर्व सुरू आहे. ताफ्यात समाविष्ट झालेल्यामध्ये नियमित लांब बसेसबरोबर मिडी बसेस देखील आहेत. ज्या वर्दळीच्या रस्त्यावर सहजगतीने मार्गक्रमण करतील.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक नागरिक येत असतात,  शहरातील सुविधा वाढविण्यासाठी लक्ष दिले जात आहे.

शासनाच्या कामाचा झपाटा मोठा असून शहराला कोस्टल रोडअटल सेतू मेट्रो यासह  काँक्रीट रस्तेपूल अशा जलद आणि उत्तम दळणवळण सुविधा देण्यात येत आहेत. असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते म्हणालेकर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना दिवाळीपूर्वीच बेस्ट कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस दिला आहे. शासन कर्मचाऱ्यांसाठी हिताचे काम करते असून मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सफाई कर्मचारी अविश्रांत काम करीत असतातते खरे मुंबईचे हिरो आहेत. या सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी देखील निर्णय घेतले आहेत. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी निधी उपलब्ध करणारी योजना लागू केली आहेअशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली

Saturday, 1 November 2025

पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण

 पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण

-- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'बेस्टच्या ताफ्यात पर्यावरणस्नेही १५० बस सामील

 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज मिळेल दर्जेदार प्रवासाचा अनुभव

मुंबईदिनांक 28 : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे. 'बेस्टही मुंबईची जीवनवाहिनी असून उपनगरीय लोकल रेल्वेमेट्रो ट्रेन यांना प्रवाशांशी जोडण्यासाठी बस सेवा महत्त्वाची आहे. या बसेसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

        बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST)च्या कुलाबा येथील आगारात मुख्यमंत्री  फडणवीस यांचे हस्ते 150 नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरकौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढासांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलारमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, 'बेस्ट'च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठीअतिरिक्त महाव्यवस्थापक आर. आर. डुबल व ए.एस. राव मुख्य अभियंता राजन गंदेवारमुख्य वाहतूक व्यवस्थापक रमेश मडावी उपस्थित होते.

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने 5 हजार बसेस घेण्याचा निर्णय पूर्वीच झाला आहे. त्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  मुंबई वन ॲपच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी  'सिंगल तिकीट सिस्टीमआणण्यात आली आहे. प्रवासी भाड्याचे उत्पन्न  जास्त असेल तर बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. यासाठी हे उत्पन्न जास्तीत जास्त वाढविण्यासाठी काम केले जावेअधिक व्यावसायिक दृष्टिकोन आणला जावा. 'बेस्टसक्षमीकरणासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तत्पर आहेचअसा आश्वासक दिलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला

आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

 आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करण्याचे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

 

मुंबई दि 28 – ज्या भागात लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी केंद्रांची आवश्यकता आहेतिथे नव्याने अंगणवाडी सुरू करावी. तसेच मदतनीस व सेविकांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

 

150 दिवसांच्या कामाचा आढावाअंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या पदोन्नतीअहिल्याभवन उभारण्यासाठी जागा निश्चितीकरणबालसंगोपन योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादवआयुक्त कैलास पगारेसहसचिव वि.रा.ठाकूर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

पुण्यात अहिल्याभवन अथवा महिलांचे वसतीगृह करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीच्या माध्यमातून उभारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

तसेचबालसंगोपण योजनेसंदर्भात आढावा त्यांनी यावेळी घेतला.

ज्या अंगणवाडीमध्ये विद्यार्थी जास्त आहेत मात्रमदतनीससेविकांची संख्या कमी आहे. आणि जिथे विद्यार्थी कमी आहेत अशा अंगणवाड्यांमध्ये  सेविकांची पुनर्नियुक्ती करावी. नवीन अंगणवाड्यांची आवश्यकता कुठे आहे यासदंर्भात सर्वेक्षण करूनत्याप्रमाणे त्या प्रदेशात अंगणवाडीमदतनीस व सेविका यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच पर्यवेक्षिकाजिल्हा पर्यवेक्षिका यांना ग्रामविकास विभागातून महिला व बालविकास विभागात वर्ग करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी

 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई दि. 28 : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची सुविधा 18 सप्टेंबर पासून  दोन महिन्याच्या कालावधी करीता  उपलब्ध करण्यात आली आहे.   ई-केवायसी ची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून  आत्तापर्यंत  अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी ची प्रकिया यशस्वी पूर्ण केली आहे . इतर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यांवर उपाययोजनाबाबत  आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे.  ही प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ असूनमहिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पुर्ण करू शकतात. ज्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांनी 18 नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पुर्ण करावी.

०००

नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे

 नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे

मुंबईदि. २८ : नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉनजनजागृती रॅलीसोशल मीडियावर हॅशटॅगसह जनजागृती मोहीमकार्यशाळा तसेच शासकीय कार्यालयेशैक्षणिक संस्था आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिज्ञा वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. नशामुक्त भारत अभियानाची मुदत  नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढविण्यात आली असून या कालावधीत नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

   समाजातील सर्व घटकांपर्यंत नशाविरोधी संदेश पोहोचवून "नशामुक्त भारतखुशहाल भारत" हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी तसेच एनसीसी स्वयंसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून अंदाजे १० कोटी लोकांपर्यंत प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून पोहोचण्याचे उद्दिष्ट आले आहे.

अभियानाच्या प्रसारासाठी "नशामुक्त भारत व खुशहाल भारत" या टॅगलाईनसह तयार केलेल्या मॉस्कॉटचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक आणि महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड स्कॅनर बसवून सामूहिक प्रतिज्ञा घेण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

Featured post

Lakshvedhi