Tuesday, 1 November 2022

जूनपासून बल्लारपूर येथे सुरू होणार एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र

 जूनपासून बल्लारपूर येथे सुरू होणार एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र

                             

            मुंबईदि. 1 : महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात एसएनडीटी विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ झालेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे सुरु करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी सातत्याने पाठपुरावा केला होता. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून येथे रोजगारभिमुख आणि कौशल्यधारित अभ्यासक्रम सुरु करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. श्री पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी यासंदर्भात झालेल्या बैठक झाली व निर्णय घेण्यात आला.

            एस.एन.डी.टी.अर्थात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुरु करण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडाएसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्ज्वला चक्रदेवउच्च व तंत्रशिक्षण संचालक धनराज माने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            श्री. मुनगंटीवार म्हणाले कीएसएनडीटी विद्यापीठाचा आतापर्यंत 7 राज्यांमध्ये विस्तार झालेला आहे. वेगवेगळे शैक्षणिकरोजगारभिमुख आणि कौशल्यधारित अभ्यासक्रमांना आज मागणी आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि येथील परिसरातील विद्यार्थीनीना आवश्यक असणारे साधारण 10 अभ्यासक्रम या विद्यापीठातून शिकविण्यात येतील. एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र बल्लारपूर येथे सुरु करण्यासाठी आवश्यक असणारी जागेची पाहणीसाधनसामुग्री तसेच केंद्र सुरु झाल्यानंतर आवश्यक असणारे मनुष्यबळशिक्षित प्राध्यापक याबाबतचा आढावा प्रत्यक्ष घेण्यात येईल.

            नवीन शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरु होत असल्याने प्राथमिक टप्प्यात चंद्रपूर येथे असलेल्या अत्याधुनिक दोन शाळांमध्ये अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि एसएनडीटी विद्यापीठाने पार केलेली शताब्दी याचा मेळ घालून काही नवीन उपक्रमही विद्यापीठामार्फत सुरु करण्यावर भर देण्यात येईल असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

            श्री. पाटील म्हणाले कीचंद्रपूर येथील बल्लारपूर येथे एसएनडीटी केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक निधीबाबत सविस्तर प्रस्ताव करावा. तसेच सध्या पहिल्या टप्प्यात आवश्यक निधी सामाजिक उत्तरदायित्व निधीजिल्हा नियोजन निधी याव्यतिरिक्त कसा उभा करता येईल याबाबतही सविस्तर प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे तातडीने सादर करण्यात यावा. आवश्यक पदभरती होईपर्यंत करार पध्दतीवर नेमणूका करुन काम सुरु करण्यात यावे. स्थानिक रहिवाशांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे. दुर्गम भागातील हे केंद्र महिलांना आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्वाचे ठरेल, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल पदभरती

 शारीरिक शिक्षकग्रंथपाल पदभरतीसाठी कार्यवाही करावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 1 : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालकग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदांचा आढावा घेऊन संबंधित पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान दरात 60 टक्के वाढ करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

            मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदांचा तसेच वस्त्रोद्योग विभागातील सुतगिरण्यांच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीनियोजन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रेवित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्तावस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,उच्च शिक्षण संचालक धनराज माने,तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसहायक प्राध्यापक पदाबरोबरच शारीरिक शिक्षण संचालकग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदे भरण्यासंदर्भात पदांचा आढावा घेऊन पदभरतीची कार्यवाही करावी. तसेचराज्यातील अभिमत विद्यापीठातील आर्थिक व सामाजिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाची प्रचलित शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्यासाठी अभिमत विद्यापीठांचा शुल्क नियंत्रण समितीच्या अंतर्गत कार्यवाही करणे बंधनकारक असणार आहे. तसेचमहाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरीत करण्यास विलंब होऊ नयेयासाठी उपाययोजना आखण्याच्या सूचनाही संबंधित विभागास देण्यात याव्यात.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्यादृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाने शिक्षकीय पदांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे हीत विभागाची निकड विचारात घेता वित्त विभागाकडे सादर केलेल्या रिक्त जागा पैकी 2 हजार 88 पदांच्या पदभरतीस मान्यता दिली आहे. याची कारवाही सुरू आहे. परंतु शारीरिक शिक्षण संचालकग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदभरण्यास मान्यता देणे गरजे असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

            पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे वेतन थकित राहू नये यासाठी उपाययोजना आखण्यात याव्यात व प्रलंबित वेतन तातडीने वितरीत करण्यात यावे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्यात वाढ तसेचराज्यातील विधी विद्यापीठाच्या बांधकाम व दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बैठकीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी संपादित केलेल्या जमिनीसंदर्भातनवीन अध्यासनस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अत्याधुनिक उपकरणांचा समावेश करण्यासदंर्भात चर्चा करण्यात आली.

सूतगिरण्यांच्या पुनर्वसनासाठी नव्याने प्रस्ताव सादर करावे

            सहकारी सूत गिरण्यांना राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या योजनेअंतर्गत आधुनीकीकरणविस्तारीकरण आणि पुनर्वसन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सूतगिरण्यांचे पुनर्वसन करताना प्रत्येकी सूतगिरणीचे पुनर्वसन होत आहे काअर्थसहाय केल्यानंतर सूतगिरण्या नव्याने सुरू होत आहेत का, यासदंर्भातील अहवाल सादर करावा. त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया राबवावी, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


मानसशास्त्र

 वर्गात प्राध्यापकांनी मानसशास्त्राचा तास घ्यायला सुरुवात केली होती.

तेवढ्यात मागून एका मुलाने शिट्टी वाजवली...

प्राध्यापकांनी शिट्टी कोणी वाजवली असं विचारल्यावर संपूर्ण वर्ग शांत बसला मात्र कोणीच नाव सांगितलं नाही...

सरांनी हातातला खडू खाली ठेवला

आणि म्हणाले : "आपला आजचा तास इथेच संपतो आहे,

पण राहिलेला वेळ सार्थकी लावण्यासाठी मी तुम्हाला कालच रात्री घडलेला एक किस्सा सांगतो...!"


किस्सा ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कान टवकारले...

"काल रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती.

वेळ काढायचा म्हणून गाडीत पेट्रोल भरून येऊ असा विचार माझ्या मनात आला म्हणून गाडी काढून मी पेट्रोल भरून घेतलं.

पेट्रोल भरल्यावर सहजच मी एका शांत रस्त्यावर गाडी वळवली.

रस्त्याच्या कोपऱ्यावर एक अतिशय सुंदर मुलगी उभी होती.

मी गाडी तिच्याजवळ थांबवून तिला विचारलं : "मॅडम,

मी आपली काही मदत करू शकतो का...?"

"हो ,मला घरापर्यंत सोडू शकलात तर फार बरं होईल...!"

गाडीचा दरवाजा उघडून मी तिला आत घेतलं,आणि तिच्या घराच्या दिशेने गाडी वळवली.

वाटेत आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो . सौन्दर्यासोबतच बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या निवडक स्त्रियांमध्ये मी तिचा समावेश करेन...

तिच्या घराशी पोहचल्यावर तिने लाजत लाजत कबूल केले की माझ्या सहृदय वागण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली आहे...

मी ही तिच्या सौन्दर्याची आणि बुद्धिमत्तेची तारीफ करत तिच्या प्रेमात पडल्याची कबुली तिला दिली.

एकमेकांशी बोलताना मी तिला माझ्या पेशाबद्दल सांगितलं..

निरोप घेताना आम्ही फोन नंबरची अदलाबदल केली.

अगदी शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तिचा भाऊ मी शिकवत असलेल्याच महाविद्यालयात शिकतो ,त्यामुळे होणारा दाजी या नात्याने मी त्याची काळजी घ्यावी.

मी तिला त्याचं नाव विचारलं त्यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही त्याला त्याच्या खास सवयीवरून लगेच ओळखाल...

'तो अतिशय उत्तम शिट्टी वाजवतो’ 😘

प्राध्यापकांच्या या वाक्यावर अख्खा वर्ग मगाशी शिट्टी वाजवलेल्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागला...😉

प्राध्यापक महाशय त्या विद्यार्थ्याकडे बघून हसून म्हणाले: 😊


" माझी मानसशास्त्राची पदवी व ज्ञान मी विकत घेतलेलं नाही तर स्वकष्टाने प्राप्त केलं आहे... 

निघ बाहेर वर्गाच्या...!


😄 😅 😃




🙏🙏

Jine ka मजा kutch aur hai

 



पटलं तर व्यय म्हणा

 *नाना पाटेकर यांचा ब्लॉग वाचायलाच हवा. ब्लाॅग असा आहे:*

*शिर्डी साईबाबा* 

प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० करोड  + सोने  ३२  करोड, + गुंतवणूक ४२७ करोड.

*सिद्धीविनायक, मुंबई:* 

पैसे - २००  करोड , FD : १२५ करोड. 

*लालबागचा राजा:*

१८  करोड कमाई फक्त  गणपतीच्या  १०  दिवसातली.

गावाकडे दोन रुपये हरवले तर पोराला घेऊन भर उन्हात तो अर्धा दिवस हुडकत बसणारे शेतकरी /मजूर मी स्वतः पाहिलेत अन *त्याच मजुरांना देवाच्या दानपेटीत सढळ हाताने 5-10 रुपये टाकतानाही पाहिलंय.*

*फक्त 3 देवस्थानांची वेल्थ हजार करोडच्या आसपास आहे.* 12-12 हजारासाठी आत्महत्या करणारे शेतकरी एका बाजूला अन अडीच हजार करोड एकट्या कुंभमेळयाला ‘अलोकेट’ करणारे आमचेच सरकार एका बाजूला.

स्वतःची अजिबात परिस्थिती नसूनही देवाला साडी-चोळी-पोषाख  करणारे, दान टाकणारे, आजवर देवांच्या दानपेट्या भर-भरून देणारे गरीब शेतकरी स्वतः जेव्हा त्रासून दुर्दैवाने आत्महत्येच्या निर्णयाला पोचतात तेव्हा हिच देवस्थाने आरामात आपला बँकेत ठेवलेल्या FDचे व्याज चाखत बसलेली असतात!!

*मग ह्या गरीबांना मरताना सुद्धा २ रुपयाची मदत न करणाऱ्या विठ्ठल-तुळजाभवानी-स्वामी समर्थ-सिद्धिविनायक देवस्थानांना मी 'भिकारी' का म्हणू नये?*

मी पत्रकार नाही, जो विचार मनात जन्मला तो आहे असा Raw स्वरुपात समोर मांडला.

एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का?            

*मुळात एवढा पैसा आला कोठून? देव कामाला गेले होते की पुजारी कामाला गेले होते, का मंदिरांच्या विश्वस्तांनी कामाला जाऊन हे करोडो रुपये घाम गाळून कमवून आणले?*

*लोकांचाच पैसा ना हा? मग आता दुष्काळात, गरज असताना लोकांनाच हा पैसा थोडासा मदत म्हणून दिला तर काय फरक पडणार आहे?*


ही तर फक्त ३ देवस्थानांची नावे होती.

आळंदी- देहू- भीमाशंकर- अष्टविनायक- महालक्ष्मी- सप्तशृंगी- शनी अन शिखर शिंगणापूर-सिद्धेश्वर यांचा आजवरच्या दानपेटीतला पैसा किती असेल??? 

अन छोटी-छोटी तर हजारो मंदिरे आहेत आपल्या देशात, राज्यात. त्यांचे पैसे किती?

मुळात म्हणजे हा पैसा नेमका कोणाचा आहे? देव स्वतःकडे ठेवतो का हा पैसा? कि बाकीचेच लोक वर्षानुवर्षे देवाच्या नावावर हा पैसा हाणतात?

दोन मिनिट असं मानलं कि भक्तांची सोय करतात, तर तसंही नाही. 

अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूरचे, गावातले सोडा नुसते मंदिरा शेजारचेच रस्ते पहा, देवाच्या गावात असूनही तोंडातून आपसूक शिवी निघून जाईल अशी परिस्थिती!

माझ्या इथं ओरडण्याने काहीच होणार नाही याची पुरेपूर जाणीव आहे मला.

*पण एक दिवस आज जन्मलेल्या या विचाराचा फायदा या पैशांच्या खऱ्या मालकांना, गरीब शेतकऱ्यांना १०० टक्के मिळवून देईन हे मात्र नक्की.*

- नाना पाटेकर


*पटलं तर पूढे forward करा आणि देशाला जागं करा.*


🇮🇳 *जय हिंद* 🇮🇳

Pensioners Life certificate


 

जिंदगी



Featured post

Lakshvedhi