Wednesday, 10 June 2026

लँड टायटलिंग कायद्यामुळे मालमत्तेला हक्काचे मालमत्ता कार्ड

 मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात

चंद्रशेखर बावनकुळे यांचा विशेष सत्कार

लँड टायटलिंग कायद्यामुळे मालमत्तेला हक्काचे मालमत्ता कार्ड

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्रातील नागरिकांच्या मालमत्ता हक्कांना कायदेशीर बळ देण्यासाठी राज्य सरकार डिसेंबरमध्ये लँड टायटलिंग कायदाआणणार असून या कायद्यामुळे प्रत्येक मालमत्तेला सरकारी हमी असलेले प्रॉपर्टी कार्ड मिळणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रख्यात आध्यात्मिक मार्गदर्शक प्रभू गौर गोपालदास यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, सकाळ समुहाचे मुख्य संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक, पुढारीच्या राजकीय संपादक मृणालिनी नानिवडेकर, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी, पत्रकार संघाचे पदाधिकारी, संपादक, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार स्वीकारल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारितेचे समाज आणि लोकशाहीतील महत्त्व अधोरेखित केले. आपल्या ३१ वर्षांच्या राजकीय प्रवासात पत्रकार आणि संपादकांनी मोठे योगदान दिल्याचे सांगत त्यांनी पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे ते म्हणाले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi