Tuesday, 9 June 2026

आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारावा

                                                                    

आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारावा

- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. ९ : आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात  प्रभावी भूमिका बजावावी, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

महाराष्ट्र लोकभवन येथे आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 126 व्या बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

            यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसेच वेगवेगळया भागातून आलेले आदिवासी बांधव, आदिवासी कलाकार,आदी उपस्थित होते.

राज्यपाल वर्मा म्हणाले की, अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जागृती घडवून आणली. अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, सामाजिक कुरीती आणि विभाजनाविरुद्ध त्यांनी उभारलेला लढा आजही प्रेरणादायी आहे.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले की,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या जनजातीय विकासाविषयीच्या भूमिकेमुळे आदिवासी समाज शिक्षण, रोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या क्षेत्रात पुढे जात आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi