Tuesday, 9 June 2026

भारतीय इतिहासातील गोंडवाना राज्य आणि गोंड शासकांच्या गौरवशाली परंपरेचे कौतुक

 भारतीय इतिहासातील गोंडवाना राज्य आणि गोंड शासकांच्या गौरवशाली परंपरेचे कौतुक करत राज्यपाल वर्मा म्हणाले की, आदिवासी समाजाने हा गौरव पुन्हा प्राप्त करण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. समाजाला कुपोषण, आजारपण आणि व्यसनमुक्त करण्यासाठीही व्यापक प्रयत्नांची गरज आहे.

आदिवासी कला, नृत्य आणि संगीताच्या जतनासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना आदिवासी विकास विभागाला देण्यात आल्या आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) यांनी देखील देशातील विविध आदिवासी समाजांचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि ज्ञानव्यवस्थेचे दस्तावेजीकरण करावे, असे निर्देश दिले असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

ज्येष्ठ तारपा वादक व लोककलावंत भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख करत राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. हा सन्मान आदिवासी लोककला आणि कलाकारांच्या गौरवाचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi