येत्या काळात महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेतील करार
· १० अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी १० प्रकल्पांची जबाबदारी
मुंबई, दि.२२ : स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या कराराच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन वाटप, परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावी. राज्यातील सामंजस्य कराराच्या अनुषंगाने प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी एमआयडीसी, उद्योग संचालनालय आणि मंत्रालयातील १० प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्येकी १० प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, याची जबाबदारी देण्यात येणार आहे.येत्या काळात महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीचा आणि त्यानंतर राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सहायभूत सेवा धोरण व एकात्मिक हरित डेटा सेंटर पार्क धोरण-२०२४ अंतर्गत स्थापित झालेल्या/होणाऱ्या डेटा सेंटर्स/एकात्मिक डेटा हरित सेटर पार्कच्या सद्यःस्थितीविषयी आढावा घेतला. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अन्बळगण, महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सीईओ पी. वेलारासु, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कंपन्यांच्या पाठपुराव्याची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन जमीन वाटप, पर्यावरण मंजुरी, बांधकाम आराखडे आणि विविध परवानग्या पुढील तीन महिन्यांत पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
No comments:
Post a Comment