Thursday, 31 July 2025

जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्राकरिता इच्छुक प्रशिक्षकांना ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्राकरिता

इच्छुक प्रशिक्षकांना ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ३१ : जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्रात क्रीडा प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक क्रीडा प्रशिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कांदिवली येथे ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

 

केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत "खेलो इंडिया" योजनेअंतर्गत देशभरात १००० खेलो इंडिया केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.  या योजनेचा उद्देश  मुलांना प्रशिक्षित करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी अधिकाधिक खेळाडू घडविणे हा आहे. या योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त केंद्रांवर शासकीय मार्गदर्शकअनुभवी प्रशिक्षक व माजी गुणवंत खेळाडू हे प्रशिक्षक म्हणून नेमण्यात येणार आहेत.

 

प्रशिक्षकाची वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे असूनउच्च दर्जाची गुणवत्ता व कामगिरी असल्यास समितीच्या मान्यतेने ५० वर्षांपर्यंत वयाचे उमेदवारही प्रशिक्षक पदासाठी पात्र ठरू शकतात. प्रशिक्षकांना ऑलिंपिकएशियन गेम्सजागतिक अजिंक्यपदआंतरराष्ट्रीय स्पर्धाराष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारएनआयएस पदविकाअधिकृत लेवल कोर्सेसबीपीएड/एमपीएड व किमान १० वर्षांचा अनुभव यांपैकी एक किंवा अधिक अर्हता असणे आवश्यक आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयशासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयसंभाजीनगर समोरआकुर्ली रोडकांदिवली (पूर्व)मुंबई – ४००१०१ या पत्त्यावर सादर करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा कार्यकारी अधिकारी, श्रीमती प्रिती टेमघरे (मो. ९०२९२५०२६८) व श्री. अभिजित गुरव (मो. ८१०८६१४९११) अथवा 20890717 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार ‘गतिमान आणि पारदर्शक कामासाठी पेपरलेस कामकाज’

 अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार

‘गतिमान आणि पारदर्शक कामासाठी पेपरलेस कामकाज’

 

मुंबईदि. ३१ : मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हा पदभार स्वीकारला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री.खारगे यांच्याकडे यापूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा कार्यभार होता. तत्पूर्वी त्यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांत महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. महसूल विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर महसूल मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे आणि अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विभागाच्या कामाचा तसेच पुढील कामाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.

समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी कायद्यांमध्ये बदल करायचा झाल्यास तो अवश्य करण्यात येईल. जाणीवपूर्वक झालेला कोणताही गैरप्रकार स्वीकारला जाणार नाहीअसे मंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले. महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे कालबद्ध पद्धतीने निकाली काढून कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावीअसे सांगून विभागाचे कामकाज यापुढे संपूर्णपणे ई- ऑफिसच्या माध्यमातून चालणार असल्याचे अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विभागाचे कामकाज गतिमानपारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने सुरू राहीलअशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध,कोकण विभागातील मदतीचा आढावा (1 जानेवारी ते 30 जुलै 2025)

 कोकण विभागातील मदतीचा आढावा (1 जानेवारी ते 30 जुलै 2025)

जिल्हा            एकूण रुग्णसंख्या     एकूण मंजूर मदत रक्कम

मुंबई शहर                 428                 4 कोटी 01 लाख 15 हजार

मुंबई उपनगर              392                 3 कोटी 61 लाख 29 हजार

 ठाणे                         1338               12 कोटी 10 लाख 10 हजार

पालघर                     153                  1 कोटी 28 लाख 41 हजार

रायगड                      219                 1 कोटी 97 लाख 03 हजार

रत्नागिरी                    164                 1 कोटी 30 लाख 60 हजार

सिंधुदुर्ग                      44                  57 लाख 79 हजार

संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणालीजिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने राबवले जात असून निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत आहे. यापुढेही जास्तीतजास्त गरजू रूग्णांना मदत केली जाणार असल्याचे
 मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 20 गंभीर आजारांसाठी मदत,आवश्यक कागदपत्रे :-,2,738 रूग्णांना 25 कोटी 86 लाखांची मदत

 मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनकोकण विभागातील

2,738 रूग्णांना 25 कोटी 86 लाखांची मदत

 

मुंबई, दि. 31 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः कोकण विभागात मागील सात महिन्यामध्ये 2,738 रूग्णांना तब्बल 25 कोटी 86 लाख 37 हजार रूपयांची मदत दिली गेली आहे.   

             मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनाआयुष्मान भारतराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमकिंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतीलतरमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

 20 गंभीर आजारांसाठी मदत -

कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे 2 ते 6), हृदययकृतकिडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे :-

•          रूग्णाचे आधार कार्ड

•          रूग्णाचे रेशन कार्ड

•          रूग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ टँग फोटो जोडणे बंधनकारक आहे.

•          तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (1.60 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे)

•          संबंधित आजाराचे वैद्यकिय रिपोर्ट जोडणे आवश्यक आहे.

•          वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र

•          रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी

•          अपघात ग्रस्त रूग्णांसाठी एफआयआर रिपोर्ट आवश्यक आहे.  

•          अवयव प्रत्यारोपण रूग्णांसाठी झेडटीसीसी नोंदणी पावती आवश्यक आहे.

सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ईमेल वर पाठवावीत.  अधिक माहिती करिता टोल फ्री क्र. 1800 123 2211 या क्रमांकावर कॉल

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० महत्वाकांक्षी योजना; सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० महत्वाकांक्षी योजना;

सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. ३० : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही माझी महत्वाकांक्षी योजना आहे.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योजनेतील कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये.या योजनेचे राज्यातील सर्व कार्यान्वयिन यंत्रणांनी कामे गतीने व कालबध्द नियोजन करून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

           सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० साठी जमीन उपलब्धता आणि इतर आनुषंगिक विषयांसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना  बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला उपस्थित होते.

           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना माझी अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. खासगी आणि शासकीय जागेत विकसित होणा-या सौर प्रकल्पासाठी स्थानिक यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.जिल्हास्तरीय टास्क फोर्सने या योजनेच्या वेळोवेळी होणा-या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घ्यावा.कामे करण्यासाठी ना- हरकत दाखले,विकासकांना येणा-या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेतून सप्टेंबर २०२५ पर्यंत पाच हजार मेगावॅटपर्यंत वीज उपलब्ध होईल याप्रकारे जिल्हानिहाय कामांना गती देण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार,महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी

 ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये

महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी

 

मुंबईदि. २९ : ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यानराज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरउपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताप्रधान सचिव नविन सोनाआरोग्य विभागाचे सचिव निपुन विनायकविरेंद्र सिंहवित्त विभागाच्या सचिव ए. शैलाआरोग्य विभागाच्या आयुक्त कादंबरी बलकवडेठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेआरोग्य संचालकसहसंचालकजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार आदी उपस्थित होते.

ठाणे जिल्हा रुग्णालया अद्ययावत होत असून त्यामध्ये ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय२०० खाटांचे महिला रुग्णालय आणि २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय असे एकूण ९०० खाटांचे हे रुग्णालय तयार होत आहे. त्याचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून विद्युतीकरणयंत्रसामग्री बसविणे आदी कामे सुरू आहेत. साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून या ९०० खाटांच्या रुग्णालयासाठी सुमारे १०७८ नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करतानाच अद्ययावत यंत्रसामग्री बसविण्यावर भर देण्यात यावा. मंत्रालयात या रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव श्री. सोना यांना दिले. हे जिल्हा रुग्णालय ठाणे जिल्ह्यासोबतच रायगडनवी मुंबईपालघर याभागातील नागरिकांसाठी वरदान ठरेलअसेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यानठाणे जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतानाच राज्यातील महापालिका रुग्णालयामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीची मोहिम हाती घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोगगर्भाशयाचा कर्करोग याविषयी जागृती वाढावी आणि उपचारापेक्षा प्रतिबंध यावर भर देण्यासाठी ही तपासणी मोहीम घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यातील आरोग्य केंद्रांची स्थितीत्यांना लागणारी औषधेसाहित्यसामग्री याच्या आढाव्यासाठी आरोग्यमंत्रीसचिवांनी अचानक भेटी देऊन पाहणी करण्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

००००

भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्यात 'शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा होणार

 भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस

राज्यात 'शाश्वत शेती दिनम्हणून साजरा होणार

- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

            मुंबई, दि. २९ : हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने निमित्त जन्मदिवस ७ ऑगस्ट हा दरवर्षी ‘'शाश्वत शेती दिनम्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

           भारतरत्न डॉ. स्वामिनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढीकरिता केलेल्या संशोधनामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. त्यांच्या महान कार्य, योगदान, समर्पण आणि नम्रतेसाठी भारत सरकारने त्यांना २०२४ मध्ये भारतरत्न’ नागरी पुरस्काराने सन्मानित केले. तसेचसंयुक्त राष्ट्रांनी त्यांना आर्थिक पर्यावरणाचे जनक असे गौरवले आहे. 'शाश्वत शेती दिनानिमित्तराज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर’ स्थापन करण्यात येणार आहे.

भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान, शाश्वत शेतीहवामान अनुकूलन, महिला शेतकरी इ. बाबीतील विशेष कार्य विचारात घेऊन त्यानुंषगाने ‘शाश्वत शेती दिन’ राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर, विद्यापीठस्तरावर साजरा करणे, त्यांच्या नावे पुरस्कार देणे आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कृषी आयुक्त कार्यालयाला या दिवसाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्याचे असे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

*****

Featured post

Lakshvedhi