Monday, 4 August 2025

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना

 शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना

  • शासन निर्णय निर्गमित

 

मुंबईदि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

डिजीटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी साधन असले तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसारखोटी माहिती पसरवणेतसेच शासकीय नियमांचे उल्लंघन होवू नये याकरिता मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसारमहाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम१९७९ हे सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू राहतील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम१९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना :-

राज्य शासनातील अधिकारी-कर्मचारीस्थानिक स्वराज्य संस्थामंडळेमहामंडळेसार्वजनिक उपक्रम तसेच प्रतिनियुक्तीने किंवा करारपद्धतीने नेमलेले कर्मचारी यांना हे नियम लागू राहणार आहेत.

शासनाच्या किंवा भारतातील कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलिकडच्या धोरणावर प्रतिकूल टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा.

वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंट स्वतंत्र ठेवावेत. केंद्र किंवा राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट किंवा अॅपचा वापर करू नये. शासकीय योजना व उपक्रमांच्या प्रसारासाठी केवळ अधिकृत आणि प्राधिकृत माध्यमांचा वापर करावा.

कार्यालयीन कामकाजाच्या समन्वयासाठी व्हॉट्सअॅपटेलिग्रामसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल.

शासकीय योजनांच्या यशस्वितेसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करता येईलमात्र त्यातून स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. वैयक्तिक अकाऊंटवर शासकीय पदनामलोगोगणवेशशासकीय मालमत्तेचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू नयेत. आक्षेपार्हद्वेषमूलकभेदभाव करणारा मजकूर पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे मनाई आहे. प्राधिकृत मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज सोशल मीडियावर अपलोड करू नयेत. बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे.

शासनाने स्पष्ट केले आहे कीया नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल. डिजिटल युगात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व्हावा आणि शासकीय यंत्रणेचा विश्वासार्हता अबाधित राहावीयासाठी नियमावली करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील पर्यटनविषयक विविध महोत्सव, कार्यक्रम आणि उपक्रमांनाकार्यक्रमांसाठी प्रायोजकत्वाचे प्रस्ताव

 महाराष्ट्रातील पर्यटनविषयक विविध महोत्सव, कार्यक्रम आणि उपक्रमांनाकार्यक्रमांसाठी प्रायोजकत्वाचे प्रस्ताव

ऑनलाईन सादर करणे बंधनकारक

मुंबई दि. 28 : महाराष्ट्रातील पर्यटनविषयक विविध महोत्सवकार्यक्रम आणि उपक्रमांना प्रायोजकत्व मिळवण्यासाठी महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे. यापुढे प्रायोजकत्वासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सर्व प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या maharashtratourism.gov.in  या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे, पर्यटन विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या संदर्भात30 एप्रिल2025 च्या शासन निर्णयानुसार हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत विविध शासकीय संस्थासेवाभावी संस्था आणि खासगी संस्थांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या पर्यटनविषयक कार्यक्रमांचे प्रायोजकत्वाचे प्रस्ताव थेट कार्यालयात सादर केले जात होते. नवीन कार्य पद्धतीनुसारकोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर पर्यटनविषयक प्रायोजकत्वाचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

यासाठी संदर्भाकरिता https://sponsorship.maharashtratourism.gov.in  ही थेट लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.  सर्व संबंधित शासकीय संस्थासेवाभावी संस्था आणि खासगी संस्थांना आवाहन करण्यात येत आहे कीत्यांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि यापुढे प्रायोजकत्व निधी मागणीचे प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावेत. स्थानिक पातळीवरील संबंधितांनाही याबाबत माहिती देण्याची सूचना देण्यात आली आहे.

हा निर्णय पर्यटन विभागाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. यामुळे प्रायोजकत्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे निधी वितरणात एकसमानता आणि गतिमानता येईलतसेच प्रशासकीय कामकाजात सुलभता येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

हर घर तिरंगा तिसरा टप्प्या 13 ऑगस्टपासून सुरू होणार www.harghartiranga.com

 तिसरा टप्प्या 13 ऑगस्टपासून सुरू होणार असून यात प्रत्येक घरकार्यालयवाहने यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवा यासाठी ध्वजारोहणच्या सेल्फी काढून केंद्र शासनाच्या www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना सचिव डॉ.कुलकर्णी यांनी दिल्या.

हर घर तिरंगा 9 ऑगस्टपासून होत असून यात ‘तिरंगा महोत्सव’ राबविला जाईल. त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्सर्ट कार्यक्रम pl share

 दुसऱ्या टप्प्याची सुरूवात 9 ऑगस्टपासून होत असून यात ‘तिरंगा महोत्सव’ राबविला जाईल. त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्सर्ट कार्यक्रम हर घर तिरंगा राबविण्यात येणार आहेतअसे सांगून सचिव डॉ.कुलकर्णी म्हणाले कीतिरंगा मेळाव्याचे आयोजन राज्यात होणाऱ्या सरस महोत्सवासारखे करण्यात येणार आहे. यात तिरंगाचे प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्वांना सहज आणि सुलभरित्या तिरंगा उपलब्ध व्हावायासाठी महिला बचत गटाकडे तिरंगा निर्मिती व विक्रीचे काम देण्यात यावे. जिल्हा व गाव पातळीवर तिरंगा बाईक रॅली किंवा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात यावे. त्याचबरोबर या कालावधीत प्रत्येकांच्या हातात तिरंगा देऊन तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात यावे. या मोहिमेत राज्यातील प्रत्येक विद्यार्थीतरूण-तरूणी आणि नागरिक यांचा सहभाग वाढवून मनुष्यसाखळी तयार करावी तसेच मोठ्या प्रमाणावर देशभक्तीपर गीते आणि राष्ट्रगीते लावण्यात यावीअसेही डॉ.कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरूवात, पहिला टप्पा

 राज्यात हर घर तिरंगा’ अभियानाची  सुरूवात

सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी

मुंबईदि. 1 : देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावेराज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावेया उद्देशाने 2 ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात यावेअशा सूचना सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी दिल्या.

केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा’ अभियान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबविला जाणार आहे. यासंदर्भात सचिव डॉ.कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊतउपसचिव महेश वाव्हळसांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरेराज्य मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक अंजली ढमाळ तसेच दृरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तसेच विभागीय आयुक्तसर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

राज्यात मागील तीन वर्षापासून हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येत असल्याचे सांगून सचिव डॉ.कुलकर्णी म्हणाले कीपहिला टप्पा 2 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविला जाईल. दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट 2025 तर तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगामय वातावरण निर्मिती व्हावीयासाठी महत्त्वाच्या ठिकाणी दृश्य माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तिरंगा स्वयंसेवक यांची नोंदणी करून उत्कृष्ट काम केलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देणेशाळेच्या भिंतीवर तिरंगाचे चित्र काढणेतिरंगाविषयक बाबींचे प्रदर्शन भरवणेरांगोळी स्पर्धा आयोजित करणेमाय गर्व्हमेंट या संकेतस्थळावर प्रश्नमंजूषेत सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करणेतिरंगा राखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून पत्रलेखन करून ते जवानपोलीसांना पोस्टल सेवेद्वारे पाठविणे. स्वत:चे घरआजुबाजूचा परिसरसार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणेतिरंगाची रोषणाई आणि लाईटिंग करणे असे विविध उपक्रम 2 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे सचिव डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित

चित्रपट प्रदर्शित करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणेदि.१: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवनत्यांचे महान कार्यअजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईलयाकरीता निधी कमी पडू देणार नाहीअसे आश्वासित करुन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेलअशी ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंड क्रमांक ५६ आणि ७ च्या साहित्य प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलविधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेनगरविकास राज्य मंत्री माधुरी मिसाळआमदार अमित गोरखेविजय शिवातारेसुनील कांबळेहेमंत रासणे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणु गोपाल रेड्डीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडवलीसमाजाला तेजस्फुलिंग दिले. साहित्यातील एक एक व्यक्तीरेखा जिवंत केल्या. यांच्या लिखाणामध्ये करुणासंवेदनाक्रांतीकाव्य आणि एक वैश्विकता पहायला मिळते. त्यांचे साहित्य जगातील २२ भाषेत अनुवादित झाले असून त्या-त्या देशात ते प्रसिद्ध आहे. तसेच देशातील विविध विद्यापीठात त्यांच्या साहित्यांवर संशोधन सुरू आहे.  रशियामध्ये त्यांच्याबद्दल असलेला सन्मानआत्मीयतात्यांच्या साहित्यावर होणारा अभ्यास बघता अभिमानाने ऊर भरुन येतोभारत मातेच्या या सुपुत्राचे साहित्य खऱ्याअर्थांने वैश्विक झाले आहे.

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कथाकादंबरीलोकनाट्यनाटकसिनेमा पटकथालावणीपोवाडेप्रवास दर्शन आदी साहित्यातील प्रत्येक अंगात बहारदारपणा आणला आहे. त्यांनी ४९ वर्षाच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक कादंबऱ्या आणि विविध प्रकारच्या रचना लिहिल्या आहेत. त्यांच्या साहित्यावर आज हजारो लोक पीएचडी करीत आहेत. खऱ्या अर्थाने ते एक चालते बोलते विद्यापीठ होतेअसेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

 

 संताच्या मांदियाळींनी समाजाच्या विषमतेवर प्रहार करतांना समाजामध्ये सुधारणा करुन एकत्रित करण्याचा प्रयत्न केलासाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी त्याच भावनेने तत्कालीन समाज व्यवस्थेची मांडणी करतांना आंर्तभावनावेदनासंवेदना दर्शवितांना कुठेही कटुता आणली नाही. त्यांचे समाजाला एकत्रित करणारे साहित्य आहे. संपूर्ण समतायुक्त समाज निर्माण करण्याचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या पोवाडागीतांनी  तरुणाईला स्फूर्ती देण्याचे काम केले.

 

रशियात असतांना वीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून आलेलो आहेयाठिकाणी वीरांना वदंन करण्याकरिता आलेलो आहेअसे त्यांनी सांगितले. नैराश्य हे तलवारीवर साचलेले धुळीसारखे असतेधुळ झटकली की तलवार पुन्हा धारधार होतेपृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर उभी आहेअसे प्रेरक विचार त्यांनी दिले.

 

अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनातून त्यांचे व्यक्तीमत्व मोठे झाले. त्यांच्या  लेखणीतून समाजाला दिशाप्रेरणासामान्य माणसाला बळवंचिताचा आवाज देण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य समाजासमोर आणण्याचे काम सुरू आहे. समाजाची मूलतत्त्वे सांगणारेसंवेदना जीवंत ठेवणारे अजरामर साहित्य पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेयादृष्टीने संशोधन झाले पाहिजे. साहित्यरत्नलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाकरिता २५ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेस्मारकाचे आराखडेही तयार झाले आहेत. येत्याकाळात लवकरात लवकर स्मारक पूर्ण करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

कालमर्यादेत निश्चित करून जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु

 कालमर्यादेत निश्चित करून जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुल व

 शैक्षणिक भवनचे लोकार्पण

नागपूरदि.१ :  जगातील अनेक जुन्या संस्कृती कालागणिक व्यपगत झाल्यानामशेष झाल्या परंतु भारतीय संस्कृतीला सनातन स्वरुपात टिकवून राहता आले. भारतीय संस्कृतीला टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य संस्कृत भाषेच्या माध्यमातून शक्य झाले. स्थापत्यआयुर्वेदखगोलगणितरसायन आदी ज्ञानशाखेतील ज्ञानभंडार संस्कृत भाषेमध्ये असून त्याला समाजापुढे नेण्यासाठी कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुल व शैक्षणिक भवनचे लोकार्पण व विद्यार्थी भवनचे भूमिपूजन वारंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवतउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलवित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जायस्वालकुलगुरु हरेराम त्रिपाठीसंस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे उपस्थित होते.

संस्कृत भाषेचे विद्यापीठ साकारण्यासाठी डॉ. श्रीकांत जिचकार व माजी संस्थापक कुलगुरु डॉ. पंकज चांदे यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला. कविकुलगुरु कालिदास यांच्या नावाने हे विद्यापीठ असल्याने ते रामटेक येथे व्हावे अशी सुरुवातीला संकल्पना होती. तथापि संस्कृत भाषेच्या या ज्ञानपिठाला वैश्विक स्तरावर पोहचणे सुलभ व्हावे यासाठी आपण रामटेक तालुक्यातील व नागपूर पासून जवळ असलेल्या शैक्षणिक संकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारंगा येथे हे संपूर्ण ज्ञानसंकुल विकसित करण्याचा निर्णय घेतला. येथे शेजारीच असलेल्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर येत्या काळात निश्चित कालमर्यादेत जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु, असे त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय संस्कृतीभारतीय जीवनमूल्यभारतीय जीवनपद्धती याला अधोरेखित करुन यातील जीवनमूल्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी डॉ. हेडगेवार यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. संस्कृत ज्ञान भाषेतील हे मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. ती आपली ज्ञानभाषा आहे. 102 अब्ज 78 कोटी 50 लक्ष एवढी शब्दसंख्या संस्कृतमध्ये आहे. जगातील समृद्ध भाषा म्हणून संस्कृतकडे पाहिले जाते. या विद्यापिठाच्या माध्यमातून आपण संस्कृतला अधिक समृद्ध करु, या असे त्यांनी सांगितले.

संस्कृत भाषा मला शिकण्याची इच्छा आहे. माझी आई संस्कृतमध्ये एम. ए. असून भविष्यात या विद्यापिठाच्या सेवेत माझी समिदा मी निश्चित देईलअशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

Featured post

Lakshvedhi