Friday, 5 May 2023

जलद न्यायासाठी पर्यायांचा स्वीकार गरजेचा

 जलद न्यायासाठी पर्यायांचा स्वीकार गरजेचा


राज्यस्तरीय वकिल परिषदेत न्यायमूर्ती भूषण गवई यांचे मत


 धाराशिव, दि. 5 - न्यायव्यवस्थेवरील वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणाऱ्या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक काळातील साधणे, तंत्रज्ञानाचा स्वीकार करून काम करणे गरजेचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.

       शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषदेच्यावतीने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वकिल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पाटील होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, न्यायमूर्ती नितीन सांबरे, पालक न्यायमूर्ती अरूण पेडनेकर, ई-कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाणा, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग, राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मनन कुमार मिश्रा, माजी न्यायमूर्ती व्ही. के. जाधव, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  


      पुढे बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले की, सर्व कायद्यांची भूमी असलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे आपला देश एकसंघ आहे. राज्यघटनेच्या निर्मितीत महत्वाचे योगदान असलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबवडे गावाचा तालुका असलेल्या मंडणगड येथे अजूनही न्यायालय नाही. डॉ. आंबेडकर यांच्या वकिली व्यवसायाला 3 एप्रिलला शंभरी पूर्ण झाली. देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. याचेच औचित्य साधून न्यायव्यवस्थेत सकारात्मक आणि आधुनिकता आणली जात आहे. राज्यातील कोल्हापूर येथे खंडपीठाची निर्मिती आणि डॉ. आंबेडकर यांच्या गावाचा तालुका असलेल्या मंडणगड येथे न्यायालय सुरू होण्यासाठी कार्यवाही सुरू आहे, असे नमूद केले.


      कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. मिलींद पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी धाराशिवच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या उपस्थितीत वकिल परिषद घेण्याचा मान बार कौन्सिलला मिळाला असल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी अ‍ॅड. जयंत जायभावे, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राज्यातील 14 ज्येष्ठ विधीज्ञांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेच्यावतीने 384 विधिज्ञ मंडळांतील वकिलांना ई-फायलिंगची अडचण दूर करण्यासाठी देण्यात येणाऱ्या संगणक संचाचे मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.


    कार्यक्रमास राज्यातील जवळपास दोन हजार वकिल उपस्थित होते. शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचावा

न्याय सर्वांसाठी या तत्वाला साजेसे काम न्यायव्यवस्थेतील सर्व घटकाकडून अपेक्षित आहे. न्यायालयात असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याला आधुनिकतेची जोड म्हणून ई-फायलिंगचा पर्याय अंमलात आला आहे. त्यामुळे याचा फायदा न्यायापासून वंचित असलेल्या समाजातील शेवटच्या घटकाला होणे गरजेचे आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला यांनी व्यक्त केले.


तंत्रज्ञानाचा नकारात्मक वापर निरर्थक


         समाजात तंत्रज्ञानाचा चांगल्या आणि चुकीच्या गोष्टींसाठी वापर होत आहे. दुर्दैवाने चुकीच्या गोष्टीसाठी याचा अधिक वापर होत आहे. परिणामी मानवी बुध्दीमता कृत्रिम तंत्रज्ञानाच्या वापराने अधिक कमकुवत होत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वाईट वापर होत असल्यामुळे गूगलचे सहसंचालक डॉ. हिन्टेन यांना राजीनामा द्यावा लागला. तर सकारात्मक बाबतीत स्वातंत्र्य संग्रामाचा लढा अधिक विस्ताराने मांडण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली असती तर ती अधिक विस्ताराने आणि नवीन माहितीच्या आधारे मांडता आली असती. परंतु आजही स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्याबाबत लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रत्येक आवृत्तीत तोच मर्यादीत मजकूर आढळतो आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टीसाठी, बुध्दीमत्तेच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, असे आवाहन कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी केले. 


********

राज्यात 6 मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन

 राज्यात 6 मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन


- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. 5 : कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत शनिवार 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन केले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.


            राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे व बदलत्या काळास अनुसरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.


           सर्व जिल्ह्यांमध्ये नियोजित ठिकाणी शिबीरांचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या करिअर शिबीरांच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक-युवती व पालकांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. करिअर शिबीराच्या ठिकाणी विविध स्टॉलच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीनंतर करिअर कसे निवडावे, दहावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनियरिंग व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व त्यातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था, परदेशातील उच्च शिक्षण आदींविषयी मार्गदर्शन देण्यात येणार आहे.


            या संधीचा लाभ घेण्यासाठी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी (आयटीआय) संपर्क साधावा, तसेच सोबत जोडलेल्या क्यूआर कोड (QR CODE) च्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी नोंदणी करून शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांनी केले आहे.


मुंबईत कुर्ला येथे आयोजन


            छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे उद्या शनिवार दिनांक 6 मे रोजी कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भविष्यात रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

लोकप्रतिनीधींच्या मतदारसंघांतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 लोकप्रतिनीधींच्या मतदारसंघांतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा.

राज्यात सुरू असलेली विकासकामे 'मिशन मोडवर' पूर्ण करावित.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

            मुंबई, दि. 5 : राज्यात सुरू असलेली आणि प्रस्तावित विविध विकासकामे मिशन मोडवर पूर्ण करावित. जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विविध विभागांच्या सचिवांना दिले.


            खासदार गजानन किर्तीकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित साटम, आमदार संजय गायकवाड या लोकप्रतिनीधींच्या मतदारसंघांमधील विविध विकास कामांविषयी आढावा घेणारी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यावेळी उपस्थित होते.


            लोकप्रतिनिधींच्या मतदार संघांमध्ये सुरू असलेले रस्ते, उद्याने, जलसिंचन प्रकल्प, वळण रस्ते, उड्डाणपूल ही विकासकामे कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ह्या सर्व विकासकामांचा प्रत्यक्ष फायदा सामान्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांना गती देऊन कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खेळांची आणि मनोरंजनाची मैदाने देखभाल तत्वावर हस्तांतरित करण्यास शासनाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी यावेळी खासदार श्री. किर्तीकर, श्री. शेट्टी यांनी केली. याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात एक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले. वर्सोवा अंधेरी येथील खाडीतील गाळ काढणे, त्या ठिकाणी नवीन मच्छ‍िमार जेट्टी बांधणे याविषयी चर्चा झाली.


            आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाणा मतदारसंघातील विविध विषयांबाबत यावेळी चर्चा झाली. बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेमुळे सुमारे ४३ हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे या योजनेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले.


            बुलढाणा शहरालगत कृषी महाविद्यालय स्थापन करणे, मोताळा तालुक्यात नवीन एमआयडीसी स्थापन करणे, बुलढाणा शहराला रिंग रोड मंजूर करून बुलढाणा-खामगाव रस्त्यावरील बोथा अभयारण्यात उड्डाणपूल बांधणे, राजूर घाटात एकेरी वाहतूक करणे, आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.


०००००

मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचाआढावा घेऊन धोरण निश्चित करणार

 मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचाआढावा घेऊन धोरण निश्चित करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या 56 प्रकल्पांसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश


            मुंबई, दि.5 :- मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा. या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह, विविध पर्याय तपासण्यात यावे. प्रकल्प रखडवणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना भाडे न देणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


            आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखालील दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या इमारतींच्या रहिवाश्यांच्या शिष्टमंडळासमवेत आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाच्या मुंबई इमारत व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरूण डोंगरे आदी उपस्थित होते.


            बैठकीत आमदार श्री. सरवणकर यांनी दादर परिसरातील उपकर प्राप्त इमारतीच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांची माहिती दिली. या परिसरातील अशा रखडलेल्या ५६ इमारतींमधील सुमारे साडेतीन हजार कुटुंबांची परिस्थिती बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले.


            त्यावर निर्देश देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या प्रकरणाचे गांभीर्य आमदार श्री. सरवणकर यांनी संवेदनशीलपणे अनेकदा दाखवून दिले आहे. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांबाबत धोरण निश्चित करण्याची गरज आहे. यासाठी आम्ही काम देखील सुरु केले आहे. विशेषतः दादर परिसरातील या ५६ इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाची सर्वंकष माहिती घेण्यासाठी, प्रत्येक इमारतीचे प्रश्न वेगळे असतील, तर त्याबाबत अभ्यास कऱण्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येईल. तसेच एक आर्किटेक्टही नियुक्त कऱण्यात येईल. जेणेकरून या क्लस्टर डेव्हलपमेंटसह अन्य कोणते पर्याय आहेत, ते अभ्यासले जाईल.


            या दरम्यान म्हाडाने विहीत नियमानुसार पुनर्विकास रखडवणाऱ्या विकासकांवर कारवाई करावी. त्यांना नोटीस देणे, प्रकल्प अधिग्रहीत करण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी. काही विकासक पुनर्विकसित इमारतीतील जागा देण्याबाबत या कुटुंबांना टाळाटाळ करत असतील, तर त्यांनाही समज देण्यात यावी. गेली कित्येक वर्षे पुनर्विकास रखडल्याने मुंबईतील या मूळ घर मालकांना मुंबईच्या बाहेर जावे लागले आहे. यामध्ये शासन म्हणून लक्ष घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. रखडलेले हे पुनर्विकासाचे म्हाडाप्रमाणेच अन्य यंत्रणांच्या माध्यमातून कसे पूर्ण करता येतील यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.


            यावेळी उपस्थित रहिवाश्यांनीही आपले म्हणणे मांडले. या सर्वांचे म्हणणे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी आस्थेवाईकपणे ऐकून घेतले. या नागरिकांच्या तक्रारी-म्हणण्याची म्हाडाने नोंद घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

योग्य आहार व जीवनशैली देईल थायरॉईडपासून सुटका*

 * 

 *योग्य आहार व जीवनशैली देईल थायरॉईडपासून सुटका* 

 

आज आपण थॉयराईड झाल्यावर काय काय आहार घ्यावा ते पाहूया.


आजकाल वजन वाढायला लागले की, डाॅक्टर थायरॉईडची तपासणी करण्याचा सल्ला देतात. हो. कारण अचानक वाढणाऱ्या वजनाच्या मुळाशी थायरॉईड असू शकते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. पण घाबरु नका योग्य आहार तुमचे या आजारापासून रक्षण करु शकतो.


बरं हे थायरॉईड प्रकरण नेमकं काय आहे. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे असते. 


थायरॉईड आहे हे कसे ओळखावे. साधारणपणे थायरॉईडची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसतात. 

बद्धकोष्ठता (संडासला साफ होत नाही.), शरीराचं वजन अचानक कमी जास्त होत राहते, हात पाय थंड पडतात, त्वचा कोरडी पांढरी पडते, ताण तणाव वाटतो, आळशीपणा येतो, शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे,  केस गळणे. 

थायरॉइडचे विकार होण्याची कारणे गुंतागुंतीची असू शकतात. परंतु, काही पथ्य पाळल्यास होऊ घातलेले थायरॉइड विकार टाळता येतात. त्यासाठी आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा आहे. हर्बल ट्रीटमेंटने थायरॉईडची समस्या निश्चितपणे दूर होते.


चौरस आहार हा थायरॉईडला दूर ठेवण्यास महत्त्वाचा ठरतो.  आयोडिन, लोह, अ जीवनसत्त्व यांचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन हॉर्मोन्सच्या उत्पादनाला चालना देते.

साखर आणि पिष्टमय पदार्थांचे मर्यादित सेवन करावे. या दोन्ही पदार्थांमुळे वजन वाढते. ज्यामुळे थायरॉइडच्या उत्पादनावर आणि अभिसरणावर परिणाम होतो.

तेल-तूप-चरबी वाढविणाऱ्या पदार्थांपासून दूर राहिल्याने हृदयविकार, डायबेटिससह हॉर्मोन्सच्या विकारांवर नियंत्रण मिळवता येतो.

दररोज ३० ते ६० मिनिटे व्यायाम केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे रक्तातील थायरॉइड शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते.


अर्थातच तुम्ही विचाराल हा आजार टाळण्यासाठी काय खावे. तर

◼️सफरचंद खाणं हायपोथायराॅयडिज्म समस्येत फायदेशीर मानलं जातं. कारण सफरचंदात फायबर आणि क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं. 

◼️बेरी गटातील फळं खावीत. स्ट्राॅबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो. बेरी आणि स्ट्राॅबेरी फळांमध्ये ॲण्टिऑक्सिड्ण्टसचं प्रमाण भरपूर असतं त्याचा फायदा थायराॅइड ग्रंथीला होतो. 

◼️संत्री खाव्यात. संत्र्यामध्ये क जीवनसत्व असतं. हायपोथायराॅयडिज्म समस्येत वजन कमी करण्यासाठी संत्री उपयुक्त ठरतात.

◼️अननसात क जीवनसत्व असते.  त्यामुळे अननस अवश्य खा. 


आहाराची पथ्यं पाळल्यास थायरॉईड मध्ये वजन नियंत्रित ठेवणे शक्य होते.  

थायरॉईड ची समस्या असेल तर सोयाबीन, कोबी, ब्रोकोली, पनीर, बटर, जंक फूड, काॅफी यांचे आहारातील प्रमाण कमी करा. नियमित तपासणी करून वैद्यच्या सल्ल्याने आहार, औषधे घ्यावीत.

एक नक्की जर आहार व जीवनशैली व्यवस्थित केली तर थायरॉईडपासून नक्की सुटका होऊ शकते. 


*संकलन-* 


*डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/EiFGDjj0bY0B1VwZpV3ebm


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर  Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/EiFGDjj0bY0B1VwZpV3ebm

आज आपण थॉयराईड झाल्यावर काय काय आहार घ्यावा ते पाहूया.


आजकाल वजन वाढायला लागले की, डाॅक्टर थायरॉईडची तपासणी करण्याचा सल्ला देतात. हो. कारण अचानक वाढणाऱ्या वजनाच्या मुळाशी थायरॉईड असू शकते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. पण घाबरु नका योग्य आहार तुमचे या आजारापासून रक्षण करु शकतो.


बरं हे थायरॉईड प्रकरण नेमकं काय आहे. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे असते. 


थायरॉईड आहे हे कसे ओळखावे. साधारणपणे थायरॉईडची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसतात. 

बद्धकोष्ठता (संडासला साफ होत नाही.), शरीराचं वजन अचानक कमी जास्त होत राहते, हात पाय थंड पडतात, त्वचा कोरडी पांढरी पडते, ताण तणाव वाटतो, आळशीपणा येतो, शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे, केस गळणे. 

थायरॉइडचे विकार होण्याची कारणे गुंतागुंतीची असू शकतात. परंतु, काही पथ्य पाळल्यास होऊ घातलेले थायरॉइड विकार टाळता येतात. त्यासाठी आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा आहे. हर्बल ट्रीटमेंटने थायरॉईडची समस्या निश्चितपणे दूर होते.


चौरस आहार हा थायरॉईडला दूर ठेवण्यास महत्त्वाचा ठरतो. आयोडिन, लोह, अ जीवनसत्त्व यांचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन हॉर्मोन्सच्या उत्पादनाला चालना देते.

साखर आणि पिष्टमय पदार्थांचे मर्यादित सेवन करावे. या दोन्ही पदार्थांमुळे वजन वाढते. ज्यामुळे थायरॉइडच्या उत्पादनावर आणि अभिसरणावर परिणाम होतो.

तेल-तूप-चरबी वाढविणाऱ्या पदार्थांपासून दूर राहिल्याने हृदयविकार, डायबेटिससह हॉर्मोन्सच्या विकारांवर नियंत्रण मिळवता येतो.

दररोज ३० ते ६० मिनिटे व्यायाम केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे रक्तातील थायरॉइड शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते.


अर्थातच तुम्ही विचाराल हा आजार टाळण्यासाठी काय खावे. तर

◼️सफरचंद खाणं हायपोथायराॅयडिज्म समस्येत फायदेशीर मानलं जातं. कारण सफरचंदात फायबर आणि क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं. 

◼️बेरी गटातील फळं खावीत. स्ट्राॅबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो. बेरी आणि स्ट्राॅबेरी फळांमध्ये ॲण्टिऑक्सिड्ण्टसचं प्रमाण भरपूर असतं त्याचा फायदा थायराॅइड ग्रंथीला होतो. 

◼️संत्री खाव्यात. संत्र्यामध्ये क जीवनसत्व असतं. हायपोथायराॅयडिज्म समस्येत वजन कमी करण्यासाठी संत्री उपयुक्त ठरतात.

◼️अननसात क जीवनसत्व असते. त्यामुळे अननस अवश्य खा. 


आहाराची पथ्यं पाळल्यास थायरॉईड मध्ये वजन नियंत्रित ठेवणे शक्य होते.  

थायरॉईड ची समस्या असेल तर सोयाबीन, कोबी, ब्रोकोली, पनीर, बटर, जंक फूड, काॅफी यांचे आहारातील प्रमाण कमी करा. नियमित तपासणी करून वैद्यच्या सल्ल्याने आहार, औषधे घ्यावीत.

एक नक्की जर आहार व जीवनशैली व्यवस्थित केली तर थायरॉईडपासून नक्की सुटका होऊ शकते. 


*संकलन-* 


*डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



हृदयाची काळजी घ्या, कोलेस्टेरॉल कमी करा*

 *हृदयाची काळजी घ्या, कोलेस्टेरॉल कमी करा*


अनेक प्रकारचे आजार आहेत जे झाले तरी लवकर लक्षात येत नाही. काही वेळा विशेष त्रास न होता हे आजार बरे होतात. आजार कोणताही असू दे शरीराची हानी ही करतोच. हृदयाचेही तसेच आहे. हृदयावर ताण आल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा परिणाम लगेच दिसून येत नाही पण तो परिणाम जास्त त्रासदायक ठरू नये यासाठी हृदयाची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी किरकोळ स्वरुपाचा त्रास झाला तरी वैद्यकीय तपासणी करुन घेणे डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक उपचार करुन घेणे हिताचे आहे.


जग वेगाने प्रगती करत आहे, या प्रगतीसोबतच नवनव्या आजारांचा जन्म होत आहे. काही जुने आजार तीव्र स्वरुपात माणसाला त्रास देऊ लागले आहेत. यातच समावेश होतो कोलेस्टेरटल या आजाराचा. हा आजार अतिशय आरामात शरीरात प्रवेश करतो. एरवी फिट दिसणारे तरुण तरुणीही या आजाराला बळी पडू शकतात. नियमित वैद्यकीय तपासणी करणाऱ्यांना या आजाराचे संकेत लवकर मिळू शकतात. पण इतरांना हा आजार झाल्याचे कळायला वेळ लागतो. 


कोलेस्टेरॉलचा आजार जेवढा गंभीर आहे तेवढाच तो दूर करणेही सोपे आहे. पण त्यासाठी चिकाटी हवी, संयम हवा आणि सातत्य हवे. काही सोपे उपाय नियमित केले तर कोलेस्टेरॉलच्या आजारावर मात करणे शक्य आहे.


कोलेस्टेरॉल म्हणजे काय?


सोप्या भाषेत सांगायचे तर कोलेस्टेरॉल (cholesterol) हा रक्तात असलेला घटक आहे. शरीरात रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहावे वेगवेगळ्या अवयवांना ऊर्जा मिळावी यासाठी रक्तातील कोलेस्टेरॉलचा वापर होतो. नैसर्गिकरित्या शरीर कोलेस्टेरॉल तयार करते तसेच फास्ट फूड, जंक फूड, भरपूर तेलाचा वापर करुन केलेले पदार्थ यांच्या सेवनामुळे शरीरात कृत्रिम कोलेस्टेरॉल प्रवेश करते. शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की ते रक्तवाहिन्यांजवळ चिकटून नव्या भिंती, नवे अडथळे निर्माण करते. यामुळे शरारीत सतत सुरू असलेल्या रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम होतो. रक्ताभिसरणावर परिणाम झाल्यास तब्येत बिघडण्यास सुरुवात होते. शरीरात अतिरिक्त कोलेस्टेरॉलची निर्मिती होणे या आजाराला हायपर कोलेस्ट्रोलेमिया म्हणतात.


शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळते. कमी घनता असलेले लिपोप्रोटीन LDL आणि जास्त घनतेचे लिपोप्रोटीन HDL कोलेस्टेरॉल शरीरात आढळते. कोलेस्टेरॉलचे शरीरातील प्रमाण वाढण्याची अनेक कारणं आहेत. यातील २ प्रमुख कारणं


आहाराच्या तुलनेत शरीराच्या हालचाली कमी असणे फास्ट फूड, जंक फूड, भरपूर तेलाचा वापर करुन केलेले पदार्थ यांचे मोठ्या प्रमाणावर सेवन

जर वजन जास्त असेल तर दोन पैकी किमान एक आणि काही वेळा दोन्ही कारणांमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. रक्ताची कोलेस्टेरॉल तपासणी करुन घ्या. यात शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण समजेल. रक्तात 200 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर चिंतेची गरज नाही. पण रक्तात 200-239 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे हे लक्षात घ्या. जर रक्तात 240 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण चिंताजनक आहे. कारण हे हाय कोलेस्टेरॉल आहे. ज्यांच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते अशांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. 


कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याचे सोपे उपाय


-दररोज जास्तीत उकळलेले पाणी प्या.  


-दररोज सकाळी तुळशीची २-४ स्वच्छ धुऊन घेतलेली पाने चावून खा.


 -सकाळी एक ग्लास पाण्यात लेमनग्रास तेलाचे ५ थेंब टाकून ते पाणी प्या. 


-लिंबू पाण्याने धुवून घ्या नंतर दोन ग्लास पाणी भांड्यात उकळवत ठेवा. त्यात लिंबू पिळा आणि लिंबाच्या साली पाण्यात टाका. भांड्यातील २ ग्लास पाण्याचे एक ग्लास पाणी झाले की ते गरम पाणी प्या. लिंबाच्या साली टाकून द्या.  


-दररोज सकाळी ब्रश करण्याआधी लसणाच्या (Garlic) २-४ पाकळ्या चावून खा. 


-रोजच्या आहारात मर्यादीत प्रमाणात लसणाचा वापर करा. नारळाच्या तेलापासून (Coconut oil) तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करा. 


-माशापासून तयार केलेल्या तेलाचा (Cod liver oil) खाण्याच्या पदार्थांमध्ये वापर करा आणि त्या पदार्थांचे सेवन करा. 


-ज्या पदार्थांमधून ब३, क आणि ई जीवनसत्व (vitamine B3, C, E) मिळतात अशा पदार्थांचे सेवन करा.


 -दररोज दुपारच्या जेवणात एक वाटी दह्याचे सेवन करा. दही पदार्थांच्या पचनासाठी मदत करते. 


-फास्ट फूड, जंक फूड, तेलकट पदार्थ यांचे सेवन टाळा. 

-साखर आणि मैदा यांचा वापर करुन केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.



-बेकरी प्रॉडक्ट, चिप्स आणि वेफर्स खाणे टाळा. जेवणात --साखरेऐवजी गुळाचा वापर करा. 


-दररोज किमान एक तास वेगाने चाला. चालण्याचा व्यायाम लाभदायी आहे.

 ---------------------------------------------- 

 


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



जीवनसत्व -व्हिटॅमिन डी. गरज

 व्हिटॅमिन डी. 

नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ,

आज आपण व्हिटँमीन डी या विषयावर चर्चा करुन याचं महत्त्व, कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या,या विषयी जाणून घेणार आहोत.जगभरातील५०टक्के जनता याच्या कमतरतेमुळे त्रासलेले आहे. मग चला तर मंडळी पाहूया हा विषय नक्की काय आहे ते.

व्हिटॅमिन डीच्या मदतीने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते. व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असणं गरजेचं असतं. पण सद्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे व्यक्तीला नेहमी थकवा जाणवतो.

   

*आता आपण तांत्रिकदृष्ट्या या जीवनसत्वाचे महत्त्व समजून घेऊया.*

जीवनसत्त्व ‘ड’ हे कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांच्या शोषणाला मदत करते. हाडे तयार करणे आणि त्यांच्या ठिसूळपणापासून प्रतिबंध करणे. पेशींच्या निर्मितीत भाग घेणे आणि बाधित अथवा विकृत पेशींचा नाश करणे. प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणे.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/EiFGDjj0bY0B1VwZpV3ebm



*व्हिटँमीन डी ची कमी असल्यास काय समस्या तयार होतात ते पाहू.*

१)हायपरटेंशन किंवा उच्च रक्तदाब जाणवतो.

२)स्नायू आणि शरीरावर तणाव शरीरात अचानक वेदना.

३)निराशा आवश्यकतेपेक्षा अधिक वाढते,मानसिक त्रास होतो.

४)शरीर लहान-सहान रोगांना पेलू शकत नाही

५)घाम फुटतो,चिडचिडही होते.

६)मूड स्विंग होतो.

७)थकवा आणि आळस.

८)स्मरणशक्ती कमी होतेआणि भ्रम निर्माण होतात.

९) लहान मुलांमध्ये आणि प्रौढ अवस्थेत मुडदूस (रिकेट्‌स) हा आजार.

१०)वजन वाढते.

११)एखादी जखम झाल्यास लवकर भरत नाही.

१२)पचन विकृती तयार होते.

१३)केसांची गळती.

१४)प्रतिकारशक्ती कमी होऊन शरीर कायम बँक्टेरीयल व व्हायरल इनफेक्शन ची शिकार होतं.

१५)हाडात ठिसूळ ता आल्याने सारखं सारखं फँक्चर होण्याचा धोका, आँस्टीओपाँरोसीस ही होऊ शकतो.

१६)हार्मोनल इनबँलन्स होतो.

१७)कोल्ँस्ट्राँल चे कार्य बिघडते.

१८)पित्ताचा त्रास वाढू शकतो.

[12/20, 6:38 PM] वैद्य गजानन:

         *रक्त तपासणी.*

याचे शरीरातील ‘हाफ लाइफ’ (ज्ञात उधळण्याचा कालावधी) फक्त आठ तासांचा असून व्हिटॅमिन ‘डी टोटल’चा हाच कालावधी सुमारे पंचवीस दिवसांचा असतो. यामुळे व्हिटॅमिन ‘डी टोटल’ हीच चाचणी सर्वात जास्त ग्राह्य मानण्यात येते. ‘डी ३’ लिहिलेले असले तरीही व्हिटॅमिन ‘डी टोटल’ हीच चाचणी औषधोपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना बहुतांश वेळा अपेक्षित असते. व्हिटॅमिन ‘डी टोटल’ ही चाचणी रक्तातून होते आणि त्याचा नमुना कधीही देता येतो. याच्या सामान्य पातळीचे प्रमाण ३० ते ७० असते.

या अनुशंगाने ज्या भागावर याचा प्रभाव पडतो त्या भागांच्या टेस्ट ही केल्या जातात.

*कसे तयार होते हे जीवनसत्त्व.* *शरीरात कुठल्या रुपात कार्यरत असते.*

व्हिटॅमिन ‘डी’ म्हणजेच व्हिटॅमिन ‘डी टोटल’ असून ते ‘डी २’ आणि ‘डी ३’ या प्रकारांनी बनलेले असते. ‘डी २’ हे वनस्पतीजन्य असून ‘डी ३’ हे सूर्यप्रकाशातून, तसेच प्राणिज पदार्थांमधून मिळते.  

 व्हिटॅमिन ‘डी २’ आणि ‘डी ३’ हे दोन्हीही प्रकार हे थेट परिणामकारक नसतात. त्यांच्यावर यकृत आणि मूत्रपिंड यांमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर कॅल्सीट्रॉल नावाच्या संयुगात होत आणि हा प्रकार व्हिटॅमिन ‘डी’चा उपयुक्त प्रकार असतो.

        [12/20, 7:19 PM] वैद्य गजानन:

           *व्हिटँमीन डी नँचरली कशातून मिळत असते शरीराला.*

१)सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन ‘डी ३’ त्वचेखाली तयार होते.आठवड्यात दोन वेळा अर्धा-अर्धा तास कोणतेही लोशन न लावता शरीराच्या मोठ्या 

भागावर सूर्यकिरण पडल्यास त्या मात्रेत हे व्हिटॅमिन तयार होते. उन्हातून फिरणे कमी झाल्यामुळे हल्ली बहुतांश लोकात याची कमतरता आढळते.

२)याचा मुख्य स्रोत प्राणिज पदार्थ असतात. मटण, लिव्हर, लिव्हर ऑइल,मासे,

३)अंड्याचा पिवळा बलक.

४)दूध आणि चीज. 


*कमतरता कोणाला जाणवते.*

१)उन्हातून फिरणे कमी झाल्यामुळे हल्ली बहुतांश लोकात याची कमतरता आढळते. २)यकृत, मूत्रपिंड यांच्या आजारात शोषणप्रक्रियेत आणि विघटनप्रक्रियेत अडथळा आल्याने कमतरता उद्भवते. ३)काळ्या व्यक्तींमध्ये त्वचेतून सूर्यकिरणे शोधण्याच्या प्रक्रियेला मेलॅनिन नावाचे द्रव्य प्रतिरोध करते अन्‌ त्यामुळे त्यांच्यात कमतरतेचे प्रमाण अधिक असते.

४) वृद्ध मंडळी आणि स्तन्यपान देणाऱ्या माता यांच्यामध्येही कमतरता जास्त प्रमाणात आढळते.

५)गँस्ट्रीक बायपास सर्जरी झालेले,आँस्टीओपाँरोसीस, टिबी, थायराँईड, लिम्फोमा चे कँन्सर ग्रस्त,इ .मंडळी ना ही याची कमतरता भासते.

६)अँन्टीफंगल,एडस,कँन्सर,टिबी,कोलेस्टेरॉल च्या काही औषधा मुळे ही शरीरातील ह्या जीवनसत्वाची कमतरता भासते.

७)पाच वर्षापेक्षा कमी वयाची मुले.पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाचे वृध्द.


          [12/20, 7:51 PM] वैद्य गजानन:

*कशी भरून काढावी कमतरता.*

१)मासे हे जीवनसत्व मिळवण्याचे मोठे स्त्रोत असून यात काँड लिव्हर आँईलच्या गोळ्याचे सेवन आपण करू शकता.माशात पेडवा,रावस,व बांगडा ही कोकणात तसे *आमच्या गोव्यात* आढळणारी मच्छी आहारात जास्त असल्यास याची कमतरता भरून निघते.

२)मशरूम, सोयामिल्क,वेगवेगळी धान्य ही याचा नँचरल सोर्स आहेत.

३)चिकन,मटण यातील लिव्हर हे यासाठी बेस्ट आहे.

४)पनीर सह सारी डेरी प्राँडक्ट ही यासाठी बेस्ट आँफशन आहेत.

५)नेहमी अंडी खाणे ही या व्यक्तींना फायदेशीर आहे विशेषतः पिवळा बलक.

६)रोज नियमित संत्र्याचा ज्यूस प्यायल्यास ही याची कमतरता भरून येते.

    या पोस्ट च्या माध्यमातून आपल्याला या जीवनसत्त्वाचे महत्त्व ,कमतरतेमुळे होणारे त्रास,उणीव कशी भरून काढावी यासंबंधी विस्तृत माहिती देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आशा आहे आपणास ही पोस्ट ही इतर पोस्ट इतकीच आवडेल.


वैद्य. गजानन.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi