Friday, 5 May 2023

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बुध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा


तथागतांचा मार्ग चिरकाल अनुसरणीय


            मुंबई, दि.5 :- 'तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी तथागत बुद्धांच्या चरणी अभिवादन अर्पण केले आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वशांतीचा, सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाचा संदेश हा अनंतकाळ टिकणारा, त्रिकालाबाधित - चिरकाल असा आहे. त्यांनी दिलेल्या पंचशील तत्वांचा अंगीकार हा सगळ्यांच्याच उत्थानाचा मार्ग आहे. तथागतांचा आज जन्मोत्सव आणि ज्ञानप्राप्तीचा दिन. या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी प्रणाम. या बुध्द पौर्णिमेच्या पवित्र आणि मंगल अशा क्षणाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.

खारघर दुर्घटना, चौकशी

 


दाट केसांसाठी

 *दाट केसांसाठी*

1.बेसन आणि दही-बेसनात जरा दही मिसळा. डोक्यात खाज सुटत असेल तर चिमूटभर हळद मिसळा. आता हे मिश्रण केसांच्या मुळात लावा. आता डोक्यावर शॉवर कॅप घाला आणि अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

2.बेसन आणि अंडी :- हे शैंपू आणि कंडिशनरप्रमाणे परिणाम देतं. दोन चमचे बेसनात एका अंड्याचा पांढरा भाग मिसळा. यात एक चमचा लिंबू आणि मध मिसळा. सर्व व्यवस्थित मिसळून घ्या. आता हा मास्क केसांच्या मुळात लावा. थोड्या वेळ वाळू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

3.तेल लावावं - केसांमध्ये दजवळपास १ तास तेल मुरलं पाहिजे, त्यामुळे केसांच्या मूळापर्यंत तेल जातं. डोक्यावर कोमट तेलानं मालिश करावी आणि गरम पाण्यातून काढलेल्या टॉवेलनं डोकं झाकून घ्यावं. त्यानं केसांना वाफ मिळते. कोणत्याही तेलानं केस वाढतात असं नाही, बदाम तेल केसांसाठी उपयुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असतं.



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणा

 *🌹तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार...🌹*


*१) पोट :-* केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही....... 


*२) मूत्रपिंड :-* केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही...... 


*३) पित्ताशय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही........ 


*४) लहान आतडे :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता....... 


*५) मोठे आतडे :-* केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता....... 


*६) फुफ्फुसे :-* केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता........ 


*७) यकृत :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता...... 


*८) हृदय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही  जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता....... 


*९) स्वादुपिंड :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता...... 


*१०) "डोळे" :-*  केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता...... 


*११) "मेंदू" :-* केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता....... 


निसर्गाने "माेफत" मध्ये दिलेल्या शरीराच्या "अवयवाची" योग्य "काळजी" घ्या आणि त्यांना "बिघडवू" देऊ नका  शरीर "स्वस्थ" तरच आपण "मस्त".......


कारण----------


"शरीराचे" कोणते ही"अवयव" हे बाजारा मध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने सुट होऊन बसतीलच असे नाही म्हणून आपल्या "शरीरातील अवयवांची" नेहमी काळजी घ्या........


तुम्हीच आहात तुमच्या शरिराचे खरे राखणदार......


काळजी घ्या आपली व आपल्यांची.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*



Thursday, 4 May 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विषय तज्ज्ञांच्यासेवा उपलब्धतेसाठी शासन निर्णय निर्गमित

 महाराष्ट्र लोकसेवाआयोगाला विषय तज्ज्ञांच्यासेवा उपलब्धतेसाठी शासन निर्णय निर्गमित

            मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या विविध पदभरती परीक्षांच्या गोपनीय कामासाठी विषयतज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.


            आयोगाच्या गोपनीय व संवेदनशील कामकाजासाठी काही वेळेस शैक्षणिक संस्थांमधील संबंधित विषयांतील तज्ञांची सेवा उपलब्ध करुन घेताना आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा परिणाम परीक्षांच्या वेळापत्रकावर होतो. परिणामी शासन सेवेत कामकाज करण्यासाठी आवश्यक उमेदवार वेळेवर मिळू शकत नाहीत. त्यामुळे पुरेशा मनुष्यबळाअभावी शासकीय कामकाजाच्या गतिमानतेवर परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन विविध शैक्षणिक संस्थांमधील विषय तज्ज्ञांच्या सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगास उपलब्ध व्हाव्यात याकरिता या शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.


             या शासन निर्णयान्वये संबंधित सर्व शैक्षणिक संस्थांमधील अध्यापकीय संवर्गातील विषय तज्ज्ञांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सोपविण्यात आलेली गोपनीय व संवेदनशील कामे आयोगाने विहित केलेल्या कालमर्यादेत व दर्जात्मक स्वरुपात पूर्ण करुन देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विहित केलेल्या कालमर्यादेत संबंधित विषयतज्ञांची सेवा आयोगास उपलब्ध करुन देणे उपरोक्त शैक्षणिक संस्था प्रमुखांवर बंधनकारक राहणार आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विषयतज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी निगडित कामकाजासाठी समन्वयक म्हणून क्षेत्रीय स्तरावरील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजाच्या आवश्यकतेनुसार विषय तज्ज्ञांच्या सेवा आयोगास उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक सहकार्य करण्याची जबाबदारी अशा समन्वयकांवर राहणार आहे, असेही शासन निर्णयात म्हटले आहे.

चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्या

 चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्याराज्य शासनाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन


केंद्र सरकारच्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन


 


            मुंबई दि. 4 : चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी अर्ज करण्याचे तसेच, केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात कागदपत्रे सादर करावेत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाची (चांभार, मोची, ढोर, होलार) आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य शासन अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येतात, तर केंद्र सरकारतर्फे एन.एस.एफ.डी.सी. योजना राबविण्यात येते. 


            अनुदान योजना व बीजभांडवल योजनेअंतर्गत परिपूर्ण कागदपत्र असलेले कर्ज प्रस्ताव स्वीकारले जातील. तसेच एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समितीमार्फत निवड झाली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या सूचना फलकावर लावण्यात आली असून, संबंधित पात्र अर्जदारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह मुंबई शहर जिल्हा कार्यालय, खेरवाडी, बांद्रा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती पुराणिक यांनी केले आहे.

आरोग्य विभागाने ऑनलाईन प्रणालीचाउपयोग करून पारदर्शक बदली प्रक्रिया राबवावी

 आरोग्य विभागाने ऑनलाईन प्रणालीचाउपयोग करून पारदर्शक बदली प्रक्रिया राबवावी


- आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत


            मुंबई, दि. 4 : आरोग्य विभागाची आस्थापना मोठी आहे. दरवर्षी बदली प्रक्रिया राबविताना अधिकारी – कर्मचाऱ्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे विभागाने प्रथमच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून पारदर्शकपणे बदली प्रक्रिया राबवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या.


               मंत्रालयातील त्यांच्या दालनात आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर आढावा घेताना मंत्री श्री. सावंत बोलत होते. बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसचिव अशोक आत्राम, श्री. लहाने आदी उपस्थित होते.


               बदल्यांबाबत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचा आढावा घेताना मंत्री श्री. सावंत म्हणाले की, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी www.transfer.maha-arogya.com व अधिकाऱ्यांसाठी www.officerstransfer.maha-arogya.com ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली आहे. या ऑनलाईन प्रणालीवर बदलीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज करावयाचे आहेत. या प्रणालीमुळे सर्व कर्मचाऱ्यांचा डेटा एका क्लीकवर उपलब्ध झाला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसाठी व्यवस्था असून येथे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निश्चित कालावधीत निरसन करावे. या प्रणालीचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे चुका होतील. चुका सुधारण्यासाठी सहायक पथक तयार ठेवावे. तांत्रिक अडचणी, तक्रारी तातडीने सोडवाव्यात. तक्रारींचे निराकारण केल्यानंतरच तक्रार प्रणालीवरून काढावी. या प्रणालीसाठी ‘बॅक सर्वर’ तयार ठेवावा. सर्वर डाऊन होणार नाही, याची काळजी घ्यावी. सुरूवातीच्या दिवसांमध्ये प्रणालीविषयी आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी सेवा “24 बाय 7” सुरू ठेवावी.


                   मंत्री श्री. सावंत पुढे म्हणाले की, राज्यात दुर्गम भागातील आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचारी, अधिकारी व डॉक्टरांना मिळणाऱ्या विशेष सवलती, लाभ, सुविधांची माहिती देण्यात यावी. त्यामुळे मेळघाटसारख्या दुर्गम भागाकडे नियुक्त होण्यास कर्मचारी आकर्षित होतील. परिणामी, दुर्गम भागात रिक्त पदे न राहता नागरिकांना आरोग्य सुविधा मिळतील. आरोग्य विभागातंर्गत सातत्याने दवाखाने व अन्य इमारतींचे बांधकाम, दुरूस्ती करण्याची मागणी येत असते. त्यासाठी विभागाची स्वतंत्र बांधकाम यंत्रणा असावी, कायदेविषयक बाबी सांभाळण्यासाठी कायदेविषयक यंत्रणा असावी, याबाबत विभागाने तातडीने कार्यवाही करावी.


                  शासकीय रूग्णालयांमध्ये सर्व आरोग्य सुविधा नि:शुल्क करण्याबाबत कार्यवाही करावी. अन्य राज्यातील आरोग्य यंत्रणेचा अभ्यास करून त्यांच्याकडील चांगल्या बाबी राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी विभागाचे पथक पाठवावेत. राज्यात काम पूर्ण झालेले, अर्धवट असलेली व काही कारणास्तव सुरू न होऊ शकलेल्या रूग्णालयांची कारणांसह माहिती देणारा ‘डॅश बोर्ड’ तयार करावा. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यांच्या माध्यमातून गरीब रुग्णांना लाभ होत आहे. आपला दवाखाना येथून उपसंचालक यांनी रुग्ण संख्या, दिलेल्या सेवा, औषधी वितरण याबाबत दैनंदिन अहवाल घ्यावा. खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य दूत नेमून विभागाने गरीब रूग्णांना मदत करावी. तसेच रूग्णालयांमधील खाटांची संख्या, रिक्त खाटांची माहिती देणारे ॲप तयार करावे. औषधी प्राधिकरण स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. यामध्ये तयार करण्यात आलेल्या घटनेला विधी व न्याय विभागाकडून मान्यता घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत राज्यात औषधांचा पुरवठा थांबू नये, अशा सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिला.


                 बैठकीत सुंदर माझा दवाखाना, माता सुरक्षित- घर सुरक्षित अभियान, महिलांमधील स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान व उपचार, हिरकणी कक्ष स्थापना याबाबतही आढावा घेतला. बैठकीला आरोग्य विभागाचे उपसंचालक, अधिकारी उपस्थित होते.


००००

Featured post

Lakshvedhi