Thursday, 4 May 2023

म्हणून पाया पडायची पध्दत आहे...*

 *म्हणून पाया पडायची पध्दत आहे...*


चागंली पध्दत‌आहे, पण कलियुगात वाईट घडते?


●● *नमस्काराचे महत्व* ●●


● *महाभारताचे युद्ध सुरु होते.* 

   *दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे*

   *मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे*

   *ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून* 

   *देखील त्यांच्या सेनेची सतत हानी* 

   *होत होती..*


● *एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर* 

   *व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन* 

   *भीष्म पितामह घोषणा करतात की..*


● *"मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन.."*


● *त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या* 

   *शिबिरात पोहोचताच पांडवांची* 

   *अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या* 

   *क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..*


● *तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल* 

   *झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या* 

   *लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..* 


● *"माझ्या सोबत चल.."*


● *द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण* 

   *पितामहांच्या कक्षात पोहोचले.* 

   *ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर* 

   *उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,* 

   *आत जाऊन पितामहांना प्रणाम कर..*

 

● *सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत* 

   *जाऊन पितामहांना प्रणाम करताच,* 

   *"अखंड सौभाग्यवती भव" असा* 

   *आशीर्वाद त्यांनी तिला दिला..*


● *त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की,* 

   *"वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी* 

   *काय आलीस..??"* 


● *"माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे*

   *आले आहे आणि ते बाहेर थांबले* 

   *आहेत" असे द्रौपदीने सांगताच* 

   *श्रीकृष्णाला भेटायला पितामह* 

   *बाहेर आले आणि त्या दोघांनी* 

   *एकमेकांना प्रणाम केला..*


● *भीष्म पितामह म्हणाले..*

   *"माझ्या एका वचनाला दुसऱ्या* 

   *वचनाने मात देण्याचे काम फक्त*

   *श्रीकृष्णच करु शकतात.."*

 

● *शिबिरात परतताना श्रीकृष्ण* 

   *द्रौपदीला म्हणाले की, "बघ,* 

   *तुझ्या फक्त एक वेळ जाऊन* 

   *पितामहांना नमस्कार करण्यामुळे*

   *तुझ्या पतींना जीवनदान मिळाले,* 

   *हे तुझ्या लक्षात आले का..??*


● *जर तू दररोज नित्यनेमाने पितामह* 

   *भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या* 

   *मान्यवरांना नमस्कार केला असतास* 

   *आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या* 

   *पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू* 

   *पांडवांना नमस्कार केला असता तर* 

   *हि युद्धाची वेळच आली नसती..*


● *अशी असते नमस्कार* 

   *आणि आशीर्वादाची शक्ती..!!*


●● *तात्पर्य..*


● *वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच आहे की,*


*कळत नकळत आपल्या हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते..*


● *जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात..*

   *असे घर स्वर्ग बनू शकते..*


● *मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे*

   *कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही..* 

 

● *कारण..*


● *नमस्कारात प्रेम आहे..*

   *नमस्कारात विनय आहे..*

   *नमस्कारात अनुशासन आहे..*

   *नमस्कार आदर शिकवतो..*

   *नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..* 

   *नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..* 

   *नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..* 

   *नमस्कारात शीतलता आहे..*              

   *नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो..*

   *नमस्कार आपली संस्कृती आहे..*

   *ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे..*


*🙏 आपणास माझा साष्टांग नमस्कार !! 🙏*

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


शेती, आरोग्य क्षेत्रासाठी सौरऊर्जेवरील प्रकल्पांसाठी बँकेने सहकार्य करावे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. 3 : राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणावर असून शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी आशियाई एशियन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            मंत्रालयात एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित यावेळी उपस्थित होते.


            पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, उपलब्ध आहे. राज्याच्या शाश्वत विकासावर आम्ही लक्ष केंद्रित केले असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषीपंपांच्या योजनेसाठी एशियन इन्फ्रास्टक्चर इनव्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करावे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरविणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णालयांसाठी सौर उर्जा, माहिती व तंत्रज्ञान, शेतीसाठी सौर ऊर्जा आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. बँकेमार्फत सुरू असलेल्या एमयुटीपी प्रकल्पाच्या कामाबद्दल शिष्टमंडळाने यावेळी समाधान व्यक्त केले.


०००० 

खावटी कर्ज वाटप प्रक्रियेस गती द्यावी

 खावटी कर्ज वाटप प्रक्रियेस गती द्यावी


- सहकार मंत्री अतुल सावे.

            मुंबई, दि. 3 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्ज वाटप करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. यानुसार पात्र शेतकऱ्यांना उपलब्ध निधीतून कर्ज वितरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले.


            आज मंत्रालयात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खावटी कर्जमाफीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. सावे बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, आमदार राजन तेली, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहसचिव श्रीकृष्ण वाडेकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. सावे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विकास संस्थांच्या माध्यमातून खावटी कर्ज वाटप करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये अल्पमुदत पीक कर्जाबरोबरच अल्पमुदत शेतीपूरक खावटी कर्ज वितरीत केले जाते. मात्र, प्रलंबित २५ कोटीचे खावटी कर्ज विभागाकडे उपलब्ध असलेल्या निधीतून वितरित करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा. तसेच थकीत कर्जदार सभासदांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर लेखापरीक्षण करून अपलोड करण्यात आल्या होत्या, संबंधित पोर्टलही सुरू करण्यात यावे, असेही निर्देश मंत्री श्री. सावे यांनी दिले.


०००

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठीदरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती

 कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठीदरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश


 


            मुंबई, दि. ३ : कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ जणांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.


            वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही योजना मांडली होती. या योजनेअंतर्गत दरवर्षी २५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर केल्याबद्दल वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.


            वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग (THE च्या २०० च्या आतील किंवा QS – Quacquarelli Symonds रँकिंग १५० च्या आतील) परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. यापैकी तीस टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल. मरिन सायन्स, मरिन इकॉलॉजी, ओशोनोग्राफी, मरिन बायोलॉजी, मरिन फिशरीज, मरिन बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोडायव्हर्सीटी या अभ्यासक्रमांसाठी १५ पदव्युत्तर पदवी आणि १० पीएच.डी. अशा दरवर्षी २५ शिष्यवृत्ती दिल्या जातील. पदव्युत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे वय कमाल ३५ वर्षे आणि पीएचडीसाठी कमाल वय ४० वर्षे असावे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. या योजनेसाठी ३१ कोटी ५० लाख रुपये इतका खर्च येणार आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी पीएचडी करीता ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो, तसेच पदव्युत्तर पदवीकरीता २ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो ठरविण्यात आला आहे.


            या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. परदेशातील हा अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्याने दोन महिन्यांच्या आत कार्यकारी संचालक कांदळवन प्रतिष्ठान यांना अंतिम परीक्षेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र व प्रगती अहवाल, पदवीदान समारंभाचे छायाचित्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.


            राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे जैवविविधता या विषयावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार असून या क्षेत्राकडे नवतरुणांचे लक्ष केंद्रित होईल, असा विश्वास वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन यासाठी शासन कटिबद्ध असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात उचलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन श्री. मुनगंटीवार यांनी केले.


००००

भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त

 भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. 3 : भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त आहे. जगातील ज्या चांगल्या शिक्षण पद्धती अथवा चांगले अभ्यासक्रम असतील त्यांचा अवश्य स्वीकार करा. तथापि प्राथमिक स्तरावर भारतीय शिक्षण पद्धती योग्य असल्यास ती विनाकारण बदलू नका, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. तसेच इंग्रजीच्या अट्टाहासातून बाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी केले.


            महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) नियामक मंडळाची २५१ वी सभा आज शालेय शिक्षण मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. यावेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक तथा माध्यमिक शिक्षण संचालक आणि नियामक मंडळाचे सदस्य सचिव कृष्णकुमार पाटील तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि शिक्षण पद्धती पुरातन आहे. विद्यार्थ्यांना हसत - खेळत शिकवताना झालेला अभ्यास कायम लक्षात राहतो. त्यामुळे जे चांगले आहे ते स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, बालभारतीची पुस्तके आणि त्यासाठी साठवायचा पेपर खराब होणार नाही याची दक्षता घेताना राज्यातील गोडाऊन सुस्थितीत ठेवावेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत. जगात ज्या चांगल्या शिक्षण पद्धती आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी जाणून घेता याव्यात याअनुषंगाने एक संग्रहालय तयार करावे, असे सांगून हे संग्रहालय संशोधनासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


            सर्व शाळा इंटरनेटशी जोडल्या जाणार आहेत. यासाठी दुर्गम भागातील ज्या शाळांमध्ये नेटवर्क नाही, त्यांची माहिती घेऊन त्या उपग्रहाद्वारे जोडण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी केली. येत्या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध करून देण्यात येणारी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वेळेत मिळतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देऊन लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर आवडीची पुस्तके देखील शाळेत उपलब्ध करून द्या, असेही त्यांनी सांगितले.

ल व ल व ती विक्राळ ब्रम्हांडी ज्वाला

 



Noto की गड्डी देखी अपने

 


Featured post

Lakshvedhi